शुर मायबोलीकर गेले "ढाक-बहिरी"वर.. !!

Submitted by Yo.Rocks on 9 February, 2010 - 15:33

सुन्या: " काय मग कसं वाटतय ?"
सम्या (समीर रानडे) : "बस्स झाला ट्रेक.. इथेच थांबेन म्हणतो "
विन्या (विनय भीडे) : "अरे त्या दरीएवढी फाटलीय "
योगी (योगायोग) : "आयला, मस्तच रे.. मजा येणार"
यो (यो रॉक्स) : "अरे ये तो शुरवात है !"

वरील उद्गार आहेत मायबोलीकरांचे.. शुरवीरांचे.. शुर मायबोलीकर्स ! ज्यास खालील घळीचे दृश्य कारणीभुत होते..
IMG_1568.JPG

निमीत्त होते 'ट्रेक मेटस' ग्रुपने आयोजीत केलेल्या "ढाक बहिरी" ट्रेकचे ! ज्यात आम्हा पाचजणांचा मायबोली ग्रुप आपला एक छोटेखानी जिटीजी पहिल्यांदाच अंदाजे २८०० फुट उंचीवर (तोदेखील पैसे देउन Proud ) साजरा करत होता.. ! त्यातच विन्याचा हा पहिलावहीला ट्रेक नि सम्याचा बर्‍याच कालावधीनंतरचा ट्रेक यामुळे धमालच उडणार होती !

कर्जत डोंगररांगेत विसावलेला हा "ढाक बहिरी" तसा एक अवघड ट्रेक म्हणुनच गणला जातो.. पण 'ट्रेक मेटस' ग्रुपवर असलेला विश्वास नि त्यांच्यासोबत आलेला अनुभव पाहता आमचे मायबोली शुरवीर नक्कीच हा ट्रेक सर करतील अशी खात्री होती ! म्हणुनच जेव्हा ह्या ट्रेकचा प्लॅन जाहिर झाला तेव्हा लगेच वरील नमुद केलेल्या माबोकरांना त्यांच्या विनंतीनुसार कळविले नि सगळे तयार झाले ! सोबतीला माझ्याच सोसायटीतील एक मित्र नि एक मैत्रीण असे दोघे ट्रेकसाठी दाखिल झाले ! या दोघांमध्येपण तीचा पहिलावहीलाच ट्रेक नि दुसर्‍याला फक्त तोंडओळख होती ट्रेकची ! म्हटले काही खरे नाही ! पण धमाल येणार हे नक्की होते !

सुन्या वगळता बाकीचे पहिल्यांदाच येत असल्याने बर्‍याच प्रश्न्नांना उत्तरे द्यावी लागतील हे जाणुन होतो.. 'काय-काय आणायचे' 'कोणते बुट घालायचे.. ' 'खाण्याची सोय..' 'इत्यादी इत्यादी..' या सगळ्या प्रश्न्नांमध्ये सम्याचा 'आमचे 'ते' औषध आणले तर चालेल का ? ' हा बाउन्सर होता.. Proud नि विन्याने तर अगदी फॉर्मॅलिटीमध्ये जेव्हा विचारले की "तिथे अंघोळीची सोय आहे का ?" तेव्हा खुप हसु आले... काय करणार.. इथे आम्ही ब्रशपण करत नाही नि हा मालक अंघोळीचे विचारत होता Proud त्याच्याच भाषेत सांगायचे तर ट्रेकर्सलोकांचा पिंडच वेगळा असतो !

असो.. ठरल्याप्रमाणे आम्हाला शनिवारी दादरहुन दुपारी २.४० ची सिंहगड एक्सप्रेस पकडायची होती ! 'दादर ते लोणावळा' नि 'लोणावळा ते कामशेत' असा प्रवास ठरला होता ! तिथुनच मग एसटीने (शेवटची संध्या. ७.०० ची शेवटची ) जांभिवली गाव गाठायचे होते.. सुन्या नि सम्या इतर पुणेकरांसहीत थेट कामशेतलाच भेटणार होते.. आम्हाला बोरिवलीहुन निघताना उशीर झाला पण कसेबसे करत आम्ही एकदाचे ठरल्या वेळेत गाडी पकडण्यात यशस्वी झालो.. गाडी पकडली होती सिंहगड एक्सप्रेस पण तिकीट ठाण्यापर्यंत.. उशीर झाल्याने पुढचे तिकीट काढण्याचे काम ठाण्याहुन चढणार्‍या योगीला दिले होते ! ठाण्याला योगी भेटला नि तिथेच बाकीचे ट्रेकमेटस चढले..

