स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार कमलेश Happy वर अनुक्रमणिका दिली आहे त्याप्रमाणे त्या त्या पानावर लिहिलेले आहेत. त्या पानाच्या क्रमांकावर क्लिक करा आणि स्क्रोल करुन पहा.

(Shri Tulaja Bhavani)

R.C.Dhere,
Padmagandha Prakashan
Published in (2007),
(Pages 688).

The book was published in 2007. The ‘Shri Akkalkot Swami Samartha Mutt, Pune’, rendered financial support for the publication. A short note giving details about the Trust also appears in the beginning.

As the author mentions in the preface, the book provides information collected by him from time to time over a span of fifty years of inquiry and research. Fired by an inner impulse to present that information and share his views, he expresses a sense of fulfillment on having completed, in the latter part of his career, the task of setting out the immense religious, cultural, nationalistic as well as political significance that the Goddess has had for the Indian people.

It is moving to note how the loss of his own mother, when he was barely five, prompted Dr.Dhere to see her in the Goddess – the Eternal Mother – and attempt to fill the void of maternal love, which had denied to him. He admits he underwent an emotionally charged experience as he was writing the book.

Just as the entire bhakti tradition in Maharashtra views Vitthal (or Pandurang) as mauli (or ‘mother’), it assigns the same maternal role to Dnyaneshwar despite the fact that both are male. The underlying principle, of course, is that none cares as earnestly and purely as does a mother, and further that the Eternal Brahma is both male and female and even transcends that classification.

The author confesses his sentimental or passionate lapses at places in the book. But he assures readers that he has not compromised either on fidelity to resources or in his efforts to acquire as many of them as he could. The latter effort involved extensive travel to famed places of Devi worship, research into works by past scholars, meeting knowledgeable persons currently involved in research and wide study of published material on the subject. He points out with a note of regret that scholars had done nothing to add to the pioneering research undertaken by Dattatreya Madhav Kulkarni of Tuljapur (1920). Although researchers like Kamalakar Bhagwan Prayag, Ganesh Hari Khare, Narahar Sheshrao Pohanerkar and D.R.Amaladi did some writing from an objective, historical perspective, they presented their work in the form of nothing more elaborate than booklets which did no justice to the entirety of the subject.

Gratefully acknowledging and responsibly using such earlier research, nevertheless, the author attempts to present in the book a comprehensive picture of the Deity. It would be the experience of every respectable researcher of religious history that subjects involving human faith can be unraveled only when one explores collective social beliefs with some deference. Man lives out a meaningful life only on the basis of sentiments that are governed by intellect and discretion, which fact renders sentiment-based realism more potent, influential and inspirational than its logically dictated counterpart. The ability of a myth to influence people depends on sentiment-based perception, as the author has shown in many of his research writings.

Tulaja Bhavani is viewed in popular perception as ‘Mahishasuramardini Durga’ who wields weapons of offence and defense in her eight hands, not only to destroy asuras (evildoers) but also to protect the righteous with limitless love and maternal care. While this imagery described in the ‘Saptashati’ became the subject of the deepest spiritual inspiration for Dnyandeo, it equally motivated Shivaji in the 17th Century. Contemporary bards, poets and chroniclers saw in the killing of Afzal Khan by Shivaji a re-enactment of that of Mahishasura by Durga. The same popular myth was used for arousing nationalistic fervor during the 19th and 20th Centuries. One poet of the period, in fact, chose to call a ballad he composed on the independence struggle by the name ‘Mahishasuramardan’ (or, ‘Killing of Mahishasura’). Dr. Dhere draws attention to the remarkable fact that an ancient myth can become a source of motivation for an entire nation – spiritually, socially and politically. Not only did it provide untold inspiration for individual elevation to millions through the ages, being described by Dnyaneshwar and philosophers in his tradition as ‘destroyer of human weakness’, but it also became the prime mover for nationalistic rejuvenation, as regarded by Aurobindo and others.

कुंजिका स्तोत्र हे अति गोपनीय स्त्रोत्र आहे.

हे स्तोत्र चे पठण नवरात्रीच्या अष्टमी व नवमीच्या संधी काळात (४८ मिनीटे) करावे. पठण करताना
कितीदा पठण केले ते मोजण्याची आवश्यकता नाही.

हा संधीकाळ (४८ मि) फार महत्वाचा आहे.
ह्या संधीकाळात देवी काली मातेच्या रुपात येऊन आशिर्वाद देते अशी वंदता आहे.

