चलो शिवाजी पार्क - विराट मेळावा

Submitted by मंजूडी on 30 January, 2010 - 13:50

लालूभेटीसाठी जमले मराठमोळे लोक

गाड्या भरभरून आले सगळे लालूला भेटायला...

कुठे?? शिवाजीपार्कात...

शिवाजीपार्कात?? बालेकिल्ल्याच्या सम्मोर??

होय, होय.... लालूभेटीसाठी जमले मराठमोळे लोक शिवाजीपार्कात... बालेकिल्ल्याच्या सम्मोर Wink

अहो कोण लालू काय विचारताय... आपली मायबोलीकर लालू.... कोल्हापूरची अस्सल मराठमोळी लालू.

लालू उर्फ शर्मिलाच्या भारतभेटीनिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या गटगला खालील मायबोलीकर आपापल्या कुटूंब कबिल्यासकट हजर होते:-

१.लालू उर्फ शर्मिला
२.शर्मिला फडके
३.रैना + श्री. रैना
४.भ्रमर
५.विनय भिडे
६.मन्या2804
७.मनिषा लिमये
८.अश्विनी के
९.ललिता प्रीति
१०.असुदे
११.mayuri1
१२.आशुतोष0711
१३.नीलवेद
१४.साधना
१५.आनंदसुजू
१६.मंजूडी
१७.डू आय
१८.गजानन +सौ. गजानन + आरोही
१९.सुजा
२०.थंड
२१.मनी
२२.मेधा2002
२३.किरू +सौ. किरू + आर्या
२४.आनंद मैत्री
२५.घारूअण्णा
२६.नीलू + मैत्रीण

वरील लोकांशिवाय माझ्या माहितीप्रमाणे पूनम आणि नीरजाने फोनरूपाने उपस्थित राहून गटगचा आनंद लुटला. (अजून कोणी फोन केला असेल तर सांगा रे)

वरच्या यादीत कोणाचं नाव राहिलं असेल तर तो माझ्या स्मरणशक्तीचा दोष समजा. Wink

ह्या प्रसिद्ध उसगावकर व्यक्तिमत्वाला भेटायला शब्दशः गाड्या भरून लोक आले. ठाण्याहून सुटलेल्या आशूतोषच्या गाडीतून तब्बल सहा मायबोलीकर बसून आले. केळकरांच्या मांडीवर आपले १३१२ बसलेले.. त्यामुळे गाडी उजव्या बाजूला कलंडेल की काय अशी भिती वाटून नीलला पुढच्या सीटवर डावीकडे बसवण्यात आले होते. नीलच्या मागे साधना....... आणि एकूणच गाडीचा समतोल साधण्यासाठी मला गाडीच्या बरोब्बर मध्यभागी बसवले होते. (उत्सुक इच्छुकांचं समाधान झालं का? Wink ) अमित देसाईची गाडी लेडीज स्पेशल होती, बायकांच्या बडबडीला कंटाळून की काय पण परत येताना सगळ्या लेडीज बायकांना त्याने अतिशय धूर्तपणे आशूतोषच्या गाडीतून पाठवून दिले.

कार्याध्याक्ष रैनाचं हे पहिलंच गटग.. आणि त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून तिचं दडपण वाढत चाललेलं.... मायबोलीकरांना ओळखायचं कसं? येतो सांगून मायबोलीकर आलेच नाहीत तर काय करायचं? भेटण्याच्या ठिकाणावरून काही गोंधळ नाही ना होणार? इतक्या लोकांचा पाहूणचार कसा करायचा? शिवाजीपार्कात काही खायला मिळतं का? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांनी तिच्या भोवती फेर धरलेला.. पण कुठलाही गोंधळ न होता गटग अतिशय उत्साहात पार पडलं.

आयडी शर्मिला असूनही तिला कोणीच त्या नावाने हाक मारत नाही हे पाहून लालूने उसगावी पोचल्यावर आपला आयडी बदलण्याचा इरादा जाहीर केला. (शर्मिला फडकेचा जीव भांड्यात पडला Wink )
रैनाला मुंबई गटगसाठी कायमस्वरूपी कार्याध्यक्ष करण्याचा ठराव बहुमताने पास करण्यात आला. Wink
मंजू आपली जबाबदारी पूर्ण करेल की नाही ह्या भितीने रैना पिशव्या भरून बटाटेवडे घेऊन आली. अश्विनीने केक आणण्याची परंपरा याही वेळी जपली. वडे आणि केक हादडल्यावर लालू बाटल्या घेऊन आली. (पाण्याच्या) Wink उशीरा पोचणार्‍यांना वडे मिळाले नाहीत, अर्थातच.
लालू आणि आशूतोषने भरपूर चॉकलेट्स आणली होती.

