चलो शिवाजी पार्क - विराट मेळावा

Submitted by मंजूडी on 30 January, 2010 - 13:50

लालूभेटीसाठी जमले मराठमोळे लोक

गाड्या भरभरून आले सगळे लालूला भेटायला...

कुठे?? शिवाजीपार्कात...

शिवाजीपार्कात?? बालेकिल्ल्याच्या सम्मोर??

होय, होय.... लालूभेटीसाठी जमले मराठमोळे लोक शिवाजीपार्कात... बालेकिल्ल्याच्या सम्मोर Wink

अहो कोण लालू काय विचारताय... आपली मायबोलीकर लालू.... कोल्हापूरची अस्सल मराठमोळी लालू.

लालू उर्फ शर्मिलाच्या भारतभेटीनिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या गटगला खालील मायबोलीकर आपापल्या कुटूंब कबिल्यासकट हजर होते:-

१.लालू उर्फ शर्मिला
२.शर्मिला फडके
३.रैना + श्री. रैना
४.भ्रमर
५.विनय भिडे
६.मन्या2804
७.मनिषा लिमये
८.अश्विनी के
९.ललिता प्रीति
१०.असुदे
११.mayuri1
१२.आशुतोष0711
१३.नीलवेद
१४.साधना
१५.आनंदसुजू
१६.मंजूडी
१७.डू आय
१८.गजानन +सौ. गजानन + आरोही
१९.सुजा
२०.थंड
२१.मनी
२२.मेधा2002
२३.किरू +सौ. किरू + आर्या
२४.आनंद मैत्री
२५.घारूअण्णा
२६.नीलू + मैत्रीण

वरील लोकांशिवाय माझ्या माहितीप्रमाणे पूनम आणि नीरजाने फोनरूपाने उपस्थित राहून गटगचा आनंद लुटला. (अजून कोणी फोन केला असेल तर सांगा रे)

वरच्या यादीत कोणाचं नाव राहिलं असेल तर तो माझ्या स्मरणशक्तीचा दोष समजा. Wink

ह्या प्रसिद्ध उसगावकर व्यक्तिमत्वाला भेटायला शब्दशः गाड्या भरून लोक आले. ठाण्याहून सुटलेल्या आशूतोषच्या गाडीतून तब्बल सहा मायबोलीकर बसून आले. केळकरांच्या मांडीवर आपले १३१२ बसलेले.. त्यामुळे गाडी उजव्या बाजूला कलंडेल की काय अशी भिती वाटून नीलला पुढच्या सीटवर डावीकडे बसवण्यात आले होते. नीलच्या मागे साधना....... आणि एकूणच गाडीचा समतोल साधण्यासाठी मला गाडीच्या बरोब्बर मध्यभागी बसवले होते. (उत्सुक इच्छुकांचं समाधान झालं का? Wink ) अमित देसाईची गाडी लेडीज स्पेशल होती, बायकांच्या बडबडीला कंटाळून की काय पण परत येताना सगळ्या लेडीज बायकांना त्याने अतिशय धूर्तपणे आशूतोषच्या गाडीतून पाठवून दिले.

कार्याध्याक्ष रैनाचं हे पहिलंच गटग.. आणि त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून तिचं दडपण वाढत चाललेलं.... मायबोलीकरांना ओळखायचं कसं? येतो सांगून मायबोलीकर आलेच नाहीत तर काय करायचं? भेटण्याच्या ठिकाणावरून काही गोंधळ नाही ना होणार? इतक्या लोकांचा पाहूणचार कसा करायचा? शिवाजीपार्कात काही खायला मिळतं का? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांनी तिच्या भोवती फेर धरलेला.. पण कुठलाही गोंधळ न होता गटग अतिशय उत्साहात पार पडलं.

