पण विकत कोण घेणार?

Submitted by अजय on 20 January, 2010 - 00:15

"पण विकत कोण घेणार?"

हार्वर्ड विद्यापीठातल्या माझ्या प्राध्यापकांनी मला प्रश्न केला.

व्यवस्थापन क्षेत्रातल्या एका विषयाचा वर्ग होता. आम्हा विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या उद्योगांच्या कल्पना लिहून आणायच्या आणि प्रकल्प म्हणून ती कल्पना (तो उद्योग) प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करता येईल याचं विश्लेषण करायचं असा काहिसा तो धडा होता. माझ्या मते मी अगदी व्यवस्थित तयारी केली होती. काय विकायचं, ते कसं तयार करायचं, बाजारातल्या इतर गोष्टींपेक्षा ते वेगळं कसं असेल, स्वस्तात कसं करता येईल असे सगळे विचार केले होते. आणि एकदा का मोठ्या प्रमाणात माल तयार झाला की भरपूर मार्केटींग करून तो विकायचा आणि भरपूर नफा कमवायचा अशी स्वप्नं होती. बरोबरच्या काही विद्यार्थी मित्रांनी वस्तू विकण्याऐवजी सेवा विकायची कल्पना काढली होती. आणि एकदा ग्राहक मिळाले की असे अनेक सेवादाते एकत्र येऊन धंदा वाढवणार होते.

"पण विकत कोण घेणार?"

मला वाटलंच होतं हा प्रश्न येणार. मी थोडी तयारी केली होती त्यानुसार उत्तर दिलं

"केवढ्याला घेणार?", "किती जण घेणार?", "वर्षातून किती वेळेस घेणार?", "तुझ्याचकडून का घेणार?"

जसे जसे हे प्रश्न यायला लागले तसा माझा आत्मविश्वास घरंगळत गेला. माझी सगळी तयारी ही वस्तू तयार करण्यापर्यंत होती. पण विक्रीबद्दल काही जास्त विचार केला नव्हता.

"जे ग्राहक तुझा माल घ्यायला तयार होतील असे वाटतंय त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार?" , "त्यात तुझे किती पैसे, वेळ खर्च होणार", "हे सगळे खर्च, उत्पादन खर्च केल्यावर नफा किती शिल्लक रहाणार", आणि "उद्या बँकेत त्याच काळासाठी हेच भांडवल ठेवलं तर त्यावरचं व्याज हे नफ्यापेक्षा जास्त असेल की कमी"?

हा शेवटचा प्रश्न ऐकल्यावर माझी कल्पना पूर्ण मोडकळली. बरोबरच्या विद्यार्थ्यांची वेगळी परिस्थिती नव्हती.

"तुम्हाला नाऊमेद करण्याचा माझा हेतू नव्हता. विक्री हा कुठल्याही उद्योगातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे हे तुम्हाला कळावं हा माझा हेतू होता. विक्री करू शकलात तर बाकीचं काहिही Outsource करता येतं. पण काही तयार केलं, सेवा दिली तरी जो पर्यंत विक्री नाही तो पर्यंत तो उद्योग होत नाही. " प्राध्यापक बोलत होते. " आज तंत्रज्ञानात खूप सुधारणा झाल्या आहेत, वस्तू तयार करणे, सेवा देणे सोपे आणि स्वस्त होते आहे. पण एखाद्याला काहितरी विकणे पूर्वी होतं, तितकंच अवघड आहे. आधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा , बाकीची उत्तरे शोधणे सोपे जाईल".

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाऊस च्या यशामधे त्याच्या जाहिरात बाजीचा मोठा भागा आहे. मुख्य म्हणजे समाजाच्या एका मोठ्या वर्गामधे त्याने "गरज निर्माण" केली आहे.

नाही. जाहीराती इतरही करतात. मला वाटते ते दोघे भाऊ आहेत आणि ते डायरेक्ट पुस्तकाच्या दुकानात जाऊन कमिशन वगळून कॅश पेमेन्टवर पुस्तके देतात. आणि स्थानिक रीत्या प्रभावी जाहिरात देतात, इतर पुस्तक प्रकाशक जांगड पद्धतीने पुस्तके विकायला ठेवतात. मग विक्रेतेही फार लक्ष देत नाहीत त्या विक्रीकडे.

चाऊसवाल्याने स्वतः उभ्या केलेल्या वितरण तंत्राने प्रचन्ड धन्दा केला आहे... >> चाऊस म्हणजे काय कोणी सांगु शकेल काय?

