ग्रीन टी?

Submitted by बस्के on 31 January, 2010 - 22:59

ग्रीन टी बद्दल कोणाला काही माहीती आहे का? कोणी मायबोलीकर घेतात का? - म्हणजे ग्रीन टीबद्दल विचारतीय मी..

नेटवर वाचल्यावर अगदी सोन्याची खाण सापडल्यासारखे वाटतेय. अ‍ॅन्टीऑक्सिडंट, मेटॅबॉलिझम सुधारते, चेहरा क्लीन होतो, स्लिम वगैरे होतो. कॅन्सर अन अल्झायमर आणि काय ते वेगळंच!

हे सगळं खरंच होतं की फॅड आहे !?
(फॅड नसावं असं जॅपनीज व चायनीज मुलींकडे पाहून वाटते. Proud )

(मी वाचलेल्या काही लिंक्स.. )
http://chinesefood.about.com/library/weekly/aa011400a.htm
http://www.umm.edu/altmed/articles/green-tea-000255.htm
http://www.greenweightlosstea.com/
http://www.webmd.com/food-recipes/features/health-benefits-of-green-tea
इत्यादी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती अगदी अगदी..मी हेच लिहायला आले होते. मी बहुतेक चुकीचा हिरवा चहा पीत होते की काय अस वाटायला लागलय मला इथे सगळ वाचून.

मी पण ( चिनी मैत्रिणीच्या कृपेने ) ग्रीन टी गेली कित्येक वर्षे पीत आहे. मला काही तो कडू वगैरे लागला नाही. तिने पहिल्यांदा तिच्या घरी ग्रीन टी करून दाखवला होता.

किटली मधे पाणी चांगलं खळखळ उकळून घेतलं. ते कपात ओतून त्यात टीस्पून भरून चहाची पानं टाकली अन मोजून दोन मिनिटे त्यावर झाकण ठेवलं. चहा तयार!

तिच्या मते अमेरिकन दुकानातनं मिळणारा ग्रीन टी हा भुश्याच्या बरोबरिचा असतो. ती शक्यतोवर चायना किंवा तैवानहून मागवते . किंवा अगदीच कोणी येणारं नसल्यास चायना टाऊन मधल्या दुकानातून घेऊन येते.

इथे २६ नवीन मजकूर वाचून सांगायला आलो की एक तथ्य तुम्हाला माहिती आहे का.. ग्रीन चहा अनाश्या पोटी आणि पहाटे पिला तरचं चं चं त्याचे फायदे मिळतात. जसे जी तांब्याच्या लोट्यातील पाणी हे पहाटे अनाश्यापोटी असेच प्यावे लागते. आवळ्याचा रसही तस्साच. कडूनिंबाचाही तसाचं. मध-निंबू देखील तसेच. तरचं फायदे मिळतात. नाहीतर असे हे वेळी-अवेळी पिऊन काहीही होणार नाही.

लोल..
सिरियस्ली ?
मी अमृतासारखा(आयडी नव्हे) पितीय सारखा!
तुम्ही लोकं नक्की कुठला ग्रीन टी पिताय? ( किंवा मी कुठला पितीय?)
मी देसी दुकानातून लुज लिव्ह्ज असलेला आणलाय.

ग्रीन टी कुठे इतका वाईट लागतो? वरच्या पोस्ट वाचून आश्चर्य वाटले की इतका काही वाईट नसतो. मला तर खूप आवडतो म्हणून पिते. १० वर्षे पितेय. खास करून चायनी़ज नाहीतर जपनीज रेस्टॉरंटात मिळतो तो पितेच पिते. प्यायचे कारण ते नुसते पाणी ढोसत बसण्यापेक्षा हे बरे. दिवसाचा पाण्याचा कोटा पुरे होतो.

त्या चहाचे फायदे वगैरे दिसण्यावर होतात वगैरे माहित नाही. लोक अजुन तरी(मला) चांगली दिसतेस असे म्हणतात बघून ना मग ठिक आहे. तसे अजुन काकूपदाला पोचायला वेळही आहे म्हणून असेल. Proud
तो आवडत नसेल तर chamomile प्या,orange,लेमन प्या. chamomile मला ज्यास्त आवडतो.

