माझ्या आवडीचे पुस्तक-परिच्छेद

Submitted by हर्ट on 4 January, 2010 - 05:34

जेंव्हा नवीन असं काही वाचायला जवळं नसतं किंवा नवीन असे वाचताना आकलन व्हायला हवी असलेली मनाची स्थिती नसते, तेंव्हा संग्रही असलेलं आणि आधीच वाचलेलं पुस्तक मी घेतो आणि त्या पुस्तकांच कुठलं पान मला निदान विरंगुळा तरी देईल हे मला इतकं छान माहिती असतं की बरेचदा ते ते पान.. त्या त्या पानावरील ते ते परिच्छेद मुखपाठ व्हायला लागतात.

पुष्कळशी पुस्तके ही पहिल्या पानापासून अगदी अखेरच्या पानापर्यंत वाचनिय नसतात पण अधून-मधून लेखकाला मनापासून स्फुरलेलं काहीतरी असतं आणि तो ते चांगलं लिहून जातो.

हा बा.फ. मला पाचेक वर्षांपुर्वीच सुरु करायचा होता. तो मी आज सुरु करत आहे. कारण हल्ली मायबोलीकर हे अतिशय जिव्हाळ्याने पुस्तकांविषयी बोलतात. वाचकांची संख्या कितीतरी पटीने इथे वाढली आहे. आपल्या अनमोल वेळेतील थोडा वेळ आपल्या आवडीचे परिच्छेद लिहिण्याकरिता ते आनंदाने देतील. या बा.फ. मागचा माझा उद्देश अगदी सरळ साधा आहे. जे मला/तुम्हाला कधी गवसलं नाही ते यातून गवसेल. पुस्तकाची न्यारी चव कळेल जी यापुर्वी मी/तुम्ही कधी घेतली नाही. नेट वर मला/तुम्हाला मराठी पुस्तकातील काही उतारे सहज प्राप्त होऊ शकतील.

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तकाचे मूळ उतारे जसेच्या तसे दिले गेले आहेत>>?? खरय का हे? >> हे खरं नाहीये हे तुला ही माहिती आहे. १८७ शब्दांचा मजकूर मी लिहिला आहे!

कुलदीपा,

तुझ्या आधीही कविता महाजनांच्या उतार्‍याचं पोस्ट होतं. आणि तुझा उतारा (तो कितीही शब्दांचा असू दे) मूळ पुस्तकातलाच होता. उगीच इथे शब्दांचा खेळ नकोय.

कुलदीप,

तुझा उतारा १८७ शब्दांचा होता ना? परवानगी केवळ ५० शब्दांचीच असते.

चिनूक्स
मला काही प्रश्न आहेत त्याला उत्तर देशील का कृपया?
१. प्रकाशकांची परवानगी कशी काढतात (संपर्क कसा साधतात) ? पत्राने, ई मेल ने, फोन ने वगैरे वगैरे. माझी कुठल्याही प्रकाशकाशी ओळख नाही. असं असताना माझ्या एका पत्राला/ विनंतीला माजगावकरांचे/ भागवतांचे वगैरे ऑफीस कच-याची पेटी दाखवेल की उत्तर पाठवेल असा प्रश्न एक सामान्य वाचक म्हणुन मला आहे.
२००० वाचकवर्गाच्या एका संकेतस्थळावर मी एक उतारा 'उद्धृत' करायला मला कुठलाही प्रकाशक एक सामान्य वाचक म्हणुन परवानगी देईल का ?
२)लेखकाची, प्रकाशकाची आणखी कोणाकोणाची परवानगी काढावी लागते ?
३) माझ्या घरी खाजगी मैफलीत मी समजा एका (विकत घेतलेल्या)कादंबरीचे वाचन केले (परवानगी न काढता) तो कायदेभंग आहे का?
उदा-मी शेकड्यानी पुस्तकं विकत घेऊन ती देते. लोकांनी तुझी गीफ्ट नको, पुस्तकं आवर म्हणेपर्यंत पुस्तकं देणारी व्यक्ति आहे. त्याची भरपूर कुचेष्टा होते. अधिकाधिक लोकांना वाचनासाठी उद्युक्त करावे ही तळमळ आहे. अशा वेळेस आळशी लोकांना उतारे वाचून दाखवून, मग त्यांना पुस्तक देणे हा एक बरा उपाय वाटतो. लहान मुलांना जमवून गोष्टी वाचून दाखवणे वगैरे.. प्रत्येक वेळेस लेखकाची, प्रकाशकांची परवानगी घ्यावी लागते का?.
मेहतांची पुस्तकं कायम ३००/- रुपयांच्या वर असतात, ती वाचायला अक्षरशः लोकांना उद्युक्त करावे लागते. ४०० रुपये किंमत पाहून शिवाय क्लिष्ट भाषेत म्हणुन मी किशोरीताईंचे पुस्तक वाचायला धजावले नसते. पण तू (परवानगी काढून) अक्षरधारा मध्ये समाविष्ट केल्यामुळे ते माझ्या यादित गेले आहे.
शाळा कॉलेजातील,गावागावातील कशाला, जगातील सर्व बुक क्लब्स हेच करतात . सामुहिक अभ्यास, पुस्तक वाचन, चर्चा हे सर्व कायदेभंगात समाविष्ट व्हावे का? माजगावकरांकडे असे गावोगावचे, शाळाशाळांचे अर्ज गेले तर त्यांची हा influx handle करायची तयारी आहे का ?
४. वर्तमानपत्रात विंदांच्या ज्ञानपीठानिमीत्त सुमाताईंच्या रास मधील काही पानं छापुन आली होती. त्याचे अभिवाचन मी मराठी मंडळात केले हा कायदेभंग आहे का? वर्तमानपत्र मी विकत घेतले होते. त्यांनी प्रकाशकांची परवानगी काढली (असावी.)

