जेंव्हा नवीन असं काही वाचायला जवळं नसतं किंवा नवीन असे वाचताना आकलन व्हायला हवी असलेली मनाची स्थिती नसते, तेंव्हा संग्रही असलेलं आणि आधीच वाचलेलं पुस्तक मी घेतो आणि त्या पुस्तकांच कुठलं पान मला निदान विरंगुळा तरी देईल हे मला इतकं छान माहिती असतं की बरेचदा ते ते पान.. त्या त्या पानावरील ते ते परिच्छेद मुखपाठ व्हायला लागतात.
पुष्कळशी पुस्तके ही पहिल्या पानापासून अगदी अखेरच्या पानापर्यंत वाचनिय नसतात पण अधून-मधून लेखकाला मनापासून स्फुरलेलं काहीतरी असतं आणि तो ते चांगलं लिहून जातो.
हा बा.फ. मला पाचेक वर्षांपुर्वीच सुरु करायचा होता. तो मी आज सुरु करत आहे. कारण हल्ली मायबोलीकर हे अतिशय जिव्हाळ्याने पुस्तकांविषयी बोलतात. वाचकांची संख्या कितीतरी पटीने इथे वाढली आहे. आपल्या अनमोल वेळेतील थोडा वेळ आपल्या आवडीचे परिच्छेद लिहिण्याकरिता ते आनंदाने देतील. या बा.फ. मागचा माझा उद्देश अगदी सरळ साधा आहे. जे मला/तुम्हाला कधी गवसलं नाही ते यातून गवसेल. पुस्तकाची न्यारी चव कळेल जी यापुर्वी मी/तुम्ही कधी घेतली नाही. नेट वर मला/तुम्हाला मराठी पुस्तकातील काही उतारे सहज प्राप्त होऊ शकतील.
धन्यवाद!
>पन्नास शब्दांपर्यंतच्या
>पन्नास शब्दांपर्यंतच्या परिच्छेदांसाठी परवानगी मागू नये, असा संकेत मराठी प्रकाशक पाळत असत
असाच काहीसा नियम, संकेत नव्हे, पण ५० अश्या ठराविक आकड्याऐवजी कथेच्या / प्रकरणाच्या/ पानाच्या १% वगैरे असावा असे मला सुचवावेसे वाटते. म्हणजे जी सुरुवातीची सूचना लिहिली आहे त्यात हे ठरवून द्यावे की अमुक प्रमाणात पुनःप्रकाशन करण्यासाठी परवानगीची गरज नाही.
त्यामुळे जे सरसकट प्रती बनवणारे लोक असतील त्यांना जाब विचारणे सोपे जाईल. आणि लोकही विचार करून उतारे देतील.
सध्याचा नियम आपल्याला आपल्या आवडत्या पुस्तकांबाबत चर्चा करण्यात खोडा घालतो आहे अशी भावना होते आहे. ती कोणासाठीच चांगली नाही असे मला वाटते. ज्या पुस्तकांत असे छापलेले आहे, त्यांचे उतारे देण्याने नियमभंग होतो हे मला मान्य आहे. पण तो नियम व्यवहार्य नाही असे मला वाटते.
असा जर नियम केला, तर असे अनेक
असा जर नियम केला, तर असे अनेक परिच्छेद देऊन बराच मोठा मजकूर प्रकाशित करता येईलच.
एका मराठी संकेतस्थळावर अनिल अवचटांनी लिहिलेल्या लेखांच्या पानांचे दुवे आहेत. ही पानं अशीच लिहिली गेली आहेत.
या वर्षी प्रताधिकारासंबंधी नवीन कायदा येतो आहे. इंटरनेटच्या वापराची कल्पना नसल्यानं अनेक प्रकाशकांना अजूनही सगळ्या व्यवहाराची कल्पना नाही. पण या नवीन कायद्यात ऑनलाइन contentबद्दल बरेच नियम केले आहेत, असं ऐकून आहे.
आता या सगळ्या संवादांचं एक
आता या सगळ्या संवादांचं एक पुस्तक छापा...
आधी एडीट केलेला उतारा मी परत
आधी एडीट केलेला उतारा मी परत इथे पेस्ट करतोय तो का हे काही वेगळं सांगायला नकोच! बी ने प्रस्तावनेत लिहिलेलच आहे.
"ओळख पाळख वगैरे..."
मंड्ळी काय लिहावं हा प्रश्न मला अजिबात पडलेला नाही!
लिहिण्यासारखं बरेच आहे लिहिन लिहिन म्हणता म्हणता ते तसं झालेलचं नाही हे ही लक्षात आहे. काहीतरी लिहिलय ते पोस्ट करण्यासारख वाटत नाहीये म्हणून आणि एकंदरच ह्यावर लिहायची माझी जबरदस्त उर्मी मला आता थांबवू शकत नाहीये म्हणून ह्यावेळेस माझ्या अनेक आवडत्या उतार्यांपैकी लिहीन म्हणतो..
