लालूभेटीसाठी जमले मराठमोळे लोक
गाड्या भरभरून आले सगळे लालूला भेटायला...
कुठे?? शिवाजीपार्कात...
शिवाजीपार्कात?? बालेकिल्ल्याच्या सम्मोर??
होय, होय.... लालूभेटीसाठी जमले मराठमोळे लोक शिवाजीपार्कात... बालेकिल्ल्याच्या सम्मोर
अहो कोण लालू काय विचारताय... आपली मायबोलीकर लालू.... कोल्हापूरची अस्सल मराठमोळी लालू.
लालू उर्फ शर्मिलाच्या भारतभेटीनिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या गटगला खालील मायबोलीकर आपापल्या कुटूंब कबिल्यासकट हजर होते:-
१.लालू उर्फ शर्मिला
२.शर्मिला फडके
३.रैना + श्री. रैना
४.भ्रमर
५.विनय भिडे
६.मन्या2804
७.मनिषा लिमये
८.अश्विनी के
९.ललिता प्रीति
१०.असुदे
११.mayuri1
१२.आशुतोष0711
१३.नीलवेद
१४.साधना
१५.आनंदसुजू
१६.मंजूडी
१७.डू आय
१८.गजानन +सौ. गजानन + आरोही
१९.सुजा
२०.थंड
२१.मनी
२२.मेधा2002
२३.किरू +सौ. किरू + आर्या
२४.आनंद मैत्री
२५.घारूअण्णा
२६.नीलू + मैत्रीण
वरील लोकांशिवाय माझ्या माहितीप्रमाणे पूनम आणि नीरजाने फोनरूपाने उपस्थित राहून गटगचा आनंद लुटला. (अजून कोणी फोन केला असेल तर सांगा रे)
वरच्या यादीत कोणाचं नाव राहिलं असेल तर तो माझ्या स्मरणशक्तीचा दोष समजा.
ह्या प्रसिद्ध उसगावकर व्यक्तिमत्वाला भेटायला शब्दशः गाड्या भरून लोक आले. ठाण्याहून सुटलेल्या आशूतोषच्या गाडीतून तब्बल सहा मायबोलीकर बसून आले. केळकरांच्या मांडीवर आपले १३१२ बसलेले.. त्यामुळे गाडी उजव्या बाजूला कलंडेल की काय अशी भिती वाटून नीलला पुढच्या सीटवर डावीकडे बसवण्यात आले होते. नीलच्या मागे साधना....... आणि एकूणच गाडीचा समतोल साधण्यासाठी मला गाडीच्या बरोब्बर मध्यभागी बसवले होते. (उत्सुक इच्छुकांचं समाधान झालं का? ) अमित देसाईची गाडी लेडीज स्पेशल होती, बायकांच्या बडबडीला कंटाळून की काय पण परत येताना सगळ्या लेडीज बायकांना त्याने अतिशय धूर्तपणे आशूतोषच्या गाडीतून पाठवून दिले.
कार्याध्याक्ष रैनाचं हे पहिलंच गटग.. आणि त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून तिचं दडपण वाढत चाललेलं.... मायबोलीकरांना ओळखायचं कसं? येतो सांगून मायबोलीकर आलेच नाहीत तर काय करायचं? भेटण्याच्या ठिकाणावरून काही गोंधळ नाही ना होणार? इतक्या लोकांचा पाहूणचार कसा करायचा? शिवाजीपार्कात काही खायला मिळतं का? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांनी तिच्या भोवती फेर धरलेला.. पण कुठलाही गोंधळ न होता गटग अतिशय उत्साहात पार पडलं.
आयडी शर्मिला असूनही तिला कोणीच त्या नावाने हाक मारत नाही हे पाहून लालूने उसगावी पोचल्यावर आपला आयडी बदलण्याचा इरादा जाहीर केला. (शर्मिला फडकेचा जीव भांड्यात पडला )
रैनाला मुंबई गटगसाठी कायमस्वरूपी कार्याध्यक्ष करण्याचा ठराव बहुमताने पास करण्यात आला.