घारुअण्णांचं नेहमीप्रमाणे मोठेमोठे बेत रचणं चालू होतं. नील एकच श्रोता होता आणि केवळ मान डोलावण्यापलिकडे आपल्याला काही पर्याय नाहीये हे त्याला कळून चुकलं होतं. Wink

निघताना रैनाने मला एकच प्रश्न विचारला, "अमितच्या मते मी मायबोलीच्या व्यसनाधीन आहे, ह्याबद्दल तुझं काय मत आहे?"
पण इतके सगळे मायबोलीकर बघून अमित ह्याच्यापुढे रैनाला असं म्हणणार नाही ह्याबद्दल मला खात्री आहे. Happy

आर्या आणि आरोहीने मस्त मिरवून घेतलं. फार गोड बाहुल्या आहेत त्या...

इतर मायबोलीकर वृत्तांत लिहितीलच.... पण जे मायबोलीकर पहिल्यांदाच अश्या गटगला उपस्थित राहिले त्यांनी आपल्या अनुभवावर किमान चार ओळी तरी लिहाव्यात अशी नम्र विनंती. Happy

गुलमोहर: 

अरे वा..जबरी कोरम जमलेला दिसत होता लालु जिटीजीला.. सहीच.. Happy .. लाल्वाका, लईच फेमश की तुम्ही .. Happy

वृत्तांत पण मस्तच... गजा,मस्त लिहितोयस पूर्ण कर रे पण :फिदी:...

रैना, तुझ्या पहिल्याच गटग संयोजनाला इतका अभुतपूर्व प्रतिसाद मिळालेला पाहुन तुला एकदम भरून आलं असेल ना?अभिनंदन गं तुझं:)

बाप रे...भरपूर लोक आले होते की जीटीजीला. खरंच विराट मेळावा होता म्हणजे.. Happy
शिवाजी पार्क, त्यात परत एवढे मराठी लोक... त्या उध्दव ठाकरेला बोलवायचं की... गेला बाजार शिवसेनेचं एक हिवाळी अधिवेशन होऊन गेलं असतं Biggrin

आशुतोष (काका) हे त्यांच्या गाडीतून किती लोकांना घेऊन आले होते याची शेवटपर्यंत गणती झाली नाही. >>> रैना Rofl

मीना प्रभूला पाहण्या-ऐकण्याच्या नादात मी जिप्सी मिसलं Sad
आणि नंतर तोषाच्या होंडा सिविक मधून चक्कर मारायचीही राहीली.

जिप्सीत केलेल्या दंग्याबद्दल लिहा ना कुणीतरी... (तिथे सर्वांनी दंगा केलाच असणार असं मी गृहित धरलंय :फिदी:)

रैना, मस्त वृ आणि संयोजन Happy

आशुतोष (काका) हे त्यांच्या गाडीतून किती लोकांना घेऊन >> स्वतःसकट ६ लोकांस त्यांनी सुखरूप कार्यस्थळी आणले Proud

फार नाही गं थोडासाच केला दंगा Happy त्याबद्दल नंतर.. आधी इथला वृ तर पुरा होऊदे.

हे त्यांच्या गाडीतून किती लोकांना घेऊन >> स्वतःसकट ६ लोकांस त्यांनी सुखरूप कार्यस्थळी आणले >>>>>
पन ते ६ कोण होते माहिती आहे का ?
मंजू डी, आनंद केळकर, नील्...जवळपास सगळे हेवी वेट चँपियन होते...:हाहा:

बाकी खादाडीची सोय चांगली होती. बटाटा वडा, केक, चॉकलेटं ... चंगळ होती.

बाकी मयुरी ने सगळ्यांना एका फोटोत कोंबल खर्..जमल तिला..:डोमा:
न आलेल्या बहुतेक सगळ्यांची आठवण काढली...:स्मित:

तुम्ही शेवटपर्यंत गालातल्या गालात मंद हसत का होता हो ?

त्यांचा चेहराच तसा आहे त्याला ते तरी काय करणार?? Proud गेल्या वेळी मलाही हाच प्रश्न पडलेला....

आणि डुआया .... तू मधेच धावत का सुटला होतास रे ??????
केळकर काका घाबरलेले तुला बघुन एकदम्... Wink
बाकी किरु ने उदबत्त्या विकत घेउन तेथील विक्रेत्यांच्या धंद्याला हातभार लावला..

साधना, सँताक्लॉज असाच हसत असतो ना? Proud पोतडीतून भरपूर चॉकलेट्स व चित्र काढली त्याने. मी निघताना माझ्या बॅगमधे ४-५ चॉकोलेट्स कोंबली बिचार्‍याने घाईघाईत. मला ती फार उपयोगी पडली. रात्री १२ वाजता जेवले त्यामुळे मधे त्यातली ३ खाल्ली आशुतोषला दुवा देत देत.

बाकी किरु ने उदबत्त्या विकत घेउन तेथील विक्रेत्यांच्या धंद्याला हातभार लावला..

