एक ओळ

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तुला एक ओळ लिहायची होती, राहून गेली
अल्लड स्वप्नं पापणीत येता येता राहून गेली

हाक देतच होत्या झुंजुमुंजु पाऊलवाटा
पानावरचे दवं का गं पापणी भिजवून गेली?

दाराआड लपल्या पावसाची थोडी गंमत करायची होती
तुझी छत्री नेमकी कुठेतरी राहून गेली!

तरारून आली होती जाणीव गेल्या श्रावणात
मनातून काढायची तेव्हढी राहूनच गेली

रात्रभर गुंतवले भावनेच्या गुंत्याने
नादावली पहाट, उगवायचेच विसरून गेली!

विषय: 
प्रकार: 

वॉव! खुपच तरल. सर्वच कडवे सुंदर आहेत. मला आवडले ते
" हाक देतच होत्या झुंजुमुंजु पाऊलवाटा
पानावरचे दवं का गं पापणी भिजवून गेली? "

अरे वा...एकदम मस्त... मी वाचलीच नव्ह्ती आतापावेतो...
>>>>तुला एक ओळ लिहायची होती, राहून गेली
अल्लड स्वप्नं पापणीत येता येता राहून गेली............... जियो !!!