अर्थसंकल्प २००८-९

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गेल्या वर्षी मी पहील्यांदाच मायबोलीवर बजेट २००७ बद्दल लिहीले होते. त्यात सामान्य लोकांना कळेल व त्याचा फायदा होईल असेच मुद्दे मी घेऊन त्यावर लिहीले होते. या वर्षी परत एकदा फेब (नेहमी प्रमाने) महीना आला व बजेटचे वेध लागले. पण मागच्या बजेट मध्ये व या बजेट मध्ये एक फार मोठा फरक म्हणजे जानेवारी व परत फेब मध्ये मार्केट खुप पडले. त्यामुळे सर्व बजेट कडे चातका प्रमाने डोळे लावुन बसले होते जेने करुन मार्केट ला परत वर चढायला एक ट्रिगर मिळेल पण तसे काही झाले नाही. ब्रॉड व्हू (मोठ्या प्रमानावर) गुंतवनुकदारांची थोडी निराशाच वाट्याला आली पण बजेट पुर्ण वाचले तर ( बापरे ते विचीत्र शब्द वाचने अगांवर येते) असे दिसुन येते की सामान्य लोकांना जवळचे वाटावे असे हे बजेट आहे. ईंडीया ईन्क साठी हे बजेट थोडे वाईट पण त्याच वेळेस भारतासाठी हे बजेट चांगले आहे. ( पडलात ना तुम्ही पण गोंधळात) म्हणजे काय की परदेशी लोकांसाठी ते वाईट (मुख्य करुन FII पण देशांतर्गत ते चांगले. भारत निर्मान वर गेल्या ३ वर्षांपासुन भर देन्यात येत आहे तो या वर्षी पण दिला गेला आहे. या बजेट चे कि पाँईंट्स आपण बघुयात. (कदाचीत मराठीत बजेटची १२ तासाचा आत समिक्षा करनारा हा पहीलाच ब्लॉग असेन.)

फर्स्ट थिंगस फर्स्ट. बजेटचा मला काय फायदा होनार. (पक्षी सामान्य जनता).

१. आयकराची (ईनकम टॅक्स) ची लिमीट १ लाखाहुन १.५ लाखापर्यंत वाढली. पुढच्या वर्षी साठी आयकराचा तक्ता असा असेन.
रु १५०००० पर्यंत - ० रु
१५०००० ते ३००००० -१० टक्के.
३००००० ते ५००००० - २० टक्के
५००००० ते कितीही - ३० टक्के

म्हणजे साधारण ५००००० पगार असताना या वर्षी तुम्ही ४०००० वाचवनार. जर आयकर देनारी बाई असेल तर त्यासाठी पहीली लिमीट ही १८०००० असेल व सिनीअर लोकांना २०५००० असेन.

२. कंपन्याचा नफ्यावरील करात काहीही वाढ नाही.
३. ८० ड अंतर्गत जर एखाद्याने आई वडिलांसाच्या दवाखान्या साठी पैसे खर्च केले असतील तर त्याला १५००० ची सुट.
दवाखान्या बद्दल बोलतच आहोत तर
४. टिअर २ आणि ३ टाऊन्स ( म्हणजे तालुके वैगर) जर मोठा दवाखाणा काढला तर त्याला ५ वर्षे टॅक्स हॉलीडे.
५. वल्ड हेरीटेज साईट्स ( जसे अजंठा, ऐलोरा) येथे जर तुम्ही २ किवा ३ स्टार हॉटेल काढले तर त्याला पण ५ वर्षे टॅक्स हॉलीडे.
६. सर्व गोष्टींवरील सिऐसटी (सेंट्रल सेल्स टॅक्स) हा ऐक टक्यांने कमी केला. ( म्हणजे बर्याच गोष्टी जसे चहा, साखर वैगर थोड्या स्वस्त होनार).

स्वस्ताई बद्दल बोलत आहोत तर.
७. टिव्ही, सेट टॉप बॉक्स, कॉस्मेटिक्स, ओषधे या सर्व वस्तुमध्ये २ ते ९ टक्के पर्यंत बद्ल. त्या सर्व वस्तु स्वस्त होनार. कारण कस्टम्स ड्युटी कमी होनार.
८ सिगरेट मात्र १० टक्यांनी महाग होनार. दारु मध्ये बदल नाही.
९ आम आदमी बिमा योजना ही नविन योजना सुरु केली जानार आहे. यात ज्यांना काहीच ईनकम नाही, म्हणजे गरीब माथाडी कामगार वैगरे त्यांना भविष्यासाठी काहीतरी सोय या योजने अंतर्गत करता यिल.
१०. स्मॉल कार्स आणखी स्वस्त होनार. ईक्साईज डुय्टी १६ वरुन १२ टक्यांवर आणली गेली.