रैना,

१. प्रकाशकांशी संपर्क तू कशीही काढू शकतेस. तुझ्या पत्राला कचरापेटी दाखवली जाणार नाही, कारण हे प्रकाशक तसे सुसंस्कृत आहेत, व हक्कांबाबत जागरूकही. Happy तू जर व्यावसायिक हेतूनं वापर करणार नसशील, व प्रकाशकांच्या व्यावसायिक हितसंबंधांना बाधा येणार नसेल, तर परवानगी जरूर मिळेल.

इथे एक उदाहरण देतो. विंदांच्या काही कवितांचं ब्रेलीकरण आम्हांला करायचं होतं. हक्क विंदांकडे असले, व आम्ही व्यावसायिक उपयोग करणार नसलो, तरी त्यांनी आम्हांला भटकळांकडून लेखी परवानगी घ्यायला लावली होती.

२. परवानगी लेखकाची व प्रकाशकाची घ्यावी लागते. गेल्या दोन वर्षांपासून तसं त्यांच्या पुस्तकांवर नमुद केलेलं असतं.

३. तू जर ते वाचन तिकिट लावून करणार असशील, तर कायदेभंग आहे. देणगी प्रवेशिका असल्यासही परवानगी लागेल.

इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की वाचन आणि पुनःप्रकाशन या वेगळ्या गोष्टी आहेत. वाचनाचा मुद्दा इथे का आला, हे मला कळलेलं नाही.
कमलेश वालावलकरच्या 'बाकी शून्य'चं अभिवाचन व नंतर नाट्यरुपांतर फर्गसनच्या मुलांनी त्याची परवानगी न घेता केलं. इथे परवानगी आवश्यक कारण अभिवाचन असलं तरी त्याला तिकिट आहे.

४. वर्तमानपत्रं सहसा परवानगी घेतात. मध्यंतरी लोकप्रभेत असे वेचक उतारे प्रसिद्ध केले जात. उतारा कितीही लहान असला तरी संबंधित प्रकाशकाकडून परवानगी घेतली जात असे.

आभारी आहे चिनूक्स.
तितकसं पटलेलं नाही, पण निदान काय करणं अपेक्षीत आहे हे तुझ्यामुळे कळलं.
आता प्रकाशकांचं काही खरं नाही. संपर्क साधुनच पाहते. Happy

वाचन आणि पुनःप्रकाशन या वेगळ्या गोष्टी आहेत. वाचनाचा मुद्दा इथे का आला, हे मला कळलेलं नाही.>> कारण हा बी ने काढलेला बाफ म्हणजे माहितीजालावरील अभिवाचन म्हणायला हरकत नाही.
हेतू तोच आहे. आपण वाचलेलं वाटुन घेणे, त्यातील सौंदर्यस्थानांचा सामुहिक आनंद घेणे.
मला reproduce the content verbally or in writing असं म्हणायचं होतं, म्हणून वाचन आणि पुनःप्रकाशन.

नाही. हे पुस्तकाच्या भागाचं पुनःप्रकाशन आहे. प्रकाशनाचे व पुनःप्रकाशनाचे सर्व अधिकार हे प्रकाशकाकडे राखीव असू शकतात. पॉप्युलर, मेहता, राजहंस या प्रकाशकांकडे तसे अधिकार असतात. यामुळे लेखनाचा स्वामित्वहक्क जरी लेखकाकडे असला तरी प्रकाशनाचे सर्व हक्क प्रकाशकाकडे असतात. त्यामुळे कोणत्याही स्वरुपात प्रकाशकाच्या परवानगीशिवाय पुनःप्रकाशन करणं हा गुन्हा ठरतो.

