माझा व्यवसाय : बिझनेस सॉफ्टवेअर

Submitted by जीएस on 9 February, 2010 - 09:53

१९८७: फ्लॅशबॅक

१९८७ साली नववीत होतो तेंव्हा प्रथम संगणक म्हणजे काय ते शाळेत बीबीसीच्या एका प्रकल्पामुळे बघायला मिळालं. तेंव्हा भारतात पिसी हा प्रकार जेमतेम येऊ घातला होता. मुलांना संगणकाची गोडी लागावी म्हणून आमच्या शाळेला तब्बल ३२के एवढी मेमरी असलेले दोन मायक्रोसंगणक भेट मिळाले होते. कलर मॉनिटर होता, स्पिकर्स होते, पण हार्ड डिस्क असा काही प्रकार नव्हता. जे काही साठवायचे ते फ्लॉपीवर. आम्हा मुलांना गोडी लागावी म्हणून बीबीसीतर्फे एक वेलकम फ्लॉपी मिळाली होती त्यात दहा वेगवेगळे शैक्षणिक गेम्स होते. बेसिक वापरून प्रोग्रॅमिंग !!

दहा खेळांचा लवकरच कंटाळा आला, आणि मग मी स्वतःच persistance of vision हे अ‍ॅनिमेशनचे मूळ सूत्र समजल्यावर काही नवे गेम्स लिहायला सुरूवात केली. काही शैक्षणिक, काही मनोरंजक. त्या काळात एखाद्या मुलाची आणि मुलीची जोडी जुळू शकते की नाही हे बघायचा FLAMES नावाचा एक मजेदार प्रकार होता. त्यासाठी लिहिलेला छोटासा प्रोग्रॅम फारच लोकप्रिय झाला होता Happy लोक वेगवेगळी नावे घेउन यायचे जुळवायला Happy

दोन तीन मित्रांना बरोबर घेउन नव्या पंधरा गेम्सची एक फ्लॉपी बनवली. सर्वांची आद्याक्षरे घेऊन ग्रँडस क्रिएशन असे कंपनीचे नाव ठरवले. मुंबईतल्या शंभर शाळात जरी ही फ्लॉपी विकली गेली तरी खूप पैसे मिळतील असा हिशोब केला होता. आमच्या उपमुख्याध्यापिकांना भेटलो, त्यांना सगळे प्रोग्रॅम्स दाखवले आणि फ्लॉपी विक्रीची योजना सांगितली. विक्रीचे अर्धे पैसे शाळेला व अर्धे आम्हाला मिळावे हा माझा प्रस्ताव ऐकून तर त्या ज्या अवाक झाल्या तो चेहेरा माझ्या अजूनही स्मरणात आहे. पण मुंबईत केवळ दोनच शाळांमध्ये संगणक आहे असे सांगून त्यांनी माझ्या बिझनेसची हवाच काढून घेतली. मात्र बाईंनी एक फार मोठी गोष्ट केली, मला म्हणाल्या, 'चल तुला आता डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय ते दाखवते' आणि त्यांनी मल्टीडायमेन्शनल अ‍ॅरे आणि टेक्स्ट फाईल्स या दोन गोष्टी एकत्र वापरुन डेटा कसा वापरता येईल ते दाखवले, आणि २४x७ केंव्हाही संगणक कक्षात यायची सूट दिली.

आमच्या शाळेत एका इयत्तेच्या नऊ तुकड्या असायच्या. खूप डेटा होता. मग या वरच्या भांडवलावर पुढच्या एका वर्षात फी, परिक्षेची बसण्याची व्यवस्था, आणि परिक्षांचे निकाल या तीन विषयांची सॉफ्टवेअर्स लिहिली आणि शाळेने ती पुढेही वापरली. मी लिहिलेले हे पहिले बिझनेस सॉफ्टवेअर. आणि तेंव्हाच मी माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी असेल असे मिशन स्टेटमेंट लिहिले. त्याची एक गोष्टच आहे, पण ती पुन्हा कधीतरी...

२०१० : माझा व्यवसाय

सध्या माझा मुख्यतः उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील लघु व मध्यम आकाराच्या व्यवसायांसाठी ई. आर. पी. व तत्सम सॉफ्टवेअर पुरवणे, आणि ते वापरून व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे कसे करावे याबद्दलची सल्ला सेवा असा व्यवसाय आहे.