मंजू आपली जबाबदारी पूर्ण करेल की नाही ह्या भितीने रैना पिशव्या भरून बटाटेवडे घेऊन आली. अश्विनीने केक आणण्याची परंपरा याही वेळी जपली. वडे आणि केक हादडल्यावर लालू बाटल्या घेऊन आली. (पाण्याच्या) उशीरा पोचणार्यांना वडे मिळाले नाहीत, अर्थातच.
लालू आणि आशूतोषने भरपूर चॉकलेट्स आणली होती.
घारुअण्णांचं नेहमीप्रमाणे मोठेमोठे बेत रचणं चालू होतं. नील एकच श्रोता होता आणि केवळ मान डोलावण्यापलिकडे आपल्याला काही पर्याय नाहीये हे त्याला कळून चुकलं होतं.
निघताना रैनाने मला एकच प्रश्न विचारला, "अमितच्या मते मी मायबोलीच्या व्यसनाधीन आहे, ह्याबद्दल तुझं काय मत आहे?"
पण इतके सगळे मायबोलीकर बघून अमित ह्याच्यापुढे रैनाला असं म्हणणार नाही ह्याबद्दल मला खात्री आहे.
आर्या आणि आरोहीने मस्त मिरवून घेतलं. फार गोड बाहुल्या आहेत त्या...
इतर मायबोलीकर वृत्तांत लिहितीलच.... पण जे मायबोलीकर पहिल्यांदाच अश्या गटगला उपस्थित राहिले त्यांनी आपल्या अनुभवावर किमान चार ओळी तरी लिहाव्यात अशी नम्र विनंती.
च्यायला; एव्हढे रीस्पाँस पण
च्यायला; एव्हढे रीस्पाँस पण एकही फोटो नाही? निदान एखादा ग्रुपफोटो तरी... न आलेल्यांना फोटो दाखवायचे नाहीत असा अलिखीत नियम तर नाहीना मायबोलीवर?
बाकी जिप्सीचा उल्लेख वाचुन जुन्या आठवणी चाळवल्या...
सही धमाल केलीत की. तिचा
सही धमाल केलीत की.
तिचा बदलणा-या भावनांनी दाटुन आलेला इस्टमन कलर चेहरा पाहत आम्ही हसत सुटलो >>>
सगळेच वृत्तांत अर्धे मुर्धे आहेत पण मज्जेचे आहेत. मला कुणीतरी मागच्या दाराने फोटो पाठवा बरं
तुझ्या नावानी शिमगा करताना
तुझ्या नावानी शिमगा करताना पाह्यलय लोकांना....>>> चालायचच गं.. सवय झाली बघ आता..
तुला पण होईल. 
हे कार्याध्यक्षांच्या
हे कार्याध्यक्षांच्या निवॄत्तीचे तर संकेत नाहीत ना?
हे कार्याध्यक्षांच्या
हे कार्याध्यक्षांच्या निवॄत्तीचे तर संकेत नाहीत ना? >>>
रैना, व्ही.आर.एस. की कॉय?
मी फोन केला होता. नीलु खुश
मी फोन केला होता. नीलु खुश होती.
तिच्या मायबोलीवरच्या अख्ख्या आयुष्यात तिने पहिल्यांदाच एवढे मायबोलीकर मुंबईतल्या जीटीजीला पाहिले होते.>>> निलुलाही बर्याच जणांनी प्रथमच पाहिलं आणी गहिवरलेल ते!
मनिषाने मात्र मला प्रचंड धक्का दिला. "तू भ्रमर नाहिच, त्याला मी ३-४ वेळा भेटलेय. त्याच्या मुलीच्या बारश्याची काजु-कतली खाल्लीये, तू कसा काय भ्रमर होऊ शकतोस". ही मुक्ताफळे ऐकुन मी ईतका भंजाळलो की "थंड" ने माझा आयडी विचारला तेव्हा "तो मी नव्हेच" असंच माझ्या तोंडुन निघालं.