जाहीराती इतरही करतात >> अगदी, परंतु त्यांच्या जाहिराती बघितल्या तर लगेच आकर्षित होउ शकतो. खोटं का बोला पण त्यांची डिक्शनरी मी पण विकत घेतलीये.

चाऊस हा मराठी-इंग्रजी शब्दकोश आहे. > त्यांची एकंदर ५-७ पुस्तके आहेत, ज्यात यशशास्त्र नावाचं एक पुस्तक आहे. माझ्या एका मित्राने हे पुस्तक वाचलं, ते अमलात आणलं आणी त्याच्यात आमुलाग्र बदल झालेला मी पाहिलाय.

इथे हैद्राबादीत चाउस म्हणजे एक प्रकारचा इरसाल म्हातारा. बडे मियां दीवाने टाइप. अशी पुस्तके पण आहेत काय. चान्गले आहे की. सेल्स चा एक दुसरा पण तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे कलेक्षन्स. दिलेल्या मालाचा पैसा मिळणे. यात अपयश आले तर भले भले झोपतात. तसेच डॉक्युमेन्ट्स जसे सी फॉर्मस, जी फॉर्म्स वगैरे जी वेळेत कलेक्ट करावी लागतात. त्या शिवाय आपले ट्रॅन्झॅक्षन पूर्ण होत नाही. जर तुमच्या उत्पादनास चांगली मागणी असली तर फुल अ‍ॅड्वान्स पेमेन्ट ही सगळ्यात चान्गली पद्धत आहे. नाहीच तर पेमेन्ट ऑन डिलीवरी ओफ गूड्स. एकदा माल व ग्राहक हातातून गेला की पेमेन्ट च्या मागे रडत हिन्डावे लागते.

हे मुंबैच्या लोकल सारखे आहे. सगळे एका वेगाने चालत राहिले तर काही त्रास नाही पण एक पेमेन्ट किन्वा सप्लाय अडला तर त्रास च त्रास. तिथे तुम्हाला मध्ये पडून परिस्थिती सुधारावीच लागते. आपल्या मागे सप्लायर असतात एम्प्लॉयी असतात, स्टॅच्युटरी पेमेन्ट्स असतात. पैसा खेळता ठेवणे ही एक अजब कला आहे ती आत्मसात करावी लागते. परत त्या ग्राहका कडून पुढली ऑरडर ही हवी असते त्यामुळे संवादही तोडता येत नाही. एक प्रकारची शिस्त जरूरी आहे.

नथिंग व्हेंचर्ड, नथिंग गेनड हे बिल फेर्रीस ह्या ऑस्ट्रेलियन अर्थतज्ञाचे पुस्तक वाचले. नव उद्योजकांनी काय धडे लक्षात ठेवावे ह्यावर चांगले लिहिले आहे.

कुठलीही सेवा अथवा वस्तूची विक्री करण्यासाठी तिचा युनिकनेस हा सर्वात महत्वाचा घटक आहे. तुम्ही स्टँडआउट होणे महत्वाचे.मी काम करित असलेल्या शिक्षणक्षेत्रासही हा नियम लागू आहे.

तिचा युनिकनेस हा सर्वात महत्वाचा घटक आहे >>> हा युनिकनेस पूर्णपणे वस्तुवर अवलंबुन नसतो. दोन सारख्या वस्तु विकणार्‍या विक्रेत्यांमधिल फरकदेखिल महत्वाचा ठरतो.

आज एक "SPIN selling technique" वर एक सेमिनार अटेंड करुन आलो. SPIN म्हणजे काय हे थोडक्यात ईथे टाकतोय (नेटवरुन घेतलय)

How classic sales techniques such as closing and objection-handling can actually reduce your chance of selling, especially in big business-to-business sales situations, where buyers are savvy to the classic tricks.

Overall, the method, like many other approaches, is a 'hurt and rescue' approach. You find their problem and 'hurt' them by exposing the terrible things that might happen (spot the use of tension). Then you rescue them with your product.

The four question types are described below.

Situation questions

In big sales, minimize the small talk and focus on finding background detail that can be used to make sense of the buyer's business situation. Context creates meaning. This is about understanding the wider context before you zoom into the details.

Problem questions

Ask questions to uncover problems which your product can address. If you are selling tractors, ask about maintenance costs, breakdowns and so on. If you are selling life insurance, ask about how many dependents the person has.

A trap here is to dive straight into presenting the benefits of what you are selling. You may know the problem, but they do not! Going straight to the sales pitch will just get you objections.

