नवीन काय "खाऊ"? (खाद्य उत्पादने)

Submitted by लालू on 12 December, 2009 - 10:57

हल्ली बाजारात सगळीकडे बरेच नवीन तयार खाद्यपदार्थ येतात. जसे वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, कॉर्न चिप्स, कुरकुरे, चिवडे, वड्या, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट्स इ. याबद्दल इथे माहिती लिहिणे अपेक्षित आहे. 'स्नॅक्स' किंवा थोडक्यात चहाबरोबर आणि (कधीतरी) येताजाता तोंडात टाकायचे पदार्थ. Happy

लिहा तर मग, लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला आवडलेल्या खाऊची माहिती. प्रकार, ब्रॅन्ड, कुठे मिळेल इ. लिहावे. भारतातील आणि परदेशातीलही पदार्थ लिहिले तरी चालेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, लोकहो.
हे पदार्थ कधी, कसे, कितपत खावेत याबद्दल कोणी अज्ञानी असेल असे मला वाटत नाही. तसंच हा बाफ 'फक्त लहान मुलांच्या' खाण्यासाठी नाही. अर्थात तेही लिहिले तर चालेल. लोक हेल्दी ऑप्शन्सही लिहित आहेतच. काही पदार्थ कसे वाईट आणि त्यांच्या दुष्परिणामांबद्दल चर्चा वळू नये यासाठी लिहिले. तो या बीबीचा विषय नाही.
एखाद्या प्रॉडक्टबद्दल काही वाद-विवाद असतील तर अवश्य लिहा.

कॉस्टको मध्ये दोन वर्षांपूर्वी हार्टच्या आकाराची किंचित गोडसर खुसखुशीत पेस्ट्री पफ टाईप अतिशय सुंदर बिस्किट (का कुकीज ) मिळायची. या ट्रीप मध्ये ती अजिबात दिसत नाहीत. कुणाला नाव आठवतंय का त्यांच आणि ती दुसरीकडे कुठे मिळ्तात का ?
आमच्या लोकल ग्रोसरीत सेसमी ओट स्नॅक्स मिळतात. अगदी खुसखुशीत खारे शंकरपाळे. आमच्याकडे कुणी आले की ते खाऊ म्हणून बरोबर घेऊन जातात इतकं आवडतं त्यांना.

ब्रिटानिया लिटिल हार्ट्स मिळतात ती ही नव्हे. ही छोट्या हाताच्या आकाराची असतात. आणि थोडे चिरोट्यासारखे टेक्श्चर.

Costco मधील फ्रूट स्न्याक्स हा candies ला चांगला पर्याय आहे. आमचा मुलाला आम्ही गोळ्या म्हणून हेच देतो. फक्त आम्ही त्यात जिलेटीन नाही हे बघून घेतो. कॉस्टको च्या kirkland च्या फ्रूट स्न्याक्स आणि Bunny Fruit snacks, general mills च्या काही फ्रूट स्न्याक्स मध्ये जिलेटीन नसते. बर्याच ह्या उत्पादनात खऱ्या फळाचा juice असतो .

कॉस्टको मध्ये केक कुकीज "Madeleines " हा प्रकार मिळतो . अतिशय मस्त लागतो.
तिथच लेमन कप केक मिळतात ते ही खुप छान असतात.

होल फूड्सचा ३६५ ओर्गेनिक ब्रान्ड भारि हे. त्यान्चे चेडर पॉपकॉर्नमधे खरे चेडर चिज असते (चिजचा फ्लेवर नाय). त्यान्चे ओटमिल क्वेकरपेक्षा चान्गले लागते. चिप्ससुध्दा भारि अस्तात.

केलॉगचे अनफ्रोस्टेड ब्राउन शुगर सिनॅमॉन आनि अनफ्रोस्टेड ब्लुबेरि पॉपटार्ट्स. टोस्ट करुन खायचे.

पिल्सबरीचे सिनॅमन बन. कॉस्कोत फ्रोझन सेक्शनमधे मिळतात. फ्रीझरमधून काढल्यावर १५ मिनिटात बेक करून तयार होतात. मग दिवसभरात केव्हाही खाता येतात.

जायंटमधे ऑरेंज किंवा ब्लुबेरी मिनी मफिन्स मिळतात, एकावेळी एक अख्खा तोंडात टाकता येतो.

आताच्या सिझनमधे क्लेमंटाइन मिळतात. एकावेळी ३-४ सहज संपतात.

तसेच सद्ध्या चेस्टनट मिळतात. प्रत्येक चेस्टनटला चाकूने X आकाराची चिर द्यायची आणि मायक्रोवेव्हमधे १०-१५ सेकंद गरम करायचे. जरा थंड झाल्यावर सोलून खायचे. अप्रतिम!

दीपचे पालक समोसे, टोस्टर ओव्हनमधे १० मिनिटे बेक करून खायचे.

कॉस्टको मधल्या वेजी स्ट्रॉज , palmiers, Madeleines, Aussie bites मला पण आवडतात. ट्रिस्किट मधे चीजची स्लाईस घालुन , Cheerios, Mixed Nuts, Wheat Thins, Baked Lays with Tzatziki dip,Corn chips or Toasted Wheat Bread with guacamole. Winter मधे डिंकाचे /नाचणीच्या पिठाचे लाडु, चेक्स सिरियल चा चिवडा,
चेस्टनट बेक करुन छान लागतात. Farmers Market मधे जुजुबि मिळतात. अगदि बोरासारखे लागते ते.
अगो Palmiers घरि सुद्धा छान बनवता येतात Puff Pastry Sheet पासुन.