रैना तिच्या आवाजाप्रमाणेच मृदु व्यक्तीमत्व आहे, खरं तर तिच्या कार्याधक्षपदाचा भार अमित (श्री, रैना) यांनीच उचलला होता. मी बर्याच आयडींना प्रत्याक्षात प्रथमच भेटलो. त्यात असुदे ने उच्चारलले एक संतवचन मला एकदम पटले. "शाळा कॉलेज सुटल्यावर आपल्याला ईतके मित्र अचानक भेटतात, आणी ते पण आपल्यासारखेच xxxx निघावेत, काय योग आहे!"
सौ. असुदेनी मला "तुम्ही मुलुंडला असुनही ठाण्यात येत नाही हे काही बरोबर नाही, यापुढे येत जा" अशी प्रेमळ विनम्रंती केली. असुदेच कसं काय होत असेल देव जाणे. तरीच तो म्हणाला, "हिला मी रोज सकाळी ऑफिसला सोडायला जातो, पण संध्याकाळी परत येते रे"
रैना तिच्या आवाजाप्रमाणेच
रैना तिच्या आवाजाप्रमाणेच मृदु व्यक्तीमत्व आहे >>>> अगदी अगदी
हिला मी रोज सकाळी ऑफिसला सोडायला जातो, पण संध्याकाळी परत येते रे >>>>
भ्रमा, आता मयुरी तुला परत भेटली की मारणार (आणि वर जेवायला पण बोलावेल
)
भ्रमा, तुझ्याविषयी बर्याच
भ्रमा, तुझ्याविषयी बर्याच जणांचे बरेच गोड गैरसमज आहेत. मलाही तुझ्याबद्दल कोणीतरी काहीतरी सांगितलंय... ज्यावर मी अज्याबात विश्वास ठेवू शकत नाही.
भ्रमा, तुझ्याविषयी बर्याच
भ्रमा, तुझ्याविषयी बर्याच जणांचे बरेच गोड गैरसमज आहेत. मलाही तुझ्याबद्दल कोणीतरी काहीतरी सांगितलंय... ज्यावर मी अज्याबात विश्वास ठेवू शकत नाही<<<<
काय ग काय ते?
मलापण सांग ना. 
मंजे, मलाहि कळुदे नां कसले
मंजे, मलाहि कळुदे नां कसले गैरसमज आहेत ते!
भ्रमा, बघ कशा सगळ्या तुला
भ्रमा, बघ कशा सगळ्या तुला बोलतायत. उगी उगी ! मी नाय हं तुला असं बोलणार (मी तुला पहिल्यांदाच बघितलंय तर फरक कसा कळणार? )
अश्विनीचा
अश्विनीचा प्रस्ताव......पुढच्या गटगसाठी ठाण्याहून निघणार्या माबोकरांसाठी छोटी मिनीबस ठेवण्याचा
हिला मी रोज सकाळी ऑफिसला
हिला मी रोज सकाळी ऑफिसला सोडायला जातो, पण संध्याकाळी परत येते रे>>
असुदे मयुरी नसताना बरंच काय काय म्हणुन घेतो.
ललिता- तुझा वृत्तांत कुठे आहे? मीनातै काय म्हणाल्या भाषणात?
डुआय- जिप्सीवृ कुठे आहे
अरे खरंच कोणीतरी प्लीज इथे एकतरी गृप फोटो टाका ना. चालत नाही का माबोवर फोटो टाकलेलं ?
.
.
पुढच्या गटगसाठी ठाण्याहून
पुढच्या गटगसाठी ठाण्याहून निघणार्या माबोकरांसाठी छोटी मिनीबस ठेवण्याचा >>>
त्यापेक्षा पुढचं गटगच ठाण्यात ठेवायचं
हिला मी रोज सकाळी ऑफिसला सोडायला जातो, पण संध्याकाळी परत येते रे>>

सही. थॅन्क्यु मनिषा.
