मोठा नेता कसा निर्माण होतो?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एखादा व्यक्तीला नेता व्हावे असे वाटले म्हणुन, तो नेता होत नाही! पण परिस्थिती जर अनुकुल असेल तर कुणीही सोम्या गोम्या अचानक नेता होउ शकतो. भारतीय राजकारणात, आघाडी/युती/अपक्ष ह्यांच्या काळात, असे अनेक लोक नेतेपदी विराजमान झाले, कि ज्यांची ते पद सांभाळण्याची अभ्यास/ कुवत/ लायकी नव्हती.
नेता मोठा म्हंजे कर्तुत्ववान/कार्यक्षम ह्या अर्थाने, व्हायला कार्यकर्त्यांची एक फळीच उभारावी लागते. अन असे कार्यकर्ते जे नेत्याला नेहमी चांगली/मोठी कामे करायला भाग पाडतील. अनेकदा, नेत्याच्या नावे सुरु केलेले मोठे काम हे त्याच्या स्वतःच्या मनातले नसते, पण एखादा कार्यकर्ता अनेक दिवस प्रयत्न करुन त्याला हे काम करायला लावतो, अन अनायसे नेत्याला त्या कामाचे श्रेय मिळुन जाते. म्हणुनच चाणाक्ष राजकारणी नेहमी धडपड्या अन चौकस कार्यकर्त्यांच्या शोधात असतात...!

(सहजच सुचलं!)

प्रकार: