ग्रीन टी?

Submitted by बस्के on 31 January, 2010 - 22:59

ग्रीन टी बद्दल कोणाला काही माहीती आहे का? कोणी मायबोलीकर घेतात का? - म्हणजे ग्रीन टीबद्दल विचारतीय मी..

नेटवर वाचल्यावर अगदी सोन्याची खाण सापडल्यासारखे वाटतेय. अ‍ॅन्टीऑक्सिडंट, मेटॅबॉलिझम सुधारते, चेहरा क्लीन होतो, स्लिम वगैरे होतो. कॅन्सर अन अल्झायमर आणि काय ते वेगळंच!

हे सगळं खरंच होतं की फॅड आहे !?
(फॅड नसावं असं जॅपनीज व चायनीज मुलींकडे पाहून वाटते. Proud )

(मी वाचलेल्या काही लिंक्स.. )
http://chinesefood.about.com/library/weekly/aa011400a.htm
http://www.umm.edu/altmed/articles/green-tea-000255.htm
http://www.greenweightlosstea.com/
http://www.webmd.com/food-recipes/features/health-benefits-of-green-tea
इत्यादी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात दोराबजी मध्ये पण मिळतो ग्रीन टी. अजुन एक शनिपार जवळचे राज ट्रेडींग चहा पावडरचे दुकान माहीतीए का? तीथे सुद्दा मिळतो.

LOL महेश. मध पण पितेच मी म्हणजे पाण्यात घालून Happy पण ग्रीन टी पण पीते. पण तो उपाशी पोटी पिणं कितपत जमेल शंकाच आहे.

मध्यंतरी भावाने दार्जिलिंगवरुन २ किलो ग्रीन टी आणून दिला होता. त्याआधी कुणीतरी पालमपुरहुन पण एक किलो पाठवला होता. अगदी रोज नाही पण मधुन्-अधुन पितो आम्ही, आठवण झाली की. मी मुळात चहा कधीच पीत नाही, त्यामूळे ती ग्रीन टी ची चव थोडी ऑड वाटली मला.
माझे बाबा गेले १-२ वर्षे पिताहेत ग्रीन टी अगदी आवडीने. त्याआधी पण ते बिनादुधाचाच चहा प्यायचे बरीच वर्षे.

मी चहा खुप कमी पिते पण ग्रीन टी रेग्युलर, हळुहळु टेस्ट डेव्हलप होते. चायनिज स्टोअरमधुन आणला तर खात्रीशिर मिळातो. नुसता ग्रीन टी आवडत नसेल तर आलं टाकुन पाणी उकळुन घ्यायचं आणि मग गाळलेल्या पाण्यात ग्रीन टी बॅग किंवा पाने २-४ मि साठी ठेवायची. अजुन एक प्रकार म्हणजे लिंबु पिळुन. दोन्ही प्रकारे सकाळी घेतल्यास वजन कमी करायला नक्कीच फायदा होतो.

Real green tea is unprocessed and is dried under shade(not directly sun dried ) tea which does not under go CTC and acid based processing. So is safer and better than CTC processed black color tea.

चिनूक्स, प्रक्रिया न केलेला ग्रीन टी कुठे मिळू शकेल ठाणे/मुंबईत?

TWINNINGS चा बोगस वाटतोय, तो बराचसा दूध्/साखर न घालता केलेल्या साध्या चहासारखाच लागतोय.

गिरनारचा कसा आहे?

माधव मी पण twinnings चा वापरतेय. पण तुम्हाला बोगस का वाटतोय? Uhoh
इथे ग्रीन टी ची ओरिजिनल चव माहित नाही त्यामुळे हा घोळ होत असेल बहुतेक. मला तर इतकं ही नाही माहित की त्याचा रंग कसा दिसला पाहिजे? पाण्यात एकूण ग्रीन टी किती घालायचा? कितीवेळ उकळवायचा?
सगळंच अंदाजपंचे धागोदरसे... Proud

मी उसगावात असताना प्यायला होता त्याची चव अगदीच वेगळी होती आपल्या पारंपारीक चहापेक्षा (वर काहींनी त्यालाही 'भुसा' म्हटले आहे). पण twinnings ची चव बरीचशी आपल्या पारंपारीक चहासारखीच लागतेय मला. म्हणजे twinnings चाच regular lemon tea आणि green lemon tea बरेचसे सारखे लागतात चवीला. microwave मध्ये एक मिनीट ठेवल्यावर त्याचा रंग golden BROWN येतो. green tea चा रंग बराच फिका असतो. म्हणून मला हा बोगस वाटतोय.