पुस्तक: प्रवास
लेखिका:सानिया
पान क्र.: १९ PLEASE REFER THE PAGE NUMBER
प्रकाशन गृह:राजहंस प्रकाशन
*****
मला काय वाटत ओळखीची, नेहमीच्या वापरातली माणसं वापरातली? होय होय वापरातली ज्यांचा आपल्याला उपयोग आहे, होतोय, पुढेही करून घेता येईल, अश्याच माणसांबरोबर आपण संबंध सुरळीत ठेवू पाहतो नात्यातली माणसं जेवढी गरजेची तेवढी त्या नात्यांभोवतालची वीण घट्ट अन् कधीकधी असह्य करून टाकणारी... ही गरज जोवर दोघांनाही/ असते तोवरच हे संबंध सुरळीत आणि दोन्ही बाजूंनी जपून ठेवलेले असावेत असं का कुणास ठाऊक वाटून गेलं. ह्या नात्यांमध्ये गरज आणि विश्वासाचा तसा काही परस्परासंबंध असायलाच पाहिजे असं काही नाही... गरज असते विश्वास असतोच असं नाही! मग ही ओळखीची माणसं कधी अनोळखी, परकी वाटू लागतात ते समजतच नाही.
मुळातच आपण ह्या अश्या सगळ्या ओळखी, अनोळखी, रक्ताच्या नात्यातल्या आणि इतर लोकांशी गरज म्हणून संबंध राखून असतो. ह्या गरजांची रुपं अनेक असू शकतात शारिरीक, भावनिक, आर्थिक वगैरे वगैरे. ह्यातूनच मग आपण एकमेकांना घट्ट धरून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो कधीकधी सहजपणे तर कधी अगदी अट्टाहास धरतो. आणि मग ही गुंतागुंत वाढतच जाते. आणि आपण रस्त्यात दिसणार्या समोरच्या व्यक्तीला बघून हसायच विसरून जातो. आणि मग उरतो तो फक्त एक हिशोब! उपयोगमुल्य
*****
दीपक, मायबोलीवर वरील उतारा
दीपक,
मायबोलीवर वरील उतारा प्रसिद्ध करण्यासाठी तू प्रकाशकांची परवानगी घेतलेली नाहीस. तू प्रकाशकांना http://aschkaahitri.blogspot.com/ या तुझ्या ब्लॉगावर वरील उतारा प्रसिद्ध करण्याविषयी परवानगी मागितली होती. ती परवानगीही तुला देण्यात आलेली नाही. तू प्रकाशकांना पाठवलेला ईमेल व प्रकाशकांनी तुला पाठवलेलं उत्तर माझ्याकडे आहे. त्यात मायबोलीचा उल्लेख नाही, व प्रकाशकांनी परवानगीही दिलेली नाही.
तेव्हा हा उतारा ताबडतोब इथून काढून घेण्याची विनंती मी करतो आहे.
'हे सांगणारा तू कोण' हा प्रश्न येईल म्हणून -
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
-----------------------------------------------------------
We, the 'Rajhans Prakashan Private Ltd.' have authorised Mr. Chinmay Damle to book complaints and take legal action on behalf of 'Rajhans Prakashan Pvt. Ltd.' regarding online violation of our publishing rights, copy rights and piracy.
Dileep Majgaonkar
(Director: Rajhans Prakashan Pvt. Ltd.)
****
प्रशासक,
मायबोलीला विविध प्रकाशकांनी वेळोवेळी साहाय्य केलं आहे. काही प्रकाशकांशी भागीदारीसुद्धा आहे.
राजहंस प्रकाशनाने कोणालाही त्यांच्या पुस्तकातील उतारे मायबोलीवर प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. तसंच, परवानगी नाकारूनही वरील उतार प्रसिद्ध केल्यानं, आणि शिवाय परवानगी असल्याचं सांगितल्यानं राजहंस प्रकाशनानं दीप्क यांना परत एकदा पत्र पाठवलं आहे.
हा संपूर्ण पत्रव्यवहार मी आपल्याला पाठवू शकतो.
त्यामुळे या प्रकरणात आपण आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, ही विनंती.
चिन्मय, तो उतारा मी काढलाय जे
चिन्मय,
तो उतारा मी काढलाय जे आहेत ते माझेच शब्द आहेत.
