पण विकत कोण घेणार?

Submitted by अजय on 20 January, 2010 - 00:15

"पण विकत कोण घेणार?"

हार्वर्ड विद्यापीठातल्या माझ्या प्राध्यापकांनी मला प्रश्न केला.

व्यवस्थापन क्षेत्रातल्या एका विषयाचा वर्ग होता. आम्हा विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या उद्योगांच्या कल्पना लिहून आणायच्या आणि प्रकल्प म्हणून ती कल्पना (तो उद्योग) प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करता येईल याचं विश्लेषण करायचं असा काहिसा तो धडा होता. माझ्या मते मी अगदी व्यवस्थित तयारी केली होती. काय विकायचं, ते कसं तयार करायचं, बाजारातल्या इतर गोष्टींपेक्षा ते वेगळं कसं असेल, स्वस्तात कसं करता येईल असे सगळे विचार केले होते. आणि एकदा का मोठ्या प्रमाणात माल तयार झाला की भरपूर मार्केटींग करून तो विकायचा आणि भरपूर नफा कमवायचा अशी स्वप्नं होती. बरोबरच्या काही विद्यार्थी मित्रांनी वस्तू विकण्याऐवजी सेवा विकायची कल्पना काढली होती. आणि एकदा ग्राहक मिळाले की असे अनेक सेवादाते एकत्र येऊन धंदा वाढवणार होते.

"पण विकत कोण घेणार?"

मला वाटलंच होतं हा प्रश्न येणार. मी थोडी तयारी केली होती त्यानुसार उत्तर दिलं

"केवढ्याला घेणार?", "किती जण घेणार?", "वर्षातून किती वेळेस घेणार?", "तुझ्याचकडून का घेणार?"

जसे जसे हे प्रश्न यायला लागले तसा माझा आत्मविश्वास घरंगळत गेला. माझी सगळी तयारी ही वस्तू तयार करण्यापर्यंत होती. पण विक्रीबद्दल काही जास्त विचार केला नव्हता.

"जे ग्राहक तुझा माल घ्यायला तयार होतील असे वाटतंय त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार?" , "त्यात तुझे किती पैसे, वेळ खर्च होणार", "हे सगळे खर्च, उत्पादन खर्च केल्यावर नफा किती शिल्लक रहाणार", आणि "उद्या बँकेत त्याच काळासाठी हेच भांडवल ठेवलं तर त्यावरचं व्याज हे नफ्यापेक्षा जास्त असेल की कमी"?

हा शेवटचा प्रश्न ऐकल्यावर माझी कल्पना पूर्ण मोडकळली. बरोबरच्या विद्यार्थ्यांची वेगळी परिस्थिती नव्हती.

"तुम्हाला नाऊमेद करण्याचा माझा हेतू नव्हता. विक्री हा कुठल्याही उद्योगातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे हे तुम्हाला कळावं हा माझा हेतू होता. विक्री करू शकलात तर बाकीचं काहिही Outsource करता येतं. पण काही तयार केलं, सेवा दिली तरी जो पर्यंत विक्री नाही तो पर्यंत तो उद्योग होत नाही. " प्राध्यापक बोलत होते. " आज तंत्रज्ञानात खूप सुधारणा झाल्या आहेत, वस्तू तयार करणे, सेवा देणे सोपे आणि स्वस्त होते आहे. पण एखाद्याला काहितरी विकणे पूर्वी होतं, तितकंच अवघड आहे. आधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा , बाकीची उत्तरे शोधणे सोपे जाईल".

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनि लोक चांगले copy cats असतात.
Happy
तिथे electronic components सुध्धा विपुल प्रमाणात, गल्लोगल्ली व स्वस्त मिलतात.
आपल्या इथे supplier शोधण्यात निम्मा वेळ जातो. Happy

आपल्या ईथे १० रु, ला ३/४ पेन्स विकत मिळतात. बरेच दिवस वाटायचं की चायनीज माल असेल. तसं नाहिये, ही सगळी उल्हासनगरलाच बनतात

भ्रमा, चायनीज ह्या नावाखाली खपवला जाणारा बराचसा माल USA Wink चाच अस्तो.