कुन्जिका स्तोत्रं
शिव उवाच
शृणु देवि प्रवक्ष्यामि कुंजिकास्तोत्रमुत्तमम्।
येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः भवेत्॥1॥
न कवचं नार्गलास्तोत्रं कीलकं न रहस्यकम्।
न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम्॥2॥
कुंजिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत्।
अति गुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम्॥ 3॥
गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वति।
मारणं मोहनं वश्यं स्तम्भनोच्चाटनादिकम्।
पाठमात्रेण संसिद्ध्‌येत् कुंजिकास्तोत्रमुत्तमम् ॥4॥
अथ मंत्र
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ग्लौ हुं क्लीं जूं सः
ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा
॥ इति मंत्रः॥
नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि।
नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिन ॥1॥
नमस्ते शुम्भहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिन ॥2॥
जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरुष्व मे।
ऐंकारी सृष्टिरूपायै ह्रींकारी प्रतिपालिका॥3॥
क्लींकारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोऽस्तु ते।
चामुण्डा चण्डघाती च यैकारी वरदायिनी॥ 4॥
विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिण ॥5॥
धां धीं धू धूर्जटेः पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी।
क्रां क्रीं क्रूं कालिका देविशां शीं शूं मे शुभं कुरु॥6॥
हुं हु हुंकाररूपिण्यै जं जं जं जम्भनादिनी।
भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः॥7॥
अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं
धिजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा॥
पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा॥ 8॥
सां सीं सूं सप्तशती देव्या मंत्रसिद्धिंकुरुष्व मे॥
इदंतु कुंजिकास्तोत्रं मंत्रजागर्तिहेतवे।
अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति॥
यस्तु कुंजिकया देविहीनां सप्तशतीं पठेत्।
न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा॥
अथ मंत्र
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ग्लौ हुं क्लीं जूं सः
ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा

। इतिश्रीरुद्रयामले गौरीतंत्रे शिवपार्वती

संवादे कुंजिकास्तोत्रं संपूर्णम् ।

फारच छान. ही माहीती वाचुनच मन प्रसन्न झाल.
मम चित्ता शमवी आता''.
मी एक श्लोक टाकते.
नमो गुरुभ्यो गुरु- पादुकाभ्यो.
नमो परेभ्य पर पादुकाभ्या
आचार सिद्धेश्वर पादुकाभ्यो
नमोस्तु लक्ष्मीपती पादुकाभ्या.
मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणतात हा श्लोक.

प्रभाताई Happy

गुरुच्या/परमात्म्याच्या पादुका म्हणजे साक्षात गुरु किंवा परमात्माच. म्हणून तर भरताने श्रीरामांच्या पादुकाच अयोध्येच्या सिंहासनावर ठेवून त्याच शुद्ध भावनेने राज्यकारभार चालवला. अशी काही उदाहरणं आपल्याला ह्या मार्गात आपलं आचरण कसं असावं हे शिकवतात.... अर्थात त्या नुसत्या कथा म्हणून सोडून दिल्या नाहीत तर.

नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य

सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरंगभंगरञ्जितम्
द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतं ।
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ १॥

त्वदंबुलीनदीनमीनदिव्यसंप्रदायकं
कलौमलौघभारहारिसर्वतीर्थनायकम्।
सुमच्छकच्छनक्रचक्रवाकचक्रशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥२॥

महागभीरनीरपूरपातधूतभूतलं
ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम्।
जगल्लये महाभये मृकण्डुसूनुहर्म्यदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥३॥

गतं तदैव मे भयं त्वदंबु वीक्षितं यदा
मृकण्डुसूनुशौनकासुरारिसेवितं सदा ।
पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥४॥

अलक्ष्यलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम्।
वसिष्ठशिष्टपिप्पलादिकर्दमादि शर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥५॥

सनत्कुमारनाचिकेतकश्यपात्रिषट्पदै
र्धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः।
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥६॥

अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं
ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकं।
विरिञ्चिविष्णुशंकरस्वकीयधामवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥७॥

अहो मृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे ।
दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे॥८॥

इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा।
सुलभ्यदेहदुर्लभं महेशधामगौरवं
पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ॥९॥

विक्रांत, पान १० वर मी_आर्याने लिहिलंय नर्मदाष्टक. तरी असूदे इथेही Happy

ॐ हिंद मुढ्लाभ्याम दैत्यानाम परमगुरु
सर्वशास्त्र प्रवक्तानाम ...भार्गवम शूक्र देवय नम्!!!
या स्त्रोत्रा बद्दल माहिती हवी आहे.कोणते स्त्रोत्र आहे व यात दैत्यानाम असे का वापरण्यात आले आहे?

माझ्यामते नवग्रह स्तोत्रातला 'शुक्र' ग्रहाचा श्लोक्/मंत्र असावा.

हिमकुंदमृणालाभं दैत्यानाम् परम् गुरु|
सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्||

यातील 'दैत्यानाम' म्हणजे 'दैत्याचे नाम' नाही तर ते दैत्य या शब्दाचे षष्ठी बहुवचन आहे. त्याचा अर्थ 'दैत्यांचा' असा होतो.

जो हिम(बर्फ), कुंद फुलांसारखा शुभ्र आहे, दैत्यांचा परम गुरु (शुक्राचार्य म्हणजे शुक्र) आहे,
त्या सर्व शास्त्रांत पारंगत अश्या भृगु कुळात जन्मलेल्या (भार्गव) माझा प्रणाम असो.

ashwini k,

sorry for conv. in English here,

can you please elaborate the meaning of gayatri mantra which you have given in your posts initially ?

thanks,

!! श्रीरेणुकास्तोत्रम् !!

