एका लग्नाची गोष्ट

Submitted by दीप्स on 8 January, 2010 - 00:21

भाग्यानी सुरु केलेल्या चर्चेच्या अनुशंगाने मला ही हा धागा सुरु करावासा वाटला Happy

मी माझी गोष्ट सांगणार आहेच इथे तुम्हीही शेअर करा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण तेंव्हापासून शक्यतो दोन्ही बाजूंना सुरक्षीत अंतरावर ठेऊन ’गुटोंकी मुटभेड’ टाळण्याचाच आम्ही प्रयत्न करतो.>>>>>>>>अगदी अगदी!
आगावा सहीच! सगळी पोस्टच आवडली.

माझ्या लग्नाचे किंवा त्याआधीचे बरेच पल्ली प्रसंग आहेत, )वल्ली - पल्ली समानार्थी शब्द वाटतात, नै?)
त्यातला एक जाता जाता,,,,,,,,,
प्रथमच भेटायचं जेव्हा ठरलं तेव्हा आम्ही सदाशिव पेठेत लज्जत मध्ये भेटायचं ठरवलं )'लज्जत! कपाळावर आठ्या)
नवरा नुसता घामाघुम, आणि मी शांत! अधीर खरतर Proud उगीच इकडचं तिकडचं काहीतरी गप्पा मारलयावर जाउ या का म्हणाला , मी 'तेव्हा' त्याच्या आज्ञेत हते, 'बरं' म्हणा, मी स्कुटर काढतो तु ये , इतकं बोलउन हा गेला देखिल!
बिल मला भरायला लागणार होतं, माझ्याकडे पैसेच नव्हते, आता मी घामाघुम! पण तिथुन जवळच माझं अभिनव कला महाविद्यालय असलयानं आम्ही मित्र-मैत्रिणि नेहमी यायचो लज्ज्जतला, मी अोळखीच्या वेटरला जवळ बोलावुन प्रकार समजावुन सांगितला, तो बिच्चारा इतका छान हसला, म्हणाला, जा तुम्ही, नंतर द्या, मी सांगतो मालकांना,,,,,,,,,,
लगेच दुपारी जाउन पैसे देउन आले, पण त्यानंतर आजतागायत नवर्‍यासोबत जाताना पैसे घेउनच बाहेर पडते Happy

पण त्यानंतर आजतागायत नवर्‍यासोबत जाताना पैसे घेउनच बाहेर पडते>>> पल्लीबाय लई भारी Lol , माझ्या बायकोलाही ही सवय मी फार लवकर लावली
श्रुती, अगदी कालच एक चकमक यशस्वीरित्या टाळली आम्ही Lol

>>>अगदी कालच एक चकमक यशस्वीरित्या टाळली आम्ही
आगावा काही तरी टीप्स दे बुवा Happy

Pages