भारतातील भ्रष्टाचार - अमेरिकन चश्म्यातून

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

विमानाचे दरवाजे उघडले आणि एक ओळखीचा वास नाकात शिरला. मुंबई विमानतळावर, विशेषतः तुम्ही परदेशात वास्तव्य करुन येत असाल तर हा वास लगेच जाणवतो. इमिग्रेशन, स्वाईन फ्लू तपासणी, कस्टम्स वगैरे सोपस्कार पार पडले आणि टॅक्सी पकडण्यासाठीच्या खिडकीवर येऊन थडकलो. एक व्यवस्थित दागिने घातलेल्या जाडेलशा बाईंनी २४१२ हा टॅक्सीचा नंबर सांगितला आणि हातात एक रसीद दिली.

बाहेर आलो आणि थोड्याश्या शोधाशोधीनंतर २४१२ मिळाली. मुंबईकरांना परिचीत असणारी नेहमीचीच प्रिमीयर पद्मिनी होती ती. तिच्या डिकीत सी. एन्. जी. सिलींडर असल्याने माझी मोठी बॅग त्यात राहीना. अखेर मोठी बॅग पाठी सीटवर ठेऊन मी पुढे बसण्याचे ठरले. टॅक्सीवाल्याने टॅक्सी सुरु केली. विमानतळाबाहेर पडताना रसीद एका छोट्याशा कचेरीत देऊन टॅक्सीवाल्याने पैसे घेतले. तो हे पैसे घेत असताना मी पोलिसांनी एक टॅक्सी अडवलेली पाहिली. परत आल्यावर मी काही न सांगताच टॅक्सीवाल्याने मला पोलिसांना दाखवून म्हटले - "साहब कोई बाहरका बकरा मिल गया इन्हे. ऐसेही परेशान करते है साले." मी चकीत झालो. बाहेरचा टॅक्सी नंबर दिसला की त्याला थांबवून पोलिस त्याच्याकडून पैसे उकळतात असे त्याने मला सांगितले. भारतात येऊन मला उणापुरा तासभर झाला होता आणि इथल्या भ्रष्टाचाराचे काळे दर्शन व्हायला सुरुवात झाली होती.

टॅक्सी विमानतळ परिसराच्या बाहेर पडली. १५ एक मिनीटांनी टॅक्सीवाल्याने टॅक्सी एका सी. एन. जी. पंपावर थांबवली.
"साहब बोरिवलीतक जाना है, गैस भरनाही पडेगा." पंपावर भली मोठी टॅक्सी आणि रिक्शांची रांग होती. मग त्याने मला त्या पंपाच्या सुरस कथा सांगायला सुरुवात केली. तो पंप म्हणे १५ दिवसापूर्वी एका आठवड्याकरता बंद करण्यात आला होता. गॅसच्या वजनाची चोरी केल्याबद्दल पकडले गेल्यामुळे. दंड भरुन पुन्हा चालू केलेला. मी त्याला विचारलं "मग आता बरोबर गॅस देत असतील नाही?" यावर तो उत्तरला "नही साहब. अभी भी उतनाही चुराते है". "मग तू दुसऱ्या पंपावर का जात नाहीस?" "दूसरा सी. एन. जी. पंप पास नही है". यावर मी निरुत्तर झालो. मुंबईत येऊन पुरे दोन तासही झाले नव्हते तर ही दुसरी भ्रष्टाचाराची घटना बघत होतो.