ईकॉनॉमी.
११. गेल्या तिन वर्षात भारताची वाढ ही ७.५ टक्के, ९.४ टक्के व ९.६ टक्के झाली आहे. या वर्षी सर्व्हीसेस मधीली वाढ १०.७ टक्के असेन तर उत्पादनातील वाढ ही ९.४ टक्के असेल.
१२. शेतीतील ग्रोथ रेट हा २.६ टक्के असेन.
१३. फुड ग्रेनस ( म्हण्जे गहु, ज्वारी) यांचे उत्पादन २००७-८ मध्ये विक्रमी २१९.३२ मिलीयन टन्स झाले. तर तांदुळाचे विक्रमी ९४.०८ मिलीयन होते.
१४ मिड डे मिल या प्रोग्राम अंतर्गत ११.४ करोड मुलांना अन्न रोज देन्यात आले.
१५ भारत निर्मान या योजने अंतर्गत २९० खेड्यांना रोज पाणि पुरवन्यात आले तर ५२ खेडी ही टेलीफोन ने जोडन्यात आली.
१६. ११ व्या पंचवार्षीक योजने अंतर्गत भारत निर्मानला आणखी ३१२८० करोड देन्यात आले. यात खेडी जोडने, रस्ते तयार करणे हे अभिप्रेत आहे.

शिक्षन
१७ सर्व शिक्षन योजनेला १३१०० करोड रु.
१८ अतिप्रगत शिक्षण ( आय आय टी) पुर्णे, मोहाली व कलकता येथे नविन अतिप्रग्त संस्था उघडनार. पुण्यातील डेक्कन कॉलेज रिसर्च ईं. ला ५ करोड रु.

शेती

१९ शेती विषय्क लोन या वर्षी २८०००० करोड पर्यंत देनार.
२० २४ मोठ्या व ७५३ छोट्या ईरिगेशन स्किम्स उभारल्या जातील.
२१ २९ फेब पर्यंत ज्या शेतकर्यांनी कर्जाचा ऐकही हफ्ता भरला नाही त्यांना संपुर्ण कर्जमाफी.
२२. रुरल ईन्फ्रा. डे फंड १४००० करोड उभारनार ज्यात खेडे गांवाना जोडले जाईल.

पॉवर
२३. ११ व्या पंचवार्षीक योजने अंतर्गत ७८५७७ मेगावॅट पॉवर चे उत्पादन केले जाईल. मार्च २००८ पर्यंत १०००० मेगावॅट उत्पादन क्षमता पुर्ण होईल.

निर्यात व गुंतवनुक
२४ निर्यातदारांना ८००० करोड चे पॅकेज.
२५ राज्य सरकार बॉन्ड द्वारे पैसे उभे करु शकतील.
२६ पॅन प्रत्येकाला जरुरी.

या बजेट मध्ये प्लॅन्ड खर्च हा २४३३८६ करोड असेल तर अनप्लान्ड ५०७,४९९ करोड असेल. रेव्हेन्यु डेफीसीट ही ५५,१८४ करोड असनार आहे. (साधारण गिडीपी च्या १ टक्के). ही तुट भरुन यायला आणखी एक वर्ष लागेल.
संपुर्ण आकडेवारी (खर्च व त्याचा मेळ) http://indiabudget.nic.in/ub2008-09/bag/bag2.htm ईथे आहे.