चायनाला प्लीज अंडर एस्टिमेट नका करु लोकहो, भारी पडेल

USA ( उल्हासनगर नाही बरका !! Happy ) त्यांच production चिन मध्येच होत.
चिन ला एस्टिमेट च करु नये.
माझ मत आहे की चिनच्या सर्व products वर भारतात बन्दी आणली पहिजे.
त्यान्चा माज उतरेल.

चिनी लोक आपला माल घेत नही, करण आपला धंदा वाढतो म्हणुन!!! japaneese कडुन घेतिल.

हरामखोर लेकाचे.

आता लोक म्हणतिल कि हे globalization च्या नवाखाली शक्य नही.
ठिक आहे official बन्दी आणु नका, पण आव्हान द्या लोक्कान्ना, घेवु नका म्हणुन.
आपण स्वताहा टाळलं पहिजे घेण.

आता प्रतिसाद द्यायचा म्हणल्यावर फुकटचे सल्ले द्यायला काय लागत हो ?

नोकरी म्हणजे आठ तास पाट्या टाकायचा धंदा
धंदा म्हणजे चोवीस तासांची नोकरी

हे वाक्य ज्यांनी धंदा व नोकरी असे दोन्ही गोष्टी केल्या असे कथालेखनातले माझ्या पिढीचे मान्यवर, वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात वपु यांचे फेमस वाक्य आहे.

य वाक्यात बराच अर्थ दडलाय.

थोडक्यात माबो वर जाऊन कथा वाचणे, बायकोबरोबर रोज संध्याकाळी फिरायला जाणे इ. चैनीच्या गोष्टीसाठी वेळ कमीत कमी सुरवातीच्या काळात काढणे अशक्य. ही मानसिकता आपली असणार्‍या थोडक्यात वर्कहोलिक लोकांचा हा प्रांत आहे. जाता जाता बघु जमल तर यासाठी हे क्षेत्र नाही.

व्यवसायिकता ही पॅशन आहे. जो पर्यंत व्यवसाय हा पॅशन म्हणुन बघितला जात नाही यश मिळण अवघड जात.

गणपत वाणी बिडी पिताना .... कवीता आठवा. असे गणपत वाणी व्हायच नसेल तर स्वतःचे गुण दोष याची पुर्ण जाणीव ठेऊन मग निर्णय घ्यावा.

नमस्कार,

मि मनिष खोत,

तुमच्या विविध प्रतिक्रिया वाचुन आनन्द झाला. माझे तारकर्लि मालवण ला छोटेसे होटेल आहे आणि मि त्यात पर्यटकान्चि रहान्याचि व जेवना चि व साएट सिन चि व्यवथ्या करतो. माझे हॉटेल व बजेट दोण्हि छोटे आहे. मि सध्या मुम्बइत जॉब करतो आणी जॉब साम्भाळुन मि हे करत आहे. तरि हा धन्दा वाधवन्या साठि काहि आयडिया सान्गा
१) फायनान्स
२) हॉटेल मध्ये ग्राहकान्चि सन्खा कशि वाधवावि
३) नविन काय मि त्याना देवु शकतो
४) विविध आञाडीञा

माझा फोन
०९३२०७४७७९८

मनिष अभिनंदन Happy

कृपया आपले प्रश्ण विस्ताराने मांडलात तर मार्गदर्शन करणे सोपे जाईल...

१) फायनान्स >>> वित्तिय मदत हवी आहे की करायची आहे?
२) हॉटेल मध्ये ग्राहकान्चि सन्खा कशि वाधवावि >>> मायबोलीवर जाहिरात विभागात तुम्ही तुमच्या हॉटेलची जाहिरात देऊ शकता... माउथ पब्लिसीटी हा सध्याचा सोप्पा मार्ग
३) नविन काय मि त्याना देवु शकतो >>> आधी ग्राहकांचा विश्वास संपादन करा... चविचे देणार त्यांना देव देणार Happy
४) विविध आञाडीञा >>> ग्राहकांना आकर्षित करायच्या विविध कल्पना अनुभवी मायबोलीकर (मिहीर) नक्कीच सुचवितील...

Shree Indradhanukhsya,

Pratikriya dilya baddal dhanyavad
Maf kara.............. mi Marathi English madhe lihit aahe karan Marathi Marathi madhye lihine kathin jatay & Velhi bharpur lagtoy.

1) Tumcha Phone No. Milelkay.
2) Mi sadhya Mumbait Job kartoy aani Gavi Jaoon Yevoon Hotel Sambhaltoy sadya tihe Maze vadil, Aai aani Bhau Hotel Baghtoy
3) Hotel Far mothe nahi pan mi Yenarya Pratek Paryatakal Jastit Jast Seva Upladbhdya Karun denyach Prayatnya Kartoy
4) Mazya Hotel Madhy 3 Room aahet 10 x 10 Tyatale 2 room Attach Toilet Bathroom & 1 common room aahe, Tasech 1 Hut 14 x 25 aani 1 Tarpoline Tent 14 x 14 with Attah Toilet Bathroom aahe
5) Pls. see my this link tyatun tumhala Kalpana yeyeel http://swatitentresort.blogspot.com

Mi tumchya pratikriyechi Vat pahatoy

Dhanyavad.
Manish Khot
09320747798

खोतांनु, स्वागत तुमचा!!

तुमचे प्रयत्न अगदी स्तुत्य आसत आणि त्याका फळ गावताला ह्या नक्की!

ईंद्रांमे सांगलेले सगळे मुद्दे योग्य. माका वाटता की तुमच्या हॉटेलचो एक USP (Unique Selling Point )होयो, म्हणजे बघा मालवणात गेलेलो प्रत्येक जण "चैतन्य" मधेच जाता कारण चव, सर्विस याबाबतीत्तो सरस आसा. तसा कायतरी तुमक करुक होया. जाहीरात ही आजच्या युगाची गरज आसा. त्यादृष्टीने तुमका प्रयत्न करुक हरकत नाय. MTDC च्या Bed-Breakfast सारख्या संकल्पनेत सहभागी आसास काय??

माका एक प्रकर्षानं असा वाटता की तुम्ही दोन दगडांवर पाय ठेवण्यापेक्षा सगळो "फोकस" हॉटेलकडे वळवशात तर बरां. तुमची घरचीच सगळी आसल्याकारणाने मॅनेज करुक तुमका सगळा सोप्या जायत.

आणि मिहीर आसाच, त्याकाय संपर्क करा. डिसेंबरात येतलय गावाक, कर्लीक येतय मग! Happy

मनीष तुम्हाला अनेक शुभेच्छा.

वेडिंग प्लॅनर्स व वेडिन्ग एक्सिबिशन मध्ये भाग घेऊन हनिमून पॅकेज विकता येइल. मुंबईतील वेडिन्ग प्लॅनर्स बरोबर टाय अप केल्यास पक्का बिझनेस मिळेल. तसेच कॉर्पोरेट हपिसात पत्रक दिल्यास ते लोक ग्रूप ने हिंड्तात त्यांना वीकांताला अश्या जागा हव्याच असतात. दोन तीन कपल्स किंवा एखाद्या डिपार्ट्मेंटचे सर्व कलीग मिळून येऊ शकतील. ब्रेक इवन फिगर वर्काउट करून तेव्ढा बिझ महिन्याला आलाच पाहिजे असे धोरण ठेवावे. खर्चा व्यतिरिक्त सर्व पैसा फॅसिलिटीज अपग्रेड करण्यात घालावा. शहरी पाहुण्यांना फॅसिलिटीज चांगल्या लागतात. लोनली प्लॅनेट व आउटलूक ट्रॅवलर मध्ये मागील पानावर डील्स असतात तिथे जरूर जाहिरात द्यावी. फिरंग लोक तसले वाचून नक्की येतील. वाय फाय कनेक्टिविटी आहे का तुमच्या तिथे? ती आजकाल मस्ट आहे.