ऐंद्र्यादिवंदितपदे वरदेऽभीष्टकामदे।।

कामदेवार्चितेऽनंते रेणुकेऽम्ब नमोऽस्तु ते।।१।।

एकवीरे निजाधारे रुचिरे सज्जनादरे।।

उदारे रेणुसंजाते रेणुकेऽम्ब नमोऽस्तु ते।।२।।

करुणारससंपूर्णे नयने सुस्मितानने।।

शोभने पाहि नोभीते रेणुकेऽम्ब नमोऽस्तु ते।।३।।

वीरमातर्महादेवि त्वदन्या कापरा भुवि।।

तारिणी दुर्गतोऽनंते रेणुकेऽम्ब नमोऽस्तु ते।।४।।

राममातर्महामाये जमदग्निप्रियेऽभये।।

विजये वेदविनुते रेणुकेऽम्ब नमोऽस्तु ते।।५।।

यैरर्चिते तव पदे ते धन्याः परमे पदे।।

निहितास्ते सुरनुते रेणुकेऽम्ब नमोऽस्तु ते।।६।।

न त्वदन्या गतिर्देवि परमा खलु शांभवी।।

भुक्तिमुक्तिप्रदे शांते रेणुकेऽम्ब नमोऽस्तु ते।।७।।

मः केशवेश्वराश्चापि सृष्टिस्थित्यंतकारिणः।।

प्रसादादेव तेऽनंते रेणुकेऽम्ब नमोऽस्तु ते।।८।।

जगदंब नमोऽस्तु रेणुके परिपाहीश्वरि नः सुभावुके।।

जयलाभयशःप्रदे मुदे स्तुतिरेषास्तु तवाखिलार्थदे।।९।।

नावाहनं नार्चनपद्धतिं ते जाने न भक्तिं त्वयि मे भवांतके।।

अथापि मां त्वं कुलदेवि भक्तकुलोद्भवं पाह्यपि चार्थसक्तम्।।१०।।

मातापुरनिवासिन्याः श्रीदेव्याः स्तोत्रमुत्तमम्।।

यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात्।।११।।

।। इति श्री प. प. श्री वासुदेवानन्द सरस्वती विरचितं श्रीरेणुकास्तोत्रं संपूर्णम् ।।

