-क्रांत
Your kiss leaves something to be desired. The rest of you.
हे वाक्य कोणी कोणत्या संदर्भात म्हंटले होते कल्पना नाही, पण पुस्तकांमधील उतार्यांना - चांगल्या पुस्तकांमधील चांगल्या उतार्यांना - नक्कीच लागु पडेल. कुठेतरी एखादा चांगला उतारा वाचला तर तो एखाद्या मीम ( meme) प्रमाणे काम करतो. डोक्यात तर बसतोच, पण तो ज्या पुस्तकातुन आला ते वाचायची पण इच्छा होते. आणि त्या लेखिकेची इतर पुस्तके सुद्धा. इतरांना सांगायची आणि ती चांगली गोष्ट इतरांपर्यंत पसरवायची पण इच्छा होते. झाला तर यामुळे लेखकांना व प्रकाशकांना फायदाच होईल.
असे अनेक उतारे अनेकांनी टाकल्यामुळे पुर्ण पुस्तकच आंतरजालावर उपलब्ध झाले तर? जे लोक पुस्तके फक्त या प्रकारे वाचतात ते तसेही ती पुस्तके वीकत घेण्याची सुतराम शक्यता नसते. पण लेखिकेचे विचार तर त्यांच्यापर्यंत पोचले! इतर अनेक मात्र जरूर ती पुस्तके विकत घेतील. पुस्तके ही सर्वांपर्यंत पोचलिच पाहिजेत. तोच एक विचार (व आचार) स्वातंत्र्याचा मार्ग आहे. अर्थात लेखक/लेखिकांच्या (व प्रकाशकांच्या) हक्कांचेही भान ठेवायला हवे. कुणी जर असे उतारे स्वतःच्या नावाने खपवताहेत असे दिसले तर वाईटपणा घेऊन देखिल त्याचा जरूर निषेध करा.
मायबोलीला वरील वाक्य कितपत लागु होईल याची थोडी शंका येऊ लागली आहे. इतक्यात दोनदा चांगल्या उपक्रमांना सुरुंग लावल्या गेला. बाळसे धरायच्या आतच कुशंकांना त्या कल्पना बळी पडल्या. आणिबाणि असल्याप्रमाणे 'हा बाफ आता बंद' असे चांगल्या उपक्रमांबाबत होऊ लागल्यास किंचीत कडुपणा जाणवतो. एका पातळीवर मायबोलीने बरेच काही साध्य केले आहे त्यामुळे अपेक्षा वाढतात. अर्थात न घाबरता एखादी गोष्ट करा असे इतरांना सांगणे सोपे आहे. एक स्तरावर मायबोलीचे जाळे आहे पण ते खोलवर नाही आणि सर्वदुर नाही. मायबोलीने विविध विषयांमधील मान्यवरांना आकर्षित करुन हे जाळे घट्ट विणायला हवे. मग मतांच्या ऐवजी वस्तुस्थिती चा बोध होईल आणि नविन उपक्रम तोंडघशी पडणार नाहीत. उदा. एखादा copyright lawyer मायबोलीवर असता तर सगळे लगेच स्पष्ट झाले असते. शॅडो कॅबिनेट देखिल खरोखर शह देण्याकरता नव्हती तर जनजागृती करता होती. या दोन्ही गोष्टि moderate करता आल्या असत्या. त्याबरोबरच मायबोलीची मते आणि मायबोलीवर लिहिणार्यांची मते जुळायलाच हवीत असे आहे का? अनेक वृत्तपत्र मासीकांमध्ये लिहिलेच असते की लेखकांची मते ही त्यांची स्वत:ची आहेत!
क्रांतिकारक गोष्टिंकरता उचलावी लागणारी पावले देखिल क्रांतिकारक असतात. नाहीतरी महाराष्ट व भारताला अनेकदा 'यांचाही सहभाग होता' या पाटीखली बसावे लागते. मायबोलीचेही तसे होऊ नये ही सदिच्छा.
PS: The thing I had mentioned about paragraphs possibly refers only to educational stuff (52g of the 1957 copyright act). But what is a visit to Maayboli anything but a purely educational experience in every sense of the word?
अनेक वृत्तपत्र मासीकांमध्ये
अनेक वृत्तपत्र मासीकांमध्ये लिहिलेच असते की लेखकांची मते ही त्यांची स्वत:ची आहेत!>>>>
या बाबतीत इंटरनेट माध्यम (अन म्हणुन मायबोली) अजुन बाल्यावस्थेत आहे असे समजु.