अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क

Submitted by चंपक on 10 January, 2010 - 00:51

अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क देण्याबद्दल हालचाली:

Reaching out to the Indian diaspora, Prime Minister Manmohan Singh invited them to "actively" participate in the country's economic development and join politics while hoping that they would get voting rights by the time of next general elections in 2014.

http://www.indianexpress.com/news/pm-invites-diaspora-to-join-active-pol...

"In fact, I would go a step further and ask why more overseas Indians should not return home to join politics and public life as they are increasingly doing in business and academia," he said.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

In fact, I would go a step further and ask why more overseas Indians should not return home to join politics and public life as they are increasingly doing in business and academia
-------------------------------------------
चला, मला भारतात परतल्यावर इतर काही उदरनिर्वाहाचे साधन मिळाले नाही तर हाही एक मार्ग मिळाला. गेल्यावर सोनियाजींशी संपर्क साधला पाहिजे Happy असो.

सीरीयसली,
निर्णयाचे स्वागत!

एक्सप्रेस च्या लिन्क ने पूर्वी व्हायरस आलेले आहेत त्यामुळे ते पाहण्याची डेअरिंग नाही. कृपया कोणी तरी सांगा-
अनिवासी भारतियांना म्हणजे - परदेशी राहणार्‍या भारतीय नागरिकांना की ओसीआय घेउन परदेशी/भारतात राहणार्‍या मूळच्या भारतीयांना?

हे प्रपोजल आतापर्यंततरी बरच व्हेग आहे. मुळचा भारतीय, सध्ध्या अमेरीकन नागरीक, ओसीआय धारक भारतातील निवडणुक लढवतो हे चित्र "फार फ्रॉम रीएलीटी" आहे असं वाटतं. Happy नॅशनल सिक्युरीटीचा प्रश्न वेगळा...

हुडा..... तुम्हारा चुक्या Happy

मी मतदार नाही, उमेदवार असणार हे! (मै आ रहा हुं गब्बर! :))

म्हणुन तर इथे प्रचार सुरु केलाय! प्रॉस्पेक्टीव वोटर सपोर्ट मिळवण्यासाठी Happy

गो चंपक! Happy

फारेन्डसारखे पण मला हे नीट कळले नाही. 'भारतीय' म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांना(जे भारताचे नागरीक नाहीत) की परदेशात राहणार्‍या भारतीय नागरिकांना? भारतीय नागरिकांना परदेशात राहून भारतातल्या निवडणुकांत मतदान करण्याची सोय सध्या माझ्या मते तरी नाही. हे त्याबद्दल आहे का? निवडणूक लढवणे तर दूरच जे नागरीक नाहीत त्यांना मतदानाचा हक्क देणेही विचित्र वाटते.

भारतीय नागरिकांना परदेशात राहून भारतातल्या निवडणुकांत मतदान करण्याची सोय सध्या माझ्या मते तरी नाही. हे त्याबद्दल आहे का?>>>>>> असेच दिसतेय! परदेशी (कुठल्याही प्रकारे परदेशी झालेले) नागरिकांना निवडणुकीत कुठलाही सहभाग दिला जाउ शकत नाही/ जाणार नाही.

>>परदेशी (कुठल्याही प्रकारे परदेशी झालेले) नागरिकांना निवडणुकीत कुठलाही सहभाग दिला जाउ शकत नाही/ जाणार नाही. <<

हंम्म्म.. वरील लिन्कमधील एक स्टेट्मेंट...

"In this context, it is important that we make efforts to connect the second generation of overseas Indians with their ancestral heritage and involve them actively in India’s march forward,"

सेकंड जनरेशन म्हणजे बाय डीफॉल्ट परदेशीच झाले की, असो.

It'll be interesting to see how it plays/flys in parliament. I'm still skeptical though. Happy

अनिवासी भारतियांना म्हणजे - परदेशी राहणार्‍या भारतीय नागरिकांना की ओसीआय घेउन परदेशी/भारतात राहणार्‍या मूळच्या भारतीयांना?
---------------------------------------------------------
मला वाटते दोघाना कारण ओसीआय घेउन भारतात राहणारे टेक्नीकली अनिवासी भारतीयच गणले जातात.

OCI / PIO ना मतदानाचा हक्क नसतो. अनिवासी भारतीय चा अर्थ, अजूनही भारतीय नागरीक असलेल्या परदेशात राहणार्‍या नागरिकांना मतदानाचा हक्क असा घ्यावा लागेल.

सेकंड जनरेशन ना कनेक्ट करणे / बोलावने म्हणजे मतदानाचा हक्क असे कसे होईल? Happy

"In this context, it is important that we make efforts to connect the second generation of overseas Indians with their ancestral heritage and involve them actively in India’s march forward,"

अ‍ॅक्टीवली इन्व्हॉल्व्ह मध्ये मतदानाचा/निवडणुक लढवण्याचा हक्क अभिप्रेत आहे असं वाटतं; I could be wrong (and I want to be wrong) Happy

राज,
अहो India’s march forward म्हणजे फक्त पॉलीटिक्स कसे होईल. त्यांनी भारतात येउन बिझेनेस सुरु करावेत हे त्यातून अभिप्रेत आहे. दरभेटीत पंतप्रधाण अनेकदा हे म्हणत असतातच की. उद्योगधंदे हे भारताला पुढे नेतील. पॉलिटिक्स?? पाथ टू डुम. Happy

असा मतदानाचा हक्क देउ केला तर उद्या लगेच सोनिया, तिचे बाबा अन आईही पंतप्रधाणाच्या लाईनीत लागतील,रेसिडेन्सी घेउन. Happy तसे काही होणार नाही.