पुस्तकाची आवृत्ती संपली व जर लेखकाला दुसरा प्रकाशक गाठायचा असेल, तर हे प्रकाशनाचे हक्कही दुसर्‍या प्रकाशकाकडे जातात.

आणि कोणाला पटो वा न पटो, प्रकाशकांचं हे धोरण आहे, जे त्यांनी त्यांच्या पुस्तकांवर स्पष्टपणे लिहिलेलं आहे.
शिवाय इथे प्रकाशकांना खलनायक का केलं जातं आहे, तेही कळलेलं नाही. अनेक पुस्तकांची पानं त्यांच्या परवानगीशिवाय ऑनलाइन आली आहेत. मायबोलीवर तर कवितासुद्धा आहेत. उतार्‍यांमुळे त्यांची जाहिरात होत असेल, हे मान्य केलं तरी मग मर्यादा ठरवायची कोणी? आणि पुस्तकाचा कुठला परिच्छेद दिला जातो आहे, तेही महत्त्वाचं नाही का? प्रकाशकांनी परवानगी नाकारलेली नाही. केवळ ती घ्यावी असा आग्रह आहे.

चिन्मय,
थॅन्कस वन्स अगेन Happy मी ही बोललो आताच राजहंसच्या संपादिकेशी. बादवे दीपक म्हण चालेल.

संपर्क साधुनच पाहते.>>
रैना, मला वाटतं इन फॅक्ट असा अनुभव आहे की जर आपण फोन / मेल केला ना प्रकाशनगृहात तर त्याचा रिप्लाय येतो लगेचच. Happy

दिपक,

एक विनंती आहे तुला. मला सुजाताबाईंचा दुरध्वनी क्रमांक व/वा मेल पत्ता हवा आहे. मीही इथून त्यांना संपर्क साधू पाहतो आहे.

सुजाताबाईंचा दुरध्वनी क्रमांक व/वा मेल पत्ता>> असा त्यांचा वयैक्तिक दुरध्वनी क्रमांक व/वा मेल नाहीये रे...

राजहंसच्या बोर्ड लाईनवर कॉल कर तो ट्रान्सफर होईल संपादिकेंकडे.

राजहंसची वेब साईट शोध किंवा हे घे

दुरध्वनी क्रमांक = २४४७३४५९

इमेल = rajhans1@pn2.vsnl.net.in

मला असं वाटतं इथे काही गोष्टी स्पष्ट होण्याची गरज आहे.
१. इंटरनेटवर जेव्हा आपण एखाद्या पुस्तकातला मजकूर संबंधितांच्या परवानगी खेरीज छापतो तेव्हा ते लोक आपल्याविरुध्द कारवाई करु शकतात, कारण उघड आहे,त्या साहित्याच्या प्रिंटस निघू शकतात तसेच ते साहित्य इतर कोणाच्याही नावावर केले जाण्याची दाट शक्यता असते. हा प्रकार आपण कित्येकदा मायबोलीवर अनुभवलेला आहे. दुसर्‍याच कुणाचे साहित्य आपले म्हणून इथे देणे किंवा आपल्याला मूळ लेखक माहित असताना दुसर्‍याच कुणाच्या नावे ते मेलमधून येणे.
२. प्रिंटसच्याबाबतीत लोक झेरॉक्सचा मुद्दा उपस्थित करु शकतात, पण हे लक्षात घ्या तिथे ज्याची झेरॉक्स असते त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि इथे कदाचित मायबोली प्रशासनावर. त्यामुळे झेरॉक्स काढणे ही वैयक्तिक जबाबदारी ठरते पण इथे प्रकाशित होणार्‍या साहित्यास प्रशासन जबाबदार ठरेल.
३. वर म्हटल्याप्रमाणे फक्त उतारे जरी लिहिले तरी त्यावर मर्यादा कशी घालणार? आज मला १ पानभर उतारा आवडला, उद्या मी १० पाने लिहीन. परवा पुस्तकच! त्याच्या प्रिंटस केव्हाही मूळ किंमतीपेक्षा स्वस्त मिळणार आणि लोक त्या घेणार. पुस्तक २० पानाचेही असू शकते त्यामुळे इथे आख्खे पुस्तक लिहिले जाणे अगदीच अशक्य नाही. उदा. "मी माझा" यातल्या १० चारोळ्या जरी घेतल्या तरी ५० च्यावर शब्दमर्यादा जाणार नाही. आज मी १० टाकल्या , उद्या दुसरे कुणी पुढच्या १०, तिसरे कुणी उरलेल्या असे संपूर्ण पुस्तक छापले जाईल.(इथे कुणीही असे करणार नाही हे माहित असले तरी नियमांच्या गैरवापराचाच विचार आधी करावा लागतो. Happy )
याला कुठेतरी अंकुश असावा म्हणून प्रकाशकांची परवानगी घेऊनच इथे साहित्य छापणे उचित ठरेल. कायद्याने जरी नक्की माहित नसले तरी नैतिक जबाबदारी म्हणून! Happy