तू पहिल्यांदा फोन केलास तेंव्हा मला म्हणालास की हे पान बंद होईल. मी समीरशी बोलतो. नंतर काय झालं माहित नाही पण हे पान बंद झालंच नाही. अस का झालं? मे बी अॅडमीनला वाटलं असेल की ही चर्चा अयोग्य नाही हो ना?
अजूनही हा बीबी बंद करण्यात आलेला नाहीये!
तू हे ही म्हणालास की अक्षरवार्तेत प्रवासवर तू लिहितो आहेस म्हणून मी हा उतारा काढून टाकावा. ते मी केलं.
तू म्हणतोस त्याप्रमाणे तु असशील ही राजहंसचा प्रतिनिधी / प्रवक्ता पण म्हणून ह्याचा अर्थ हा होतोय का की कुठल्या इंटेनशनने कुणी काय लिहिलय हे तू सांगावस?
तुझ्या दुसर्या फोनमध्ये तू म्हणतोस की तुला धडकीच बसली ( बादवे तुला धडकी का बसावी हा प्रश्न मला अजूनही सतावतोय!) की बी फोन वगैरे करुन राजहंसला तेच तेच प्रश्न परत विचारेल आणि अकारण त्यांना त्रास होईल वगैरे... पण मला जरा सांग असे किती फोन राजहंसच्या संपादिकेला दिवसातून येत असतील ज्यात हे असे कवडीमोलाचे (?) सवाल विचारत असतील...
असो जर असे प्रश्न कुणी विचारले अन् केवळ त्यांना त्रास होऊ नये अशीच तुझी इच्छा असेल.. असं समजूनही चालूयात एक वेळ पण हे तू का ठरवावस की कुणी फोन करावे? कुणी न करावे? तूझा हेतू चांगलाच आहे होता या बद्दल तीळमात्र शंका माझ्या किंवा कुणाच्याच मनात नाही / नसावी. पण तुझं फोन वरून बोलण खटकलं होतं तेव्हा.
आता मी का नाही लिहिल याबद्दल सांगतो. सर्व प्रथम हे पुस्तका /कांच री - प्रॉडक्शन नव्हतं.
व्यावसायिक वापरही नव्ह्ता. पैसा कमवावा हाही हेतू नव्हता.
तुला काय वाटतं / प्रकाशकांना काय वाटतं हे ही महत्वाच आहेच त्याच बरोबर जे लोक पुस्तकं विकत घेतात त्यांना काय वाटतं हे ही तितकंच महत्वाच आहे! कारण पुस्तकं लोक विकत घेतात कायदा नाही!
तू तुझ्या एका ही पोस्टमध्ये हे का केलं गेलं असावं ह्याचा विचार केलायस का? नाही!
आत्ता एकच सांग मित्रा, ह्यानं पायरसी रोखली जाईलच असं तू १००% म्हणू शकतोस का? नाही हा उपाय नव्हे. तू त्या बाईंना शोधून काढलयस का? तुझ्या विपूतल चित्र तुझं स्वतःच आहे का? त्याला पायरसी म्हणता येईल का?
तुझ्या विपूतही हेच लिहितोय तेही तिथून तू उडवशील म्हणून हे इथं.
कायद्याच्याबाबतीत ही मी बोलेनेच सवडीने.
आणि एक तूझं काय मत आहे ३ इडीयट्सची स्टोरी चेतनच्याच पुस्तकावरून ढापलेली आहे का? असं असेल तर तू काही करणार आहेस का ? मी मदतीला तयार आहे.

पुन्हा जर का फोनवरून बोलायच असेल तर रात्री ७:०० नंतर फोन कर.
दीपक, कृपया तू स्वतःचं हसं
दीपक,
कृपया तू स्वतःचं हसं करून घेऊ नकोस.
तुला परवानगी नसताना तू अजूनही हा परिच्छेद उडवलेला नाहीस. केवळ संपादीत केला आहेस.
तुला कदाचित मी किंवा इतर लोक काय बोलतात ते नीट कळत नसावं.
'या पुस्तकातील १० पानं अक्षरवार्तेत येणार आहेत, अकरावं पान तुझं..आणि अशीच पानं येत राहतील, तेव्हा तू काढ' यात न समजण्यासारखं काय आहे, ते मला ठाऊक नाही.
ते फोन नंबरचं वैयक्तिक फोन नंबरबद्दल होतं.. तुझी पोस्ट्म लोकांना कळत नाहीत, हे मला ठाऊक होतं.. फोनवर मी तुला काय सांगतोय हेही तुला कळलेलं दिसत नाही.
तुझ्या विपुत काय होतं, ती मी का उडवली, ते प्रशासकांना ठाऊक आहे.
