पोह्यांची उकड

Submitted by नानबा on 10 February, 2010 - 16:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पोहे (पातळ - जाड कुठलेही चालतील)
दही
कढीपत्ता
२ हिरव्या मिरची
कोथिंबीर,जीरे,मोहोरी, हळद
मीठ

क्रमवार पाककृती: 

१ वाटी पोहे भिजवून घ्या. त्यात दोन मोठे चमचे दही (जेवढ आंबट तेवढ चांगलं) घाला.
ह्यात जीरे, मिरच्या, मीठ आणि जराशी कोथिंबीर घालून मिक्सर मधून फिरवा.
जीरे, मोहोरी कढीपत्ता, जराशी हळद घालून चळचळीत फोडणी करा आणि त्यात हे सगळं मिश्रण घाला.
एकदा हलवून झालं की एक वाफ येऊद्या.
वाफ आली की बाऊलमध्ये घालून थोडं तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खा.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे सव्वा माणूस ;)
अधिक टिपा: 

आवडत असेल तर जराशी साखरही घालू शकता.

ह्याची कृती जवळपास तांदळाच्या उकडीसारखीच असली तरी चव वेगळी लागते (पोह्यांच्या स्वत:च्या चवीमुळे आणखीन छान!)

गरम गरमच भारी लागतं.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याच पिठाचे डोसे पण मस्त लागतात (पण तेल जास्त पितात आणि मिश्रण थोडावेळ मुरायला लागतं - अगदी लगेच करून खाता येत नाहीत.)

मी केली आत्ता. Happy छान चव आहे. मी ती फोडणी घातली नाही, नुसते वाफवताना वरुन तेल घातले.
दगडी पोहे होते ते वापरले.

फोडणीतलं तेल, वरून तूप... बापरे नानबा वजन
>> हे हे हे.. कृतीत दिलय, म्हणजे मी घालून खाते असं नाही! Proud

मी पण करुन खाल्ली.
झकासच् ,
भरपुर कोथिंबीर घातली.
मी जाड पोहेच वापरले होते [ते कसे संपवायचे हाही मोठ्ठा प्रश्न होता तोही मस्तपैकी सुटला] Happy

मी परवा करुन पाहीन नानबा ( उद्या महाशिवरात्र आहे. Happy
सोप्पी, आणि लो कॅलरी वाटतेय कृती छानपैकी.
धन्यवाद.

अरे वा!! वेगळी कृती आहे ही.. मी पण करून बघणार.

रैना, शिवरात्रीचा उपास सोडायला लसूण घातलेली उकड का? Wink

मस्त कृती आहे. पोह्याची अजून एक यम्मी पण तेलकट रेसिपी नुकतीच कळलिये, पण नानबाला तेल आवडत नाही म्हणून लिहित नाही Wink Light 1

.

पोह्याची अजून एक यम्मी पण तेलकट रेसिपी नुकतीच कळलिये, पण नानबाला तेल आवडत नाही म्हणून लिहित नाही
>> हे हे हे.. थांबा मी माझं तेलाचं पोस्ट डिलीट करते.. (नाहितर पुढच्या प्रत्येक पाक कृतीत माझा उद्धार व्हायचा!;) )

लालू, मनिषा, HH - लगेच केलीत, सही आहात!

आज सकाळी खाल्ली, मस्त एकदम!! नवर्‍याला तांदुळाच्या पिठाची आवडत नाही पण ही आवडली. मला पण जास्त हिच आवडली. मी पातळ पोहे घेतले, मिक्सरची पण गरज पडली नाही. स्माशरने मस्त मऊ झाले. एकदम यम्म!! धन्यवाद नानबा!! फोटो काढणार होते गं, सकाळी घाई झाली पण जरा Happy

नानबा, मी केली आजच. पोहे भिजवले आणि दही भरपूर असणारच घरात ह्या गैरसमजात होते. डबा उघडून पाहिला तर पावही नव्हतंपण तोवर परतीचा मार्ग बंद झाला होता म्हणून केली. वाईट नाही लागली पण दही व्यवस्थित असायलाच हवं असं वाटलं तेव्हा आता जास्त दही असेल तेव्हाच करेन.

या पिठाच्या सालपापड्याही होतील की. करुन पाहिल्या पाहिजेत.
नानबा, तळायच्या नसतील तर मायक्रोवेवमध्ये करता येतील. Happy

नानबा. मस्त! पोह्याचे पापड असेच करता येतील अवन मध्ये थापून ठेवून. उकड जराशी कमी पातळ व दही न टाकता,थोडा सोडा टाकून. मी केले होते छान लागतात.

Pages