मन सुन्न झालं होतं. मला आपल्या समाजातच दोष दिसायला लागला. सगळेच भ्रष्टाचारी. कोण कुणाला बोलणार? राजकारणी लोकांना दोष देऊन कसं चालेल? तेही याच समाजातून वर आलेले. आपल्यातलेच एक. लाल दिवा चालू असताना पोलिस नाही हे बघून सिग्नल तोडणारी माणसं भ्रष्टाचारी नव्हेत काय? आणि वर जर पकडलं गेलंच तर ५०० रुपयांचा अधिकृत दंड भरण्याऐवजी ५० रुपयाची लाच देणारी माणसं भ्रष्टाचारी नव्हेत काय? ही माणसं आपल्यातलीच असतात - आपल्या ओळखीतलीच असतात. अशा प्रसंगाच्या सुरस कथा आपल्याला गप्पांच्या ओघात सांगतातही. पण आपण काय करतो? ५० रुपयात आपला मित्र सुटला म्हणून आनंद व्यक्त करतो! हे भ्रष्टाचाराचं समर्थनच नव्हे काय?

यदा यदा ही धर्मस्य...... गीतेतला श्लोक आठवला मला. 'जेव्हा जेव्हा भारतात अधर्माचं राज्य प्रस्थापित होईल तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन.' अशा आशयाचा. कदाचित असा जन्म त्याने महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले यांच्या रुपाने घेतलाही असेल या पूर्वी. पण आजचे काय? आजच्या समाजात हा भ्रष्टाचाराचा अधर्म दूर करणारा एकही नेता दिसत नाही. असं का? कुठलाही सुदृढ समाज जेव्हा अध:पतनाच्या वाटेला लागतो तेव्हा त्या समाजातील सुजाण लोक जागे होतात आणि अविश्रांत मेहनत करुन सुधारणेचं पर्व आणतात. कुठे गेले आमच्या समाजातील सुजाण लोक? कि आपल्या समाजाचा आत्माच मेलाय?

अमेरिकेत भ्रष्टाचार नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. पण सामान्य माणसाला भ्रष्टाचार करायची संधीच मिळत नाही. कुठल्याही सरकारी कचेरीत कामे विनायसास होतात. जागेच्या लाखो डॉलर्सच्या व्यवहारात टॅक्स वाचवण्यासाठी कोणी कधीच एक पैसाही ब्लॅकने देत नाही. पोलिसाने वाहतुकीचा नियम तोडल्याबद्दल पकडलंच तर त्याने तिकीट फाडू नये म्हणून त्याला लाच देण्याचा कोणी विचारही करत नाही. कोर्टात केसेस चा निकाल काही महिन्यात लागतो. जो काही भ्रष्टाचार चालतो तो राजकारण्यांच्या पातळीवरुन. कदाचित मोठी कंत्राटे देताना तिथेही भ्रष्टाचार होत असेल पण ज्याला कंत्राट मिळतं त्याला काम बरोबर आणि वेळेवर करुन द्यावंच लागतं. एखादा राजकारणी भ्रष्टाचाराच्या आरोपात पकडला गेलाच तर त्याची कारकिर्द लगेचच संपुष्टात येते. पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणला जात नाही. एकंदरीत समाजाची मुल्येच आपल्या समाजापेक्षा बरीच वरच्या दर्जाची आढळतात. अमेरिकेकडून आपण नको त्या गोष्टींचं अंधानुकरण करतो. मग अमेरिकन समाजातल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण कधी करणार?

"साहब आगयी आपकी सोसायटी". माझी तंद्री तुटली. टॅक्सी माझ्या इमारती समोर थांबलेली असते. पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून माझे आई वडिल डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघत असताना दिसतात. मी सगळं काही विसरतो आणि सामानासकट वर धाव घेतो.

विषय: 
प्रकार: 

<<पुन्हा एकदा... तुमचा अनुभव प्रातिनिधिक नसावा...>>

याचा नक्की अर्थ काय? तुम्हाला असे म्हणायचे आहे का की असे अनुभव मलाच येतात? इतर कुणाला भारतात लाच मागत नाहीत? की कुणि देत नाहीत?

भारतात जर जिथे तिथे लाच द्यावी लागली, नि इथे एकदाहि नाही, असा मी एकटाच नाही.