एकतर तू धादांत खोटं लिहिलंस. तुला परवानगी नसताना ती आहे असं लिहिलंस. तुला नीट फोन करून तुला समजावलं, सुजाता देशमुखांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीनं समजावलं, तेही तू ऐकलेलं नाहीस. उलट वर काहीतरी विचित्र बडबड करतो आहेस.
तुझा हेतू चांगला होता हे कोणीही अमान्य केलेलं नाही. पण तू जे करतो आहेस ते प्रकाशकांना मान्य नाही.
2010/1/6 RAJHANS PRAKASHAN
Dear Deepak,
Thanks for your mail and for sending the relevant portion of our book you have used in the blog.
Your intentions were noble and hence we are not going to initiate any action against this particular case. So please do not worry.
We all shall fight together the evil of piracy and online malpractices.
Wish you a very happy, prosperous, safe and peaceful new year!
Best regards,
Sujata Deshmukh
(Editor: Rajhans Prakashan)
----- Original Message -----
From: deepak kulkarni
To: rajhans1@pn2.vsnl.net.in
Sent: Tuesday, January 05, 2010 6:23 PM
Subject: Fwd: माझा ब्लॉग
हाय सुजाता मॅडम, आज सकाळी आपलं बोलणं झालं त्या संदर्भात ही मेल करतोय. राजहंस प्रकाशनाच सानियाच प्रवास हे पुस्तक मी वाचलं त्यातला एक उतारा पान क्रं. १९ वरचा मी माझ्या ब्लॉगवर - http://aschkaahitri.blogspot.com/ लिहिला. अर्थात त्यासाठी सानियाची परवानगी घेतली पण प्रकाशक म्हणून तुमची ही परवानगी घ्यायला हवी होती ती घ्यायला मी चुकून विसरलो. [ I got excited while reading that stuff & in that process totally forgot to take your permission. अर्थात हेतू कितीही चांगला असला तरीही चूक ती चूकच त्याबद्दल मी तुमची माफी मागतो.] आपलं बोलण ही झालय ह्या सर्वावर तुम्ही परवानगीही दिलीत धन्यवाद. तरीही मेल लिहून तुमची लेखी परवानगी हवी आहे. म्हणून ही मेल.
त. टी. सोबत सानियाची मेल रेफरन्स म्हणून जोडत आहे.
पुन्हा एकदा आभार. कळावे, दीपक कुलकर्णी.
प्रशासक,
राजहंस प्रकाशनाने खालील ईमेल दीपकला पाठवला आहे. त्या अगोदरही परवानगी नाकारली गेली होती. परवानगीसाठी पाठवलेल्या पत्रात मायबोलीचा उल्लेख नव्हता.
Dear Mr. Deepak,
Please check my mail.
We, 'Rajhans Prakashan Pvt. Ltd.' have not granted you any permission to use excerpts from the books published by us.
I have categorically stated that we will not initiate action against this particular blog wherein you have given few pages from 'Prawas' by Sania.
you are hereby instructed to remove the matter from your personal blog and wherever you have replicated it with immediate effect.
Henceforth no portion from our any book shall be included either in your personal or any other blog.
Best regards,
Sujata Deshmukh
(Editor: Rajhans Prakashan Pvt. Ltd.)
प्रशासक, आपल्याला विनंती
प्रशासक,
आपल्याला विनंती करूनही आपण मायबोलीवरील अनधिकृत साहित्य हटवलं गेलेलं नाही. जुन्या मायबोलीवरील कविता, किंवा इथल्या परिच्छेदांसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नाही. उलट यामुळे चुकीचा संदेश जातो आहे.
तरी आवश्यक ती कार्यवाही लगेच करावी, ही विनंती.
अरेरे मित्रा, तू अजूनही हा
अरेरे मित्रा,
तू अजूनही हा परिच्छेद उडवलेला नाहीस. केवळ संपादीत केला आहेस>> तू पुस्तक वाचलयस का?
कशाला उगाचच खोटं बोलतोयस?
हा परिच्छेद पुस्तकात आहे का??? तू जरा नीट डोळे उघडे ठेवून पुस्तकातलं पान क्रमांक १९ वाच.
मला काय वाटत ओळखीची, नेहमीच्या वापरातली माणसं वापरातली?>>> हे माझं रसग्रहण / समीक्षा काय म्हणायचय ते म्हण. ही माझी वाक्य आहेत! बाबा रे सानियाचा उतारा नाहीये हा
प्लीज वेकअप
ही घे माझं ह्या मेलला उत्तर!
ही घे माझं ह्या मेलला उत्तर! अर्धवट मेल नको टाकूस
Dear Sujata ma'm,
First of all thanks for the another mail (in a formal salutation)
I've talked to the author - saniya on this issue. As per her understanding her permission was enough. [just for your reference.]
>>you have given few pages from 'Prawas' >> there are no pages!!! It is not even a half page ma'm.
