(हिंमत असेल तर), डोळ्यांत वाच माझ्या..

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

काल
आपल्या फस्टम् फस्ट रात्री
हे बटबटीत गोळे तुझ्या डोळ्यांचे
रोखून बघताना माझ्याकडे........
नको म्हंटलं तरी जातंच ना लक्ष
त्यांच्याकडे...!
दिसलंच मला त्यांच्यात प्रतिबिंब
तुझ्या मनातल्या भावांचं, धाकी पाडणार्‍या जरबेचं.
पटापटा मान वळवून ती नजर
टाळण्याचा मी केलेला तो आटोकाट प्रयत्न
कोणी असं करत नाही!
पण इतक्या रागावून अर्पित केलेली ती एक्सरे व्हिजन
मला पाहवलीच नाही बघ.
आणि मग निरखू लागलो मी
भिंतीवरची किडा पकडणारी पाल, गुणगुणणारे डास.
तुझ्या आयशॅडो थापलेल्या नेत्रांचे निखारे
वर खोट्या पापण्या डकवलेले..
बचाबच आयलायनर लावून वटारलेले!
मी हळूच चोरून बघतो तर काय..
ती नजर.. अजूनही रोखलेली माझ्यावर
त्यात होते इशारे..
अविश्वासाचे, नावडतेपणाचे, जवळ आलास तर याद राख सांगणारे
प्रत्येक कटाक्ष माझ्या बेरकीपणाला
ओळखून असणारा..

दचकून दूर सरकून,
त्या नजरेतला भाव समजून घेत
विचार केला...
ढाराढूर झोप नंतरही काढता येईल
आधी ह्या जुल्मी डोळ्यांची भाषा समजली पाहिजे!

आता अनेक बर्ष उलटली तरी
कित्तेकदा ती नजर रोखल्या जाते
आणि हबकतोच मी.
फस्टम् फस्ट रात्रीची भिती
अजुनही उरात भरून आहे
मी महाबेरकी असलो तरी सहनशील निपजलो असा
माझ्या माहेरी लौकीक आहे.

Pages