असो.

चंपक,
योगायोगाने मी सुद्धा याच विषयावर एक बीबी काल सुरु केला होता....
हा विषय इकडे सुरु आहे हे माहित नव्हते. असो.

मुळात अनिवासी भारतीय हे फक्त वंशाने(originality) भारतीय आहेत, ते भारतीय नागरिक नाहित. मग त्यांना मतदानाचा अधिकार कशाला हवाय? आज मतदानाचा अधिकार, नंतर निवडणुक लढवण्याचा आणि नंतर कोणीतरी विलायतेत बसुन देशाचा कारभार हाकणार नाही कशावरुन. Uhoh
FDI अथवा remittances ठिक आहे, पण त्यासाठी देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करु नये.

पण त्यांना लोकांनी निवडून दिल्याशिवाय तसे कसे होईल? Happy

भारतीय नागरिकांना जगात कोठेही असले तरी आणि ओसीआय घेउन भारतात राहणार्‍या मूळच्या भारतीयांना मतदानाचा अधिकार असायला काय हरकत आहे? याने काय कॉम्प्लिकेशन्स होतील याची माहिती कोणी दिली तर उपयुक्त ठरेल.

कोणत्याही दोन देशांमधे दुहेरी नागरिकत्व असते ते याच वाटेने जात असेल ना? (ओसीआय म्हणजे ते नाही हे मला माहीत आहे).

मुळात अनिवासी भारतीय हे फक्त वंशाने(originality) भारतीय आहेत, ते भारतीय नागरिक नाहित. >>> अनिवासी भारतीय भारतीय नागरिक असू शकतात, ते फक्त भारतात राहात नाहीत.

>.पण त्यांना लोकांनी निवडून दिल्याशिवाय तसे कसे होईल>.>>
होईल ते पण होईल. (भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल सुद्धा अशीच झाली आहे.. १८९२ साली मतदानाचा अधिकार पहिल्यांदाच मान्य करण्यात आला होता Wink ) उद्या जाऊन NRI चा दबावगट ते(निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार) सुद्धा मान्य करुन घेईल.

आणि वरवर पाहता मतदानाच्या अधिकाराची यांना काय गरज आहे? इथे दरवर्षी निवडणुका असतात. वार्डातली, झेड्.पी. ची, लागलेच तर विधानसभेची, लोकसभेची. येणारेत का हे लोक प्रत्येक वेळी आपल्या busy schedule मधुन वेळ काढुन?

भारतीय संविधानात दुहेरी नागरीकत्वाची तरतुद नाही. Afterall citizenship is about loyalty and loyalty can not be divided. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत दोन दगडावर पाय ठेवता येत नाही.

>>> पण त्यांना लोकांनी निवडून दिल्याशिवाय तसे कसे होईल?

याविषयी भारतीय राज्यघटनेत पळवाटा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार कोणीही भारतीय नागरिक असलेली व्यक्ती (जन्माने अथवा स्थलांतर करून मिळविलेले नागरिकत्व) आयुष्यात कधीही निवडून न येता भारताचा पंतप्रधान होऊ शकते. पंतप्रधान पदाची शपथ घेताना लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्यत्व असणे सक्तीचे नाही. लोकसभेच्या निम्म्याहून अधिक सदस्यांनी सभागृहाचा नेता म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड केल्यावर ती व्यक्ती (राज्यसभेची वा लोकसभेची सदस्य नसली तरी) पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकते. (उदा. नरसिंहराव, देवेगौडा). शपथ घेतल्यावर ६ महिन्यांच्या आत लोकसभेत किंवा राज्यसभेत निवडून यावे लागते. म्हणजे किमान ६ महिने कोणीही निवडून न येता पंतप्रधानपदावर राहू शकतो. ६ महिन्यात निवडून आले नाही तर पदाचा राजीनामा देऊन दुसर्‍या दिवशी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन पुढील ६ महिने पंतप्रधान होता येते. अशा तर्‍हेने कोणीही कधीही निवडून न येता आयुष्यभर पंतप्रधान राहू शकते.

>>> असा मतदानाचा हक्क देउ केला तर उद्या लगेच सोनिया, तिचे बाबा अन आईही पंतप्रधाणाच्या लाईनीत लागतील,रेसिडेन्सी घेउन.

६ महिने भारतात वास्तव्य केल्यावर कोणीही परकीय नागरिक भारतीय नागरिकत्व मिळण्यास पात्र होतो. सोनियाचे बाबा ६ महिने भारतात राहून भारतीय नागरिकत्व मिळवू शकतात व त्यानंतर कॉन्ग्रेसने आपले संसदीय पक्षाचे नेते म्हणून त्यांची निवड केली तर ते तहहयात भारताचे पंतप्रधान म्हणून राहू शकतील (त्यांना त्यासाठी निवडणुकीला उभे राहण्याची अथवा निवडून येण्याची आवश्यकता नाही). भारतीय राज्यघटनेतील ही Loopholes आहेत.