माझा व्यवसाय : बिझनेस सॉफ्टवेअर

Submitted by जीएस on 9 February, 2010 - 09:53

१९८७: फ्लॅशबॅक

१९८७ साली नववीत होतो तेंव्हा प्रथम संगणक म्हणजे काय ते शाळेत बीबीसीच्या एका प्रकल्पामुळे बघायला मिळालं. तेंव्हा भारतात पिसी हा प्रकार जेमतेम येऊ घातला होता. मुलांना संगणकाची गोडी लागावी म्हणून आमच्या शाळेला तब्बल ३२के एवढी मेमरी असलेले दोन मायक्रोसंगणक भेट मिळाले होते. कलर मॉनिटर होता, स्पिकर्स होते, पण हार्ड डिस्क असा काही प्रकार नव्हता. जे काही साठवायचे ते फ्लॉपीवर. आम्हा मुलांना गोडी लागावी म्हणून बीबीसीतर्फे एक वेलकम फ्लॉपी मिळाली होती त्यात दहा वेगवेगळे शैक्षणिक गेम्स होते. बेसिक वापरून प्रोग्रॅमिंग !!

दहा खेळांचा लवकरच कंटाळा आला, आणि मग मी स्वतःच persistance of vision हे अ‍ॅनिमेशनचे मूळ सूत्र समजल्यावर काही नवे गेम्स लिहायला सुरूवात केली. काही शैक्षणिक, काही मनोरंजक. त्या काळात एखाद्या मुलाची आणि मुलीची जोडी जुळू शकते की नाही हे बघायचा FLAMES नावाचा एक मजेदार प्रकार होता. त्यासाठी लिहिलेला छोटासा प्रोग्रॅम फारच लोकप्रिय झाला होता Happy लोक वेगवेगळी नावे घेउन यायचे जुळवायला Happy

दोन तीन मित्रांना बरोबर घेउन नव्या पंधरा गेम्सची एक फ्लॉपी बनवली. सर्वांची आद्याक्षरे घेऊन ग्रँडस क्रिएशन असे कंपनीचे नाव ठरवले. मुंबईतल्या शंभर शाळात जरी ही फ्लॉपी विकली गेली तरी खूप पैसे मिळतील असा हिशोब केला होता. आमच्या उपमुख्याध्यापिकांना भेटलो, त्यांना सगळे प्रोग्रॅम्स दाखवले आणि फ्लॉपी विक्रीची योजना सांगितली. विक्रीचे अर्धे पैसे शाळेला व अर्धे आम्हाला मिळावे हा माझा प्रस्ताव ऐकून तर त्या ज्या अवाक झाल्या तो चेहेरा माझ्या अजूनही स्मरणात आहे. पण मुंबईत केवळ दोनच शाळांमध्ये संगणक आहे असे सांगून त्यांनी माझ्या बिझनेसची हवाच काढून घेतली. मात्र बाईंनी एक फार मोठी गोष्ट केली, मला म्हणाल्या, 'चल तुला आता डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय ते दाखवते' आणि त्यांनी मल्टीडायमेन्शनल अ‍ॅरे आणि टेक्स्ट फाईल्स या दोन गोष्टी एकत्र वापरुन डेटा कसा वापरता येईल ते दाखवले, आणि २४x७ केंव्हाही संगणक कक्षात यायची सूट दिली.

आमच्या शाळेत एका इयत्तेच्या नऊ तुकड्या असायच्या. खूप डेटा होता. मग या वरच्या भांडवलावर पुढच्या एका वर्षात फी, परिक्षेची बसण्याची व्यवस्था, आणि परिक्षांचे निकाल या तीन विषयांची सॉफ्टवेअर्स लिहिली आणि शाळेने ती पुढेही वापरली. मी लिहिलेले हे पहिले बिझनेस सॉफ्टवेअर. आणि तेंव्हाच मी माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी असेल असे मिशन स्टेटमेंट लिहिले. त्याची एक गोष्टच आहे, पण ती पुन्हा कधीतरी...

२०१० : माझा व्यवसाय

सध्या माझा मुख्यतः उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील लघु व मध्यम आकाराच्या व्यवसायांसाठी ई. आर. पी. व तत्सम सॉफ्टवेअर पुरवणे, आणि ते वापरून व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे कसे करावे याबद्दलची सल्ला सेवा असा व्यवसाय आहे.