।। मानसपूजा (आत्मपूजा) ।।

अथ प्रबोधः

अजितामृत योगनिद्रिताच्युतशक्तेः स्वकृतातिमोहित द्युमुखे

श्रुतिबन्दिगीततो भगवज्जागृहि जागृहि त्र्यधीट्।।१।।

अथ ध्यानम्

यतो%स्य जननाद्यजः स्ववशमाय आद्यो विभुः।

स्वराट् सकलविद्गुरुः स सुखसच्चिदात्मा प्रभुः।।

असंसृतिरूप उझ्झितमलो%मुमैक्याप्तये

निवर्त्य नयनं निषेधविधिवाक्यतश्चिन्तये।।२।।

अथावाहनम्

कार्यक्षमान्वीक्ष्य पृथग्युतान्वा यो%नुप्रविश्यापि विभुर्निजांशात्।

निन्ये प्रभुत्वं हि महन्मुखांस्तमुपाह्वये त्रीशमनन्यचित्तः।।३।।

अथासनम्

अनेजज्जवीयो हृदो%प्याप्नुवन्नो सुराः पूर्वमर्शत्पराञ्चो%पि तिष्ठत्।

परान्धावतो%त्येति यद्ध्यासनं ते त्र्यधीशार्पितं चित्तमस्तान्यवृत्ति।।४।।

अथ पाद्यम्

राहोः शीर्षवदौपचारिकभिदा विष्णो पदं त्रीश ते।

प्रत्यक्तच्च निसर्गशुद्धमपि सन्मायांशतो%शुद्धवत्।।

भातं मूढधिया तदर्थममलं ज्ञानामृतं यत्नतो

धीपात्रेsत्र हिरण्मये विनिदितं पाद्यं गृहाणात्मभ।।५।।

अथार्घ्यम्

देवाचार्यप्रसादप्रजनितसुरसंपत्तिसद्रत्नजात-

श्रेण्याढ्ये मञ्जुले%स्मिन्नतितरविमले भाजने वै विशाले।।

चेतःसंज्ञेsविलोले धृतभजनजलाद्वेष्टृताद्यर्थजाले

स्वर्घ्यं संपादितं ते त्र्यधिप परम भोः स्वीकुरुष्वाप्तकाम।।६।।

अथाचमनम्

विधिवच्छ्रवणादि यत्कृतं ते त्र्यधिपाभव मे प्रसीद शंभो।।

द्विविधावरणाम्बु तेsर्पितं सत्कृपयाssचमनं कुरुष्व तेन।।७।।

अथ स्नानम्

प्रवचनादिसुदुर्लभताश्रुतेस्त्र्यधिपते इह श्रुतिविश्रुते।।

परमभक्तिसुशीतलसज्जलं वपुषि सिक्तमथा%%प्लुतये%स्त्वलम्।।८।।

अथ वस्त्रम्

यत्किञ्चिज्जगति त्रीश तत्त्वया वास्यमीश ते।।

वस्त्रत्वेनार्पितं तेन परानन्दार्हतास्तु मे।।९।।

अथ यज्ञसूत्रम्

यद्ब्रह्मसूत्रं त्रिवृतं पवित्रं कृत्वा समंत्रं त्रिपस स्वतंत्रम्।।

दत्तं सुमित्रं भज तेन चात्र सत्रं सुपात्रं कुरु मान्यतंत्रम्।।१०।।

अथ चंदनम्

आह्लादनं चन्दनमुच्यते तत्सत्यर्तरूपं न ततः परं ते।।

प्रेष्ठं त्र्यधीशागुण ते नूनमालेपनं ते प्रकरोमि भक्त्या।।११।।

अथ पुष्पम्

भगवन्त्र्यधिप प्रददामि मुदे सुमनः सुमनः सकलार्थविदे।।

अथ धूपः

योगानले%त्र बलदर्पपरिग्रहाहंकाराभिलाषममताप्रतिघांश्च दग्ध्वा।।

धूपो%यमुत्तमतमो%र्पित आर्य शान्तिद्वारा त्र्यधीश पदपर्यवसाय्यसौ ते।।१३।।

अथ दीपः

सो%हंभावप्रोज्वलज्ज्ञानदीपो मूलाज्ञानध्वान्तसंपातहृत्यै।।

स्थेयान्भास्वाँन्भाश्वतस्त्रीश तुभ्यं स्वात्मज्योतिर्दत्त एतं गृहाण।।१४।।


अथ नैवेद्यः

यस्य ब्रह्मक्षत्रे मित्रे ग्रासो र्मृत्युर्लेह्यं पेयम्।।

क्वान्वेष्टव्यं तस्मै कस्मै नैवेद्यार्थं दत्तं द्वैतम्।।१५।।

अथ ताम्बूलः

त्रीश ते%द्य परमभक्तिवीटिका पञ्चमैकपुरुषार्थसाधिका।।

निर्विकल्पसमाधितः पुरा रञ्जिकास्तु भवभञ्जिका वरा।।१६।।

अथ प्रदक्षिणा

त्वं त्रीशाहमहं त्वमित्यवगतेः स्थेम्ने निदिध्यासना-

त्मानस्ते परिदक्षिणा हि विहिता यद्यच्च मे क्रीडितम्।।

तद्ब्रह्मास्तु चिदन्वये क्षितुरथोत्वानुस्मरद्व्याहरे

तारं तारकमेकमात्मनि यथा शार्दूलविक्रीडितम्।।१७।।


अथ नमस्कारः

असकृदभिहिता तेनेकजन्माप्तपुण्यैः। प्रणतिविततिरेषाद्वैतशेषाविशेषा।।

त्वयि विनिहितमेतन्मे ज्ञ सर्वं स्वकीयं। त्र्यधिप जयतु पूजा त्वद्यशोमालिनीयम्।।१८।।

अथ क्षमापना

यन्मे न्यूनं संमतं स्थूलदृष्ट्या भूमन्तेनुक्रोशपीयूषवृष्ट्या।।

नित्यं प्रेयः स्वप्रभं शालिनीयं तस्याभूत्संपूर्णताशालिनीयम्।।१९।।

रोधनं द्व्यात्मनं शोधनं चात्मनः पूजनं त्र्यात्मनो भोजनं स्वात्मनः।।

यत्र सैषात्मपूजास्तु कण्ठे सतां स्रग्विणी मापरा स्त्रीव कण्ठे%सताम्।।२०।।

।। इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचिता आत्मपूजा संपूर्णा ।।

गायत्री मंत्र
ऒम भूर्भुव : स्व : ऒम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियोयोन : प्रचोदयात

अर्थ
---------------------------------------------------------------------
विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरुप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो. तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्म -सद्विचार-सदाचार-सद्माषण सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत.
( http://www.marathimati.com/balmitra/ShubhamKaroti/GayatriMantra.asp )

शशांक पुरंदरे ,

गायत्री मंत्र
ऒम भूर्भुव : स्व : ऒम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियोयोन : प्रचोदयात

अर्थ
---------------------------------------------------------------------
विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरुप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो. तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्म -सद्विचार-सदाचार
> > > >

जर हा प्रतिसाद माझ्यासाठी होता तर त्याबद्दल आभारी आहे.

मला हिच एक शंका होती कि गायत्री मंत्राचे उच्चारण आणी त्याचबरोबर त्याचे मूळ लिखाण सुद्धा आत्तापर्यंत बदलले आहे.

ह्या मंत्रात स्व च्या पुढे कधीही : हे चीन्ह नसते. ह्या चीन्हामुळे त्याचा अर्थ वा उच्चार स्वाहा असा होतो.

ह्या मंत्राचे शब्द बदलुन आता बरीच वर्षे होउन गेली आहेत, आणी " आजपर्यंत तर आम्हाला कोणी काही बोलले नाही ह्या बद्दल म्हणुन आम्ही नेहेमी असेच हा मंत्र म्हणतो ", असे म्हणत सगळे हा मंत्र चुकिचा म्हणतात वा बोलतात.
हा मंत्र जसा आहे आणी लिहावा / बोलावा तसा ईथे खाली देतो आहे.
ॐ भू भूर्व स्व, ॐ तत्स वितुरवरेण्यम, भर्गो देवस्य, धी मही, धीयोयोन: प्रचोदयात् | ॐ ||
अर्थ : ॐ, भू लोक, पाताळ लोक, स्वर्ग लोक, ह्या तिन्ही लोकांना वितरित करुन एक रुपाने धारण करुन असणार्‍या देवा, तुझे ध्यान ज्ञानाने जाणून ध्यान योगाने तुझे मी चिंतन करतो, ॐ ||