आयडी शर्मिला असूनही तिला कोणीच त्या नावाने हाक मारत नाही हे पाहून लालूने उसगावी पोचल्यावर आपला आयडी बदलण्याचा इरादा जाहीर केला. (शर्मिला फडकेचा जीव भांड्यात पडला Wink )
रैनाला मुंबई गटगसाठी कायमस्वरूपी कार्याध्यक्ष करण्याचा ठराव बहुमताने पास करण्यात आला. Wink
मंजू आपली जबाबदारी पूर्ण करेल की नाही ह्या भितीने रैना पिशव्या भरून बटाटेवडे घेऊन आली. अश्विनीने केक आणण्याची परंपरा याही वेळी जपली. वडे आणि केक हादडल्यावर लालू बाटल्या घेऊन आली. (पाण्याच्या) Wink उशीरा पोचणार्‍यांना वडे मिळाले नाहीत, अर्थातच.
लालू आणि आशूतोषने भरपूर चॉकलेट्स आणली होती.

घारुअण्णांचं नेहमीप्रमाणे मोठेमोठे बेत रचणं चालू होतं. नील एकच श्रोता होता आणि केवळ मान डोलावण्यापलिकडे आपल्याला काही पर्याय नाहीये हे त्याला कळून चुकलं होतं. Wink

निघताना रैनाने मला एकच प्रश्न विचारला, "अमितच्या मते मी मायबोलीच्या व्यसनाधीन आहे, ह्याबद्दल तुझं काय मत आहे?"
पण इतके सगळे मायबोलीकर बघून अमित ह्याच्यापुढे रैनाला असं म्हणणार नाही ह्याबद्दल मला खात्री आहे. Happy

आर्या आणि आरोहीने मस्त मिरवून घेतलं. फार गोड बाहुल्या आहेत त्या...

इतर मायबोलीकर वृत्तांत लिहितीलच.... पण जे मायबोलीकर पहिल्यांदाच अश्या गटगला उपस्थित राहिले त्यांनी आपल्या अनुभवावर किमान चार ओळी तरी लिहाव्यात अशी नम्र विनंती. Happy

गुलमोहर: 

>>तू भ्रमर नाहिच, त्याला मी ३-४ वेळा भेटलेय. त्याच्या मुलीच्या बारश्याची काजु-कतली खाल्लीये, तू कसा काय भ्रमर होऊ शकत>>>> Rofl मला पण मनिषाने विचारलं की तुला पण वाटतयं की हा भ्रमर आहे म्हणून Lol
रैना तिच्या आवाजाप्रमाणेच मृदु व्यक्तीमत्व आहे >>>> अनुमोदक Happy
पहिल्यांदाच भेटूनही सौ असुदे ईतक्या प्रेमानं बोलल्या आणि घरी यायचं आग्रहाचं आमंत्रण वगैरे... मला अगदी भरुनच आलं Happy
झकासा.. होतो रे असा बरेचदा भ्रमनिरास.. काय म्हणतात ते मूर्ती लहान वगैरे वगैरे Proud
माझा पण झाला नं, उत्सवमूर्ती लालू मला करारी व्यक्तिमत्व असे काही वाटलेले तर त्या खूपच प्रेमळ निघाल्या Happy
मंजू वृ. मस्तच!!
आशुतोष ईतकं मस्त चित्र दिल्याबद्द्ल तुला धन्स Happy

....

हिला मी रोज सकाळी ऑफिसला सोडायला जातो, पण संध्याकाळी परत येते रे>>>> Rofl
GD वृत्तांत पुर्ण कर रे... Angry

रैना, मंजुडी तुमचे वृत्तांत मस्तच आहेत...

हा अगरबत्तीवाला पहिल्या GTG पासून पार्कात हजेरी लावतो... या आधी आम्ही त्याला लिंबूटिंबू समजायचो... Wink

सगळ्यांची धमाल प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला... Happy

झक्कास वृतांत लिहीलेत सगळ्यांनी. एकुणात सगळीकडचे सगळेच मायबोलीकर 'कहर' आहेत. Happy

अरे व्वा वा, सह्हीच झालेल दिसतय गटग... Happy

मी मिसलं.... Sad

सगळ्यांचे वृत्तांत मस्तच आणि फोटो देखिल.
पण या फोटोत लालु कोण???? Uhoh
आणि बाकी बर्‍याच जणांना ओळखत नाही. प्लिज लिहा ना कोण कोण ते.....