आशू, उतारा म्हणजे पानेच्या पाने किंवा अख्खे पुस्तक नव्हे. या बीबीत उल्लेख झालेला उतारा या शब्दाचा अर्थ काही वाक्यांचा (किंवा काही शब्दसंख्येची मर्यादा गृहित धरून) परिच्छेद. तेही फक्त आणि फक्त- १) आवडला म्हणून इतरांशी शेअर करावेसे वाटल्यामुळे; २) तो उतारा / परिच्छेद / वाक्ये वाचून लोक ते पुस्तक घ्यायला उद्युक्त होतील- या हेतूंनी. शिवाय उतारा म्हणजे कविता, कडवे, चारोळी हेही अर्थ बीला अभिप्रेत नसावेत.

प्रकाशकांच्या धोरणावरही बरेचसे अवलंबून आहे. वरती रैना म्हणते आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातून, जगभरातून परवानग्या मागणारी हजारो पत्रे / ईमेल्स प्रकाशनांना / लेखकांना गेली, तर त्यांना उत्तरे देण्याची व्यवस्था होईल का, हाही प्रश्न आहेच. ज्या प्रकाशनांची स्वतंत्र प्रमोशन व्यवस्था नाही, किंवा प्रकाशक / लेखक फारसे प्रसिद्ध नसल्यामुळे जाहिराती परवडत नाहीत- त्यांना यामुळे हातभारच लागणार नाही का? आणि जी प्रकाशने / लेखक / पुस्तके बर्‍यापैकी प्रसिद्धी पावलेली आहेत, त्यांच्या पायरेटेड आवृत्त्या फुटपाथवर राजरोस येत असतात, त्यापेक्षा हे कितीतरी बरे नाही नाही का?

संबंध आहे की नाही ते माहिती नाही, पण माझ्या बाबतीत घडलेले एक उदाहरण सांगतो. मागे 'वाघ सिंह माझे सखे-सोबती' या जगप्रसिद्ध सर्कसपटू दामू धोत्रे यांच्या पुस्तकाची चर्चा झालेली. बाजारात मिळाले नाही. प्रकाशकांकडेही त्याची कॉपी शिल्लक नव्हती, तसेच नव्याने छापण्याचा त्यांचा विचारही नव्हता. धोत्रेंच्या घरी जाऊन विचारले, तिथेही हे पुस्तक मिळाले नाही. शेवटी एका शाळेच्या लायब्ररीत अत्यंत जीर्णावस्थेत हे पुस्तक सापडले. 'माझ्या काही मित्रांना वाचायचे आहे, पण उपलब्ध नाही म्हणून झेरॉक्स काढल्या तर चालतील का?' असे मी प्रकाशनाला तसेच महेंद्र धोत्रे यांना विचारले, तेव्हा त्यांनी होकार दिला. (लेखी परवानगी माझ्याकडे नाही. तसेच किती प्रती काढणार, याचीही चर्चा झाली नाही. शिवाय हे तुम्ही पुन्हा छापणार नसाल, तर जतन करण्याच्या दृष्टीने एखाद्या ऑनलाईन फोरमवर टाकू का, हेही अजून विचारले नाही).

प्रताधिकार कायद्याचा मीही अभ्यास केलेला नाही, पण प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत कशी बसवणार, आणि त्याला काही 'रीझनेबल' पर्याय आहे का- हा प्रश्न केदारसारखाच मलाही पडलेला. एखादे पुस्तक विकत घेतले, तर ते जास्तीत जास्त किती लोक वाचू शकतात याचे काहीही बंधन नाही, हे तर साहजिकच. रोजच्या ईमेल-फॉर्वर्ड्स मधून आणि छायांकित प्रतींच्या माध्यमातून कुठे ना कुठे कळत-नकळत सारेच कायदा मोडत असतील. त्या तुलनेत, काहीतरी चांगल्या कारणासाठी उतारे (काही वाक्ये/शब्द) उद्धृत करणे 'बरे'च म्हणावे.