ग्रीन टी ची पानं कपात ठेवायची आणि त्याच्यावर उकळते पाणी ओतायचे. पाने पाण्यात घालून उकळणे/ मावे मधे गरम करणे हे करायचं नाही.

बरं झालं बाई नी सांगितलंस ते, मी दुपारी ऑफिसात पिते तो चहा मी कपात टि बॅग ठेऊन वरून गरम पाणि ओतते. घरी प्रॉपेर उकळवत होते Uhoh अरे देवा Sad

गिरनारच्या पुडक्यावर लिहिलय की पाणी पुर्ण उकळवा मग ते गॅस बंद करुन तीन मिनिटे तसेच ठेवा त्यानम्तर त्यात ग्रीन टी घाला व झाकण ठेवा [हवे तर तीन चार पुदीनापाने घाला...ही माझी अ‍ॅडिशन आहे]. तीन मिन इटानी गाळुन प्या.
हवे तर त्यात लिंबु पिळा.

मला आवडला, मी असाच करते. आता त्या पुडक्यावरच तसं लिहिलय तर तसच करायच असणार असम वाट्तय.

नीरजा,

ग्रीन टी उकळून घ्यायला हरकत नसते..हा चहा नुसता उकळते पाणी टाकून brew केला तर त्यातले antioxidants पाण्यात उतरत नाहीत. ग्रीन टी किती आणि कसा उकळला म्हणजे त्यातले antioxidants पाण्यात उतरतात यावर शेकडो research papers आहेत.. Happy

आणखी वेगवेगळी रंगीत द्रव्ये मिसळा मग त्यानंतर परम आनंद मिळुन पुढच्या सर्व खाद्य पेयांच्या चवी अचानक बदलून जातील Happy

नाही नाही... कशात काय मिसळायचं याचं तंत्र आहे.
रंगीत द्रव्यांमधे ग्रीन टी काय कुठलाही टी मिसळू नका. रंगीत द्रव्यांची वाट लागते. म्हणजे चवीची.
अगदी लंब बेटावरील बर्फाळ चहामधेही चहा नसतो.. Happy
रंगीत द्र्व्ये कॉफीबरोबर मिसळलेली कधी कधी महान लागतात..
पृथ्वीमधे एकेकाळी मिळायची ती आयरीश कॉफी स्ट्राँग आठवली.. दिल पानी पानी हो गया!! Happy

पृथ्वीमधे एकेकाळी मिळायची ती आयरीश कॉफी स्ट्राँग आठवली.. दिल पानी पानी हो गया!! >>> क्या याद दिलायी तुमने. ते नविन कँटीन भंगार आहे

आजच सापडला हा धागा Happy

दुपारी खुप उन्हातन आल्यावर गार पाण्यापेक्षा गार ग्रीन टी पिऊन पहा, जास्त फ्रेश वाटत Happy

करुन एका मोठ्या बाटलीमधे भरुन फ्रिज्मधे ठेवला तर दिवस भर पिता येतो. पण दिवसभरात संपवा.

मी रोज सकाळचा नेहेमीचा चहा बंद करून ग्रीनटी प्यायला लागले आहे. मला आवडतोय. मी टेटलीचा आणलाय. पुडक्यावर कसा करायचा त्याची पद्धत दिली आहे, तसाच करते. 'चहा' म्हणून प्यायचा नाही, मग चवीचा त्रास होत नाही. दुपारी मात्र नेहेमीचा अमृततुल्यच लागतो, कडक Happy
गार करून कधी प्यायले नाहीये, seems like a good idea Happy

Pages