दहा वर्षांपूर्वी सदर व्यवसाय सुरू केला तेंव्हा सॉफ्टवेअर सेवा पुरवणे हा व्यवसायाचा उद्देश नव्हता. छोट्या प्रमाणावर का होईना पण स्वतःची बौद्धिक संपदा निर्माण करणे असे उदिष्ट होते. सॉफ्टवेअर सेवेची निर्यात पैसे मिळवण्यासाठी केली आणि करतोही, पण स्वतःचे ई. आर. पी. प्रॉडक्ट निर्माण करणे हे मुख्य काम होते. तसे ते निर्माण करून ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोजेक्ट्स, मशिनरी, इक्विपमेंट, सुटे भाग, रबर, प्लास्टिक, लॉजिस्टिक अशा व्हर्टिकलमधले एक एक करत प्रावीण्य आत्मसात करून त्या क्षेत्रात दोनशेहून अधिक संतुष्ट ग्राहक आम्ही मिळवले आहेत.

साधारणतः पाच कोटी ते दोनशे कोटी यामध्ये ज्यांचा टर्नोव्हर आहे असे व्यवसाय आमचे ग्राहक असतात. म्हणजे ज्यांचे टॅलीसारखी छोटी अकाऊंटची पॅकेज, अथवा स्थानिक कस्ट्माईझ्ड पॅकेजेस वापरून भागत नाही आणि ज्यांना SAP आर्थिक वा इतर कारणांसाठी नको असते असे व्यवसाय आमचे टारगेट ग्राहक आहेत. काही ठिकाणी तर आम्ही SAP रिप्लेस केले आहे. बंगलोर विद्यापीठांसारख्या काही विद्यापीठांमध्ये आमच्या ई. आर. पी. प्रॉडक्टला सिलॅबसमध्येही प्रॅक्टिकलसाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे.

आमच्या ग्राहकांना प्लॅनिंग, मार्केटिंग, सेल्स, कस्ट्मर रिलेशनशिप मॅनेजमेंट, मटेरिअल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्ट मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्सेस, सप्लाय चेन मॅनेजमेंट, क्वालिटी, लॉजिस्टिक्स, सर्व्हिस एक्झिक्युशन या क्षेत्रात प्रभावी सिस्टिम्स आमच्या सॉफ्टवेअरच्या व व्यवस्थापन सल्ला सेवेच्या सहाय्याने उभ्या करुन देणे हे आमचे प्रमुख काम असते. त्यासाठी संगणक तंत्रज्ञ व त्या त्या विषयातील तज्ञ असे सुमारे पन्नास कर्मचार्‍यांच्या रचनेतून हे काम सांभाळले जाते.

आगामी योजना

गेली काही वर्ष वेगवेगळ्या व्हर्टिकलमधील बौद्धिक संपदा निर्माण करणे, ग्राहकांना त्यांच्या व्यवसायात आमच्यामुळे लक्षणीय बदल झालेला दिसणे या उद्दिष्टांमुळे आम्ही स्वतःच सर्व सेवा देत होतो. आता प्रॉडक्ट पुरेसे परिपक्व झाल्याने व्यवसायविस्ताराच्या दृष्टीने मार्केटिंग, इंप्लिमेंटेशन व सपोर्ट पार्टनर भारतातल्या महत्वाच्या औद्योगिक शहरात नेमण्यास सुरूवात करत आहोत. पुढील काळात ब्रँडिंगवरही आमचा भर असेल.

उद्योजक व भागीदारांना आमंत्रण

(१) आमच्या ई. आर. पी. प्रॉडक्टसाठी मार्केटिंग, इंप्लिमेंटेशन व सपोर्ट पार्टनर भारतातल्या महत्वाच्या औद्योगिक शहरात हवे आहेत.

(२) दहा वर्षांच्या अनुभवातून आमच्याकडे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचा, ऑफशोअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर उभे करुन चालवण्याचे प्रावीण्य विकसित झाले आहे. इंफ्रास्ट्रक्चरही आहेच. दुसर्‍या बाजूला अनेक जण परदेशात काम करत असतात्, तिथले मार्केट, संधी, उत्तम व्यवसायकल्पना त्यांच्याकडे असतात. पण एकाच वेळेला परदेशातील मार्केटिंग, कस्टमर, टेक्निकल प्रि-सेल्स, ऑन्साईट को-ऑर्डिनेशन सांभाळणे आणि पुन्हा भारतात डिलिव्हरी सेटअप उभा करून तो सांभाळणे हे फार अवघड असते. भारतात कर्मचार्‍यांची सॅलरी तुलनेने कमी दिसली तरी इतर प्रशासकीय, मूलभूत सुविधा, किचकट कायदे असे खूप वेळ खातील असे अडथळेही आहेत. परदेशातील उद्योजकांसमवेत अशा प्रकारे भागीदारी स्वरूपात काम करुन shared वा dedicated स्वरूपात त्यांचे स्वतःचे ऑफ्शोअर डेव्हल्पमेंट सेंटर भारतात सुरू करून चालवणे यात आम्हाला रस आहे. अमेरिकेतीलच एका उद्योजकासाठी तसे एक सेंटर आता सुरूही झाले आहे.

