कळी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

तशी ती भेट पहिलीच होती
पण ती 'जुनी ओळख' असावी तशी हसली.
हलकीशी खळी दोन्ही गालावर थबकली.
आपलेपणानं ती हवं-नको ते पहात होती.
मुलांना सांभाळणं, जेवण, वाढणं, आवरणं, अंथरूणं... वगैरे.
प्रत्येक कामात सराईतपणे वावरत होती.
बरचं काही बोलावसं वाटत होतं,
पण बोलणं असं जास्त झालच नाही.
न राहवून शेवटी तिला एक विचारलच,
"शिकतेस का ? "
नकारार्थी मान हलली. "सहावीत शाळा सोडली."
"शिकावसं वाटतं ?"
"हो..." पुन्हा गोड हसली आणि खरकट्याकडे वळली.
निघालो तेव्हा घरातल्यांसारखचं आपलेपणानं "पुन्हा या" बोलली.

.
..
.....

इथे स्थानकावर 'चाईल्ड लेबर'ची उद्घोषणा ऐकली.
तेव्हा का कुणास ठाऊक..
पण 'आशेचा सुर्य डोळ्यात घेऊन
मातीविना फुलणारी' ती निरागस कळी आठवली.
मला मीही 'तिचा गुन्हेगार' असल्याचं प्रकर्षाने जाणवलं.

विषय: 
प्रकार: 

:(.. कौतुक मस्त तरी कसे म्हणावे या कळीला?....
अश्या मातीविना फुलणार्‍या किती तरी कळ्या आहेत....उमलण्या आधी सुकुन जाणार्‍या.. हळहळण्यापलिकडे काही करु शकत नाही ही वस्तुस्थिती मला खरोखर गुन्हेगार ठरवायला लागते

'आशेचा सुर्य डोळ्यात घेऊन
मातीविना फुलणारी' ती निरागस कळी.....
अशा क्रित्येक कळ्या उमलण्या आधीच सुकुन जातात.

आपल्या मुलांच्या वयाची मुल बालपण हरवलेली दिसली की आणखी गिल्टी वाटत .कविता एकदम बेचैन
करून गेली .