दहा वर्षांपूर्वी सदर व्यवसाय सुरू केला तेंव्हा सॉफ्टवेअर सेवा पुरवणे हा व्यवसायाचा उद्देश नव्हता. छोट्या प्रमाणावर का होईना पण स्वतःची बौद्धिक संपदा निर्माण करणे असे उदिष्ट होते. सॉफ्टवेअर सेवेची निर्यात पैसे मिळवण्यासाठी केली आणि करतोही, पण स्वतःचे ई. आर. पी. प्रॉडक्ट निर्माण करणे हे मुख्य काम होते. तसे ते निर्माण करून ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोजेक्ट्स, मशिनरी, इक्विपमेंट, सुटे भाग, रबर, प्लास्टिक, लॉजिस्टिक अशा व्हर्टिकलमधले एक एक करत प्रावीण्य आत्मसात करून त्या क्षेत्रात दोनशेहून अधिक संतुष्ट ग्राहक आम्ही मिळवले आहेत.

साधारणतः पाच कोटी ते दोनशे कोटी यामध्ये ज्यांचा टर्नोव्हर आहे असे व्यवसाय आमचे ग्राहक असतात. म्हणजे ज्यांचे टॅलीसारखी छोटी अकाऊंटची पॅकेज, अथवा स्थानिक कस्ट्माईझ्ड पॅकेजेस वापरून भागत नाही आणि ज्यांना SAP आर्थिक वा इतर कारणांसाठी नको असते असे व्यवसाय आमचे टारगेट ग्राहक आहेत. काही ठिकाणी तर आम्ही SAP रिप्लेस केले आहे. बंगलोर विद्यापीठांसारख्या काही विद्यापीठांमध्ये आमच्या ई. आर. पी. प्रॉडक्टला सिलॅबसमध्येही प्रॅक्टिकलसाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे.

आमच्या ग्राहकांना प्लॅनिंग, मार्केटिंग, सेल्स, कस्ट्मर रिलेशनशिप मॅनेजमेंट, मटेरिअल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्ट मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्सेस, सप्लाय चेन मॅनेजमेंट, क्वालिटी, लॉजिस्टिक्स, सर्व्हिस एक्झिक्युशन या क्षेत्रात प्रभावी सिस्टिम्स आमच्या सॉफ्टवेअरच्या व व्यवस्थापन सल्ला सेवेच्या सहाय्याने उभ्या करुन देणे हे आमचे प्रमुख काम असते. त्यासाठी संगणक तंत्रज्ञ व त्या त्या विषयातील तज्ञ असे सुमारे पन्नास कर्मचार्‍यांच्या रचनेतून हे काम सांभाळले जाते.

आगामी योजना

गेली काही वर्ष वेगवेगळ्या व्हर्टिकलमधील बौद्धिक संपदा निर्माण करणे, ग्राहकांना त्यांच्या व्यवसायात आमच्यामुळे लक्षणीय बदल झालेला दिसणे या उद्दिष्टांमुळे आम्ही स्वतःच सर्व सेवा देत होतो. आता प्रॉडक्ट पुरेसे परिपक्व झाल्याने व्यवसायविस्ताराच्या दृष्टीने मार्केटिंग, इंप्लिमेंटेशन व सपोर्ट पार्टनर भारतातल्या महत्वाच्या औद्योगिक शहरात नेमण्यास सुरूवात करत आहोत. पुढील काळात ब्रँडिंगवरही आमचा भर असेल.

उद्योजक व भागीदारांना आमंत्रण

(१) आमच्या ई. आर. पी. प्रॉडक्टसाठी मार्केटिंग, इंप्लिमेंटेशन व सपोर्ट पार्टनर भारतातल्या महत्वाच्या औद्योगिक शहरात हवे आहेत.

(२) दहा वर्षांच्या अनुभवातून आमच्याकडे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचा, ऑफशोअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर उभे करुन चालवण्याचे प्रावीण्य विकसित झाले आहे. इंफ्रास्ट्रक्चरही आहेच. दुसर्‍या बाजूला अनेक जण परदेशात काम करत असतात्, तिथले मार्केट, संधी, उत्तम व्यवसायकल्पना त्यांच्याकडे असतात. पण एकाच वेळेला परदेशातील मार्केटिंग, कस्टमर, टेक्निकल प्रि-सेल्स, ऑन्साईट को-ऑर्डिनेशन सांभाळणे आणि पुन्हा भारतात डिलिव्हरी सेटअप उभा करून तो सांभाळणे हे फार अवघड असते. भारतात कर्मचार्‍यांची सॅलरी तुलनेने कमी दिसली तरी इतर प्रशासकीय, मूलभूत सुविधा, किचकट कायदे असे खूप वेळ खातील असे अडथळेही आहेत. परदेशातील उद्योजकांसमवेत अशा प्रकारे भागीदारी स्वरूपात काम करुन shared वा dedicated स्वरूपात त्यांचे स्वतःचे ऑफ्शोअर डेव्हल्पमेंट सेंटर भारतात सुरू करून चालवणे यात आम्हाला रस आहे. अमेरिकेतीलच एका उद्योजकासाठी तसे एक सेंटर आता सुरूही झाले आहे.