This was not the reproduction of the book! Please understand.
Anyway the main issue is of piracy & I'm strongly against it. I support you in your cause & will be ready to help you in such a case.
If Rajjhans believes that this way we can eliminate the piracy then I'm fine with it.
I will remove the matter which IS FROM THE BOOK. ** I will not remove my words! & I assume no one can ask me to do so. I hope I'm very much clear to you.
Please go through the blog.
However question remains here how we can stop the piracy which is done intentionally! Through photocopying & other means.
In this case my intentions are very clear & I hope you will also agree to it.
>>Henceforth no portion from our any book shall be included either in your personal or any other blog. >> I will take due permission if I need to include the paragraph of any book of not only your publication but any other publication & then only will go ahead. (Hoping that you will permit)
I hope your intention is to restrict piracy only & not to restrict people who pay for the books who just want to enjoy, the write up of the authors who have the magic in their words.
I hope I'm clear throughout this mail. If at all any clarification is needed do revert ASAP.
Thanks once again. No hard feelings!
Waiting for your reply.
**P.S. My blog will look like this. please find attached the original paragraph & the changed one in the word file.
चिनुक्स, यात आणखी एक गोम आहे
चिनुक्स, यात आणखी एक गोम आहे असे वाटते. कायदा जरी भारतात असला साईट अमेरिकेत होस्ट आहे. ह्या साईटला अमेरिकेचे कायदे लागू होतात. कदाचित प्रशासक ह्याचाही विचार करत असतील. कुठलाही विचार पूर्ण केल्याशिवाय काहीही स्टेप त्यामुळेच घेतली नसेल.
इथे हे काही प्यारे न देउन (इथे म्हणजे असे ओपनली कुठल्याही बाफवर व ऑनलाईन मराटी साईटस वर ) अक्षरवार्तामध्ये निवडक वेचे देणे अन लगेच मायबोलीवर ते पुस्तक उपलब्ध करुन देणे हे म्हणजे आता अक्षरवार्ता सारख्या चांगल्या उपक्रमला व्यावसाईकतेचा संशय येईल असे वाटते. ऑफकोर्स प्रकाशन आणि माबोचे तसे व्यवहार होत असतील तर आनंद आहेच, पण ते निखळ वाचन व पुस्तक ओळख असा उपक्रम न होता जाणून बुजून विक्री साठी केलेली जाहिरात होईल. फार फार तर परिक्षणात्मक जाहिरात.
अक्षरवार्ता मला आवडतेच पण मी कायद्याचा विरोधाभास दाखवतोय. ह्यावर पळवाट म्हणून मुळ उतारा देऊन पुस्तकाचे दोन चार ओळीत थातूर मातूर परिक्षण केले तर ते कॉपिराईटचा भंग होत नाही, कारण परिक्षण कुणी करावे असा अजून तरी कायदा नाही.
ते फोन नंबरचं वैयक्तिक फोन
ते फोन नंबरचं वैयक्तिक फोन नंबरबद्दल होतं..>> वैयक्तिक ?? प्लीज एक्सप्लेन.
तुझी पोस्ट्म लोकांना कळत नाहीत, हे मला ठाऊक होतं..>> हे लोकांनी सांगायला तुला नेमलय का बाबा?
एडीट करायचच आहे तर पूर्ण आणि नीट एडीट कर.
केदार, इथे मूळ मुद्दा परवानगी
केदार,
इथे मूळ मुद्दा परवानगी न घेता पुस्तकातील उतारे / कविता देणे, हा आहे.
'पुस्तकाचा भाग पुनःप्रकाशित करताना लेखक व प्रकाशक या दोघांचीही परवानगी घ्या', असं पुस्तकावर लिहिलेलं आहे. तेव्हा या दोघांचीही परवानगी घ्यायलाच हवी. आज मी विंदा, अरुणा ढेरे, सुधीर मोघे, मिलिंद बोकील यांच्याशीही याबाबत बोललो. त्यांचं साहित्य अशाप्रकारे पुनःप्रकाशित करताना त्यांची व प्रकाशकांची परवानगी आवश्यकच आहे, हे त्यांनाही मान्य आहेच.
प्रकाशक व मायबोली यांतील आर्थिक व्यवहारांची माहिती तुला प्रशासकच देतील, पण या उपक्रमाची सुरुवात पुस्तकाची ओळख व्हावी, या हेतूनेच केली गेली आहे. प्रकाशक व लेखक या दोघांचीही याला परवानगी असतेच.
दीपक,
आज दुपारी तू उतारे टाकले होतेस, व प्रकाशकांची परवानगी असल्याचंही लिहिलं होतंस. वर 'हे लिहून वाद निर्माण करण्याचा उद्देश नाही', ही मखलाशीही होती. ते तू नंतरच संपादीत केलं आहे.
