To do or Not to do

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

To do or Not to do the trade?

जानेवारी महीन्याचा शेवट भयानक वाटला पण फेबची सुरुवात खुप वाईट झाली. आज ऑफीशिअली अमेरिकेत मंदी सुरु झाल्याची घोषना झाली. डो ने १०० अंकाने पडुन या घोषनेचे स्वागत केले. (http://biz.yahoo.com/ap/080214/wall_street.htm) ही घोषना होनारच होती पण कधी त्याची सर्वजन वाट पाहात होते. येते १५ दिवस तरी अमेरिकन शेअर बाजार साईडवेज जाईल असे वाटत आहे.
भारतासाठी बोलायचे ठरले जर कदाचीत आज या घोषनेमुळे परत एकदा गॅप डाउन ओपनींग होनार. ह्या पुर्ण आठवड्यात व्हॉल्टॅलीटी भरपुर असनार. १७ जानेवारी पासुन परकीय गुंतवनुकदारांनी भारतातुन आज पर्यंत $ ३३४३.४ मिलीयन काढुन घेतल्यामुळे बाजारात एक प्रकारची भिती पसरली आहे. परकिय गुंतवनुकदार अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष देउन गुंतवनुकीत बदल करत आहेत. ऐशीया मध्ये ह्याचा सर्वात जास्त फटका भारतीय शेअर बाजाराला बसला. खरे पाहाता आजही भारतातील गुंतवनुक मुल्य ( वा फंडामेंटल्स चेंज ) झालेले नाहीत. बाजार वर जान्यासाठी आता कुठलाही पॉझीटिव्ह ट्रिगर नाही. फेब च्या शेवटी बजेट येईल. तो पर्यंत ही अस्थीरता अशीच राहील बजेट हे नक्कीच समाधान कारक असेल असे मला वाटते. त्याला तशी कारण आहेत जसे आपली ऑरग्यानीक ग्रोथ ही प्रचंड आहे जी अमेरिकेवर अवलंबुन नाही. जसे रस्तेबांधनी, विज निर्मीती, पाणि शुध्दीकरन वैगरे. त्यामुळे दिर्घकालीन गुंतवनुक ही नफ्याची ठरनारच.
ऍक्टीव्ह गुंतवनुकदाराने अशा काळात दोन तिन गोष्टी करायला हव्यात.

१. कुठल्याही ऍनेलीस्टच्या मतावरुन गुंतवनुक करु नये. ( जसे cnbc)
2 कुठलाही समभाग घेताना त्यावर थोडे संशोधन करुन घावा.
३. कधी कधी ट्रेंडीग न करने हे फायद्याचे ठरते. हा काळ तसाच आहे. बाजाराला थोडी दिशा मिळाली तर ट्रेंडींग ला परत सुरु करावी. सध्या FII ह्या प्रंचड शॉर्टींग करत आहेत. ज्या एक दोन दिवसाच्या रॅली आहेत त्या शॉर्टींग कव्हर करन्यामुळे होनार्या रॅली आहेत. एका दिवशी जर निफ्टी २०० ने वर गेला तर लगेच लॉंग पोझीशन घेउ नयेत. मुख्य उद्देश आपली गुंतवनुक वाचवने हाच असावा, नफा वा तोटा कमविने नसावा. कारण सध्याच्या बाजारात लाँग वा शॉर्ट अशी कठलीही पोझीशन घेने हे घोक्याचे ठरत आहे.
४. एकदा समभाग घेतला की परत तो जर खाली गेला तर लगेच विकु नये. त्याला ऍवरेज करन्याचा प्रयत्न करावा.

डाउन साईड ला ४४०० पर्यंत व बजेट येउन गेल्यावर साधारण ऐप्रील ऐन्ड ला आपन परत एकदा ६००० टच करु असे मला तरी वाटत आहे. गुंतवनुक करने ही एक प्रकारची डिसीप्लीन आहे. बरेचदा आपल्या हातावर ( कि बोर्ड वर) आपल्या बुध्दीचा ताबा राहात नाही व आपण पॅनीक होतो. तेव्हा जस्ट वेट न वॉच ही स्ट्रॅटेजी अवलंबवावी. ( समभाग गुंतवनुकीसाठी) येत्या फायनान्शिअर वर्षात २० ते ३० टक्के रिटर्नस मिळतील. फक्त त्यासाठी पेशन्स हवा.

जेव्हा जेव्हा खुप मोठी रॅली होते तेव्हा प्रॉफीट बुंकीग करने आवश्यक असते. ईथे सुध्दा जास्त फायद्याची हाव न धरता डिसीप्लीनने फायदा घेने चांगले ठरु शकते. जानेवारीमध्ये कुठल्याही सामान्य गुंतवनुकदाराने फायदा घेतला नाही त्यामुळे आता सर्व समभाग तोटा दाखवित आहेत. आता पुढची मोठी रॅली वार्षीक निकाल जाहीर होताना असेल तेव्हा मात्र फायदा बुक करनेच चांगले ठरेल.

रिलायन्स, HDIL, NTPC, REl petro, ABan Offshore, BHEL, DLF वा कुठलाही इंडेक्स स्टॉक हे माझे प्रेफरन्स असतील. व म्युचवल फंडात ईंडेक्स फंड बराच फाय्दा देऊन जातील.

प्रकार: 

आहे, पण मार्केट इतके वोलाटाईल आहे कि ऍवरेज करुन सुद्धा काहि चांगले स्टॉक्स थोडे रेड मधेच अहेत माझ्याकडे.
आत्ता लगेच काही इलेक्शन्स नाहित त्यामुळे बजेट मधे फार खिरापती नसतील असे वाटते. ज्या रितीने FM ने पब्लीक सेक्टर बँकाच्या CEOs ना हाउजींग लोन थोडे सॉफ्ट कराय्चे आवाहन केले आणि काही बँकानि रेट कमी केले सुद्धा त्यावरुन या इंदस्ट्रि साठी (हाउजींग, इन्फ्रास्ट्रक्चर) बजेट मधे काहीतरी असेल असे वाटते. फेडने एखादा रेट कट केला तर रिझर्व बँकेला सुद्धा काहितरी करावे लागेल.
इतर वेळी मी बजेट आधी फर्टिलायझर स्टॉक्स घेतले असते कारण त्या साठी बजेट मधे काहिना काही घोषणा असते. या अस्थीर परिस्थीतीत मात्र भिती वाटते. तु म्हटल्याप्रमाणे सेक्टोरिअल MF पासुन मात्र दुर राहय्ला हवे

अरे त्या याहूच्या पानावर गेलो की document expired असा संदेश मिळतोय. अन् हे वाच... http://money.cnn.com/2008/02/14/news/economy/bernanke_paulson/index.htm?...
हे काहीतरी वेगळच सांगतय. तर नक्की खरे काय आहे?

History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.
-