. Happy

वर मंजूडीने लिहिले होते कृपया इथे ओळख करुन देऊ नका. मी पुन्हा लिहिते आहे.
हवं तर तुमच्या ओळखीच्या लोकांकडे इमेलने मागा फोटो आणि ओळखी! Happy

मी माझी ती पोस्ट उगाच संपादित केली. शहाणी सुरती माणसं सुद्धा हे असं सांगायची वेळ का आणतात Angry

लालूने लिहीलं आहेच, मी परत एकदा लिहीते, वर फोटो डकवला असला तरी त्यातील आयडीँची ओळख इथे कोणी मागू नये आणि कोणी उघड करू नये. आपल्या ओळखीचे जे लोक उपस्थित होते त्यांना मेल पाठवून फोटो संदर्भातले प्रश्न विचारावेत.

मनिषा लिमये, फोटो इथून काढून टाकल्याबद्दल धन्यवाद. Happy

मला वाटतं मी ग्रुप फोटो अपलोड करायची विनंती केली होती. अर्थात त्यामुळे कोणाच्या भावना दुखावणे वा प्रायवसीला धक्का पोहोचवणे हा उद्देश नव्हता; आणि तो पोहोचतो असे मला तरी वाटत नाही. पण वरील काही प्रतिक्रिया वाचुन काही लोकांचा असा समज आहे असं वाटतं, म्हणुन हा प्रपंच...

मायबोली ही सभ्य आणि सुसंस्क्रुत माणसांनी एकत्र यायची जागा आहे. ग्रुप फोटो पाहुन, त्यातील व्यक्तींची माहीती काढुन त्याचा दुरुपयोग करणे; एव्हढा वेळ वा हौस/एनर्जी इथे आहे कोणाला? आणि समजा असा एखादा अवलक्षणी निघालाच तर तो फोटो नसला तरी स्टॉकींग करु शकतो. अशा मनोव्रुत्तीची माणसं उपलब्ध साधनांचा (hackng s/w) वापर करुन त्यांचा उद्देश सफल करु शकतात. अशा लोकांना घाबरुन जाण्यापेक्षा त्यांच्यावर मात कशी करता येइल याचा विचार करणं महत्वाचं आहे.

(दुसरी गोष्ट; तुम्ही ज्या काँप्युटर्/नेटवर्क वापरुन मायबोलीला भेट देता, तो कदाचीत तुमच्या नकळत तुमची माहीती मदर शिप ला पाठवत असेल. पण हा मुद्धा या चर्चेपुरता गौण.)

कुठेतरी वाचनात आलं होतं की आपल्या प्रायवसीला जास्त धोका जवळच्या/माहितीतल्या लोकांकडुन असतो.

असो, भावना खरच दुखावल्या असतील तर क्षमस्व.

राज, तसा समज नाही, तुम्ही लिहिलेल्या कारणांमुळे लोकांना फोटो इथे नको असेल असेही नाही. काही लोक सर्रास आपल्या प्रोफाईलमध्येही फोटो टाकतात, तर काहींना ओळख देणे, फोटो टाकणे आवडत नाही. मलाही कोणी मला न विचारता फोटो टाकलेला आवडणार नाही. पण जीटीजीचे ग्रुप फोटो लोक टाकतात, बाकीचे ओळखण्याचा खेळ खेळतात.

इथेही आहेत पहा-
http://www.maayboli.com/node/5234?page=12
http://www.maayboli.com/node/5234?page=36
एक तर लहानश्या ग्रुप फोटोत चेहरे नीट दिसत नाहीत आणि नावे न लिहिल्याने ओळखही पटत नाही त्यामुळं फोटो टाकण्याला कोणी आक्षेप घेत नाही, पण एखाद्याला ओळख द्यायची नसेल तर लोकांनी त्यांच्या भावनेचा आदर करावा. त्यात लोक दुरुपयोग करतील अशी भीती असेलच असे नाही, काही लोकांना कम्फर्टेबल वाटत नाही.

ही सभ्य, सुसंस्कृत लोकांनी एकत्र यायची जागा आहे हा मात्र गैरसमज आहे. Happy जगात सगळ्या प्रकारचे लोक असतात आणि त्यातलेच काही इथे येतात तेव्हा इथेही सगळ्या प्रकारचे लोक असतील/आहेत असे गृहित धरायला हरकत नाही.

Pages