असो.
वरची चर्चा वाचली. मला अजूनही
वरची चर्चा वाचली. मला अजूनही 'प्रकाशनाधिकारा'चा (publishing rights) कायदा त्यातून समजलेला नाही. प्रताधिकाराच्या कायद्याचा दुवा मी दिला होता, आणि एक परिच्छेद देऊन त्याचा भंग होत नाही असाच अर्थ मला अजूनही समजतो. प्रकाशनाधिकार हे त्याहून काही निराळे असतील तर तो कायदा कुठे बघायला मिळेल? वर आली आहेत ती प्रकाशनाची / त्यांच्या प्रतिनिधींची मतं. कायदा काय सांगतो हे कोणीतरी ससंदर्भ स्पष्ट केलं तर बरं होईल.
दुसरं, चित्रपटांच्या पायरसीबाबत झालेल्या चर्चेमधे मांडला गेलेला मुद्दा मी इथेही आणू इच्छिते. प्रकाशक या बाबत फक्त कायद्याचा बडगा दाखवणार, की हे का होतं याचा विचार करून उभयपक्षी फायद्याचा तोडगा काढण्याइतकं तारतम्य त्यांच्यात आहे?
उदा. ते पुस्तकांची अधिकृत ई-आवृत्ती काढू शकतात आणि ती रीतसर विक्रीला ठेवू शकतात. मायबोलीवरची कवितांची पानं उडवण्यापेक्षा प्रशासनाने ती वाचायला भाडं / वर्गणी ठेवावी आणि त्याचा रास्त भाग प्रकाशकांना द्यावा - ज्यांना खरंच आवड आहे ते पैसे भरूनही वाचतीलच की. यात सहज उपलब्धी (easy access) हा भाग किती महत्त्चाचा होतो हे प्रकाशकांनी समजून घ्यायला अवघड नसावं.
(जाता जाता : प्रकाशकांच्या हक्कांबाबत इतके जागरूक असणारे लोक ऑनलाईन पायरेटेड चित्रपट का बघतात आणि त्यायोगे चित्रकर्मींचं हित पायदळी का तुडवतात असाही एक प्रश्न मनात डोकावून गेला. पण त्याचा या चर्चेशी संबंध नाही.)
उतारे ????????? अरे बाबा तू
उतारे ????????? अरे बाबा तू उगाचच नीट न वाचता बोलतोयस एक उतारा आहे!
<<ते फोन नंबरचं वैयक्तिक फोन
<<ते फोन नंबरचं वैयक्तिक फोन नंबरबद्दल होतं..>> वैयक्तिक ?? प्लीज एक्सप्लेन. >>
तुला सुजाताताईंना त्यांचे नियम समजावून सांगितले, परवानगी का घ्यायला हवी ते सांगितलं. हे सगळं तू या बीबीवर लिही म्हणजे बी वगैरे परत त्याच त्या मुद्द्यासाठी सुजाताताईंना फोन करणार नाहीत, व तुस्याकडे असला तरी वैयक्तिक नंबर देऊ नकोस, हे सगळं तू ऐकलं नाहीस का? उगीच काय विषयाला फाटे फोडतो आहेस?
तू वर परवानगीबद्दल स्वतःच लिहिलेलंही नाकारतो आहेस?
अडमाची सवय लावून घ्यायला हवी स्क्रीन्शॉट घ्यायची.
आज मी विंदा, अरुणा ढेरे,
आज मी विंदा, अरुणा ढेरे, सुधीर मोघे, मिलिंद बोकील यांच्याशीही याबाबत बोललो. त्यांचं साहित्य अशाप्रकारे पुनःप्रकाशित करताना त्यांची व प्रकाशकांची परवानगी आवश्यकच आहे, हे त्यांनाही मान्य आहेच. >>>
सॉरी चिनुक्स, हे व्यक्ती आहेत कायदा नाहीत. त्यांना बोलून काही फायदा नाही. स्वाती म्हणाल्याप्रमाने कायदा काय सांगतो हेच महत्वाचे.
स्वातीच्या पोस्टविषयी - गेली
स्वातीच्या पोस्टविषयी -
गेली अनेक वर्षं मराठी प्रकाशनव्यवसाय विश्वासावर चालत असे. कोणताही करार लेखक - प्रकाशक यांच्यात होत नसे. इंटरनेटबद्दल माहितीही अनेकांना नव्हती / नाही.
आता मात्र प्रकाशनाचे अधिकार प्रकाशक राखून ठेवतात. तसा कायदा केला जातो. ज्या पुस्तकांबाबत असा करार केला गेला असेल, त्या पुस्तकांवर तसा उल्लेख असतो.