सव्वासहाच्या सुमारास आम्ही कामशेत गाठले नि तिथेच मुंबई पुण्याचे सर्व ट्रेक मेटस जमा झाले.. इथुनच मग आम्ही एसटी स्टँड गाठले ! तिथे आधीच एक ट्रेकींग ग्रुप ठाण मांडुन होता.. म्हटले ट्रॅफिक जॅम होणार तर ढाक बहिरीवर.. आधीच 'ट्रेकडी' नावाचा ग्रुप येणार आहे असे कळले होते.. नशिब असे की हा ग्रुप 'कळकरायचा सुळका' (ढाक किल्ल्याला लागुन असलेला सुळका) सर करण्याचा बेतात इथे आला असल्याचे कळले.. एसटी जशी आली तशी ट्रेकर्समंडळीने लगेच फुल करुन टाकली ! गाडी सुरु होताच धमालगाण्यांनी जोर धरला.. या गोंधळात एसटीने आम्हाला जांभिवली गावात कधी आणुन सोडले कळलेच नाही.. इथेच एका घरात आमची जेवणापाण्याची सोय केली गेली होती.. तत्पुर्वी हसतखेळत आपापली ट्रेकमहती सांगत ओळखपरेड झाली.. जेवणपाण्यास काही वेळ असल्याने बहुतेक सर्वांनी मग तिथेच अंधारात बाहेर रपेट मारण्यास गेले.. थंडीचा प्रभाव तसा कमी होता पण हळुहळु वाढतही होता.. आमच्या गुजगोष्टी चालु असतानाच सम्याची हालत मात्र वाईट झाली होती.. त्याला थंडी तर लागलीच होती पण भुकही जोरदार लागली होती.. एकदाचे चुलीवरचे जेवण तयार झाले नि 'डाळभात, भाकरी' सोबत असलेली झणझणीत गावठी लसुणचटणी नि बटाट्याची भाजी सगळ्यांनी चोपुन खाल्ली ! थंडी वाढल्याने जेवणावरच नंतर चहा घेण्यात आला नि सगळे तयारीला लागले ! थंडी रोखण्यासाठी आपापली अस्त्रे बाहेर काढु लागले.. पाणीदेखील भरुन घेण्यात आले कारण इथुन पुढे ट्रेक संपेपर्यंत पाण्याची कुठेच सोय नव्हती..

रात्रीच चढाई करत ढाकच्या पायथ्याशी जाउन राहण्याचे ठरले होते.. त्यानुसार 'एओ' 'एओ' (ही ट्रेकमेटसची भाषा..) अशी एकमेकांना साद घालत सगळे आपापल्या परिने टॉर्चच्या प्रकाशात चालु लागले ! आम्ही मायबोलीकर्स मागेपुढे राहुन एकमेकांना बॅकलिड करत होतो Proud या अंधारात एका अतिउत्साही ट्रेकरमुळे दोनतीनदा रस्ता ओळखण्यात कधीनाहीतो गोंधळ उडाला.. वाटले आमचा भुलभुलैय्या झाला की काय.. पण वेळेतच लिडरलोकांनी सगळ्या ग्रुपवर नियंत्रण मिळवले नि सर्वांना सुचना देत पुन्हा सगळ्यांचे हेडकाउंट करत नव्या जोमाने सुरवात केली.. काही वेळेतच चढणीची वाट लागली नि अंगावर घातलेली जाकीट, स्वेटर्स नकोशी वाटु लागली ! बाकी चांदण्यात रातकिड्यांची किर्रकिर्र ऐकत चालताना मस्तच वाटत होते.. त्यात आमची थट्टामस्ती सुरुच होती ! एका वळणावर तर आम्हाला जमिनीवरच तारे (दुरवरच्या शहरातील उजळणारे दिवे) दिसले तेव्हा कळले आम्ही बरीच उंची गाठलीय.. अंधारातून ते दिवे बघताना मस्तच वाटत होते..
आम्ही फारच कमी वेळेत आम्ही उंचावर आलो होतो.. तिथुनच पुढे वाट पुन्हा उतरणीची होउन जंगलात शिरली.. ( हातात टॉर्च घेउन असे उंचवटे नि घसरणीची वाट पार करणे म्हणजे जरा कसरतच ) शेवटी रात्री दोनअडीचच्या सुमारास आम्ही जंगलात ढाकच्या पायथ्याशी येउन पोहोचलो.. चोहोबाजुला गर्द झाडी होती.. नि तिथेच जमिनीवरील पालापाचोळा बाजुस करुन झोपण्याची तयारी केली.. तर एकीकडे हौशी लोकांनी कॅम्पफायर सुरु करुन गप्पागाणी सुरु केली.. सुन्या वगळता आम्ही शुरवीरांनी चुपचाप झोपेवरच लक्ष एकाग्रत करण्यात धन्य मानले नि झोपण्याचे प्रयत्न सुरु केले.. यांत सम्या पटकन यशस्वी झाला नि त्याचा विपरीत परिणाम बाकी सगळ्यांच्या झोपण्यावर झाला.. Sad काय करणार.. ह्याने आपली घोरण्याची मशिन त्या जंगलात मोठ्या दिमाखाने सुरु केली होती.. Lol
पुढील चढाई पहाटे पाच-सव्वापाचच्या सुमारास उठुन करण्याचे ठरले होते.. त्याप्रमाणे दोघातिघांनी मोबाईलचा गजर लावुन ठेवला होता.. पण पाच साडेपाच झाले तरी हवे तसे उजाडले नव्हते त्यामुळे सगळ्यांनी साखरझोपेचा आस्वाद घेण्याचे ठरवले.. एव्हाना पहाटेची बोचरी हवा त्रास देउ लागली नि शेवटी एकेक करत सगळे उठु लागले.. पुन्हा विझलेली कॅम्पफायर प्रज्वलित करण्यात आली.. ही थंडीची कृपा.. Happy सगळ्यांचे उठुन झाल्यावर आमच्या सम्याला जाग आली !!
अर्ध्या एक तासांतच आम्ही वाट धरली नि काही क्षणातच आम्ही जंगलाच्या बाहेर पडलो.. छोटेसे मातीच्या ढिगाराचे चढण पार केले नि आम्ही घळीत येउन पोहोचलो.. स्वागतासाठी वार्‍याने जोर धरला होता... डावीकडे कळकरायचा सुळकाच्या डोंगर नि उजवीकडे ढाकबहिरीचा डोंगर अशा घळीमध्ये येउन पोहोचलो ! तर समोर आ करुन बसलेली खोल दरी ! त्या घळीतुनच खाली उतरायचे होते !!
IMG_1577.JPG
इथेच अननुभवी ट्रेकर्संचा (अर्थातच आमचे दोन मायबोलीवीर नि माझ्या सोसायटीतले ते दोघे) यांचा थरथराट सुरु झाला ..