हा मंत्र मूळ त्या नारायण रुपाला आठवून आहे जो पृथ्वी, पाताळ, स्वर्ग ह्या तिन्ही लोकांना धारण करतो. ते परमेश्वराचे अनंत आणी आदी रुप आहे ज्याचे एक हजार मुख, बाहू आणी तितकेच नेत्र आहेत. ह्या रुपात ह्या सर्व चराचरातले सुर, असुर, पंच महाभूते, यक्ष, गंधर्व, किन्नर, राक्षस, आणी बाकिचे सर्व त्याच्या सृष्टीतले भूत ( जीव ) आहेत.
हा सर्वांचा आदी देव असून सर्वच्या सर्व चराचर ह्याच्याच आश्रयाने राहातात.
ह्या रुपाचा अर्थ असा आहे कि, मी सर्वांमध्ये आहे आणी सर्व माझ्यामध्ये आहेत. हाच तो सर्व वेदांचे मूळ.
ॐ . . . . हा प्रथम शब्दब्रह्म आहे, ह्यात सर्व उच्चार येतात जसे : अ आ इ ई उ ऊ ओ औ अं अ: , हा ॐ शब्द म्हणजे दुसरे काहिही नसुन परमतत्वाच्या प्रथम दृष्य रुपाने जो अवतरीत झाल्यावर आळस दिला, त्यावेळेस त्याच्या पवित्र मुखातुन निघालेला सर्वप्रथम शब्द / स्वर / उच्चार आहे. ज्यामूळे वेद सुद्धा सर्वप्रथम ह्याचाच उच्चार करुन पुढे आपले प्रतिपादन करतात.
आजच्या तारखेला सुद्धा आपण कधी आळस देतो तेव्हा असाच एक उच्चार आपल्या घशातुन उत्पन्न होतो.

"दिवाकर विरचित"
|| श्री दत्त कवच ||

|| श्री गणेशायनमः ||

श्री गणेशासी वंदुनी | श्री व्यासांते नमन करुनी ||
श्री दत्त चरणी माथा ठेवुनी | श्री दत्त कवच देतसे || १ ||

श्री दतात्रेय कवच | अंगीरस ऋषींचे वच ||
स्तोत्र महामंत्र साच | छंद ओवी रुप हा || २ ||

परमात्मा श्री दत्तात्रेय | देवता यासी ध्येय ||
ऐं क्लीं बीज-शक्तीमय | स्वाहाकार कीलक || ३ ||

या स्तोत्रमंत्राचा जप | करितां व्हावे पूर्ण निष्पाप ||
दत्त प्रसाद अमाप | लाभावा हा संकल्प || ४ ||

श्री दत्तात्रेयाचें ध्यान | तेथे लागले माझें मन ||
संयमी ऋषी ज्याचे चरण | सेविताती निरंतर || ५ ||

उज्वल कांति कमलापरी | गुप्तपणे संचरे पृथ्वीवरी ||
माहिष्मती नगरी जरी | पावन निवास मानिती || ६ ||

रेवा नदीतीरीं विहार | करीतसे हा यतिवर |
कृपा करुनी भक्तावर | संकटे त्यांची निवारी || ७ ||

योगारुढ जो प्रसन्नवदन | त्या योगीश्वरा करितों वंदन ||
त्या दत्ता श्रद्धेने प्रार्थून | दत्त कवच म्हणतसे || ८ || ||

|| अथ कवचम ||

योगीश रक्षो पूर्व दिशेसी | माधव तो आग्नेयेसी ||
सर्वात्मा रक्षो दक्षिणेसी | भक्तवत्सल नैऋत्य || ९ ||

ब्रह्मण्य तो पश्चिमेसी | दिगंबर तो वायव्येसी ||
सुव्रत रक्षो उत्तरेसी | भद्रद तो ईशान्य || १० ||

विष्णु रक्षो अधर दिशेसी | सर्वग रक्षो सर्व दिशांसी ||
दत्तात्रेय रक्षो शीर्षासी | मौनीशेखर ललाट || ११ ||

सर्वज्ञ रक्षो भ्रूमध्यासी | दयानिधी मम नेत्रांसी ||
महायोगी नासिकेसी | श्रुतीप्रिय तो श्रवणेंद्रिये || १२ ||

मनोजव रक्षो संधांसी | पुरुषोत्तम दोन्ही बाजूंसी ||
जो वरदाता कार्तवीर्यासी | तो रक्षो कर दोन्ही || १३ ||

पापहारी रक्षी नखासीं | भयहारी रक्षो कुक्षींसी ||
नारायणात्मक वक्षांसी | स्तनांसीही मम रक्षो || १४ ||

सर्व लोकांचा नियामक | मम पृष्ठासी होवो रक्षक |
अच्युत होवो उदर रक्षक | महात्मक रक्षो नाभीते || १५ ||

अत्रिपुत्र रक्षो कटीसी | शाश्वत रक्षो पोटर्यांसी ||
नग्नवेषधर गुह्यासी | परात्पर करो रक्षण || १६ ||