समीक्षे/परीक्षणांसाठी असे उतारे उद्धृत केले तर काय, शिवाय ती समीक्षा पुस्तकाला मारक आहे की तारक- हे प्रकाशक कसे ठरवतात? (शिवाय समीक्षा कशी आहे, यावरून प्रकाशकांनी त्यांचे धोरण ठरविल्यास ते बरोबर की चूक?) याबाबत कुणाला माहिती असल्यास कृपया सांगावी. Happy

आशू, उतारा म्हणजे पानेच्या पाने किंवा अख्खे पुस्तक नव्हे.
>>
साजिर्‍या, मी वर लिहिले आहे की
<< वर म्हटल्याप्रमाणे फक्त उतारे जरी लिहिले तरी त्यावर मर्यादा कशी घालणार<<
हो, कारण मला समजा 'मृत्युंजय' ,'स्वामी','पानिपत', 'शिकस्त' मधले काही उतारे इथे लिहावेसे वाटले तर ते नक्कीच त्या पुस्तकाची पानेच्या पाने आहेत. मर्यादा कशी घालणार म्हणजे, "मला एखाद्या पुस्तकातला किती भाग आवडावा व त्यातला इथे किती मी इथे लिहावा" हे कसे बरे ठरवणार?
शिवाय मी हेही म्ह्टलंय की
<<इथे कुणीही असे करणार नाही हे माहित असले तरी नियमांच्या गैरवापराचाच विचार आधी करावा लागतो.>>
शिवाय उतारा म्हणजे कविता, कडवे, चारोळी हेही अर्थ बीला अभिप्रेत नसावेत.
>> मुद्दा बी चूक की बरोबर हा नाहीचे. त्याचा हेतू स्तुत्य आहे , त्याचे कौतुक आहे हे माझ्या इथल्याच कालच्या पोस्टमधे मी लिहीले आहे. उतारे, कविता कडवे हे अर्थ त्याला अभिप्रेत नसले तरी मूळ प्रकाशन अधिकाराच्या अनुषंगाने उदाहरणार्थ येऊ शकतात. 'मला आवडलेले सुविचार' असा धागा सुरु करुन एकेक करत एखाद्या पुस्तकातले सगळेच सुविचार इथे छापले गेले तर? प्रश्न क्वांटिटी(शब्दसंख्या)चा नसून हक्काचा आहे. आणि जेव्हा प्रश्न अधिकाराचा येतो तेव्हा आपल्याला नियम पडताळावेच लागतात.
शेवटी एका शाळेच्या लायब्ररीत अत्यंत जीर्णावस्थेत हे पुस्तक सापडले. 'माझ्या काही मित्रांना वाचायचे आहे, पण उपलब्ध नाही म्हणून झेरॉक्स काढल्या तर चालतील का?' असे मी प्रकाशनाला तसेच महेंद्र धोत्रे यांना विचारले, तेव्हा त्यांनी होकार दिला.>>
बास! हेच तर हवे आहे.. फक्त त्यांची परवानगी घ्या. म्हणजे आपल्या आनंदापायी दुसरेच कुणी गोत्यात येणार नाही.
रोजच्या ईमेल-फॉर्वर्ड्स मधून आणि छायांकित प्रतींच्या माध्यमातून कुठे ना कुठे कळत-नकळत सारेच कायदा मोडत असतील. त्या तुलनेत, काहीतरी चांगल्या कारणासाठी उतारे (काही वाक्ये/शब्द) उद्धृत करणे 'बरे'च म्हणावे.
>> आजवर त्यावर कारवाई झाली नाही म्हणजे उद्या होणार नाही असे नाही. शिवाय ईमेल-फॉर्वर्ड्स मधून आणि छायांकित प्रतींच्या माध्यमात त्याचा मूळ उगम कोण हे ठरवता येणार नाही. पण, इथे मायबोली हा अधिकृत फोरम असल्याने प्रशासनाला जबाबदार ठरवलेच जाणार नाही असे नाही. शिवाय आपण स्वतःची खात्री देऊ शकतो की हे मी चांगल्याच कारणासाठी करेन पण मी वर "मी माझा" चे उदाहरण दिल्याप्रमाणे होणारच नाही याची खात्री देऊ शकतो का? म्हणूनच नियमाच्या गैरवापराचा विचार आधी करावा असं मी लिहिले आहे. इथे उतारे लिहावे की नाही या आधी प्रश्न हा आहे की, आपण हे जे करतोय त्याविरुध्द कायदेशीर कारवाई होऊ शकते का? आणि झाली तर जबाबदार कोण?

संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमात आम्हाला प्रकाशन (पब्लिशिंग) प्रताधिकार (कॉपी राईट), वांड्गमय चौर्य (प्लॅगिअ‍ॅरिझम), स्वतःच पैसे खर्चून आपल्या साहित्यकृतीचे प्रकाशन व प्रसिद्धी घडवणे (व्हॅनिटी पब्लिशिंग) अशा मनोरंजक गोष्टी शिकायला होत्या. आम्ही वैजयंती जोशी यांचे याच विषयावरील मराठीतील पुस्तक अद्यापही प्रमाण मानतो. वृत्तपत्रात काम करताना आम्ही काय प्रथा पाळायचो, हे थोडे सांगतो. आपण सर्व अधिक जाणकार आहात.
१) संशोधनासाठी (रिसर्च पेपर), प्रकल्प अहवालात स्वतःच्या मुद्याचे समर्थन करण्यासाठी, संदर्भ म्हणून किंवा स्वतःचे मत/आक्षेप नोंदवण्यासाठी जर दुसर्‍याचा मजकूर उद्धृत करायची वेळ आली तर केवळ विशिष्ट वाक्यच देऊन त्याच्या खाली त्याचा उगम देणे अनिवार्य आहे. तो उगम पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्थेचे नाव, प्रकाशनस्थळ, आवृत्ती, सन, पॄष्ठ या क्रमाने द्यावा लागे. म्हणजेच आधी अवतरण चिन्हात ते वाक्य उद्धृत करायचे व खाली
पुस्तकाचे नाव : डुकरांचे गाव, लेखक : छगन भोचक, प्रकाशक : मे. अडगुले अँड मडगुले ब्रदर्स, जळजळपूर, पहिली आवृती, २०२५, पृष्ठ क्रमांक २८, परिच्छेद ३.
असा संदर्भ द्यायचा.
२) दुसर्‍या वर्तमानपत्रातील बातमी जशीच्या तशी देता येत नाही. शक्यतो वर्तमानपत्रे असे करत नाहीत पण अगदीच महत्त्वाचा विषय असेल तर आपला वाचकवर्ग वंचित होऊ नये म्हणून ती बातमी थोडे बदल करून (शीर्षक व शब्दरचनेत काही फेरफार करून) छापता येते. त्यासाठी त्या दुसर्‍या वर्तमानपत्राला कळवावे लागते व त्याखाली सौजन्य : जेथून घेतली त्या वर्तमानपत्राचे नाव असे म्हणावे लागते. लेखाबाबतही हेच पथ्य पाळावे लागते. काही अतिउत्साही लेखक आपले लेख एकाचवेळी चार चार वर्तमानपत्रांकडे पाठवत. ते एकाच दिवशी प्रसिद्ध झाल्यावर प्रताधिकार कुणाचा, यावरून पेच पडे. अशावेळी त्या लेखकाला इशारा देऊन त्याचे पुढचे लेखन थांबवले जाते. वर्तमानपत्रे एकमेकांना मदत करत असल्याने अशा वेळी सामंजस्याने वागतात. परस्परांत प्रकरण ताणून न्यायालयापर्यंत नेत नाहीत. एखादा लेखक वर्तमानपत्रात लेखमालिका चालवत असेल व त्याला त्याचे पुस्तक अगदी अन्य प्रकाशकांकडून काढून घ्यायचे असेल तर अशी परवानगी देताना वर्तमानपत्रे खळखळ करत नाहीत. त्यांची अपेक्षा केवळ प्रस्तावनेत आपल्या नावाचा उल्लेख व्हावा, एवढीच असते. बाकी रॉयल्टी वगैरे मागत नाहीत. (पुढे काय होईल माहीत नाही)
३) पुस्तकाचे परीक्षण छापायचे असेल तर प्रकाशन संस्थेनेच त्या पुस्तकाची प्रत व सोबत संमतीचे/विनंतीचे पत्र द्यायचे असते. याबाबतही माध्यमे व प्रकाशन संस्थांचे संबंध मैत्रीपूर्ण व लवचिक असतात. पण बाहेरच्या जगात जेव्हा कलाकृतीचा/साहित्यकृतीचा वापर कुणी लाभासाठी/प्रसिद्धीसाठी करत असेल तेव्हा प्रकाशक अणि लेखक तितकेसे सैलपणाने घेत नाहीत किंबहुना घेऊ नये. (थ्री इडियट प्रकरणात लेखक चेतन भगतचा मुद्दा रास्त आहे )

हेच तर हवे आहे.. फक्त त्यांची परवानगी घ्या. >>>
परवानगी 'तोंडी' आहे आशू. उद्या कायद्यावर बोट ठेऊन माझ्यावर कारवाई करायची असल्यास त्याविरुद्ध लढण्यासाठी परवानगी दिल्याचा पुरावा म्हणून काहीच नाही माझ्याकडे. असे 'कायद्यावर बोट' कुठे कुठे ठेवणार, किंवा कायदा 'चांगल्या'साठी कसा वापरला जाणार, हा विषय आहे इथे.