इथेच अननुभवी ट्रेकर्संचा (अर्थातच आमचे दोन मायबोलीवीर नि माझ्या सोसायटीतले ते दोघे) यांचा थरथराट सुरु झाला.. कारणही तसेच होते.. जंगलातुन अचानक डोंगर समोर येतो .. नि थोडे चढले तर दोन डोंगराआड लपुन बसलेल्या दरीचे अचानक दर्शन होते.. बरं त्याची खोली पण जवळ गेल्याशिवाय दिसत नाही.. सगळ्यांना उत्सुकता होती दरी जवळुन बघण्याची.. तेव्हा सगळे एकेक करत टणाटण उड्या मारत घळीतुन खाली उतरु लागले.. इथे सम्याच्या मर्यादा उघड्या पडु लागल्या..
DSC03636.JPG
(उडी मारु की नको च्या विवंचनेत सम्या Proud )
पाचदहा मिनीटांतच घळ संपते.. नि तिथुनच खालील कड्यावर उतरायचे होते..
DSC03638.JPG
खाली उतरले की त्या निमुळत्या वाटेवरुनच पुढे जायचे होते..
IMG_1592.JPG
(घळीतुन बाहेर कड्यावर उतरताना)

सगळे एकेक करत खाली उतरले नि तिथेच थोड्याफार प्रमाणात असणार्‍या मोकळ्या जागेत विश्रांती घेउ लागले.. इथेच नाश्तापाणी करण्याचे ठरले.. नाश्तापाणी सुरु करताच आम्ही ज्यांच्या राज्यात प्रवेश केला होता ती वानरसेना हजर झाली.. Happy

इथुनच बसल्या बसल्या समोर खोल दरी मस्तपैंकी बघता येत होती.. गर्द झाडी छानच उठुन दिसत होती.. नि दुरवर राजमाचीचे बालेकिल्ले नजरेस पडत होते... येथील निरभ्र शांतता भंग करण्याचे काम घोंघावणारा वारा उत्तमरित्या पार पाडत होता.. त्यामुळे किनार्‍यावर गेले असता शांततेत जसा समुद्रीलाटांचा आवाज येतो तसाच काहीसा आवाज दरीतुन येत होता..
DSC03654.JPG
खुपच छान वाटत होते..
नाश्तापाणी आटपुन काहिजण पुढे निघाले तर आम्ही पाचसहाजण मागे राहिलो.. पुढे असलेली निमुळती वाट नि एक आड येणारा रॉक पॅच म्हणुन बॅग इथेच ठेवण्याचे ठरले.. ! आमच्या बॅगा इकडेच सोडुन जायचे तर वानरसेनेचा डोळा होता.. !