बाकी, मायबोलीवर कविता ठेवताना मुळात कवी, प्रकाशक यांची परवानगी घेतलेली नाही. त्यासाठी पैसे आकारून प्रकाशकांना मानधन देण्याचा अधिकार मायबोलीला कोणी दिला?
जाता जाता केलेल्या वैयक्तिक टिप्पणीविषयी - मी ऑनलाइन चित्रपट आयुष्यात पाहिलेले दोन. 'पा' व 'थ्री इडियट्स'. ते का पाहिले हे मायबोलीवर अनेकांना माहिती आहे.
<सॉरी चिनुक्स, हे व्यक्ती
<सॉरी चिनुक्स, हे व्यक्ती आहेत कायदा नाहीत. त्यांना बोलून काही फायदा नाही. स्वाती म्हणाल्याप्रमाने कायदा काय सांगतो हेच महत्वाचे.>
विंदा, अरुणा ढेरे, सुधीर मोघे यांच्या तरी परवानग्या मायबोलीकडे आहेत का? प्रकाशकांच्या परवानगीचं नंतर पाहू.
>> इंटरनेटबद्दल माहितीही
>> इंटरनेटबद्दल माहितीही अनेकांना नव्हती / नाही.
>> बाकी, मायबोलीवर कविता ठेवताना मुळात कवी, प्रकाशक यांची परवानगी घेतलेली नाही. त्यासाठी पैसे आकारून प्रकाशकांना मानधन देण्याचा अधिकार मायबोलीला कोणी दिला?
आता द्यावा. प्रकाशकांनी! कालपर्यंत नव्हता दिला हे काही कारण होवू शकत नाही!
>> ते का पाहिले हे मायबोलीवर अनेकांना माहिती आहे.
बरं, मग? त्यामुळे ते योग्य ठरतं का? की ते तसे बघायला 'अनेक मायबोलीकरांची' परवानगी पुरेशी असते?
वैयक्तिक नंबर कुठे आहे?
वैयक्तिक नंबर कुठे आहे? राजहंसच्या पुस्तकावरचा नंबर आहे तो जा जरा बघ परत एकदा. आता राजहंसच पुस्तक असलेल्या कुणालाही हा नंबर सापडू शकत नाही काय? त्यासाठी तू जर फोन न करता स्पष्ट इथंच लिहिल असतस की दीपक बोलला आहे संपादिकेशी तर तो इथं लिहिल सार... इ. इ.
मला हे कळत नाहीये की तू फोन का केलेस दरवेळी मला??? बाकी कुणी बोलून त्यांना प्रश्न विचारून त्रास दिला असता पण मी न सांगून कुणालाही तो नंबर सापडला नसता का???? मी सांगून किंवा तू सांगून लोक गप्प बसले असते का? बीला जर आणि काही वेगळं विचारावस वाटलं असतं अशी शक्यता सुद्धा बांधता येणार नाही का????
तू सांगावस आणि बीने (प्रातिनिधीक) गप्प बसावं असा नियम आहे काय?
परवानगीच म्हणशील तर ते मी स्वच्छ स्पष्ट शब्दात आधीही लिहिलेलं आहे.
आय होप आता तू काही नवीन उकरून काढणार नाहीस! अरे बाबा खूप ठिकाणी पायरसी होत्ये ती थांबवूया का?
काय म्हणतत्त? जमल्यास माझ्याही प्रश्नांचे उत्तरे दे.
नाही ना.. नाहीच योग्य ठरत.
नाही ना.. नाहीच योग्य ठरत.
<आता द्यावा. प्रकाशकांनी! कालपर्यंत नव्हता दिला हे काही कारण होवू शकत नाही!>
मायबोलीवर कविता आहेत ही प्रकाशकांची चूक नाही. आणि प्रकाशकांनी कोणता हक्क कोणाला द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे.
इथे मुद्दा मायबोलीवर प्रकाशक व लेखकांच्या परवानगीशिवाय असलेल्या साहित्याची चर्चा सुरू आहे.प्रकाशकांनी काय करायला हवं हे त्यांना सांगण्यासाठी दुसरा बाफ उघडता येईल.
तू गल्लत करत आहेस. कुणी
तू गल्लत करत आहेस. कुणी (मायबोली) आधी काय केले हे महत्वाचे नाही, काय असायला पाहिजे हे महत्वाचे आहे व त्यावर चर्चा चालू आहे असे वाटते. त्यामुळे व्यक्ती इथे आल्याच कश्या? असो.
