वेलकम टू द सिन सिटी !

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

नुकतीच लास वेगस आणि ग्रँड कॅनियन ट्रिप झाली. ह्यावेळी जवळ जवळ ५ दिवस मुक्काम असल्याने फार पळापळ नव्हती. त्यामुळे बर्‍याच कसिनोंना भेट देता आली आणि शिवाय रस्त्यात हवा तितका वेळ थांबून मनसोक्त फोटो काढता आले. बर्‍याच दिवसांनी खूप फोटो काढले. आणि चक्क नाईटमोड मधे काढूनही ते हलले नाहीत. त्यातले हे काही फोटो.

स्ट्रॅटोस्फिअरचे टॉवर :

Stratosphere.JPG

सर्कस सर्कस :
Circus Circus.JPG

विन :
Wynn.JPG

एन्कोर :
Encore.JPG

पॅरीस :
Paris.JPG

फ्लेमिंगो आणि पॅरीस : फाईल साईज कमी करताना मागचा टॉवर जरा ब्लर झालाय..

Flamingo.JPG

प्लॅनेट हॉलिवूड :
Planet Holywood.JPG

एक्सकॅलीबर :
excalliber.JPG

लग्जर :
IMG_7130.JPG

स्ट्रॅटोस्फिअरच्या टॉवरवरून दिसणारी स्ट्रीप :
strip.JPG

दिवसा दिसणारी सोनेरी रंगाची ट्रंपची बिल्डींग आणि त्याखाली कॉपर कलरची एनकोरची बिल्डींग

Trump.JPGencore_day.JPG

लालू, आता झब्बू दे.. Proud

विषय: 

विन आणि एनकोअर काय आहेत? जबरी दिसत आहेत. तिथली सर्वात पॉश हॉटेल्स/ कसिनो आहेत का? अज्ञानाला हसू नये! बाकी फोटोमध्ये- टॉवर आणि त्यावरून टीपलेला नाईट व्ह्यू मस्त.

मस्त आहेत फोटु.
मग सायेब किती डोलरचा जुगार खेळलात?? Happy (आमाला पिक्चरात बगुन एवढच माहिती त्यामुळे ह्या प्रश्नाला हसु ने)

मस्त फोटू!
हो पुनमताई, विन आणि एन्कोर पॉश कसिनो होटल्स आहेत. जीवाच वेगास करायचं असेल तर विनमध्ये रहायलाच हवं! फोटो कधीतरी टाकेन.

पूनम.. वेगस मधे दर २ वर्षांनी काहितरी बदललेलं असतं असं ऐकून होतं.. ते ह्या वेळी खरच अनुभवलं. Happy मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा ही दोन कसिनो नव्हती.. ! त्याचा बिल्डींग बागेरून खूप भारी दिसतात आणि आतून पण मस्त आहेत.. एकदम चकाचक.. ! तिथे बर्‍याच बिझनेस कॉन्फरन्स पण होतात.. आणि एक नविन कसिनो आहे आरिया नावाचा.. तो पण खूप छान आहे असं ऐकलय.. पण आम्ही आत नाही गेलो..

झकासराव, जुगार फार नाही हो.. रॉले (roulett) आणि स्लॉट मशिन वर खेळलो फक्त... रॉले मधे थोडेफार जिंकलेले पैसे स्लॉट मशिनवर घालवले.. Happy

सगळ्यांना फोटो आवडल्याचं सांगिलतल्या बद्दल धन्यवाद.. Happy

आणि हो.. एनकोअर चा उच्चार आनकोअर असा(ही) होतो..
http://www.merriam-webster.com/dictionary/encore मृ.. धन्यवाद.. Happy

मी विचारणारच होते झब्बू देऊ का.. Happy

अरिआ
aria.jpg
मँडॅरिन ओरिएन्टल
mand1.jpg
व्हेनेशियन
venetiang.jpg
विन मधली फुलाफळांची अरेंजमेन्ट
flowers.jpg
विनमधले झुंबर
light1.jpg
पलाझो
palzzo.jpg

सगळे फोटो छान. पण कमाल आहे, बलाजीयोचा एकही फोटो नाही? अरे, ते वेगस मधले सर्वात बेस्ट आणि ग्रँड होटेल/कसीनो आहे... Happy

आता बेलाजियो बाकीच्यांच्या पुढे फारच लहान दिसते. दिसतच नाही पटकन खरं तर. तरी मी मागच्या वर्षी गेले होते. ट्रंप आणि अरिआ नवते तेंव्हा. काम चालू होतं. पण त्यांची म्युझिक फाउंटन खरच अप्रतीम आहेत.

छान आहेत फोटोज. आम्ही जवळजवळ चार-साडेचार वर्षांपूर्वी गेलो होतो. विन तेव्हा नुकतेच बांधले होते. आनकोअर नव्हते. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये राहिलो होतो त्यामुळे सकाळ-दुपार-रात्र अशा वेगवेगळ्या वेळी टॉवरवर गेलो होतो. लास व्हेगस टू ग्रँड कॅनियन हेलिकॉप्टर टूर घेतली होती. ती खूपच एंजॉय केली. हेलिकॉप्टर कॅनियनच्या मधोमध कुठेतरी उतरवले होते काही वेळ. खूप खाली कोलोरॅडो नदी दिसत होती.

लालू, छान आहे झब्बू.. Happy

राज, माझ्या कडे बलाजियोचा समोरून काढलेला फोटो नाहिये.. मागच्या ट्रिपचा मिळाला तर शोधून टाकतो. बलाजियो भारीच आहे एकदम.. पण आता बाकीची पण त्याला काटें की टक्कर देतात.. Happy