माझ्या सोसायटीतले ते दोघे दरी बघुन चांगलेच टरकले होते त्यामुळे त्यांनी इतरांबरोबर पुढे जाण्याचे (सरकण्याचे :P) ठरवले ! आम्हाला इथेच टाईमपास करण्यात पर्याय नव्हता.. पण फार काळ थांबवेना शेवटी आम्ही दोघांना मागे ठेवुन पुढे निघालो.. पण आधी पुढे गेलेल्यांपैंकी काहीजण जोपर्यंत परत खाली येत नाहित तोपर्यंत थांबणे भागच होते.. मागे वळुन पाहिले तर "कळकरायाचा सुळका" पुर्णतः नजरेत मावला Happy
DSC03672.JPG
(विन्याराव नि "कळकरायाचा सुळका" )

या सुळक्यावरदेखील चढाईसाठी जे लोक आले होते त्यांची हालचाल दिसत होती.. मनात आले की आपण तिकडे गेलो असतो तर अधिक मजा आली असती ! Proud कारण अजुन तरी म्हणावे तसा इथे पॅच काहि सामोरे आला नव्हता.. एव्हाना आमचे शुरवीर पण बसुन आराम करुन चांगलेच स्थिरावले होते.. बाकी सगळे पुढे गेले होते.. पुढची वाट थोडी रंगतदार होती.. सांगायचे झाले तर उतरणीच्या त्या खडकाळ वाटेवर सरळ चालत जायचे होते ! उतरणीची वाट असल्याने स्वतःला देखील त्या खडकाळ भागावर स्पायडरमॅन बनुनच बहुतेक जण जात होते.. शेवटी तोल ढासळला तर दरी होतीच तोंड उघडुन.. ! या वाटेचे अंतर जेमतेम १०-१५ फुटाचे होते.. पण खबरदारी म्हणुन आमच्या लिडरलोकांनी आधीच रोप लावुन ठेवला होता ! ( हे बघुन आमच्या शुरवीरांना निश्चितच हायसे वाटले असेल Happy )

एकाचवेळी गर्दी होउन चढता- उतरताना गोंधळ होउ नये म्हणुन आम्हाला इथेच थांबवण्यात आले होते.. त्यातच मुलींना पहिले वरती गुहेत(ही काही अजुन नजरेस पडत नव्हती) पाठवले होते.. नि येथे स्त्रीयांना मज्जाव असल्याने गावकरी येण्याच्या आत उतरवयाचे होते.. आम्ही टाईमपास म्हणुन फोटोशुट सुरु केले.. नको तितकी टॉम क्रुसगिरी (मिशन इमपॉसिबल चित्रपटातला टॉम क्रुस) दाखवु लागलो.. Proud
vinay.JPG
(हे शुरवीर दगडाचा गुळगुळीतपणा तपासत आहेत की चढाईचा ड्रामा करत आहेत ते ओळखा ? Proud )

आमचे असले भयानक फोटोशुट सुरु असतानाच एक गावकरी या वाटेवरुन पुढे गेला.. तेव्हा कळले आता वरच्यांना बोलणी खावी लागणार.. (दर ट्रेकला इथे ट्रेकर्स मंडळी नि काही संतप्त गावकरी यांच्यात ह्या स्त्रीच्या मुद्द्यावरुन वाद होतो असे कळले.. देणगी दिली की त्यांचा राग थंड होतो म्हणे.. ) आम्ही शेवटी वाट बघत बसण्याचा संयम बाजुला ठेवुन त्या १०-१५ फुटी वाटेने पुढे जाण्याचे ठरवले.. नि आमचे मायबोलीकर शुरवीर सावध झाले.. ट्रेकमेटसमधील मित्र, मी नि सम्या असे पुढे जाऊ लागलो.. तर मागुन विन्या, योगायोग येत होते.. सम्या एकाग्रतेने काळजीपुर्वक , थरथरत, कष्ट घेत कसाबसं ५-६ पावलं पुढे सरकला ! तोच वरतुन आवाज आला.. "मुलींना खाली उतरवत आहोत तेव्हा पुन्हा मागे जा.. रस्ता जॅम होईल " झालं.. सम्याचा चेहरा बघण्यासारखा होता.. Lol म्हटले " पुढच्या रॉक पॅचचा सराव इकडेच करुन घे.." Proud
पणं काहिही म्हणा.. कॅमेरा काढला की समोरच्याचे टेन्शन दुर होते.. Happy हे खालच्या फोटोतुन कळेलच
samyaaa.JPG

वरतुन कोणी उतरत नाही बघुन आम्ही शेवटी वैतागुन कुच केले.. मी थोडे पुढे गेलो कारण सोसायटीतले ते दोघे दिसत नव्हते.. नि वरती पाहिले तर एक मित्र गुहेतुन आपण जिंकल्याचे हातवारे करत होता.. Happy IMG_1641.JPG