न घेऊन सांगणार कोणाला??? तिथले विक्रेते एकदम भन्नाट आहेत, विकत घ्याच म्हणुन पाठीशी लागतात, शिवाय आपण काही विकत घेवो, न घेवो, आपण जे काही खातोय त्यात वाटाही मागतात. एक भिकारी आधी केक घेऊन गेला, त्याचा केक संपतो न संपतो तोच तोषाने चॉकलेटस काढली, तर तो चॉकलेट्स साठी हट्ट धरुन बसला. शेवटी एक चॉकलेट हातात ठेवले तेव्हाच टळला....

गाडीच्या डिटेल्ससाठी दुपारपर्यंत वाट पहा मंडळी

माझ्याही पर्समध्ये चॉकलेटं कोंबली होती अश्विनी आणि वरून घे नाहीतर माझा उद्धार होईल अशी पुटपुटही ऐकू आली. बालमोहन!! Proud

साधना, तो चांगला धडधाकट होता सवयीचा गुलाम झालेला. Angry . वविच्या गटगला सुद्धा एका धडधाकट माणसाने "माझा" व कचोरी मागून घेतली (तो उदबत्ती विकत होता तरिही). काय कळतच नाही या लोकांचं Uhoh

अगं तुझी आधिची चॉकलेट्स पेंडींग होती ना त्याच्या जवळ. मला तो म्हणालासुद्धा की ही मंजुडी टिपिकल बालमोहन आहे.

मी फोन केला होता. नीलु खुश होती.
तिच्या मायबोलीवरच्या अख्ख्या आयुष्यात तिने पहिल्यांदाच एवढे मायबोलीकर मुंबईतल्या जीटीजीला पाहिले होते. Happy

तिच्या मायबोलीवरच्या अख्ख्या आयुष्यात तिने पहिल्यांदाच एवढे मायबोलीकर मुंबईतल्या जीटीजीला पाहिले होते.

मीही.. Happy मलाही खुप आनंद झाला सगळ्यांना भेटून.. तसे ठाणे गटगलाही बरीच जंता होती...

अगं तो उदबत्तीवाला आला तु गेल्यावर. किरुने उदबत्या घेतल्या, मग तुझा केकचा डब्बा तिथेच पडला होता, त्यात केकचुरा शिल्लक होता. त्याने तो बकाबका खाऊन टाकला.. मला एकाचवेळी खुप करूणा, आश्चर्य आणि रागसदृश्य काहीतरी वाटत होते त्या उदबत्तीवाल्याला पाहुन...

मस्त वृत्तांत सगळ्यांचे Happy मी फोन केला तेव्हा इतका गोंगाट होता की रैना, लालू एक-दोनदा उगाचच मी काहीतरी विचारलंय असं समजून 'हो हो' म्हणाल्या Lol
मला फोटो पाहिजेत Happy

एक नंबर गटग घडला की मुंबईत.... येवढी उपस्थिती प्रथमच.....

मया... मुंबईकर ववि संयोजकांना एक चांगली संयोजिका मिळाली की म्हणजे... हे बाकी फारच छान हो...

मी फोन केला तेव्हा इतका गोंगाट होता की रैना, लालू एक-दोनदा उगाचच मी काहीतरी विचारलंय असं समजून 'हो हो' म्हणाल्या >>> Rofl

(माझं असं अनेकदा होतं :फिदी:)

मया... मुंबईकर ववि संयोजकांना एक चांगली संयोजिका मिळाली की म्हणजे... हे बाकी फारच छान हो...>>>हिम्या,अगदी अगदी... Happy

मंजूडे अग्ग कित्ती डोमाशील Proud दुखेल हं जरा जपून...

गाडीच्या डिटेल्स... जिप्सीतल्या जिप्सी बाहेरच्या डिटेल्स साठीही वाट पहा मंडळी Happy

खरयं पूनम. इतका कल्ला होता ना की मी तुझ्या अर्ध्या वाक्यांना उगाचच होहो म्हणत होते Proud
नाय हाँ मयुरेश- नाईस ट्राय. मी नाय हाँ पर्मनंट कार्याध्यक्ष. तुझ्या नावानी शिमगा करताना पाह्यलय लोकांना. Wink Light 1

मी खरोखर काही केलं नाही. एक बाफ उघडला, तो सगळ्यांच्या कृपेने धोधो वाहिला, सर्वजणं ठरल्याप्रमाणे आले नीट, लै गप्पा मारल्या, त्यामुळे गटग संपन्न जाहले. मी आभाराचं लांबलचक भाषण लिहून आणलं होतं ते विनयभिडेनीच म्हणून टाकलं Proud
तरी नंतर असं वाटलं की नीट बसून बोलायला जागा पाहिजे होती आणि अजून वेळ पाहिजे होता.
पुढच्या संयोजकांना हे उपयोगी पडेल.

जिप्सी वृत्तांताची वाट पहाते आहे.

मंजू- मस्त वृत्तांत.

मंजूडी, हा बीबी मला नावावरुन आंबेडकरांच्या एप्रिलमधल्या मेळाव्याचा वाटला म्हणून फिरकलेही नाही. Proud
वृत्तांत सलग पूर्ण करा ना प्लीज.

Pages