Submitted by के बालचंद्र on 5 January, 2010 - 21:55
हव्या कशाला मग सलवारी ?
भरजरी शालू जुनाट झाले
फेकुनी द्या त्या नववारी
कम्फ़रटिबल त्या मस्त बिकिन्या
हव्या कशाला मग सलवारी ?
नको रुढी, रिवाज नको ते
परंपरागत तर नकोच बाई
ढिगभर कपडे वापरल्याने
वाढत गेली महागाई
कराल जर का माझा अनुनय
स्वस्ताई येईल घरोघरी ....!
टकमक बघुद्या बघणार्यांना
आपल्या बापाचे काय जाते ?
नेत्रसुख घेवुद्या घेणार्यांना
सुखवू द्या मस्त नयनपाते
टीका करती जुनाट जन ते
तिसाव्या शतकाची मी नारी ...!
स्तोम कशाला या कपड्यांचे
म्हणोत काही मेले बापडे
जर का असती देवाची इच्छा
जन्मलो नसतो नेसून कपडे ?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी
होऊ द्या आता घरोघरी ...!
गुलमोहर:
शेअर करा
जिथे न पहुचे रवि वह पहुचे
जिथे न पहुचे रवि वह पहुचे कवि....फुल्ल २ फिदा कवीता वर...:)
जिथे न पहुचे रवि वह पहुचे
जिथे न पहुचे रवि वह पहुचे कवि...
वा! वा!
वा! वा!
शालू जुनाट 'झाल्या'? बापाचे
शालू जुनाट 'झाल्या'? बापाचे काय 'जाती'? वेशभुषा 'गुणकारी'?

एक शुद्धलेखन गेले तेलंगणात. पण लिंग वचन अर्थाचेही पिंड काढून ठेवले आहेत. असल्या घाणेरड्या पिंडाना शिवायची वेळ आलीहे. आमची तरी पितरे कशी जातील स्वर्गात?
प्रतिसाद दात्या समस्त
प्रतिसाद दात्या समस्त भाऊबहिंनींचे जिवाभावातुन आभार..
असाच लोभ असु द्यावा.
.
सलवारीत व्याकरण शोधायची सवय बरी नव्हे.
आयला डोमकावळ्याचीही पितरे
आयला डोमकावळ्याचीही पितरे असतात आणि तीही स्वर्गात ?
मला वाटलं डोमकावळे आमच्याच पितरांसाठी पिंडाना शिवतात...
रसग्रहणकर्ता महान आहे!
झक्कास
झक्कास

(No subject)
प्रतिसाद दात्या समस्त
प्रतिसाद दात्या समस्त भाऊबहिंनींचे जिवाभावातुन आभार..
असाच लोभ असु द्यावा.
वाइट्ट नजर कट केली का?
वाइट्ट नजर कट केली का?
हौसा, प्रतिसादाबद्दल
हौसा, प्रतिसादाबद्दल जिवाभावातुन आभार..
असाच लोभ असु द्यावा.
वा !! छानै ... राव.
वा !! छानै ... राव.
(No subject)
खतरनाक काव्य के
खतरनाक काव्य के
भारी आहे
भारी आहे
Pages