एका लग्नाची गोष्ट

Submitted by दीप्स on 8 January, 2010 - 00:21

भाग्यानी सुरु केलेल्या चर्चेच्या अनुशंगाने मला ही हा धागा सुरु करावासा वाटला Happy

मी माझी गोष्ट सांगणार आहेच इथे तुम्हीही शेअर करा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००३ च्या डीसेंबर मधे मामाच्या मुलाचा साखरपुडा ठरला नात्यातल्याच मुलीशी , त्या साखरपुड्यात एक मुलगी बघीतली (नवरीची मामेबहीण) मामांनी व पप्पांना सजेस्ट केलं. मामाचा माझ्यावर खूप प्रभाव असल्याने मी आधीच दोन गोष्टी जाहीर केल्या होत्या की मामा म्हणतील त्या मुलीशी मी लग्न करणार व लग्न रजिस्टर्ड पद्घतीनेच करणार. पण लग्नाची अशी काहीच चर्चा नव्हती घरात कारण माझा कमी पगार (दहा हजारही नव्हता!)
मुलीकडच्या लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली तेंव्हा त्यांनी आधी नकार सांगितला वयात ६-७ वर्षांच अंतर आहे म्हणून. मुलीची आत्या म्हणजेच माझी दुरची मामी. पण मी मुलीला आधी कधीच पाहीले नव्हते.

घरातल्या सगळ्यांना म्हणजे माझ्या भावा-बहीणींना ही गोष्ट कळली होती , मग काय मामेभावाच्या लग्नात नुसती धम्माल! माझ्या मित्रकंपनीलाही कळले. ते मुद्दाम आम्ही दोघे एकमेकांशी काहीतरी बोलावं म्हणून काहीतरी सिच्युएशन तयार करु लागले. मी त्या कार्यालयाच्या स्वयपाकघरात गेलो आजी साठी साबुदाण्याची खिचडी आणायला तर माझ्या बहीणीने तिलाही तिकडे पाठवले काहीतरी कारण काढुन ...
ती त्या पॅसेज मधून येत असताना ते पिक्चर मधे म्हणतात तसं घंटी वाजली कानात Proud येस्स !! हीच ती असं वाटलं. नखशिखांत नटलेली .... खूप सारे मोगर्‍याचे गजरेच आठवतायेत आत्ता Proud
मी आवाक होउन बघत असताना आवाज आला "मलाही देता का थोडी खिचडी, माझ्या आत्यासाठी हवीये" मी हातातलं ताट तसंच तिच्या हातात दिलं एकही शब्द न बोलता Proud
हे सग़ळं होत असताना मित्र , बहीणी सगळे दुरुन बघत होते. ही आमची पहीली भेट. तोपर्यंत हे काय चाललय हे तिच्या लक्षात आलं होतं. मी पुन्हा मामेभावाच्या सोबत स्टेजवर व ती नवरीसोबतच असं होउ लागलं. मी बोलायचा प्रयत्न केला पण बोलू शकलो नाही तेंव्हा. मग त्या लोकांनी फिल्मी स्टाइल बुट चोरला त्याचा. एक आगाऊ मित्र होता त्याने बरच ताणला तो विषय. त्यांची गँग होती ८-९ जणांची, ते पण हार मानत नव्हते तेंव्हा मग मी जरा ओरडलोच त्या मित्रावर व पैसे देऊन बुट सोडवले , तिच्या हातात पैसे मीच ठेवले व बुट घेतले. हे सगळं मामा ऑब्जर्व करत होते हे मला नंतर कळलं!!

२००४ च्या दिवाळीत घरी गेलो तेंव्हा एक स्थळ आले होते , ती मुलगी एमायटीला लेक्चरर होती, मग मात्र तिच्या आत्याचा कसा काय जाणो विचार बदलला, तिने मुलीच्या पप्पांना कनविन्स केले व ते मामाकडे आले स्थळ घेउन लगेच Proud मामाचा फोन मला "मुलगी बघायची आहे का ?की लग्नात बघितली तेवढं पुरेसे आहे ?" मला सुचेचना काय बोलावं .... माझ्या उत्तराची वाट न बघता मामा म्हणाले आम्ही लग्न ठरवलं आहे २७ डीसेंबरला साखरपूडा आहे Proud तेंव्हा मला इयर एंडला १० दिवस सुट्टी असायची नाताळची. त्यांनी साखरपुड्याची तारीखच सांगितल्यावर मी ठीक आहे एवढच बोललो. मला तिला भेटायचं होतं आधी पण सगळं बारगळलं. मला कांदेपोहे प्रकार आवडत नव्हता पण तरी तिच्याशी बोलायचं होतं , मग मामेभावाच्या - सचिनच्या बायकोने - रेणूने नंबर दिला तिचा Proud क्षणाचीही वाट न बघता तिला फोन केला साखरपुड्याच्या आधीच व सगळे बोलून झाल्यावर तिचे मत विचारले रजिस्टर्ड लग्नाबद्दल तर ती तयार होती रजिस्टर्ड लग्नाला. पण तिच्या घरचे तयार नव्हते खरतर दोन्हीकडचे आम्ही एकुलतेच असल्याने घरच्यानी बरेच प्रेशर आणले पण आम्ही ठाम राहीलो. अशा प्रकारे फेब्रुवारी ११ला लग्न झाले Proud

आमच्या लग्नाला एका मामाचा विरोध होता तो या कारणासाठी की मुलीला दमा आहे. पण ती गोष्ट तिने आधीच सांगितली होती मला. मी जेंव्हा घरच्यांना सांगितलं की माझी हरकत नाही तेंव्हा त्यांनी जास्त विरोध केला नाही.