तेव्हाच गुहेचे पहिले दर्शन झाले.. इथे जाण्यासाठी दोन टप्प्यात रॉक पॅचेस होते.. पहिला टप्पा स्वतःहुन चढायचा होता तर दुसर्‍या टप्प्यात बांबु-दोरीचा आधार घेत वरती चढायचे होते.. !त्या १०-१५ फुटी वाटेच्या अगदी डोक्यावरती होती ती गुहा.. मी वरती चढलो तोच आमच्याच ग्रुपमधली एकजण दोन्ही टप्पे पार करत खाली येत होती.. तिला वाट देण्यासाठी पुन्हा थांबावे लागले.. तर मागे आमचे मायबोली शुरवीर विचारपुर्वक पावले उचलत ते १०-१५ फुटांचे अंतर कापण्यात मग्न होते.. Proud
IMG_1652.JPG
इथे सम्या अग्रेसर होता पण एकाठिकाणी त्याचा पाय काहीकेल्या पोहोचेना.. जिथे पाय टेकवायचे ते अंतर बर्‍यापैंकी लांब होते.. प्रयत्न करुनदेखील सम्याचे पुढचे पाउल उचलत नव्हते.. स्वारी अडकली होती.. पण मघाशची जी युवती खाली उतरली होती ती मग सुचना देउ लागली.. आता मात्र एक युवती आपल्याला सांगतेय म्हटल्यावर सम्याची छाती भरुन आली.. नि 'केलेच पाहिजे (नायतर पोपट :P)' च्या धर्तीवर लगबगीने पाय टेकवला.. नि धडपडला.. अजुन जरा जास्त धडपड झाली असती तर स्वारी खोली मोजायला नक्कीच गेले असते.. Proud
पण काहीही म्हणा.. सवय नसतानादेखील शुर मायबोलीकरांनी सुरु ठेवलेली कासवदौड (!!) कौतुकास्पद होती.. शेवटी आम्ही ट्रेकींगचा पुरेपुर आस्वाद घेत होतो.. Proud आता आत्मविश्वासही वाढला होता..
IMG_1658.JPG
(पहिला टप्पा पार करताना.. सम्या दि ग्रेट )
---------
IMG_1657.JPG
(विन्या नि योगायोग)

पहिला टप्पा पार केला नि खाली पाहिले तर अजुन काही गावकरी गुहेतील भैरोबाच्या दर्शनासाठी येत होते.. ते क्षणात कधी चढले.. आमच्यापर्यंत पोहोचले नि कधी वरती गुहेत पण गेले कळलेच नाही.. नि त्यांच्या पायांत साधी चप्पलपण नव्हती.. फक्त एक पिशवी होती ज्यात बळी देण्यासाठी कोंबडा घेतला होता..

पहिला टप्पा पार करताच दुसरा नि शेवटचा रॉक पॅच लागतो.. हाच काय तो त्यातल्या त्यात कठीण.. पण जितके ऐकले होते तितका कठीण नाही वाटला.. कदाचित व्यवस्थित रोवलेला बांबु नि पकडण्यासाठी बांधलेल्या दोर्‍या.. पुर्वी हा बांबु पण एका दोरीला लटकत असल्याचे ऐकुन होतो.. अशा लटकत्या बांबुला धरुन चढणे म्हणजे आगळावेगळाच थरार असावा तो ! असो.. सद्यस्थितीत प्रथमच वा बर्‍याच कालावधीनंतर असा ट्रेक करणार्‍या शुरवीरांना इतकेच खुप होते.. त्या बांबूपर्यंत जाण्यासाठी एक तार लावली आहे तिचाच वापर करुन तिथे सहजरित्या पोहोचता येते..
IMG_1681.JPG
-------
070220101544.jpg
(बांबुपाशी पोहोचताना)
-------
इथुनच मग व्यवस्थित रोवलेल्या भक्कम बांबुचा आधार घेत वर चढावे लागते.. आमच्या लिडरलोकांनी खबरदारी म्हणुन दोरी कमरेभोवती गुंडाळत होतेच ! शिवाय इतर दोर्‍यादेखील लटकत होत्या.. एकंदर म्हटले तर सोप्पे होते तसे चढणे..
IMG_1686.JPG
गुहेत पोहोचताच पादत्राणे काढुन आम्ही गुहेत प्रवेश केला.. इथेच भैरोबाचे मंदिर, पाण्याचे बर्‍यापैंकी मोठे टाके (ज्यात धुवुन इथेच ठेवलेली भांडी दिसतात) दिसते.. एकंदरीत बरीच मोकळी जागा आहे या गुहेत.. इथेच कोंबड्याचे बलिदान केले जाते.. (आम्हाला त्याचा प्रसाद मिळेल या आशेवर होतो पण फोल ठरली Sad )
cave.JPG
---
अशी गुहा मिळाली की क्षणभर साधुचे नाटक करायला हवेच..
yogayog.JPG
इथुनच आम्ही दोन टप्प्यात पार पडलेला रॉक पॅच पुर्णतः दिसतो..
ohlala.JPG