(३) स्वतः उत्तम वेबसाईट डिझाईन, डेव्हलप करणार्‍या (शक्यतो पुण्यातील) एखाद्या उद्योजकाबरोबर भागीदारी करण्यात रस आहे.

वैयक्तिक
(४) ( ज्याने स्वतःला काय उद्योग करायच आहे, कुठे, कधीपासून करायचा आहे, उद्योगात किती गुंतवणूक करू शकतो याबद्दल गृहपाठ केला आहे अशा ) मराठी उद्योजक या गृपच्या सदस्य असलेल्या कुठल्याही उद्योजकाला बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी मदत हवी असेल तर करू शकेन.

संपर्क

माझ्याशी संपर्क मायबोलीच्या ईमेल सुविधेद्वारे करता येईल. संपर्क करतांना आपला दूरध्वनी क्रमांक अवश्य द्यावा. धन्यवाद.

channelworld मध्ये आमच्याबद्दल नुकतेच आलेले हे आर्टिकल..
iota article in channelworld.pdf (90.28 KB)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलाखत...... आरतीने मुलाखत घेउन इथे छापावी. जी एस ला वेळ मिळेल तसा तो वाचेल अन दुरुस्ती सुचवेलच कि Happy

जीएस ,
मि तुमचि लिन्क वाचली महनजे मि सभासद झालोका.
ऑफिस मधले लादे उद्योग ,जास्त लिहिता वाचता येनार नाहि.

जीएस, अरे छान माहिती दिलीस.
फ्लॅशबॅक पण मस्त. शाळे मध्ये नववीत हे सगळे उद्योग केलेस ते आज च समजले. वाटवे बाईचा चेहरा डोळ्यासमोर आला Happy

तुला अनेक शुभेछा!!

जीएस, मानलं बाबा तुला...येत्या भारतवारीत भेटायलाच हवं . सहीच आहे एकूण सगळं. लिखते रहो भाई..सध्या हे नुसतं वाचूनही एवढं जबरी वाटतयं.

जीएस ,

मि तुमचि लिन्क वाचली, माझा व्यवसाय : बिझनेस सॉफ्टवेअर बद्दल,

तुमचि वाटचाल खरोखर अभिनन्दनिय आहे. मनापासुन अभिनंदन......

मि स्वतह वेबसाइट आर्तिस्त आहे. कम्र्शियल डिझाइनर आहे.

अजुन मराठि लिहिने नीट जमत नाहिये, प्रयत्न चालु केला आहे नुक्ताच.

मि तुमहला अत्ताच एक मेल टाकाले आहे. ते चेक करा.

ABHINANDAN...!

Aani Dhanyvad!
Dhanyvad asha karita ki , swataha ek yashasvitech tappa gathlyavr MARATHI udyojakana sobat gheun pudhe janaycha umade pana thevala aahe .

tumache maitri purn margdarshan aani vyavsayik sahkarya hi mazya sarkhyana uttam sandhi aahe.

.....
maaybolivar marathi typecha sarav naslyaane Roman script vaparat aahe ... kshamasva !

तुझ्याकडे कायम एक मित्र म्हणूनच बघितले, आणि त्यामूळे तूझ्या उद्योजक रुपाकडे कायमच दुर्लक्ष झाले.

अभिनंदन जी.ऐस,

तूमच्या कम्पनीची वेबसाइट पाहीली.
खुप छान आहे

पण खालचे TABS (Home, Partner's Zone, Site Map) जर Top Right corner ला ठेवले तर व्यावसायिक लूक येइल.

मीही एक सगणक अभियन्ता आहे. सध्या London मधे Financial Sector मधे काम करतोय.

नमस्कार. आपला परिचय वाचला. मी सभासदत्वासाठी मेल केली आहेच पण माझा भ्रमण ध्वनी द्यायचा राहून गेला. परिचय वाचल्यावर लक्षात आले. माझा भ्रमण्ध्वनी ९४२३०१०५३७ आहे.

Pages