बर्याचदा मायबोलीवर "सोयाबीन खावं" अशा अर्थाचं अनेकांनी लिहिलेलं वाचलं.
माझ्या एका रुममेट मुळे मलाही 'सोयामिल्क' ची चटक लागलेली मागे. त्यातुनही सोया हे तब्येती करता एकदमच 'बेश्ट' अशा समजात मी त्याआधी पासूनही वावरत होते. टोफु, कणकेमध्ये सोयाबीन्ची पूड मिसळणे, सोयामिल्क - म्हणजे एकदम 'भारी काम' असं वाटायचं.
पण पुढे हायपोथायरॉईड माणसानं 'काय खावं- काय खाऊ नये' ह्यावर माहिती मिळवताना सोयाबीन च्या वादविवादात पडले. मग सोयाच्या बाजूनं असणार्यांचही मत वाचलं आणि विरुद्ध असणार्यांचं पण.
जेव्हा मी दोन्ही weigh केलं - तेव्हा मी स्वतः सोया खाणार नाही अशा मताची झाले. (आधीच मी हायपोथायरॉईड आहे - बाकीचे हार्मोन्सही धुमाकुळ घालतच असतात - त्यामुळे ज्याची खात्री नाही त्याच्या वाटेला जाऊन प्रोब्लेम्स वाढवून घेऊ नयेत- असं मला वाटलं)
मला मुख्य वाटलेले मुद्दे म्हणजे
अ. थायरॉईडची गडबड
ब. इस्ट्रोजिन जास्त होतं
क. वरच्या ब ह्या कारणामुळे तर विरुद्ध असणारे म्हणतात की लहान बाळांना सोया फॉर्म्युला देणं म्हणजे लहानपणीच 'बर्थ कंट्रोल पिल' देण्यासारखं आहे!
ड. नैसर्गिक अवस्थेत सापडणारं सोया खाण्याच्या लायकीचं नसतं - त्यामुळे त्याच्यावर जी काही प्रक्रिया होते - त्यामुळे सोया स्वतःही जेनेटिकली मॉडिफाय होतं (जेनेटिकली मॉडिफाय होण्याचे स्वतःचेही अनेक तोटे असतात) + त्याला खाण्यायोग्य बनवण्यासाठीची इतर प्रोसेस.
ई. सोया खाल्यावर, काही मिनरल्स (ह्यात लोहही आलं)चं अॅब्सॉर्प्शन नीट होत नाही शरीराकडून .
विरुद्ध असणारे म्हणतात की ही बिलियन डॉलर्सची इन्डस्ट्री आहे त्यामुळे ह्याचा भरपूर प्रसार केला जातो 'हेल्दी' म्हणून.
खाली मी रेफर केलेल्यातल्या (सोयाच्या विरुद्ध असणार्या) काही लिंक्स आहेत.
http://www.healingdaily.com/detoxification-diet/soy.htm
http://www.skrewtips.com/2009/08/27/soy-good-bad/
http://www.sunherb.com/is_soy_good_for_you.htm
http://planetgreen.discovery.com/food-health/soybean-good-fact-fiction.html
http://www.soyonlineservice.co.nz/
तुमचं काय मत आहे? कुणाला डायरेक्ट अनुभव आहे का? नक्की लिहा!
सोया मिल्क, टोफु सगळं झकास
सोया मिल्क, टोफु सगळं झकास लागतं. आम्ही टोफु चांगलं मायक्रोवेव्ह करून सॅलड मधे घालतो. प्रोटीन्स जास्त असतात एव्हढेच माहित बाकीची माहिती आजच कळली बुवा!
अति तिथे माती.. तसे सोयाबिनचे
अति तिथे माती.. तसे सोयाबिनचे करु नका.. माझ्या मते सोयाबिन 'तुझ्या वाचुन करमेना' त्यातला प्रकार नाही.. सोयाबिनमध्ये प्रोटिन्स असले तरी त्याचे शरिरात absorb व्हायचे प्रमाण कमी आहे.. प्रोटिन्स साठी एव्हढी धडपड करायची असेल (जिमसाठी वगैरे), तर सरळ whey proteins नावची मेडिक्ल्समध्ये अथवा स्पोर्ट्स शॉपमध्ये पावडर मिळते ती घ्या..