<<तर मला हे कार्ड घेण्यासाठी मला आठ खेपा माराव्या लागल्या... ते पण प्रत्येक वेळी सकाळी आठ वाजता लाईनीत उंभ राहून... चहावाला/ शिपाई बोलत होता... १०० द्या, लगेच काम करुन देतो... >>

हे असले जर भारतात अनुभवावे लागते नि इथे नाही तर काय म्हणायचे? मला मॉतर सायकल चालवायचे लाय्सन हवे होते. माझ्या मित्राने इन्स्पेक्टरला बाटली दिली (माझ्या खर्चाने) नि मला लायसन मिळाले. इथे नुसते जाऊन परिक्षा दिली, गाडी चालवली लाय्सन. कटकट झंझट, दहा खेपा, काही नाही!

भारतात रामराज्य आहे असे माझे म्हणने नाही प्रयोग, पण भारत सरकारने देउ केलेल्या मोफत सुविधा विकसित देशात भरपुर पैसे मोजुन घ्याव्या लागतात ह्यकडे तुम्ही कानाडोळा केलात म्हणुन माझी पोष्ट होती. पर्देशात व्यावसायिक शिक्शण भारताच्या मानाने किती महाग असते ह्याची तुम्हाला कल्पना नसेल तर इथल्या परदेशी मायबोलीकरानाच विचारा. रोजच्या जीवनाश्यक वस्तु जसे की भाज्या ,फळे आपल्याकडे महाग आणि बाहेर खुप स्वस्त असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा तो गैरसमज आहे. परदेशी लोकान्च्या मानाने आपण भारतीय कष्ट करण्यात कमी पडतो असे मला प्रामाणिकपणे वाटते.काही करायला जमले नाही की सरकारी धोरणे आणि भ्रष्टाचार ह्याच्या पाठी लपायचे अशी आपली पध्दत असते.
बरेच दलित लोक perform करता आले नाही की बामणी कावा असे म्हणतात त्यातलाच हा प्रकार आहे.
मला आठवतय आम्ही १० वी झाल्यानंतर ज्या मुलाना कामी मार्क पडायचे त्यांचे पालक म्हणायचे आपल्या education systemमधे दोष आहे हो. असे असते तर भारतात इतके उत्तम doctor,engineers,sceitist तयार होतात ते झालेच नसते.स्वतःच्या मुलाने वर्षभर टवाळक्या केल्या हे मात्र कुणी पालक मान्य करत नाही.बर्‍याचदा मुलाची अभ्यास करण्याची पध्दत चुकली असते, ते introspection न करता systemला दोष दिला की झाले. कारण ते जास्त सोप्पे असते ना!!!

रोज दोनदा जेवल्याबद्दल सरकार आपल्याकडून कर वसूल करत नाही, हे नशीब समजा.
हे वाक्य म्हणजे डॉलरलंपट वृत्ती !!! .. बाकी काही नाही..

माझी ती पोस्ट फक्त लेखकमहोदयाना आहे.. बाकी कुणाला नाही... डॉलरलंपट हा शब्ददेखील फक्त त्यानाच वापरला आहे.. इतरानी गैरसमज करुन घेऊ नयेत.....ही नम्र विनंती..

हे लेखकमहोदय अमेरिकेला गेले.
जाऊ देत.
पासपोर्टशिवाय तर गेले नसणार..
पासपोर्ट काढताना पासपोर्ट ऑफिस, एजंट, पोलिस इन्क्वायरी फॉर्म हे सगळे यानी केले असेलच की.
तेंव्हा नव्हता का दिसला भ्रष्टाचार भारतीय चश्म्यातून?
तेंव्हा दिसला होता, तर करायचा होता विरोध...
पण नाही.