सही. थॅन्क्यु मनिषा.
मी नाहिच्चे या फोटूत
मी नाहिच्चे या फोटूत
या फोटोत अश्वी आणि आण्णा
या फोटोत अश्वी आणि आण्णा नाहियेत...आणि हो केक आणि चॉकलेट मागणारे भिकारी पण्...:हाहा:
लले तुला सांगितलेल तुम एक शेंडी लगाव हम तुम्हे २ देंगे...:फिदी:
तू भ्रमर नाहिच, त्याला मी ३-४
तू भ्रमर नाहिच, त्याला मी ३-४ वेळा भेटलेय. त्याच्या मुलीच्या बारश्याची काजु-कतली खाल्लीये, तू कसा काय भ्रमर होऊ शकतोस>>>>>>>>>>


हिला मी रोज सकाळी ऑफिसला सोडायला जातो, पण संध्याकाळी परत येते रे>>>>
निलुलाही बर्याच जणांनी प्रथमच पाहिलं आणी गहिवरलेल ते!>>>

मीदेखील तिला पहिल्यांदाच पाहिल तेव्हा मुलुंडात मोठे मोठे सिक्सर मारणारी हीच आपली निलुटाय हे पटलच नाय रे.
हिला मी रोज सकाळी ऑफिसला
हिला मी रोज सकाळी ऑफिसला सोडायला जातो, पण संध्याकाळी परत येते रे> हसु नका लेको, सगळ्या नवर्यांच्या मनातलच बोललाय तो.
पण सौ, असुदेनी ईतक्या आग्रहाने ठाण्याला बोलावलय, तसं आधी कुणीच नव्हतं बोलावल. 
हिला मी रोज सकाळी ऑफिसला
हिला मी रोज सकाळी ऑफिसला सोडायला जातो, पण संध्याकाळी परत येते रे> >>>
अरे तिची चूक नाहिये,हापिसातले पण परत आणून सोडत असतील...त्यांची १२ तास ड्युटी , तुझी १२ तास ड्युटी...एकूणच बायका सगळ्यांचे १२ वाजवतात ते अशा...:फिदी:
थांबा आता मयुलाच बोलावते इथे
थांबा आता मयुलाच बोलावते इथे तुमची मुक्ताफळं वाचायला
मयुलाच बोलावते इथे तुमची
मयुलाच बोलावते इथे तुमची मुक्ताफळं वाचायला >>>>
तिला वाचून मराठीत पोस्ट टाकायला सांग्...:फिदी:
मयुलाच बोलावते इथे तुमची
मयुलाच बोलावते इथे तुमची मुक्ताफळं वाचायला >>>>
तिला वाचून मराठीत पोस्ट टाकायला सांग्...:फिदी:
विनय, पिक्चर भेटलं कां?? की
विनय, पिक्चर भेटलं कां?? की भलताच शो नाही ना सुरु झाला?
अरे नाही भ्रमा,रद्दच झाल
अरे नाही भ्रमा,रद्दच झाल चित्रपटाला जाण्याच्..:अरेरे:
मगाम्ही घरीच पा बघितला........वैताग होता...
अरे व्वा, फोटू पण
अरे व्वा, फोटू पण टाकलेत.
मज्जा केली दिसते.
--------------------------------------------------------------------------------
मंजूडी, हा बीबी मला नावावरुन आंबेडकरांच्या एप्रिलमधल्या मेळाव्याचा वाटला म्हणून फिरकलेही नाही. >> सायो, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि दात दाखवायला काय झालं.
-------------------------------------------------------------------------------
आयला, नेमकच तर म्हणलय की!
आयला, नेमकच तर म्हणलय की!
.
.
नेमकं काय म्हणायचं आहे
नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि दात दाखवायला काय झालं.
>> त्यांनी नेमकंच म्हटल आहे . दात मेळाव्याला काढले नसून न फिरकण्याला काढले आहेत . तुम्हालाही काढायचे तर काढा दात . कशाचाही काय हेवा ?
Pages