बघारे बैंगन

Submitted by सायो on 10 February, 2010 - 14:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक, दोन वांगी, तळायला आणि फोडणीला तेल, मोहरी,कढीपत्ता, गुळ, चिंचेचा कोळ (साधारण १,२ टीस्पून), आलं-लसूण पेस्ट (एक टिस्पून प्रत्येकी), मसाल्याकरता: किसलेलं सुकं खोबरं, जिरं,सुक्या लाल मिरच्या (चवीप्रमाणे),धणे आणि तीळ-कोरडे भाजून, शेंगदाणे- भाजून,२ ,३ लसूण पाकळ्या (मसाल्याकरताचे सगळे जिन्न्स साधारण एक-एक टेबलस्पून घ्यावेत), फ्रेश क्रीम साधारण अर्धी,पाव वाटी.
वरुन कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

वांग्याचे करंगळीएवढे लांब, उभे काप करुन तेलात तळून घ्यावेत. एकीकडे मसाल्याचे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यावेत. थोडं पाणी घालून पेस्ट केली तरी चालेल.
पातेल्यात तेल गरम करुन मोहरी आणि भरपूर कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यावर तळलेली वांगी घालावीत. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून नीट ढवळून घ्यावं व झाकण घालून एक वाफ काढावी. त्यावर वाटलेला मसाला घालून पुन्हा नीट मिक्स करुन घ्यावं. ह्यात चिंचेचा कोळ /पल्प व गुळ घालावा. वरुन फ्रेश क्रिम व कोथिंबीर घालून पुन्हा झाकण घालून वाफ काढावी व गरम गरम खावं.

वाढणी/प्रमाण: 
२,३ जणांकरता
अधिक टिपा: 

ह्यात टोमॅटो प्युरी घालूनही छान लागते. बाकी मसाला तोच.आमच्या इथल्या रेस्टॉरंटमध्ये ही भाजी 'बघारे बैंगन' ह्या नावाने मिळते म्हणून हेच नाव दिलंय.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण, संजीव कपूर, आणि जवळचं देसी रेस्टॉरंट.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाट्ते ते बघारे बैंगन नसून... बगारा(गा च्या खाली . असावा पण तो कसा द्यायचा) बैंगन असावं ..

हैद्राबाद ला बगारा बैंगन मसाला मिळ्तो.. जोशीं कडे.. मस्त लागतो.

रेसिपी मस्तच Happy

बरोबर मनस्विनी. हिंदीत नाही तर मला वाटतं कन्नड लोकं फोडणीला वगार म्हणतात.(मैत्रिणीला म्हणताना ऐकलंय जिच्याकडून ही रेसिपी मिळालीय). पण रेस्टॉ. मध्ये बघारे स्पेलिंग असतं.

जोशी मसाला हवा असल्यास मला सांगा मी पाकिटे भारतात तुमच्या पत्त्यावर पाठवेन. अरुण जोशी आपला मराठी उद्योजक भाउ आहे. त्याला मदत केलीच पाहिजे.

ग्रेवी जबरी आहे. मायक्रोवेव मध्ये थोडेसे तेल लावून वांगी ग्रिल करता येतील पण काही ठिकाणी तळणाला पर्याय नसतो ती चव साधायची असेल तर. अर्ध्या वाटीने काय होणार आहे.

सायो तुम्ही डायरेक कुक बुक लिहा बरे. मस्त रेसीपी असतात.

मलाही ते बगारेच आहे असे वाटते.
मामी त्या जोशी मसाल्याचा धंदा लै चांगला चालतो. त्यांचे बहुतक सगळे मसाले, लोणचे एकदम मस्त असतात. ऑर्डरी द्या गं पोरींनो मामीला. Happy

ह्म्म.. साधारण मसालेभातासारखाच आहे हा मसाला.. येप छान लागेल. तोंडलीचा मी पण विचार केलेला. Happy

आय्ला.. इथंही सगळे तेच म्हणताय्त काय..
बर. करुन बघायचं असेल तर मग आम्हाला बघायला मिळणे नाही.. Sad
कोणी केलं तर आम्हाला ही फोटो पाठवा रे भाईलोग्स~~

सायो, सध्या मायबोली बंद आहे ऑफिसमधे त्यामुळे (गूळपोळीसारखी) जाहिरात करता येत नाही Wink मी क्रीम नाही घातलं आणि १ टे स्पून धण्याच्या बरोबरीत प्रत्येकी चार टे स्पू तीळ, खोबरं आणि दाण्याचा कूट घातला. जे तयार झालं ते खूप भारी लागलं. वांगी तळायची पण हिम्मत नाही झाली. थोड्या तेलावर खरपूस परतून घेतली. आता एक एक करुन बघारे बटाटे, पनीर, कारलं करुन बघणार आहे Happy

Pages