मर्ढेकरांच्या कविताना चाली लावायला त्यांच्या मुलाची परवानगी लागते? असे त्या पुस्तकाच्या हक्काच्या रकान्यात म्हटले आहे?मग आता मराठीचे शिक्षक वर्गात मर्ढेकरांच्या कवितेला त्याना स्फुरलेली चाल लावून शिकवू लागले तर त्याना तुरुंगातच जावे लागेल असे दिसते. कविता इतरत्र उद्धृत करणे वगैरे समजू शकते पण चाली बिली न लावणे असे नियम इन्टरेस्टिंग आहे . याचा उदगम मिळू शकेल काय?

शिवाय समीक्षा कशी आहे, यावरून प्रकाशकांनी त्यांचे धोरण ठरविल्यास ते बरोबर की चूक>> अगदी हाच विचार मला छळतोय साजि-या.

उद्या मी राजहंसला परवानगी मागुन त्यांचा उतारा घेतला तर त्यांच्यावर परखड टीका करु शकते का? केलीच तर ते पुढील पुस्तकांसाठी मला परवानगी देतील का?
Conflict of Interest नाही का? ( राजहंस हे केवळ वानगीदाखल. हवे तर मौज लिहीते. उद्या माबोला त्रास नको. राजहंस एक बरीच चांगली प्रकाशनसंस्था आहे असं माझं वै. म. आहे.)

प्रयोग- माहिती आवडली.

हूड- हे तुम्ही म्हणताय ? Wink एकदा कायदा झाला की तो करकचून आवळायचा असतो. उगम, अस्त काहीही असो. कायदा म्हणला की पाळायचा. त्याबद्दल विचार करणे अलाऊड नाही आणि टीका तर त्याहून नाही. Proud

साजिरा,
प्रेमाचा सल्ला. परवानग्या तोंडी घेऊ नका. लेखी पत्रव्यवहार करा आणि तो जपून ठेवा. निसरड्या जागा खूप आहेत आणि माणसांचे वर्तन अनाकलनीय असते. Happy

रॉबिनहूड, मास्तरांनी वर्गात शिकवताना लावलेली चाल वेगळी आणि व्यावसायिक वापरासाठी लावलेली चाल वेगळी- त्यात फरक आहे की नाही काही? Happy

मला वाटतं, प्रकाशकांचा मूळ मुद्दा हा छापलेला भाग परत उद्धृत त्याचा गैरवापर करू नये हा आहे. त्यासाठीच इतरत्र reproductionची अट आहे.. पण ही अट इतक्या काटेकोरपणे, साहित्य प्रसारासाठीच वापर करत असतानादेखील लागू करावी का हा शेवटी प्रकाशकांचा कॉल आहे. आपण सदुपयोग करू, पण गैरफायदा घेणारे अधिक आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःचे हित जपण्यासाठी जाचक नियम ठेवावे लागत असतील. त्यात काही स्तुत्य उपक्रमांना झळ बसते, पण in larger good, त्याला इलाज नाही. मला वाटतं, इथे प्रकाशन संस्थांनीही सरसकट नियम न करता 'उद्देश' बघून निर्णय घ्यावा. कदाचित, त्यांनी तो नियम केला, तेव्हा ऑनलाईन प्रसिद्धी त्यांनीही लक्षात घेतली नसेल. आता परत एकदा आढावा घेऊन त्यांनी फेरविचार करावा.

सध्या ते तोंडी परवानगीच देत आहेत ना? त्याचा ट्रॅक कसा ठेवतात?

रॉबिनहूड, मास्तरांनी वर्गात शिकवताना लावलेली चाल वेगळी आणि व्यावसायिक वापरासाठी लावलेली चाल वेगळी- त्यात फरक आहे की नाही काही?

>>
असे चिनूक्सने काही स्पेसिफाय केलेले नाही. चाल नाही लावायची म्हणजे नाही लावायची. पण बहुधा अशी अट असण्याबाबत मी साशंक आहे. कारण व्हर्शन रेकॉर्डिंगच्या बाबतीत कोर्टाने बराच लिबरल व्ह्यू घेतलाय आणि आख्खा गुलशनकुमार त्यावर मोठा झाला. म्हणजे लताचे गाणे अनुराधा पौडवालच्या आवाजात रेकॉर्ड केल्यास कायदे भंग होत नाही. ती नवीन निर्मिती मानली गेली आहे.