त्रिकालज्ञ रक्षो अंकांसी | शंकर तो मम जानूंसी ||
मायाजित तो जंघांसी | रक्षण करो सर्वदा || १७ ||

स्वयें प्रभू तो गोफ्यांसी | सदाभोगी तो चरणांसी ||
सदायोगी करांगुलीसी | सर्व शरीर रक्षो हें || १८ ||

त्रिकालज्ञ रक्षो देहासी | सर्वग रक्षो रोमारोमांसी ||
ऐसें रक्षो सर्वथा मजसी | दत्तात्रेय भगवान || १९ ||

भगवान दत्तांसी नमन | सर्व लोक ज्या करिती वंदन ||
सर्वांचे जो करी नियमन | सर्व तंत्रें ज्या पासुनी || २० ||

सर्व कामना सफल करित | सर्व विद्या पारंगत ||
सर्व योगीन्द्र शरण येत | मुनींद्रही जयाला || २१ ||

सर्व भक्तांचे करी रक्षण | ब्रह्मचर्य व्रत करी धारण ||
मायागूढ ज्याचे संचरण | विलक्षण भासतसे || २२ ||

कीं हा उन्मत्त जाहला | अथवा वाचेविना जन्मला ||
कीं बधिर कीं भोळा | लोकाचार न मानी || २३ ||

नग्नपणे करी संचार | ऐसा जो गुरु खरोखर ||
वंदन त्याचिया चरणावर | नमन हे फिरफिरुनी || २४ ||

भगवान दत्तात्रेयासी | वंदन त्या मुनिपतीसी ||
अभयदाता देवांसी | राक्षसांचा नाशक || २५ ||

निवारण करी उपद्रवांचे | दुष्ट मंत्र तंत्र यंत्रांचे ||
उच्चाटन करी दुष्ट ग्रहांचे | सर्व रोग नष्ट करी || २६ ||

ओम हीम क्रौं क्षौम | क्रूं हौं हूं श्रीम ||
मंत्र बीज रुप सूक्ष्म | म्हणूनी मी वंदितो || २७ ||

ओम नमो भगवंता | कार्तवीर्याचा उद्धारकर्ता |
रेवा नदी जळी खेळता | धन्य दर्शन पावती || २८ ||

माहिष्मती नगरांत | निवास जो सदा करीत ||
अनसूयेचा असे सुत | अत्रिनयनां सुख देई || २९ ||

जो क्षणमात्रें करून | तिन्ही लोकी करी भ्रमण ||
यमनियम संपन्न | दत्तात्रेय तो रक्षक || ३० ||

निवारी ब्रह्मराक्षसातें | भूतप्रेत वेताळांतें ||
पिशाच शाकिनी डाकिनीतें | पूतनादी ग्रहांदिकां || ३१ ||

आश्रितांचे दु:ख हरण | संकट पीडा करी हरण ||
दत्तात्रेय तो भगवान | नमन माझे साष्टांगी || ३२ ||

एकदांही करितां स्मरण | सन्निध उभा करि रक्षण ||
दत्तात्रेय योगीश चरण | तयाचे मी वंदितों || ३३ ||

सर्व कार्ये मम साधोत | रक्षण करी करी हित ||
हुं फट स्वाहा उच्चारीत | कवच संपूर्ण करीतसे || ३४ ||

हे कवच स्वीकारावें | श्रद्धेने नरें ऐकावें ||
लिहूनी धारण करावें | संपुटात अंगावरी || ३५ ||

नित्य याचें करिता पठण | सर्व कार्ये साधती पूर्ण ||
सर्वत्र विजय पावून | यश थोर मेळवी || ३६ ||

संकट येता राजद्वारी | भयंकर वा संगरीं ||
अराजक देशभरी | तरी ती नच बाधती || ३७ ||

नौका बुडतां प्रवाहात | प्राणभय मोठें उपस्थित ||
चोर सर्वस्व लुटीत | अग्नीभय वा उपजे || ३८ ||

ऐसीं येता संकटे | कवच रक्षण करी नेटें ||
व्याघ्रसिंहादिक उठे | जिवावरी श्वापद || ३९ ||

लांडगे विषारी उरग | अरण्यात वा लागे आग ||
सांपडेना कोठें मार्ग | निबिड वनीं चुकोनी || ४० ||

तरी निर्भय राही गिरिकुहरीं | ब्रह्मराक्षसही काय करी ||
गंधर्व भूत यक्ष सत्वरी | उडवुनी देई कवच हे || ४१ ||

दुष्ट्ग्रह वाडाकिनी | शाकिनी पिशाच्चें येउनी ||
त्रास देतां कवच पठणी | पीडा त्याची टळेल || ४२ ||

निपुत्रिकासी पुत्रलाभ | निर्धनासी धनलाभ ||
विद्यार्थ्यासी विद्यालाभ | मोक्ष लाभे साधकां || ४३ ||

रोगी सुटे रोगापासुनी | अपस्मार क्षय व्याधीतुनी ||
बंदी सुटे बंधनातुनी | कवच प्रभावें सुख मिळे || ४४ ||

एक दोन तीन दिवस | चार दिवस वा विशेष ||
पक्ष अथवा पूर्ण मास | ज्वर असा येतसे || ४५ ||