मधे कुठे तरी वाचले होते की लो बीपी चा त्रास असेल तर ग्रीन टी पिऊ नये. ते पण खरं का? मी पण पिते ग्रीन टी आणि मला ही आवडतो. पण मी सकाळी उपशी पोटी वगेरे नाही पीत.

चहा आणि चीरतारुण्य..."मम्मीने चाय पे बूलाया है..." वाली मम्मी "ग्रीन्-टी" पिणारी असेल तर "चाय पे" येणार्याला धोकाच की...:खोखो:
इकडे अमेरीकेत "स्नापल" नावाचे एक द्रव्य मीळते....बहुतेक ते "ग्रीन्-टी" असावे....मस्त लगते चवीला...आणि चिनी लोकान्ना पन "उसूक्-उसूक" असा आवाज करत झाड-पाला घातलेला चहा पिताना पाहीले आहे बर्याचदा....:अओ:

>>."मम्मीने चाय पे बूलाया है..." वाली मम्मी "ग्रीन्-टी" पिणारी असेल तर "चाय पे" येणार्याला धोकाच की...
हा हा हा Happy
फुलपाखराने टी पेक्षा मधच प्यावा नुसता Happy (चम्मत ग बर ...)

केश्विने,
बॉम्बे स्टोअर्स मधे जस्मिन ग्रीन टी चा डबा मिळतोय. तो आण. तो अजिबात वाईट लागत नाही.

बाकी ग्रीन टी हे प्रकरण वाईनसारखं घोटाघोटाने अनुभवायचं आहे. जामच आवडतो मला.
शर्मिलाशी पूर्ण सहमत.

कुठे आलं हे बॉम्बे स्टोअर्स? चांगला लागत असेल तर नक्की आणते. आज सकाळी सकाळी मी अर्धा कप हिरवा चहाच प्यायले. नंतर ती चव घालवायला गरम गरम तव्यावरुन काढलेली नुस्ती पोळी खाल्ली Proud

वाईन वगैरे मी कधी प्यायली नाहिये गं. घोटा घोटाने घ्यायचा का ! मी आपली एकदाचा संपू दे म्हणून पटकन पितेय.

घरी ये माझ्या तुला ग्रीन टी आणि वाईन जे काय हवं असेल त्याचे किंवा दोन्हीचे धडे देते.>> ही केश्विनी चालेल का
धडे देण्यास. ह्ह्ह . उद्या मुंबैत आहे म्याड्म पण ठाणे मुलुण्ड. त्यापलिकडे नाही. परवा संध्याकाळी ५.३० वा. एअरपोर्ट. जमल्यास एक धावता धडा?

मी आणलाय गिरनारचा आणि मला तो आवडलाय. Happy

मी त्यात मधही न घालता प्यायले . पण नवर्‍याला आणि लेकाला अजिबात आवडला नाहीये. Sad

घरी ये माझ्या तुला ग्रीन टी आणि वाईन जे काय हवं असेल त्याचे किंवा दोन्हीचे धडे देते.>>>>>...
पुण्यातल्या घरातही ही ऑफर आहे का?
Happy

टेस्ट हळुहळु डेव्हलप होइल.
सुरवातीचे चार पाच दिवस त्रास होइल पण नंतर जिभेला सवय होइल अस वाटतय.
पुण्यात कोणता ग्रीन टी मिळेल? कुठे?
मी ही घेवुन याव म्हणतो.

मी १ किलो पावडर आणलीये पैक आहे
आणि लिप्ट्न च्या टी बॅग्ज मिळाल्या. greena tea, greena tea citirus आणि green tea mint असे प्रत्येकी २५ टी बॅग्जचे तीन पुडे आणल्येत.
आता हा उत्साह कुठवर रहातो ते बघायचे .

टी बॅग्ज पेक्षा पावडरचा जास्त छान लागतोय

Pages