मनिष शुभेच्छा.........
एम्.टि.डि.सी. ची "न्याहारी योजना" आहे. त्या अन्तर्गत आपल्याला रेट ठरवुन दिला जातो. सोयी सुविधांची पहाणी केली जाते आणि मग मुंबई ऑफिस मधुन तुम्हाला डायरे़क्ट बुकिन्ग्स मिळतात..
हा सोपा मार्ग आहे जर सध्या तुम्ही नोकरी सांभाळुन करत असाल तर......
पण पुर्ण वेळ उतरायचे ठरवलेत तर मात्र आधी तुमचा "टारगेट कस्ट्मर" ठरवा........ फॉरेनर्स / कपल्स / ग्रुप्स / फॅमिली आणि त्यानुसार सोयींवर खर्च करा........
तुमची जागा केवढी आहे कल्पना नाही पण सहज जर कधी रत्नागिरि पावस रोड्वर गेलात तर तिथे नुकतेच रत्नसागर बिच रेसॉर्ट झालेय..... तेवढी इन्वेस्टमेंट शक्य नाही होणार आता पण त्यातुन करता येण्यासारख्या आयडियास नक्कि मिळतिल....... च्छोट्या हट्स, टेंट्स अश्या सोयी करता येऊ शकतात.... तुम्ही जातिने अश्या काही रेसॉर्टना भेट द्या....... सल्याहुनही आपण इतर काय देतात हे पहाणे आणि मग आपला प्लॅन करणे गरजेचे आहे........ ऑल द बेस्ट...... Happy

खर्चा व्यतिरिक्त सर्व पैसा फॅसिलिटीज अपग्रेड करण्यात घालावा. शहरी पाहुण्यांना फॅसिलिटीज चांगल्या लागतात. >>> अगदी योग्य मुद्दा मामी

मनिष... स्वाती टेन्ट रिसॉर्टची साईट पाहिली... Facility upgrade करण्यास बराच वाव आहे.

शहरी पाहुण्यांसाठी १-२ दिवसांचे पॅकेज बनवून ठेवा आणि तशी जाहिरात करा.

कृपया वर पानावर पहा. या प्रतिक्रिया इथे योग्य नाहीत.

मनिष,
कृपया आधी या ग्रूपचे सभासद व्हा (इथे माहिती मिळेल) आणि मग वेगळा धागा काढून त्यात तुम्हाला हवी ती माहिती विचारा. हे पान फक्त वर लिहलेल्या लेखांवर प्रतिक्रियांसाठी आहे. तुम्हाला इथे मदत/सल्ला मिळेल पण सगळे या एकाच पानावर लिहले तर इतर वाचकांना योग्य विषय सापडणे अवघड होईल.

सहकार्याबद्दल धन्यवाद

Namaskar,

Shree Bhramar, Ashwinini Mami, Indradhanuksya, Ajay & Dattaraj,

Tumya Sarvana Pratikriya dilyabaddal Dhanyavad,

1) Bhramar : Don Dagadavar Pay theoon Udhe rahane karan sadya he hotel far Mothe nahi its like a Home stay aani dusare mhanaje Mazi sarv family mazavarch depend aahe tyamule mi Ichha asoonahi nokari sodu shakat nahi pan mi prayatna nakki kartoy pudhe janyacha
2) Ashvini mami : Tumcya Idea Mala aavadalya Tyavar mi kam karin pan wi fi baddal mi sadya kahi karu shakat nani net sathi computer service denyacha prayatna kartoy
3) Bhramar : Tumcya lihinya pramane Mi MTDC kade geli 2 varshe prayatnya kartoy te mazyakade roj Ek Navin kagad magt asatat Me tynacha DD pan bharalay Mazi fale Mumbai office madhye sadya padali aahe aani aata tyani Mazyakade Room Plan with Grampachayat stamp and Sing, (Grampanchayat No Objection leter as per there format), New prize list (As per there format ) although all docs I have already submit ( Thodkyat : Sarkari Kame aani Yojana Jevdya Vattat Tevadhya Sopya Nasatat to Ek dekhava asato asudet Pan Maze Prayatnya Sooru Aahet & Rahatil )
Mi ratnya sagar chi Web site pahili pan maza project tyacha 10% sudhha nahi pan concept chhan aahe pudhe bhavishat upyogi padel.
4) Indradhanukhya : and All kay mala tumcha Email Id Dyal ka Or Mala Email Kara : manish.khot1980@gmail.com
Mi kahi Plan's banavale aahet te pathvayache hote
5) Mihir : Sorry.... Mi tumcha sabhasad aahe pan mala navin dhaga kasa banvayacha te samajale nahi
6) Duttaraj : Thanks for calling we will definatly meet soon

Kalave Lobh Assava.