>> इथे मुद्दा मायबोलीवर
>> इथे मुद्दा मायबोलीवर प्रकाशक व लेखकांच्या परवानगीशिवाय असलेल्या साहित्याची चर्चा सुरू आहे.प्रकाशकांनी काय करायला हवं हे त्यांना सांगण्यासाठी दुसरा बाफ उघडता येईल.
चांगली पळवाट आहे. असो. प्रकाशकांची वा प्रतिनिधींची प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची इच्छाच नसेल तर वाद घालण्यात काय अर्थ!
<तू गल्लत करत आहेस. कुणी
<तू गल्लत करत आहेस. कुणी (मायबोली) आधी काय केले हे महत्वाचे नाही, काय असायला पाहिजे हे महत्वाचे आहे व त्यावर चर्चा चालू आहे असे वाटते. त्यामुळे व्यक्ती इथे आल्याच कश्या?>
मायबोलीवर या कविता अजूनही आहेत. त्यामुळे मी गल्लत करतो आहे, असं वाटत नाही.
व्यक्ती आल्या कारण कवितांचे अधिकार त्यांच्याकडे आहेत.
उदा. विंदांच्या काही कवितांचे अधिकार त्यांच्याकडे, तर काही कवितांचे अधिकार पॉप्युलर, रामदास भटकळ व मौजेकडे आहेत. आता विंदांच्या कविता मायबोलीवर प्रसिद्ध करताना यांच्यापैकी कोणाचीच परवानगी घेतली गेलेली नाही.
*
आणि अजून एक महत्त्वाचं. मायबोलीप्रमाणेच आज अनेक webpagesवर असे परिच्छेद, कविता आहेत. इथे केवळ मायबोलीचा प्रश्न नाही.
पळवाट कसली यात? प्रकाशकांना
पळवाट कसली यात? प्रकाशकांना त्यांच्या छापील पुस्तकांचे व्यवहार सांभाळतानाच वैताग येतो. त्यांचा फायदा होत असेल तर आनंदच होईल त्यांना.
इथे संपूर्ण चर्चा ही परवानगीबद्दल आहे.
आणि मूळ प्रश्न कसला? इथे वर अनेकांनी लिहिलं आहे की त्यांचा हेतू पुस्तकाची जाहिरात करणं आहे जेणेकरून अधिकाधिक लोकं ती वाचतील.
जाहिरात होतही असेल. पण असे एकेक परिच्छेद, एकेक कविता येऊन थांबायचं कधी हे कळणार कसं?
गेल्या एकदोन वर्षांतल्या या घडामोडी आहेत. डॉ. कलामांचं मराठीतलं आत्मचरित्र आंतरजालावर आल्यावर प्रकाशकांना जाग आली. पुस्तक डॉ. कलामांचं असल्यानं लगेच कार्यवाहीही झाली. पण अनिल अवचटांचे लेख जेव्हा आंतरजालावर येतात तेव्हा काय करायचं?
प्रकाशकांच्या नवीन करारात या शक्यता ध्यानात घेऊन पुनःप्रकाशनाचे अधिकार त्यांनी राखून ठेवलेले असतात. जेणेकरून त्यांच्या खपावर परिणाम होणार नाही.
प्रकाशक इन्टरनेट बद्दल
प्रकाशक इन्टरनेट बद्दल अनभिज्ञ होते / आहेत ही मायबोलीची चूक आहे का वाचकांची?
प्रकाशकांनी यातून उभयपक्षी फायद्याचा तोडगा काढण्यापेक्षा केवळ नन्नाचा पाढाच वाचायचा ठरवला असेल तर आनंद आहे!
<प्रकाशक इन्टरनेट बद्दल
<प्रकाशक इन्टरनेट बद्दल अनभिज्ञ होते / आहेत ही मायबोलीची चूक आहे का वाचकांची?>
एवढं विनोदी वाक्य मी कधी वाचलं नव्हतं.
इंटरनेटाचा वापर नसल्यानं त्यांना मायबोलीवरील व इतर ठिकाणी होत असलेला प्रताधिकाराचा भंग कळला नाही, व त्यामुळे त्यांनी वेळीच पावलं उचलली नाहीत, हे खरं. पण यात मायबोलीची अजिबातच चूक नाही? प्रकाशकांचे अधिकार असू देत, कवींची परवानगी घ्यायला लागते, हे कोणालाच माहिती नव्हतं?
>> एवढं विनोदी वाक्य मी कधी
>> एवढं विनोदी वाक्य मी कधी वाचलं नव्हतं.
अशा व्यक्तीच्या वाचनाबद्दल मी केवळ कीव करू शकते.
स्वाती, इथे तू वैयक्तिक
स्वाती,
इथे तू वैयक्तिक टिप्पणी करू नयेस, ही विनंती. उपयोग होणार नाही, तरीही सांगतोय.
Pages