मस्तकी उठतसे शूळ | शीत बाधा उष्ण ज्वाळ |
वायुविकारही सबळ | दूर होय कवचानें || ४६ ||

कवच पठणे सत्वरी | सरस्वती कृपा करी ||
विवादीं प्रतिपक्षावरी | विजय तो लाभेल || ४७ ||

सर्व ग्रह अनुकूल | संपत्ती मिळे विपुल ||
सकल कामना सफल | दत्तप्रसादें होतील || ४८ ||

ऐसें श्रीदत्तकवच | अंगिरसमुनींचे सत्य वच ||
ब्रह्मवैवर्तपुराण साच | मंत्रयुक्त संस्कृत || ४९ ||

तयाची बहुजनांसाठी | ओवी रचियली मराठी ||
दिवाकर कवि-चित्तीं | प्रकटली सुलभपणें || ५० ||

विनयानें दत्तचरणीं | नम्र होउनी प्रतिदिनीं ||
म्हणता इष्ट फल, मिळूनी | धन्य होय गुरुभक्त || ५१ ||

|| श्रीदत्तकवच संपूर्ण ||

नवग्रह स्तोत्र दोन प्रकारे दिलेले आढळते. एकात पौराणिक मंत्र आहेत आणि दुसर्‍यात वैदिक. या दोन्हींचे संकलित स्तोत्र खाली देत आहे. प्रत्येक ग्रहाच्या मंत्रानंतर त्या त्या ग्रहासाठी किती जप करावा, हेही दाखविले आहे.

॥ नवग्रह पीडाहर संयुक्त स्तोत्रम् ॥

जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महद्युतिम् ।
तमोरिम् सर्व पापघ्नम् प्रणतोस्मि दिवाकरम् ॥
ग्रहाणाम् आदिरादित्यो लोकरक्षणकारक: ।
विषमस्थानसंभूताम् पीडाम् हरतु मे रवि: ॥१॥(७,०००)

दधिशंखतुषाराभम् क्षीरोदार्णवसंभवम् ।
नमामि शशिनम् सोमं शम्भोर्मुकुटभूषणम् ॥
रोहिणीश: सुधामूर्ति: सुधागात्र: सुधाशन: ।
विषमस्थानसंभूताम् पीडाम् हरतु मे विधु: ॥२॥ (११,०००)

धरणीगर्भसंभूतम् विद्युतकांतिसमप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तम् तं मंगलम् प्रणमाम्यहम् ॥
भूमिपुत्रो महातेजा जगतां भयकृत्सदा ।
वृष्टिकृद् वृष्टिहर्ता च पीडाम् हरतु मे कुज: ॥३॥(१०,०००)

प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम् ।
सॊम्यं सॊम्य गुणोपेतम् तं बुधं प्रणमाम्यहम् ॥
उत्पातरूपो जगतां चंद्रपुत्रो महद्युति: ।
सूर्यप्रियकरो विद्वान् पीडाम् हरतु मे बुध: ॥४॥(४,०००)

देवानां च ऋषीणां च गुरुं कांचनसंन्निभम् ।
बुद्धिभूतम् त्रिलोकेशम् तं नमामि बृहस्पतिम् ॥
देवमंत्री विशालाक्षो सदा लोकहिते रत: ।
अनेकशिष्य संपूर्ण: पीडाम् हरतु मे गुरु: ॥५॥(१९,०००)

हिमकुंदमृणालाभम् दैत्यानाम् परमं गुरुम् ।
सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यमहम् ॥
दैत्यमंत्री गुरुस्तेषां प्राणदश्च महामति: ।
प्रभुताराग्रहाणां च पीडाम् हरतु मे भृगु: ॥६॥(१६,०००)

नीलांजनसमाभासम् रविपुत्रम् यमाग्रजम् ।
छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥
सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय: ।
दीर्घचार: प्रसन्नात्मा पीडाम् हरतु मे शनि: ॥७॥(२३,०००)

अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्यविमर्दनम्
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यमहम् ॥
महाशिरा महावक्त्रो दीर्घदंष्ट्रो महाबल: ।
अतनुश्चोर्ध्वकेशश्च पीडाम् हरतु मे शिखी: ॥८॥(१८,०००)

पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकं ।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ॥
अनेकरूपवर्णैश्च शतशो~थ सहस्त्रश: ।
उत्पातरूपो जगतां पीडाम् हरतु मे तम: ॥९॥(१७,०००)

इदम् नवग्रहस्तोत्रम् य: पठेत्सुसमाहित: ।
दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यति ॥१०॥
नरनारीनृपाणां च भवेत् दु:स्वप्ननाशनम् ।
ऐश्वर्यं अतुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनम् ॥११॥
ग्रहनक्षत्रजा: पीडा तस्कराग्निसमुद्भवा: ।
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासो ब्रूते न संशय: ॥१२॥

॥ इति श्रीव्यासादिविरचितं नवग्रहस्तोत्रम् शुभमस्तु॥

परब्रह्म, गायत्री मंत्राच्या अर्थाबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेला अर्थ हल्ली प्रचलीत असलेल्या अर्थापेक्षा खूप पटला. गायत्रीमंत्राचा शब्दानुगणिक अर्थ देऊ शकाल काय?

