एकमत

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ऑस्ट्रेलियामध्यी काल लै मोठा गोंधळ झाला... ग्लोबल वार्मिंग च्या झळा लागुन इथल्या इरोधी पक्षाच्या नेत्याला पायौतात व्हावे लागले.
सत्ताधारी पक्षाने केलेल्या एमिशन ट्रेडिंग स्चीम वरुन इरोधी पक्ष नत्याने रान उठवले. पण सगळा इरोधी पक्ष त्याच्या मागे नव्हता..... मग सगळ्यानी मिळुन त्याचा कात्रज केला!... बिचारा फक्त एक मताने पडला!

न्यु साउथ वेल्स राज्यात पण मुख्यमंत्री बदलुन एक महिला मुख्यमंत्री पदावर आली आहे....:)

अहमदनगर जिल्हा परिषदेत, अपेक्षेप्रमाणे, विखे पाटलांनी सगळ्यांना चंदनापुरी चा घाट दाखवला आहे!

जै हो!

प्रकार: 

कसली लिंक देउ? लाईटच न्हाई, तर डिपी वरल्या लिंका बी लोक चोरुन नेतेत!

(डीपी: विजेचा ट्रान्सफॉर्मर, लिंक: विजेच्या दोन तारांना जोडनारा दुवा. वादळामुळे जेंव्हा वीज जाते, तेंव्हा मुख्यतः कारण म्ह्णजे हि लिंक पडलेली असते. ती पुन्हा बसवली कि वीज येते... प्रत्येक गावात लिंका टाकणारा/बसवणारा एक एक्सपर्ट असतो, त्यामूळे दरवेळी वायरमन्/ईलेक्ट्रिशियन ची वाट पहावी लागत नाही.
दुरुस्ती साठी वीज बंद करायची असेल, तर डीपी वर जाउन लिंक तात्पुरत्या पाडल्या जातात.)