काही आर-एस-व्ही-पी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

१५-२० वर्षांपूर्वी बहुतेक मराठी मंडळात "कार्यक्रमाला जायच्या अगोदर कळवायचं" असलं काही नव्हतं. त्यामुळे जेवणाची व्यवस्था (आणि इतरही व्यवस्था) करणार्‍या कार्यकर्त्यांची बोंब व्हायची. कारण नक्की किती लोक येणार हे अंदाजपंचे ठरायचं. त्यावर उपाय म्हणून काही मराठी मंडळानी आरएसव्हीपी (R.S.V.P) करण्याची सोय, आणि जे आरएसव्हीपी करतील त्यांनाच जेवण मिळेल असे धोरण अंमलात आणायला सुरुवात केली. पण अचानक जेवणासाठी येऊन टपकायची सवय पिढ्यांनपिढ्या जोपासलेल्या मराठी माणसाला हे थोडं जड गेलं.

आज मराठी मंडळात आरएसव्हीपी करणे नेहमीचे झाले असले तरी सध्याच्या मायबोलीकरांच्या कुठल्याही GTG ला यातले बरेच प्रसंग आणि कारणे लागू पडावीत.

rsvp1.gifrsvp2.gifrsvp3.gifrsvp4.gifrsvp5.gif

लवकरच डीसीमधे GTG होतंय. पहिल्या चित्रावरून स्फूर्ती घेऊन व्हाईट हाऊसला तुम्ही येताय हे कळवून ठेवाच. पण ते सगळ्यात शेवटी सांगितलेलं, ते पण प्लीज विसरू नका !

(सर्व चित्रे जुन्या मायबोलीवरून पुनःप्रकाशित)

विषय: 
प्रकार: 

मस्त

Lol
'ए ओळखलं का मी कोण...' मस्त आहे!

>>व्हाईट हाऊसला तुम्ही येताय हे कळवून ठेवाच
नाही, तिकडे ऐनवेळी चालते. पार्टी क्रॅशर्स. Happy