वरील पोस्टसच्या अनुषंगाने-

आशूने म्हतल्याप्रमाणे 'आवडता भाग' नक्की किती, हे कोण ठरवणार? आणि माबो हे एकच संकेतस्थळ आज जगात अस्तित्वात नाहीये. इतर असंख्य ब्लॉगांवर अशीच आवडती पानं, उतारे रोज अवतीर्ण होत असतात. अगदी पूर्ण कथासुद्धा टाकल्या जातात. त्याला आळा कसा घालणार? कमलेशचं 'बाकी शून्य', अनंत सामांताचं साहित्य, 'एक होता कार्व्हर','ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' ही पुस्तकं 'आवडली' म्हणूनच आंतरजालावर आहेत. मध्यंतरी श्री. दा. पानवलकर, मंगला गोडबोले यांच्या संपूर्ण कथा मी एका ब्लॉगावर वाचल्या होत्या. ही अशीच आवडती पानं ईमेलाद्वारेही एक बाई पाठवतात. कोणत्याही परवानगीशिवाय.

परवानगीची अट काढली तर लोक केवळ एक परिच्छेद देऊन थांबतील असं वाटतं का? आणि प्रकाशकाच्या publishing rightsचा मी उल्लेख केला आहे. त्याला काहीच महत्त्व नाही का?

प्रकाशकांना त्यांच्या जाहिरातींची काळजी असतेच, पण त्यांची परवानगी न घेता, आणि त्यांचा आक्षेप असताना, तो आक्षेप स्पष्टपणे त्यांनी त्यांच्या पुस्तकांवर नोंदवलेला असताना, अशी जाहिरात करणे चूक.

बाकी, मराठी प्रकाशकांनी ही पूर्वपरवानगीची अट एवढ्यातच घातली आहे. इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशक अनेक वर्षं हा नियम पाळत आलेले आहेत. पेंग्विनसारख्या संस्थांचा प्रताधिकारसंबंधी परवानगीसाठी विशेष विभाग आहेत.

मला वाटते 'प्रकाशन' म्हणजे काय याची व्याख्या करणं आवश्यक आहे.
तसेच, शब्दमर्यादा किती हेही त्या सुरुवातीच्या पूर्वपरवानगीच्या सूचनेत देणे आवश्यक आहे.
(चर्चेत ५० शब्द ही मर्यादा असल्याचे वाचले. ते कसे समजले?)

आख्खी पुस्तके, किंवा कथा, किंवा अगदी प्रकरणे लेखक, प्रकाशकांच्या परवानगीशिवाय जालावर देणे चूक, हे एकदम मान्य. पण एखाद्या १०,००० शब्दांच्या प्रकरणाचा १०० शब्दाचा भाग देणेही कायद्याने चूक आहे असे म्हणाल, तर तो कायदा मोडणार यात नवल नाही. आणि जर हा कायदा सर्रास मोडला जात असेल तर मग मोठे भाग देणार्‍यांनाही थांबवता येणार नाही. त्यामुळे जरा व्यवहार्य नियम, कायदा केला तर वाचकांचाच नाही तर प्रकाशकांचाही फायदाच आहे असे मला वाटते.

<एखाद्या १०,००० शब्दांच्या प्रकरणाचा १०० शब्दाचा भाग देणेही कायद्याने चूक आहे असे म्हणाल, तर तो कायदा मोडणार यात नवल नाही.>

घोटाळा होतो आहे. परवानगीशिवाय टाकणे चूक, असं आहे ते. आणि हे केवळ इंटरनेटपुरतंच मर्यादित नसून इतरत्र कुठेही पुनःप्रकाशन करताना हे बंधन पाळायला हवं. याचं कारण प्रकाशकाकडे साहित्याच्या प्रकाशनाचे अधिकार असतात.

परवानगी का, ते मी वर लिहिलंच आहे.

>>परवानगी केवळ ५० शब्दांचीच असते.
>परवानगीशिवाय टाकणे चूक

म्हणून
<एखाद्या १०,००० शब्दांच्या प्रकरणाचा १०० शब्दाचा भाग देणेही कायद्याने चूक आहे असे म्हणाल, तर तो कायदा मोडणार यात नवल नाही.>

असे मला म्हणायचे होते.

१०० शब्दांची परवानगी देतात का? किंबहुना ५०हून अधिक?

पन्नास शब्दांबाबत -

वर्तमानपत्रांमध्ये उद्धृत करताना पन्नास शब्दांपर्यंतच्या परिच्छेदांसाठी परवानगी मागू नये, असा संकेत मराठी प्रकाशक पाळत असत. हा नियम कुठे आहे, हे मला ठाऊक नाही. काही प्रकाशकांनाही ठाऊक नाही, पण ते हा नियम पाळत असत.

मात्र, प्रकाशकाच्या publishing rightsनुसार आता उतारा कितीही लहान असला तरी परवानगी लागतेच.

Pages