गहू दळताना सोयाबीन तसेच न
गहू दळताना सोयाबीन तसेच न वापरता आधि भिजवून वाळवून थोडे भाजून मग दळणात टाकावे. किंवा सोयाबीनचे पीठ वेगळे याचप्रमाणे वापरावे, रसभाजीत, आमटीत, कसेही वापरता येते. याप्रकारे वापरले तर पचन चांगले होते, प्रोटिन्स absorb व्हायचे प्रमाण वाढते. रोज थोड्या प्रमाणात सोयाबीनचा वापर करावा.
आमच्या इथे सोयबिन चे पीथ
आमच्या इथे सोयबिन चे पीथ मिळ्ते का ते माहित नाहि म्हनुन मि रोज तोफु मिक्स करते कणिक भिजवताना.
मि २ न्हि वेळेस वापरते. हे कित्पत योग्य आहे.
हल्ली महिन्यातुन ठराविक
हल्ली महिन्यातुन ठराविक दिवसांमधेच फक्त चेहर्याची टि झोन मधली त्वचा शुष्क पडते व अक्षरशः एखादी साल निघावी तशी चेहर्याची त्वचा अत्यंत कोरडी होते व त्वचा पिल होते..हे सर्व होत असताना चेहर्याला सुज येणे व झोंबणे हि लक्षणे देखिल जोडीला असतात.यातच डोळ्याकडील भाग देखिल सामिल आहे .डोळ्याचा आजुबाजुचा भाग कोरडा पडतो व वरचेवर डोळा खाजवावा अस वाटत रहाते.....त्याच प्रमाणे शरिरावर असाधारण सुज येते सकाळी उठल्यावर पावलांवर सुज आहे हे लक्षात येते..पावले खुप दुखतात ...साधारण एखाद तासाने सगळ पुर्ववत होत .खाण्यापिण्यावर नियंत्रण असुनही वजन अनावश्यक वाढते आहे असे ध्यानी आले आहे....मला इस्ट्रोजेन कमी असल्याचे सांगण्यात आले आहे .तरी मला शक्य असल्यास मार्गदर्शन करावे
सुरताल, तुमचा सुर आणि ताल
सुरताल,
तुमचा सुर आणि ताल दोन्ही चुकलेत इथे पोस्ट टाकताना.
हा सोयाबीन च्या फायद्या-तोट्यांची चर्चा करणारा बीबी आहे.
सोया तेल कितपत फायदेशीर आहे?
सोया तेल कितपत फायदेशीर आहे?
निंबुडा डॉक्टरांनी सोयाचे
निंबुडा
डॉक्टरांनी सोयाचे सेवन जास्त प्रमाणात करा असा सल्ला दिला आहे म्हणुन मी इथे लिहिले पण घाईत मी डॉ च्या सल्ल्याचा उल्लेख करणे विसरले .गल्लत झाली......अंमळ समजून घेणे
जगातल्या सर्व अन्नपदार्थाचे
जगातल्या सर्व अन्नपदार्थाचे काही ना काही दुष्परिणाम असतात.. एखादा अन्नपदार्थ न पचणे, त्याचे शोषण न होणे, त्यापासून काहीतरी तिसरेच रसायन तयार होणे, इथपासून त्याची अॅलर्जी असणे, असे ढीगभर साइड इफेक्ट असतात. अगदी दूध, भाज्या, अंडी, गहू, मासे.... काहीही घेतले तरी हे लागू होते. त्यामुळे सरसकट निष्कर्ष काढु नयेत.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नाचे/ औषधाचे फायदे तोटे समजणे हे अव्याहत सुरु असते.
आपला आहार हे औषध समजून खा. नाहीतर औषध अन्नाप्रमाणे खात बसायची पाळी येईल , अशी एक म्हण आहे.
Pages