तेव्हा शुरवीरांना त्यांच्या कामगिरीबाबत कौतुक वाटले नाही तर नवलच Happy इथे आम्ही ढाकबहिरी काबिज केली होती तर दुसरीकडे त्या कळकरायाच्या सुळक्यावर चढाई करणारा ग्रुप शेंड्याच्या समिप आला होता.. त्यावेळी झुम मारुन टिपलेला फोटो..
IMG_1703.JPG
पोटभरुन फोटोशुट करुन आम्ही परतीला लागलो.. उतरतानाही शुरवीरांनी मोठ्या आत्मविश्वासाने कामगिरी पार पाडली..
IMG_1726.JPG
(शूर मायबोलीवीर.. कट्ट्याचे मालक Proud )

तिथुनच आम्ही पुन्हा जिथे बॅग्ज ठेवल्या होत्या तिथे येउन पोहोचलो.. तिकडेच थोडीफार पेटपुजा उरकुन पुन्हा घळीत प्रवेश केला.. आता मात्र सगळे जोशमध्ये होते.. ट्रेक संपलाच असे समजत होते.. विन्यानेदेखील आपल्या बायकोला आपण सुस्थितीत असल्याचे कळवले.. काहिही दुखणे न झेलता ट्रेक संपवला असे अभिमानाने सांगितले.. पण खरी गंमत पुढे होती.. Proud जंगलातच जेवण उरकुन आमचा ग्रुप पुणेकर नि मुंबईकर असा वेगळा होणार होता.. पुणेकर आम्ही आलेल्या वाटेनेच (कामशेतमार्गे) परत जाणार होते तर मुंबईकर कर्जतमार्गे परतणार होते.. मुंबईकरांची वाट खुप लांबलचक, खडतर नि वेळखाउ होती.. यावेळी मात्र सुन्या नि सम्या यांच्यात मतभेद होते.. सम्या अर्थातच पुणेकरांबरोबर जाण्याच्या विचारात तर सुन्या नविन वाट बघण्याच्या इराद्यात होता.. पण एकमेकांना अर्ध्यावर सोडतील तर माबोकर कसले असा सुविचार करत सम्या जाता जाता आमच्यात आला नि पुन्हा धमालमस्ती करत, गाणी म्हणत आम्ही जंगलातुन खाली उतरु लागलो... Happy

दुपारची वेळ असल्याने काहि वेळेतच घामाच्या धारा वाहु लागल्या.. घशे कोरडे पडु लागले.. अशावेळी पाण्याचे मह्त्त्व जास्त कळून येते Happy उतरताना मात्र वाट काही संपत नव्हती..
IMG_1743.JPG
ढाकबहिरीला मागे सोडले तरी वाटेला काही अंत नव्हता.. मध्येच उतरण नि मध्येच चढण.. त्यातच तापदायक वातावरण.. नवख्या ट्रेकरला एकदम प्रतिकुल अशी परिस्थिती होती.. नि पहिली शिकार माझ्या सोसायटीतुन आलेल्या मैत्रीणीची झाली.. "बस फक्त अर्धातास... पुढची पंधरा मिनीटे.. हाच शेवटचा डोंगर..." असे नेहमीच्या युक्ती वापरत तिचे मनोबल वाढवत होतो... जास्तीत जास्त वेळ चालवत राहणे नि वेळेत पोचणे हेच यांमागचे उद्दीष्ट होते.. नाहितर खाली गावात पोहोचेपर्यंत रात्र झाली असती..