टार्गेटमधल्या 'मार्केट पँट्री'च्या रासबेरी क्रिम सँडविच. अहाहा, मस्त आहे पण एका सँडविच मध्ये १३० कॅलरीज. म्हणून परत जाऊन आणायचं डेअरिंग करत नाहीये. दुपारी चहा पिताना रोज आठवण येते त्याची.

ट्रेडर जोस मधील वेजी चिप्स, स्टीक्स पण छान असतात चविला.
देसी स्टोर मधे मिळणार्‍या गरवी गुजरात च्या चकल्या पण बर्‍या आहेत.त्याच ब्रँड चा चिवडा मात्र गोडसर आहे.
हलदीराम चे फरसाण छाने.

.

सध्या इथे 'गरवी गुजराथ' चे नमकिन प्रॉडक्ट मिळत आहेत... चांगले आहते. त्याचा भाजक्या पोह्याचा चिवडा अगदी बेस्ट आहे Happy

नानक ब्रँडची रसमलाई, गुलाबजाम पण छान वाटले.

नानक रस्मलाई +१ पण गुलाबजाम फार गोड वाटले पूर्ण पिळुनच घ्यावे लागतील Happy
सध्या बालाजी चे स्नॅक्स ही मिळू लागलेत. त्यांचे चिप्स आणि फराळी चिवडा (ह्यात कडीपत्ता नसतो आणि हा गोड नसतो) चांगला असतो.

मैया इंडीया कॅश अ‍ॅण्ड कॅरी तर बालाजी न्यु इंडीया बझार मध्ये मिळाले होते. बाकी ठिकाणीही असतील.

मुंबईला छेडाच्या किंवा इतरही च्याऊम्याऊखाऊच्या दुकानात खाकर्‍याचे असंख्य आणि मस्त मस्त प्रकार मिळतात. आमच्याकडचे सांप्रतकाळचे फेमस : बीट खाकरा, पावभाजी खाकरा.

खूब खाओ चे सोया क्रीस्पीजही यम्मी! त्यांचेच राईस आणि ज्वारी क्रीस्पीजही आहेत. मॅग्नेट, आगरबाजारातील सहकारी भंडारात मिळतात.

शिवाय बटाट्याची शेव, बिकानेरी शेव वगैरे तेलकट ऑप्शन्स आहेत. या तेलकट पदार्थातलं तेल कमी करण्यासाठी एक सोपा उपाय. डब्यात खाली पेपर नॅपकिन घालून त्या डब्यात हे पदार्थ ठेवायचे आणि शिवाय आणखी एखाद पेपर नॅपकीनचा बॉल करून त्यात ठेवायचा. बरचसं तेल शोषलं जातं. नॅपकीन जास्त तेलकट झाला तर तो काढून दुसरा ठेवायचा.

मैया बुंदी.. मिळते का बघते.

असा एक ग्रूप निघणार होता म्हणे, म्हणजे सगळ्या बुंद्या एका धाग्यावर गेल्या असत्या. पण ते राहिलं. सध्या बुंद्या आणि बुंदीचे लाडू इथेच.

मामी, पेपर टॉवेल साठी ++१
हिच ट्रीक मी खारी बिस्किट्स, नानकटाई, शॉर्ट्ब्रेड सारख्या भरभक्कम तूप्/बटर असणर्‍या बिस्किटांसाठी पण वापरते.

पूर्वी दादरला मनोहरची खारी बिस्किटं वगैरे ब्राऊन /रद्दी पेपर च्या पिशव्यात मिळायची तेव्हा त्या पिशव्या घरी आणेतो कित्ती तेल़कट व्हायच्या ते आठवले...

ठाणे, प्रशांत - कारल्याचे स्नॅक्स (भजीच पण क्रिस्प), बटर बनाना वेफर्स, सोयाबीन चकली, पंचरंगी चिवडा
बेकर्स प्राईड - बटर खारी, कोकोनट केक (ह्या छोट्या छोट्या केक्स मध्ये ताजा नारळ असतो त्यामुळे २ दिवसात संपवणे)
गोरेगाव - ए टू झेड ची ताजी कचोरी, सुरभीचे समोसे, खोपोलीचे वडे (हे घरात आणून ठेवण्याचे पदार्थ नव्हेत, पण यम्मी खाऊ)

गार्डनची लेमन भेल कुठेही मिळते.. टीपीला बरी.

ठाण्यात हनुमानकडचा साबुदाणा चिवडा लय भारी असतो. एकदम क्रिस्पी. दोन प्रकार आहेत त्यात - १. तिखट नसलेला (पांढरा) २. थोडासा तिखट (लाल)

मामे, छेडाकडे कोथिंबीर कली नामक एक फरसाण प्रकार मिळतो, तो खाऊन पहा.
आतापर्यंत खाल्ला असशीलच म्हणा.

मला यावेळी बिग बझार ( के स्टार मॉल, चेंबूर ) मधे औरंगाबादच्या एका उत्पादकाची हिरवी मिरची पावडर मिळाली. खुप छान चव आहे. आम्हाला इथे दोन प्रकारच्या हिरव्या मिरच्या मिळतात. एक काकडीसारख्या चवीला तर दुसर्‍या हाताळतानाही हाताची आग आग करणार्‍या. दोन्ही मला आवडत नाहीत. पण या पावडरीने आपल्या सवयीची चव मिळते. आज ती घालून साबुदाण्याची खिचडी केलीय. रंग हिरवट आला पण चव मस्त.
कोरडी पावडरच असल्याने मिरच्या टिकवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्नही वाचले. (माझ्यासाठी ) अगदी चिमूटभरही पुरते.

सफोलाची ओटस ची सर्वच पाकिटे आवडली. ज्यांना नुसते शिजवलेले ओटस आवडत नाहीत त्यांना नक्कीच आवडतील. तिखट आणि गोड, दोन्ही प्रकारात आहेत.

Pages