अजुनही बरेच मुद्दे आहेत जसे घर बांधनी, शेती, कोल वैगरे पण मी जे आपल्या सर्वांना महत्वाचे मुद्दे आहेत तेच ईथे घेतले आहेत.
माननिय अर्थमंत्र्यांच्या भाषनातील मुद्दे मी मराठीत ईथे मांडले आहेत. माझ्या स्वतच्या दृष्टीने हे बजेट चांगले आहे. कारण या बजेट ला मांडताना शेअर बाजार डोळ्यासमोर न ठेवता सामान्य माणुस डोळ्यासमोर ठेवला आहे. आयकरात व रोज लागन्यार्या बाबीत खुप मोठी सवलत मिळालेली आहे. ईलेक्टॉनिक्स, कम्युटर, केबल हे स्वत होनार. रोज जगण्यासाठी लागनार्या गोष्टी (जसे ओषधे, जेवन वैगर) हे थोड्या प्रमानात स्वत होनार. ज्यांचे ईनकम ५००००० आहे त्यांनाही फायदा होनार पण रोज हातावर पोट घेउन जगनार्या लोकांना ही फायदा होनार. आर्थीक तुट ही फारशी नाही. प्रगतीशिल राष्ट्रांना १ टक्के तुट काहीही नसते.
शेअर् बाजाराने आज जरी जोरात स्वागत केले नसले तरी येत्या दोन तिन महीन्यात फरक जानवेल. एक चांगले बजेट आपण् मांडले आहे. ग्लोबलायझेशनच्या दृष्टीने तसे तोट्याचे पण भारतीयांसाठी चांगले.

प्रकार: 

>>२९ फेब पर्यंत ज्या शेतकर्यांनी कर्जाचा ऐकही हफ्ता भरला नाही त्यांना संपुर्ण कर्जमाफी.>>

मला वाटतं आता तरी शेतकर्‍यांनी कर्ज फेडण्यासाठी आत्महत्या करणे थांबवावे. शतशः आभार प्रथम अर्थमंत्र्यांचे आणि नंतर तुमचे, सविस्तर वर्णनासाठी. छान माहिती समजली.

गुड वन Happy
सोप्यात सोप लिहिल आहेस.
कार बाबत हायब्रिड कार (ह्याच स्पष्टिकरण न्युज चॅनेल वर ज्या कार दोन फ्युएल वापरु शकतात अस होत) ह्यावरील एक ड्युटी १० % नी कमी केली आहे. म्हणजे ह्या कार बाकीच्या कारच्या तुलनेत खुपच स्वस्त होतील.
आता दोन फ्युएल वापरु शकणार्‍या मध्ये मला वाटत सध्या वॅगन आर ड्युओ ही एकच कार असावी.
म्हणजे ती कार बरीच स्वस्त होइल अस आहे का??
हे जरा मला गोंधळात टाकणार होत रे.

शेतकर्‍यांची कर्ज माफी हा एक मोठा विषय आहे.
आत्महत्यांच प्रमाण कमी होइल अशी अपेक्षा आहे पण........
ज्या शेतकर्‍यानी सावकारांकडुन कर्ज घेतल त्यांच काय???
फक्त बँकेतील कर्ज माफ होउ शकत ना?
शिवाय त्याला लिमिट आहे ते म्हणजे तुमच्याकडे फक्त २.५ एकर शेती असावी अस.
मला माहित असलेले कित्येक लोक असे आहेत (सातारा सांगली सोलापुर जिल्ह्यात) कि ज्यांच्याकडे ५० एकर जमिन असते पण पाण्याअभावी ते २-३ एकरच पिकवु शकतात त्यानी काय करावे??
मी सातारा सांगली सोलापुर हे मला माहित असलेले उदाहरण दिले आहे.
मराठवाडा, खानदेश इकडे देखिल असेच उदाहरण असु शकते की.

ULIP ला म्युचुअल फंडा प्रमाणेच सर्वीस टॅक्स्च्या ब्रॅकेट्मधे आणलय त्यामुळे गुंतवणुक म्हणुन युलिप आणी महाग होणार (खर म्हण्जे पहिल्या वर्षाचे अल्लोकेशन येव्हढे कमी असते कि वर्षा/दोन वर्षा साठी ULIP हा गुंतवणुक पर्याय नव्हताच)

शेतकरी कर्जमाफीचा बोजा सरकार उचल्णार असल्याने ज्या बँकानी शेतकर्‍याना कर्ज पुरवठा केला होता त्यांना फाय्दा होईल. यात बर्‍याच PSU बँका आहेत

शेअर ट्रेडींग- शोर्ट टर्म गेन टॅक्स मुळे कदाचीत लाँग टर्म इन्वेस्ट्मेंट वाढेल पण एकंदरीत ट्रेंडींग महागच झालेय Sad