इथे हा प्रयत्न चालु असताना आमचे दोन शुरवीर (सम्या नि विन्या) थकले होते.. विन्याने तर क्षणाक्षणाला घसरुन पडण्याचा सपाटा लावला होता.. त्याच्या बुटांनी विन्यावर भलताच राग काढायचे ठरवले होते Proud नि विन्यादेखील पडला की " अरे ही माझी बसण्याची स्टाईल आहे" असे म्हणत गंडवण्याचा असफल प्रयत्न करत होता.. Lol ह्याला बायकोला आपली सुस्थिती फारच लवकर कळवल्याचे राहुन राहुन वाटत होते.. ! एकीकडे सम्याला आपण केलेला सुविचार किती अयोग्य होता याचा पश्चाताप झाला होता.. घामाच्या धार पुसताना सुन्याच्या नावाने शंखही फुंकत होता.. Lol पण योगायोग मात्र सुरवातीपासुन फ्रेश होता तसाच होता.. जल्ला ह्याला कायबी फरक पडत नाय.. मी, सुन्या नि इतर सगळे उनाला कंटाळले होते पण हा मात्र टवटवीत.. शेवटी तीन चार तासाच्या तंगडतोडनंतर एकदाचे गाव लागले..
IMG_1750.JPG
(पार्श्वभुमीला ढाकबहिरीचा डोंगर)
तिथेच एका शाळेत असलेल्या बोअरवेलवर सगळ्यांनी धाव घेतली.. तिथेच फ्रेश होउन मग एका घरात चहापाण्यासाठी पहुडले नाहितर अक्षरक्षः लोळत पडले होते.. उन्हाने कासावीस झाले होते.. पाचेक मिनिटानंतर चहा आला नि ट्रेकमधील पेटपुजेचा अंतिम कार्यक्रम सुरु झाला.. आमच्या विन्यावर तर ट्रेकचा इतका प्रभाव पडला की चिवडा खाताना पण म्हणत होता.."एक शेवटचा पॅच(हात) मारतो" Proud ह्याने आयुष्यातली सर्वात मोठी तंगडतोड केली होती..
काहिअवधीतच साडेपाचची एसटी आली नि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.. एकंदर शुर मायबोलीकरांच्या सहभागाने ट्रेक खुप धमाल झाला होता.. पण अख्ख्या ट्रेकमध्ये आम्हाला फक्त माबोकरांचा फोटो घेता येत नव्हता.. आला नव्हता.. यावरुन कळेल की ट्रेकमेटस मध्ये सगळेच मित्र बनुन जातात.. नविन जुने एक होउन जातात.. पण अथक परिश्रमानंतर आम्ही एक फोटु काढलाच Proud
शुर मायबोलीकर जाउन आले ढाक बहिरीवर...
grou9.JPG

समाप्त. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही. यो तू असे सारखे धडाधडा ट्रेक करत असतोस याच फार कौतुक वाटते नेहमी.
"तिथे अंघोळीची सोय आहे का ?" >>> Lol अग आई ग. हा माझ्यासाठी एकदमच बाउन्सर होता.

अंघोळीची सोय >>>> Lol
भाकरी, गावठी लसूण चटणी>> यम्म. पाणी सुटलं तोंडाला.
वर्णन, फोटो आवडले.

विन्या (विनय भीडे) : "अरे त्या दरीएवढी फाटलीय ">>>
तिथे अंघोळीची सोय आहे का ?" >>> Happy
वाचुनच दमायला झालं..कौतुकास्पद चिकाटी आहे तुमची.

छान Happy
पुढच्या ट्रेकला 'मालकांना' सॅकमध्ये एक बादलीपण घेऊन यायला सांग म्हणजे आंघोळीची सोय होइल. Proud

तिथे अंघोळीची सोय आहे का ?" >> विन्या.... Rofl
सम्याचा फोटु टाका रे..

बाकी यो एकदम रॉक्स.. येउदे पुढचा लेख पटकन (विन्या-सम्याचे पराक्रम वाचायचेत Proud )

अरे केदार, ज्यांना ट्रेकमधला ट ही नाही माहित त्यांच्याकडून ह्या असल्या प्रश्नांची विचारणा होतेच. माझ्या बहिणीने पण एकदा माझ्याबरोबर गडावर यायची तयारी दर्शवली होती. पण तिथे वर हॉटेल असेल कां? किंवा टॉयलेटची वगैरे सोय असेल कां? याची चौकशी करून.

यावेळचे घळीचे फोटो छान आलेत Happy अजुन येऊद्यात
९४ साली नियमित मुम्बैला डेक्कन क्विन मधुन जाताना खण्डाळा घाटाच्या अखेरी अखेरीस पलिकडल्या डोन्गर रान्गेत दिसणार्‍या ढाक कडे मी आसुसून पहायचो असे आठवते
(ढाकचा बहिरी माझा राहून गेला तो गेलाच! Sad अन आता होईल की नाही सान्गता येत नाही
ढाकच्या बहिरीलाच सान्गतो, येत कर! )

मस्त लिहीतोय्स

रुनी असे बाऊंसर आम्हाला नाणेघाटच्या वेळेला आलेले. एक कपल फॅशन परेड ला याव तस सुटकेस वगैरे घेऊन आलेल. त्या कपल मधल्या तिने तर हिल वाले शुज घातलेले. आमच्यातल्या एकीचे एक्स्ट्राचे जोड, सॅक अस सगळ त्यावेळी मदतीला आल. त्यांची चुक नाही त्या बिचार्‍यांना कल्पना नव्हती ट्रेक करायचा म्हणजे नक्की काय ते, त्यांना वाटत होत वर रिसॉर्ट आहे. गरम पाण्याची सोय व. आहे. मुख्य प्रश्न पडला त्यांना केव्ह्ज मधे गेल्यावर प्रातर्विधीला जायच कुठे? पण धम्माल आलेली त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना Proud

बाकी अंघोळ वगैरेची गोळी बरोबर घ्यायला सांगितल नव्हतस का रे योग्या त्यांना? Wink

कविता मी सुटकेस डोळ्यासमोर आणून प्रचंड हसले. Rofl
बाकी हायहिल्सवाल्या मुली मात्र बर्‍याचदा बघीतल्यात सिंहगडावर (हातात हिल्स धरून) अनवाणी चढून जातांना.