Aapalya pratikriyecha Pratikshet .......... Me

Manish Khot
09320747798

उत्पादन क्षेत्रामध्ये मार्केटिंग हे सर्वात मह्त्त्वाचे असते . उत्पादन करणे सोपे असते ते ग्राहकापर्यत पोचविणे अवघड असते त्यासाठी प्रथम प्रयत्त्न करावे लागतात.हे सत्य आहे.

निमाप्रदिप, सहसा मनुका वगैरे सारखा प्रॉडक्ट खपण्याकरता ब्रँड डेवेलप करावा लागतो. तुम्ही जर नुकतीच सुरवात केली असेल तर बाजारात आधीच चलती असलेल्या ब्रँड्सशी संपर्क साधून त्यांना मनुका विकता येतिल. हळू हळू स्वतःचा ब्रँड ही डेवलप करता येइल. थोडं क्रियेटीव होऊन काही वेगळं केलं तर होउ शकतं.

कनेक्शन गेल्यामुळे बी यांना विचारायचे राहून गेले की त्यांनी दिलेली लिंक 'पण विकत कोण घेणार' या सदराखाली देण्यामागे काय पार्श्वभूमी असावी. (ती लिंक 'मराठी भाषा दिवस' या संदर्भात असावी असा अंदाज एका ड्यु आयडी ने नुकताच माझ्याकडे एसेमेसवर व्यक्त केला आहे).

हा बाफ (यातील मुद्दा) लक्षात आला नाही. जे विकले जाईल तेच (अथवा तीच सेवा) बनवले ( अथवा दिली) जाणार ना?

अभ्यासक्रमातील डेमो या दृष्टिकोनातून अतिशय वास्तवाभिमुख करणारी परिक्षा आहे. पण 'विकत कोण घेणार' हा प्रश्न माणसाला आयुष्यात पडतोच कुठे? जे विकले जाते तेच तर माणूस विकायचा प्रयत्न करतो असे मला तरी वाटते. (जे विकले गेलेलेच नाही ते विकण्यासाठी ते निर्माण करणे असा अभ्यासक्रमातील हेतू असल्यास तसे मूळ लेखात वाचायचे राहून गेले असावे.) Sad

<<<माझ्या मते मी अगदी व्यवस्थित तयारी केली होती. काय विकायचं, ते कसं तयार करायचं, बाजारातल्या इतर गोष्टींपेक्षा ते वेगळं कसं असेल, स्वस्तात कसं करता येईल असे सगळे विचार केले होते. >>>

काय विकायचे ठरवले होते हे जाणून घ्यायला आवडेल.

वरील प्रतिसादात (पहिला उतारा सोडला तर) उपरोधाचे प्रमाण शून्य आहे हे नमूद करत आहे.

-'बेफिकीर'!

सध्या इथे अमेरिकेत फॉल सुरु आहे. या फॉल सिझन मधील मुलांसाठी मजेचा सण म्हणजे हॉलोविन. ३१ ऑक्टोबरला संध्याकाळी मुलं निरनिराळी सोंगं घेऊन घरोघरी ट्रीट्स गोळा करत फिरतात. चॉकलेट्स आणि कँडीजची रेलचेल असते. मात्र फूड अ‍ॅलर्जी असलेल्या मुलांना खाऊची मजा लुटता येत नाही. या मुलांनाही सणाची मजा लुटता यावी आणि जोडीला या बाबत जागृतीही व्हावी म्हणून FARE या संस्थेने केलेली टील रंगाच्या भोपळ्याची जाहिरात मार्केटिंगचा छान नमुना आहे. त्याबाबतचा लेख इथे शेअर करतेय.
http://www.inc.com/ilan-mochari/teal-pumpkin.html

Pages