Implication questions

Instead of telling them the problem they have (which is also likely to raise objections), the goal is now to get them to see (and feel!) the problem. By asking questions which draw out the implications of the problem, they get to feel the pain that will drive them towards your product. This is the 'hurt' of Hurt and Rescue.

For example, the person selling tractors might ask about implications of unplowed fields whilst the life insurance salesperson could carefully ask what would happen to the children if the target person died or became very ill.

Need-Payoff questions

Having hurt the target person with your implications, you now give them a straw to grasp at by asking how their pain could be resolved. With careful questions, you can get them to the state where they are asking for your product even before you show it to them. This is a very neat 'rescue' of Hurt and Rescue, where they either rescue themselves or ask you to rescue them.

For example, the tractor sales person can ask how much better the tractor was like when it was new, or whether any of the farmer's neighbors have solved problems of old and problematic tractors. The insurance sales person could ask questions that build pictures of the target person's children being safe and secure whatever curve-balls the world might throw at the family.

सर्वान्च्या सुरेख पोष्ट्स. बरेच शिकण्यासारखे आहे.

मागच्या पानावर एक विषय आला होता, त्यावर एक विचार..

<<
कल्ला करणाराचे सडले वांगे देखिल खपतात, >>> मुळात सडले वांगे विकायचे ह्या विचाराने कल्ला करायचा की विकायचे ते सफरचंदच?? कल्ल्याने तुम्ही short term sale करु शकाल पण लांबवर जायचं असेल तर??
>>

ह्यात Repeat Customer हा महत्वाचा घटक आहे. उदाहरण द्यायचे झाले तर फिरत्या विक्रेत्यांचे. म्हणजे अगदी 'सडले वांगे' नाही पण त्यातल्या त्यात कमी दर्जाची वस्तु मात्र किमतीत देखील कमी. अशी वस्तु विकल्यावर जर तुम्हाला तो ग्राहक पुन्हा अपेक्षित नसेल तर कमी दर्जाची वस्तूदेखील खपवता येउ शकते. ह्यात त्याची किंमत जर खुपच कमी असेल तर ग्राहक देखील रिस्क घ्यायला तयार होतो. अशावेळी तो repeat customer सुद्धा होउ शकतो.

एक उदाहरणः भारतामध्ये CFL lights विप्रो, फिलिप्स अतिशय महाग विकतात (साध्या बल्बच्या कमीत कमी १० पट - १०० ते २०० रु) त्याची उत्पादन किंमत एवढी नसावी. मात्र मला काही ठिकाणी रस्त्यावर एका कम्पनीचे Unbranded CFL २५ रु ला मिळत होते. त्यामुळे मी त्यातले २ विकतही घेतले. ६ महिने चालले तरी पैसे वसूल ह्या भावनेने! गम्मत म्हणजे ते अजुनही चालत आहेत. मात्र ते विक्रेते.२ दिवसातच गायब झाले! हे जनरली outsourced कम्पन्यान्चे QC Rejected प्रॉड्क्ट असावेत अशी कल्पना.

तर सान्गायचा मुद्दा हा की सेकन्ड्स, QC rejected अशी प्रॉड्क्ट विकणारा Goal असणारेसुद्धा असू असतात, अगदी लाँग टर्म साठीसुद्धा मात्र ते किंमत आणि नवीन ग्राहक ह्या २ गोष्टींवर फोकस करतात!

.

स्पर्धकांच्या तुलनेत आपण वेगळे उत्पादन, सेवा देत असू तर फायदा होतो.>>>> हा वेगळेपणा सेवा क्षेत्रात तुम्हाला टिकवता येतो. कारण उत्पादन बरेच वेळा सारखे असु शकते. उदा. संगणक. ह्याची किंमत किंवा वापरले गेलेले भाग सारखे असु शकतात, पण विक्रीपश्चात सेवा हा ईथे महत्वाचा घटक ठरतो.

.

मायबोलीवरच्या टाटा-बिर्ला-अंबानीना प्रणाम !
आम्ही आम जनता... नुस्तं वाचत राहू आपलं!

फार चांगले आहे. मी जकार्ता ला रहाते. इथे साध्या गोष्टि मिळत नाही. माझ्या मनात बरेच वेळा येते की कोणी distribution agency घ्यावी. मलेशीया , सिंगापूर ला भरपूर दुकाने आहेत पण इथे direct flight नसल्याने माल जास्त येत नाही. पण indian भरपुर असल्याने demand जास्त आहे. जे लोक खप होत नाहि असे म्हणतात त्यांना असे मार्ग का सुचत नाहि ?