आज लग्न या विषयावर एवढं वाचलं जातं की लग्न हा एक जुगार आहे वगैरे .... पण माझ्या मनी ध्यानी नसताना मला असा जोडीदार मिळाला ह्या बद्दल मी देवाचे आभार मानतो खरोखरीच. मित्राचे वडील नेहमी म्हणायचे की लग्न झालं की बायकोच्या पावलानी लक्ष्मी येते , आम्ही तेंव्हा हसून सोडून द्यायचो पण खरच लग्न जमून ते होइपर्यंत बायको पुण्यात येइपर्यंत माझे दोन इन्क्रीमेंटस झाले सहा महीन्याच्या अंतराने Proud घर या विषयावरही काही विचार केला नसताना घरही झालं ! आम्ही पाच कॉलेज मित्रांनी मिळून एकाच सोसायटीत घर घेतलं !! आज आम्ही अगदी सुखात नांदतो आहोत. अजून काय हवं ?

झक्या,सान्वे आता तुम्ही लिहा.

मामाचा फोन मला "मुलगी बघायची आहे का ?की लग्नात बघितली तेवढं पुरेसे आहे ?">>>>>>>>
Rofl
दिप्या मी ते लग्न इमॅजिन केल रे. Happy

दिप्या लय भारी इश्टोरी लगिनाची रे भाऊ तुझ्या

प्रशांत दामलेजी "एका लग्नाची गोष्ट" नाटक आठवल बघ Wink आता सांग बघु पार्ट टु नाटकासारखाच आहे का ट्रॅक वर Wink (गंम्मत रे. हलक्याने गे पोस्ट)

"मलाही देता का थोडी खिचडी, माझ्या आत्यासाठी हवीये">>>>> मला एवढंच वाक्य दिसलं..... सही श्टोरी है.......

>>> आता सांग बघु पार्ट टु नाटकासारखाच आहे का ट्रॅक वर

कवे, असणारच तसा.... 'एका लग्नाच्या गोष्टी'ला पर्यायच नसतो दुसरा Proud उगीच नाही इयर-एंड्ला मधुरा माहेरी होती Proud

दिप्या, दिवा घेशील याची खात्री आहे. Happy

मित्रांनो,
दीपुर्झाचा लग्नाचा अनुभव मनापासून लिहिलेला आणि मित्रांशी आपल्या आयुष्यातील जपलेले कोमल क्षण शेअर करण्याचा होता. मला तो आवडला अन् मीही त्याला प्रतिसाद दिला, पण काही मित्रांची नापसंतीही लक्षात आली. 'हाय हॅलो बाय' एवढ्या तीन शब्दांपुरते आजच्या काळातले मैत्रीसंबंध मर्यादित राहणार असतील तर किमान आयुष्यातील प्रेम या उदात्त भावनेची जाहीर टिंगल नको व्हायला. या भावनेतून मी माझी पोस्ट उडवत आहे.
दीपुर्झाचे कौतुक करायला मात्र विसरणार नाही. Happy

माला.दाते ना अनुमोदन. स्वताची पर्सनल लाइफ चारचौघात मांडुन काय मिळणार?
मला नाही आवडले. बर्याच लोकांना नाही आवडले हे बीबी प्रकरण. Happy
माझे लग्न पन लव्ह मॅरेज पन मी असं लिहु धजनार नाही चारचौघात.

लग्न कसे जमले यात फार वैयक्तिक काही आहे असं मला वाटत नाही. ज्यांना हा बीबी रूचला नसेल त्यांनी वाचून/न वाचता सोडून द्यावे, इथे येऊन अख्खा बीबी वाचून वरून मतांच्या पिंका टाकणे गरजेचेच आहे का?

बॅक बटण... कम हियर...

दक्षिणे माझ्याकडुन तळणीचे मोदक बर!! (जरा विविधता हवीच!!)

दीप्या मस्तच आहे धागा आणि लग्नचा किस्सा, मला आवडला.
प्रयोग, असले लग्न म्हणजे कठीणच आहे, फक्त पत्रिकाच बघायची. अंधारातली उडी खरीच, पण एकदम निबिडच अंधार की. पण ज्याचा शेवट गोड......... Happy

माझे लग्न मी स्वत्:च ठरविले होते. माझा नवरा जेव्हा माझ्या वडिलांना भेटायला लग्नाला संमती मिळवावी म्हणुन्)आला, तेव्हा त्याला आईने चहा आणि गुड डे बिस्कीटे दिली. (काय मिळणार हे मी त्याला आधीच सांगितले होते. वरुन, बिस्कीटे चहत बुडवुन खाउ नकोस, माझ्या पपांना आवडत नाही अशी टीपसुद्धा दिली.) तरीपण हा माणुस अनवधानाने बिस्कीट चहात बुडवुन खाउ लागला. माझ्या बाबांनी त्याला विचारले, "तुझ्या घरी माहित आहे का तुमचे हे अफ़ेअर?", त्याचा एक ठोका चुकला बहुतेक, हात कपातच रहिला, क्षणार्धात भानावर येत त्याने बिस्कीटाचा हात वर घेतला, मऊ झालेले ते बिस्कीट चहात पडले, चहाचा एक थेंब उडुन फरशीवर सांडला आणि ह्या पडापडीने अजुनच चेहरा पाडत तो म्हणाला, "नाही !" Sad

अर्थात त्यानंतर थोडीबहुत बाजु त्याने सावरली, मग १-२ आठवड्यांत लग्न ठरलेही. पण हा प्रसंग आठवला की खुप हसु येते.

Pages