अश्वीनी, अभय९,
धन्यवाद.

माधवा !
शब्दानुगणीक अर्थ फोड करुन सांगतांना त्याची रचना बदलहोण्याची शक्यता आहे, जी मला मान्य नाही, म्हणुन मला क्षमा करावी, पण हे ध्यानात असु द्यावे कि मी येथे अर्थ फारसा बदलेला नाहिये.

जर तुम्हाला यात आणखीन काही जास्ती माहिती वाटुन घ्यायची असेल तर कृपया उपकृत करावे, आम्ही सुद्धा चुका करु शकतो, पण मोठ्या मनाने कोणी दाखवुन दिल्या तर आभारी राहु . . . .

प्रतिसादाची वाट पाहातो आहे . . . .

नमस्कार |

परब्रह्म, तुमच्या चुका काढण्याचा उद्देश अजिबात नव्हता / नाही आहे. पण मला संस्कृतचा अजिबातच गंध नसल्याने मंत्राचा शब्दशः अर्थ लावताच येत नाही. तुम्ही दिलेला अर्थ मनापासून पटला म्हणून अधीक जाणुन घ्यावेसे वाटले.

प्रचलीत पठनात तत् सवितु असा विग्रह दिला जातो. आणि मग तो मंत्र सुर्याचा होऊन जातो. पण मी शिकलो ते अनेक वर्षांनी तुमच्या पोस्टीत दिसले म्हणून खूप आनंद झाला. इतरांनाही नीट सांगता यावे याकरता शब्दानुगणिक अर्थ मह्त्वाचा वाटला मला.

Madhava !

At all, no issues, don't worry.

प्रचलीत पठनात तत् सवितु असा विग्रह दिला जातो. आणि मग तो मंत्र सुर्याचा होऊन जातो > > > >

like this we should take it as " Nyaan Surya ( Sun of knowledge ), & even if appears as " tats, vitur varenyam = Like Light of Sun spread all over with great aura,

In both the cases it would appear a bit different where the base will remain same.

hope I'm able to clarify appropriately ? If not please let me know, will try & make it more detailed n easy to understand.

Sorry for English fonts here, my lap top at times . . . .

like this we should take it as " Nyaan Surya ( Sun of knowledge ), & even if appears as " tats, vitur varenyam = Like Light of Sun spreaded all over with great aura, >>> करेक्ट

- - - गुर्वभिन्न गणेश स्तुति - - - -

नर्ति गणेशाय न यद् गणेशाद, गुरोस्च तस्मादधिकम नृलोके ।
दिम्भो गणेशच गुरोश्च तस्य, स्तनंधयो यामी गुरो गणेश ।। १ ।।

तस्मिग शरनेदब गुरो गणेश, सुखात्मा रुपत्मा पदम् प्रदेहि ।
त्रिधा त्रिमूर्ति प्रणमामि भक्त्या, त्रिरंग नाशाय विभक्तिमत्या ।। २ ।।

निराकृतिम त्वं न्रुगजाकृतिच, स्थाणु प्रियं स्थावर जंगमात्मन ।
वन्दे वदातं गुरुतत्वमेकं, मनन्तनामान मचित्यरूपं ।। ३ ।।

गुरुर्गनेश: समिथो गुरु तं, भजे गणेशं गुरुणा च तेन ।
सता गनेशेन सदेग्ति: स्याम, नमस्च तस्मे गुरवे चितेस्तु ।। ४ ।।

। गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम् ।।

सुमुख प्रथम स्वनामगायकपालक सेवकमंगलकारक।कामसुपूरक मंगलकारक, त्राहि विनायक भाविकतारक।।१।।

सिंदूरलेपक मोदकभक्षक, दुर्जनशिक्षक निजजनवीक्षक।अंकुशधारक जगदुद्धारक, लोकविधारक संहारकारक।।२।।

अशेषकारक शक्तिविधारक, मूषकवाहक सुरदरदाहक।कलौ सुतारक त्वं हि विनायक, पालक सेवकमखिलाकहारक।।३।।

करुणारससंपूर्णकटाक्षामलवीक्षणैः।योऽनुगृह्णाति भक्तान्स प्रसन्नः सुमुखः स्मृतः।।४।।

ये परित्यज विहितं निषिद्धं प्रचरन्ति ते।वक्रास्तान ्तुण्डत्येष वक्रतुण्डः प्रकीर्तितः।।५।।

प्रथमं मंगलायैव गणेशः स्मर्यते बुधैः।सर्वदेवार्चितत्वात्स गणेशः प्रथमः स्मृतः।।६।।

स्मरणान्निजभक्तानां सर्वविघ्नान्निवार्य यः।कामान् पूरयति क्षिप्रं गणेशः कामपूरकः।।७।।

निवार्यामंगलान्याशु स्मरणाद्गणनायकः। करोति मंगलान्येष ततो मंगलकारकः।।८।।

इंद्रादीनां तु देवानां विविधा नायकाः खलु।न नायको गणेशस्य कोऽप्यतोऽसौ विनायकः।।९।।

।। इति श्री प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं गीतिपूर्वं गणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।

Pages

नवीन प्रतिसाद लिहा