.

कोण विकत घेणार हा मुद्दा आपण पुन्हा घेवुया.

मी MNC company मध्ये काम करत आहे त्यामुळे मला काही अनुभव आला आहे.
१) आज कल वस्तु च्या किमतील फार महत्व आहे. कोण विकत घेणार हि तर नन्तर ची गोष्ट झाली.
२) Asia pacific region म्हणजे भारत, चिन अश्या देशन्ना LCC म्हणजेच low cost country म्हन्ट्ले जाते.
आपल्या कडे वस्तु जितकी स्वस्त तितकी ति मस्त असं आहे.

तर किम्मत कमी करण्या साठी काय करावे लागते हे कोण सुचवु शकेल काय?

assume any small electronic product for simplicity say GPS receiver
or central locking system which we fit in our Car or locking or unlocking.

Jiraiya.

मला येवढेच विचारायचे आहे, की मझ्या कडे भांडवल कमी आहे, पण मला business करायचा आहे.

वस्तुची किम्मत कमी करण्या साठी काय करावे?

१. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट
२. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट
३. डिलर / डिस्ट्रीब्युटर कॉस्ट

ह्यातल्या पहिल्यात वाव बराच असतो पन मॅन्युफॅक्चररने ते आधीच केलेलं असतं. पर्यायी मटेरियल, मॅनपॉवर, स्वस्त टेक्नॉलॉजी असे काही उपाय तपासून बघता येतील.

धन्यवाद अमित reply बद्दल
मटेरियल वर कमी करणे अवघड आहे,
चिन ला competition देणे अवघड आहे ह्या बाबतित तरी.

बाकिच्या पर्यायंवर विचार करण्यांसारखा आहे.

मला ही महिती पहिजे की defense चे प्रोजेक्ट कसे मिळवतात? कोणी guide करु शकेल काय?
मला defense RF electronics मध्ये interest आहे.

पण approach कसा करावा कळत नहीये. Sad
मी सध्या तरी ६ महीने अभ्यास करणार आहे ह्याचा.

आपल्या इथे system इतकी currupt आहे की tender मिळवणे & जिंकणे अवघड आहे.

१) आज कल वस्तु च्या किमतील फार महत्व आहे. कोण विकत घेणार हि तर नन्तर ची गोष्ट झाली.>>>>

- ऑस्ट्रेलियात भारतीय लोक बरेच आहेत, हा मुद्दा मनात ठेवुन सिडनी परिसरातील दुकानांमध्ये काही भारतीय वस्तु/खाद्यपदार्थ आणता येतील का ह्याचा सर्वे करताना एका गुजराती दुकाणदाराने सांगितलेला किस्सा... तो म्हणाला, कि वो आते तो है BMW मे, भांव पुछते है सबसे महंगे ब्रॅन्ड का... ऑर लेके जाते है, सबसे सस्ता! खाने कि चीज मे इतनी सस्ती चीज को पसंद करते है, तो बाकी का क्या?

२)आपल्या इथे system इतकी currupt आहे की tender मिळवणे & जिंकणे अवघड आहे.>>>> सुरुवातीलाच हात टेकवु नका. संरक्षण खात्याचे खर्चाचे मोठे मोठे आकडे पाहता त्यात शिरणे सोपे नाही.

डिअर चंपक
सुरुवातीलाच हात टेकवु नका. संरक्षण खात्याचे खर्चाचे मोठे मोठे आकडे पाहता त्यात शिरणे सोपे नाही.
>>
मी प्रय्तन केला आहे, म्हणुन विचारले. मला अनुभव आला आहे थोडाफार.
असो,
माझे प्रय्तन चालुच आहेत, बघु कितपत यश मिलतय.

कोणाला defense ची tenders or proposals कुठे मिळतात महित आहे का?

any website?
please let me know.

Jiraiya.

Defence Tender स्वतः मिळवण्यापेक्षा ज्या कंपन्या मिळवतात त्यांच्याकडुन जॉब्स का घेत नाही?

चीनला टक्कर देणे अवघड आहे कारण जय समाजवाद

१. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट नावाचा प्रकार नको तेव्हढा स्वस्त.
२. लेबर स्वस्त.

त्यांना टेक्नॉलॉजीमध्येच पकडता येउ शकेल आणि क्वालिटी मध्ये. चीनी अजूनही प्रोग्रामिंग आणि इंग्रजीचे ज्ञान ह्यातच "थोडेसे" मागे आहेत फक्त

Pages