आपल्या तब्येतीसाठी सोयाबीन खरंच चांगलं आहे का?

Submitted by नानबा on 25 January, 2010 - 16:46

बर्‍याचदा मायबोलीवर "सोयाबीन खावं" अशा अर्थाचं अनेकांनी लिहिलेलं वाचलं.

माझ्या एका रुममेट मुळे मलाही 'सोयामिल्क' ची चटक लागलेली मागे. त्यातुनही सोया हे तब्येती करता एकदमच 'बेश्ट' अशा समजात मी त्याआधी पासूनही वावरत होते. टोफु, कणकेमध्ये सोयाबीन्ची पूड मिसळणे, सोयामिल्क - म्हणजे एकदम 'भारी काम' असं वाटायचं.
पण पुढे हायपोथायरॉईड माणसानं 'काय खावं- काय खाऊ नये' ह्यावर माहिती मिळवताना सोयाबीन च्या वादविवादात पडले. मग सोयाच्या बाजूनं असणार्‍यांचही मत वाचलं आणि विरुद्ध असणार्‍यांचं पण.
जेव्हा मी दोन्ही weigh केलं - तेव्हा मी स्वतः सोया खाणार नाही अशा मताची झाले. (आधीच मी हायपोथायरॉईड आहे - बाकीचे हार्मोन्सही धुमाकुळ घालतच असतात - त्यामुळे ज्याची खात्री नाही त्याच्या वाटेला जाऊन प्रोब्लेम्स वाढवून घेऊ नयेत- असं मला वाटलं)

मला मुख्य वाटलेले मुद्दे म्हणजे
अ. थायरॉईडची गडबड
ब. इस्ट्रोजिन जास्त होतं
क. वरच्या ब ह्या कारणामुळे तर विरुद्ध असणारे म्हणतात की लहान बाळांना सोया फॉर्म्युला देणं म्हणजे लहानपणीच 'बर्थ कंट्रोल पिल' देण्यासारखं आहे!
ड. नैसर्गिक अवस्थेत सापडणारं सोया खाण्याच्या लायकीचं नसतं - त्यामुळे त्याच्यावर जी काही प्रक्रिया होते - त्यामुळे सोया स्वतःही जेनेटिकली मॉडिफाय होतं (जेनेटिकली मॉडिफाय होण्याचे स्वतःचेही अनेक तोटे असतात) + त्याला खाण्यायोग्य बनवण्यासाठीची इतर प्रोसेस.
ई. सोया खाल्यावर, काही मिनरल्स (ह्यात लोहही आलं)चं अ‍ॅब्सॉर्प्शन नीट होत नाही शरीराकडून .

विरुद्ध असणारे म्हणतात की ही बिलियन डॉलर्सची इन्डस्ट्री आहे त्यामुळे ह्याचा भरपूर प्रसार केला जातो 'हेल्दी' म्हणून.

खाली मी रेफर केलेल्यातल्या (सोयाच्या विरुद्ध असणार्‍या) काही लिंक्स आहेत.
http://www.healingdaily.com/detoxification-diet/soy.htm
http://www.skrewtips.com/2009/08/27/soy-good-bad/
http://www.sunherb.com/is_soy_good_for_you.htm
http://planetgreen.discovery.com/food-health/soybean-good-fact-fiction.html
http://www.soyonlineservice.co.nz/

तुमचं काय मत आहे? कुणाला डायरेक्ट अनुभव आहे का? नक्की लिहा!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सोयाबीन्सचं फॅड येण्याआधी वर्षानुवर्षे विदर्भात सोयाबीनची शेती होते. ८०-९० मध्ये पण सोयामिल्क मिळायचं नागपूरला. आम्ही लहान असताना आमचे आजोबा दर उन्हाळ्यात सोयामिल्कचे crates आणायचे. रोज दुपारी आम्ही मस्त थंडगार सोयामिल्क प्यायचो. आम्हाला प्रचंड आवडायचं. काचेच्या बाटल्यांमध्ये (कोकाकोला सारख्या) गुलाबी, हिरवे किंवा पिवळे सोयामिल्क मिळायचे. आम्ही अनेक वर्ष दर उन्हाळ्यात प्यायलोय, काही अपाय झाला नाही.
सोयाबीनची भाजी तर कष्टाचे काम करणाऱ्या लोकांचे स्टेपल फूड आहे विदर्भात. आमच्याकडे धुणं-भांडे करणारी नेहमीच आईला सांगायची, "पोट्याइंना सोयाबीनची भाजी लागते, मटणसारखी लागते म्हणून करा लागते बापा". सोयाबीनची भाजी आणि काळ्या चन्याची भाजी (उसळ) हे त्यांचं आलटून पालटून चालायचं. भाजी परवडायची नाही.
मुद्दा हा की सोयाबीन अजिबात नवीन नाहीये भारतात आणि खाल्ल्याने कोणाला अपाय झाल्याचं ऐकिवात नाहीये. अर्थात मी डॉक्टर/ nutritionist नाही.

सोयाबिन तेल कूकिंग साठी वापरते आहे का कोणी ?...... हो मी वापरले आहे.काही फरक वाटला नाही.आताशा शेंगदाण्याचे तेल जरा वेगळे वाटते.

सोयाबीन तेलाचा वेगळा आणि उग्र वास येतो
सरसो के तेल सारखा त्याचा वैताग येऊ शकतो
भजी , पापड तळताना लगेच धूर यायला लागतो आणि घरभर वास पसरतो
पण हे सोडले तर
स्वस्त ही आहे आणि रस्सा वगैरे वर इतका तवंग येत नाही

घरभर वास पसरतो.... सॉरी, अजिबात वास येत नाही की धूर आला नव्हता.
हे मी मोहोरीच्या तेलाबाबत ऐकले आहे.वापरायची इच्छा आहे,पण कितपत जमेल असे vataty.म्हणून अजूनतरी नाही वापरले.

पुन्हा एकदा देवकीशी सहमत.
सोयाबीन तेलाला वास धूर काही आला नाही.
मोहरी तेल मात्र गरम केल्यावर घरभर उग्र वास आला होता.

Pages