(३) स्वतः उत्तम वेबसाईट डिझाईन, डेव्हलप करणार्‍या (शक्यतो पुण्यातील) एखाद्या उद्योजकाबरोबर भागीदारी करण्यात रस आहे.

वैयक्तिक
(४) ( ज्याने स्वतःला काय उद्योग करायच आहे, कुठे, कधीपासून करायचा आहे, उद्योगात किती गुंतवणूक करू शकतो याबद्दल गृहपाठ केला आहे अशा ) मराठी उद्योजक या गृपच्या सदस्य असलेल्या कुठल्याही उद्योजकाला बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी मदत हवी असेल तर करू शकेन.

संपर्क

माझ्याशी संपर्क मायबोलीच्या ईमेल सुविधेद्वारे करता येईल. संपर्क करतांना आपला दूरध्वनी क्रमांक अवश्य द्यावा. धन्यवाद.

channelworld मध्ये आमच्याबद्दल नुकतेच आलेले हे आर्टिकल..
iota article in channelworld.pdf (90.28 KB)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी एस - अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा

१.सॉफ्टवेअर कश्यात लिहीले?
२. कुठ कुठल्या प्लॅट्फॉर्मवर चालेल?
३. डेटा रिट्रिव्ह करण्याची सोय आहे का? (ODBD तत्सम)
४. पोर्टल वरुन अ‍ॅक्सेस करता येते का?

अभिनंदन.
मलाही बरेच प्रश्न आहेत.
खरे तर तुमची मुलाखत घेतली तर फारच छान होईल.
मुलाखत मला जास्त आवडेल कारण या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ एक चांगला प्रोग्रॅमर असणे पुरेसे नाही.
सांगली/मिरज/इचलकरंजी भागात कितितरी मराठी मुले या क्षेत्रात जम बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनाही फायदा होईल.

अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा!
<<व्यवसायविस्ताराच्या दृष्टीने मार्केटिंग, इंप्लिमेंटेशन व सपोर्ट पार्टनर भारतातल्या महत्वाच्या औद्योगिक शहरात नेमण्यास सुरूवात करत आहोत. >> कुठले कुठले शहर योजनेत आहे?
आणि तुमची वेबसाईट आहे का?

अगदी अगदी विकु. माझ्या मनातले बोललात. जीएस, भ्रमर, अजय आणि इतर सर्व उद्योजकांच्या मुलाखतीच घेतल्या पाहीजेत चांगल्या ऐसपैस गप्पा उद्योजकांशी. ( हे प्युअरली सेल्फिश आहे एक वाचक म्हणून.) कोणी मुलाखत द्यायला तयार असेल तर मी घ्यायला तयार आहे. Proud

जीएस- भारी वाटचाल. अभिनंदन आणि शुभेच्छा.

वा वा , हे तू लिहिणे आवश्यकच होते. खरे तर वि. कु. म्हणतात त्याप्रमाणे तुझी मुलाखत घेऊन ती टाकली पाहिजे माय्बोलीवर या क्षेत्रातल्या जाणत्या मायबोलीकराकडून. तुझा हा प्रवास बर्‍याच जणाना मार्गदर्शक ठरू शकेल. त्यातल्या खाचाखोचा, अनुभव सल्ले वगैरे.

प्रगतीबद्दल अभिनन्दन आणि पुढील वाटचालीकरता शुभेच्छा...

फ्लॅशबॅक जास्त आवडला Happy फ्लॅशबॅक ते २०१० ह्या मधल्या काळात घडलेले (अडचणी, यशापयश इत्यादी) सांगण्यासारखे असेल तर जरुर सांग.

जीएस. अभिनंदन आणि पुढील वाटचाली करता शुभेच्छा ! आमच्याकडून पण. तुमच्या कंपनीचे शेअर्स आहेत काय?

वा! खूपचं छान! खरचं मुलाखत घेतली पाहिजे आणि इथे अनेकांचे कदाचित निरनिराळे प्रश्न असतील ते गोळा करुन मग मुलाखत घ्यायला हवी म्हणजे बहुतेकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

अभिनंदन जी.ऐस.

सह्हीच !!.. मस्त वाटले वाचून Happy , अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा !!
कंपनीची वेबसाइट वैगेरे असल्यास द्या Happy

जीएस,सही रे... इतके दिवस तुझी स्वत:ची ई.आर.पी. क्षेत्रातली सॉफ्टवेअर कंपनी आहे एवढेच ऐकुन होतो.. तुझ्या या लेखातुन बाकीचे डिटेल्सही कळाले..

Pages