पॉवर/ इन्फ्रास्ट्रक्चर साठि या बजेट मधे अपेक्षीत सवलती नाहियेत

करदात्यांना सवलती अपेक्षेपेक्षाही चांगल्या आहेत Happy

आत्ता शेतकर्‍यांच्या कर्ज माफि बद्दल, मी स्वतः शेतकरी असुनही हा उपाय चुकिचा वाटतो, अंतुले सरकारने जेव्हा कर्ज माफि केली तेव्हापासुन कर्जबुडवायची प्रवृत्ती वाढिस लागली, आत्त्त हे दृष्टचक्र भारतभर वाढिस लागेल

http://equitymaster.com/budget08/ येथे सेक्टोरिअल ऍनेलिसिस चांगले केलय

केदार, सर्व वाचले नाही अजून, पण ते वाक्य वाचून 'दाद' चे 'साधी माणसं' आठवले. ज्यांनी काही हप्ते भरले त्या गरीब शेतकर्‍यांचे काय करणार काही माहिती? कदाचित उरलेले कर्ज माफ करणार असतील, पण त्यांना भुर्दंडच ना?

ते मात्र खरे असेल, इतक्या लगेच बरेच डीटेल्स मिळाले. अजून जमेल तसे टाक.

पुण्याला आय आय टी होते आहे असे दिसते. डेक्कन कॉलेज मधे काय विशेष संशोधन चालू आहे काही माहिती आहे का?

पुरातत्वशास्त्रातील संशोधनासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणार्‍या डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांना अर्थसंकल्पात ५ कोटीचे अनुदान मिळाले आहे. डेक्कन कॉलेजमधे 'संस्कृत डिक्शनरी'सह पुरातत्वशास्त्राशी संबंधित अनेक विभागांचे संशोधन आणि अध्यापन सुरु आहे. रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, नकाशाशास्त्र आदी विषयांच्या प्रयोगशाळाही आहेत. या प्रयोगशाळांसाठी आवश्यक असणारी साधने, उपकरणे तसेच प्रत्यक्ष उत्खनन प्रकल्पासाठी या ५ कोटीच्या निधीतला भाग वापरता येईल असे कॉलेजचे संचालक के. पदय्या आणि संस्थेचे कुलपति डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी सांगितले.

-पुणे टूडे, सकाळ ०१.०३.२००८

किशोर, झक्कास, अजय, अमोल, पुनम धन्यवाद.

पुर्ण कर्जमाफी
ती कर्जमाफी अल्पभुधारकांनाच लागु आहे शिवाय बँकेकडुन कर्ज घेनार्यांनाच लागु आहे.
आणखी एक महत्वाचा मुद्दा हा सर्व शेतकर्यांना लागु होतो.
जे शेतकरी कर्ज वापस करतात त्यांना पण सुट आहे. - ३१ डिसे. २००७ पर्यंत ज्यांनी कर्ज वापस तर केली आहेत पण त्याचे पुर्ण हफ्ते भरले गेले नाहीत (ओव्हरड्यू) त्यांचासाठी उरलेल्या ७५ टक्यांवर २५ टक्के सुट देन्यात येत आहे. ३१ डिसे पर्यंत साधारण ५०००० करोड कर्ज ओव्हरड्यु आहे. त्यामुळे याचा फायदा सर्वांना होईल.

अमोल / अजय तुमचे बरोबर आहे पण अरे गावात एवढी वाईट परिस्थीती आहे की कधी कधी असे पाऊले उचलावे लागतात. शेवटी सरकार तर लोकहीता साठी चालवावे लागते. हे म्हणजे आपल्या आरक्षणा सारखे आहे, एकदा दिले की नेहमी लागनारे पण दुसरा उपाय दिसत नाही. नाही तर आत्महत्या वाढीस लागतील. खास करुन हरयाना राज्याला या सवलतीचा फायदा होनार आहे.

झकास सावकारी पाशात जो अडकला तो गेला. सावकारी चालु नये म्हणुन खरे तर बँक्यांचे सरकारीकरण झाले होते पण तिथेच बाबुगिरी वाढीला लागली.

आता दोन फ्युएल वापरु शकणार्‍या मध्ये मला वाटत सध्या वॅगन आर ड्युओ ही एकच कार असावी. म्हणजे ती कार बरीच स्वस्त होइल अस आहे का?? >> हो थोडीफार. म्हणजे १५ ते १७००० ने. पण या मुळे उत्पादक ड्युयल फ्यूल वाल्या कार तर काढतील. मर्क व बि ऐम डब्लु भारतात उत्पादीत होते त्यांचा ड्युल वाल्या कार्स आता भारतात पण येतील तेव्हा जास्त फायदा होईल.

अमोल अरे आता सर्वच वृत्तपत्रात आणि साईटवर ऍनॅलीसीस आले आहेत त्यामुळे एवढेच ठेवतो.