यो रॉक्स जबरीच नेहमी प्रमाणे Happy अगदी तुमचा जयजयकार ऐकु आला. पण फोटु एवढेच का ?? महाराजांचा झेंड्याचा फोटु कुठे ??

ग्रेट.आगे जाओ और फट जायेगी.......

मागे जीएस ने केलेला ढाक बहिरी, त्याचे नुसते फोटो पाहुनच मी ठरवले होते की आयुष्यात असल्या भयानक ट्रेकला जायचे नाही. गेले तर परतण्याची खात्री नसणार.... Happy

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/93710.html?1136608985


महाराजांचा झेंड्याचा फोटु कुठे ??

एवढे सोप्पे नाहीये ढाक बहिरीच्या झेंड्यापर्यत पोचणे.... Happy आपल्याला कळेलच मंडळाची फुडली वाटचाल...

फोटों मधून वाटतं तितका अवघड हा ट्रेक नाही... ज्यानां exposure ची भिती नाही वाटतं त्यांच्या साठी तरी अजिबातच नाही कारण सगळीकडे धरायला खाचा आहेत... ज्यांना झाडावर चढायची सवय आहे त्यांना अगदी सहज जमतो हा ट्रेक...

पण ज्यांना exposure ची भिती वाटते त्यांनी फार जपून जावं... घाबरवत नाही पण २-३ जणांचा जीव गेलाय ह्या ट्रेक मधे... उगीचच अनाठाई धाडस करण्यात काहीच अर्थ नाही... self-confidence नसेल तर इतरांच्या आग्रहाला बळी पडून कोणीतरी मदत करेल असा विचार करुन ट्रेकला जाण्यात तथ्य नाही... कारण मग ट्रेकचा खरा रोमांच अनुभवताच येत नाही... इतर काही सोप्या जागी ट्रेक करुन self-confidence आला की मग हा ट्रेक करायला काहीच हरकत नाही...

बाकी लिखाण छानच... पुढचा भाग लवकर येऊदेत...

विन्या (विनय भीडे) : "अरे त्या दरीएवढी फाटलीय "
"तिथे अंघोळीची सोय आहे का ?" >>>>>>> मालक Lol

मस्त सुरुवात.. पुभाप्र.. Happy

पण ज्यांना exposure ची भिती वाटते त्यांनी फार जपून जावं...
मला खुप वाटते Sad

पुढचे येउ द्या की राव आता....

.. एसटी जशी आली तशी ट्रेकर्समंडळीने लगेच फुल करुन टाकली !>>>>
अरे एस टीत चढताना बरेच गाववाले आणि ट्रेकर्स चे २ ग्रुप जाम जंत्री होती. मी एसटीच्या पायर्‍या जवळ आल्यावर जोरात ओरडलो " अरे ही ५०० ची नोट कोणाची पडलिये ?" आणि मग सुखरुप चढलो Proud

ह्याने आपली घोरण्याची मशिन त्या जंगलात मोठ्या दिमाखाने सुरु केली होती.. >>>
जंगलातले प्राणी आमच्या जवळपास न येण्याकरता याची मदत झाली.:फिदी: ते म्हणत असतील कोण हा नवीन प्राणी आलाय जंगलात..:फिदी:

सगळ्यांचे उठुन झाल्यावर आमच्या सम्याला जाग आली !! >>> वर सम्या म्हणतो " च्यायला ! जरा झोप मिळाली नाही."

यो मस्त लिहितोस रे तु...मला हे तोंडी सांगणपण इतक चांगल नसत जमल..
आणि क्रमश: मुळे लोकांची जाम ताणतोस तु ..उत्कंठा...:फिदी:

यो, विन्या मला इकडे यायला जमत नाहि म्हणुन काहिही उठवायचं काय? एकतर तुम्हाला बाकिच्या प्रण्यांपासून वाचवलं आणि विचार करत होतो तुम्हाला सग्ळ्यान्ना सुखरूप कसं पोचवायच त्याचा.. :p
विन्या दरीत येइयेइ पर्यंत फाटलीच शेवटी तुझी.. :p
यो सुरुवात एकदम झ्याक. अम्या जरा धीर धर, आगे आगे देखो हुआ क्या..
मला पण तोंडी सांगणहि इतक चांगल नसत जमल.. अनुमोदन विन्या.

यो मस्तच रे (नेहमीप्रमाणे)
>>>विन्या (विनय भीडे) : "अरे त्या दरीएवढी फाटलीय ">>>Lol
क्रमश: Sad

Pages