भारतातील भ्रष्टाचार दिसायला अमेरिकन चश्मा याना लावावा लागला. आता अमेरिकेत पोटाची सोय झाली, की आता भारतातील घाणीवर हे बोलायला मोकळे झाले.
डॉलरलंपट शब्द हा या अर्थाने वापरला आहे..
ती सगळ्या एन आर आय लोकांची प्रव्रुत्ती नाही.
(मीही डॉलरच तर मिळवतोय! Happy पण आता थोडेच दिवस राहिलेत! )
*** काही मजकूर संपादीत. प्रतिसादातील भाषा मर्यादा ओलांडू देऊ नका. अन्यथा कारवाई करण्यात येईल.

जग मित्थ्या आहे! Happy

भ्रष्टाचार सर्वदुर पसरलेला आहे. आपल्या जवळचा आपल्याला दिसतो. दुरच दिसत नाही. पण दुर जाउन पाहिले कि कळते, अरे इथे पन तेच! मग थोडे समधान अन थोडे दु:ख वाटते. समाधान असे कि, चला सब घोडे बारा टके. अन दु:ख असे कि, अरे, इथेही तेच? मग का इतके दुर आलो?

दुरदेशी राहुण तिथले, लोकल टीव्ही, पेपर वगैरे वाचले, दोन लोकांशी बोलले कि कळते कि, कमी जास्त प्रमाणात सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत!

आपण आपल्या भोवती जेवढे जग आहे, ते अन तेथील लोकांचे जगणे, आपल्य असहित, सुसह्य करण्याचा प्रयत्न करणे, हेच उत्तम! जग केवढे, ज्याच्या त्याच्या डॉक्या एवढे! Happy

लाच देऊ नका आणि लाच घेऊ नका!

मी सुद्दा हेच करते. अर्थात माझा संबंध फक्त ट्रॅफिक पोलिस वगैरे लाचखोरीत सगळ्यात पहिल्या पायरीवर उभ्या असलेल्या लोकांशीच येतो, त्यामुळे मला ते जमते. मोठी मोठी कामे सरकारदरबारी करुन घ्यायचा अनुभव मला नाहीय त्यामुळे लाच न देताच माझी कामे होतात असे म्हणणे प्रचंड धाडसाचे आहे. तिथे लाच दिली नाही तर प्रचंड दिरंगाई आणि मनस्ताप वाट्याला येतो असे अनुभव घेतलेल्यांचे म्हणणे आहे.

आर्क शी सहमत... Happy

तिथे लाच दिली नाही तर प्रचंड दिरंगाई आणि मनस्ताप वाट्याला येतो असे अनुभव घेतलेल्यांचे म्हणणे आहे.
---- समजा रांगेत दहा लोकं आहेत, पहिल्या व्यक्तीने पैसे द्यायला विरोध केला, दुसर्‍यानेही विरोध केला, तर लाच मागणारा रांगेतील पुढच्या व्यक्ती कडून पैसे मागतांना चार वेळा विचार करेल.

याच्या अगदी विरुद्ध माझ्या मित्राचे म्हणणे आहे, त्याचा मनपाने कंत्राटाचा ३० लाखाचा चेक दोन आठवडे अडकवला तर मोठे नुकसान होते. त्यांच्याही छातीवर बसणारे असतात. पैसे फिरवण्याचे गणित चुकले तर त्यांना मोठी किंम्मत चुकवावी (कधी कंबरडे मोडते मग उद्योगातून हद्दपार...) लागते.

वैभवच्या लेखात मला तरी काही वावगे दिसत नाही. त्यांचा उद्देश (तळमळ) अगदीच स्वच्छ दिसते.

तेंव्हा नव्हता का दिसला भ्रष्टाचार भारतीय चश्म्यातून? तेंव्हा दिसला होता, तर करायचा होता विरोध...
पण नाही.
--- तेव्हा त्यांनी विरोध केला असेलही किंवा नसेलही पण त्याने खुप काही फरक पडत नाही. समजा तेव्हा त्यांनी विरोध केल नसेल तर त्यांनी आता विरोध करायचा हक्कच गमावला कां?

जमोप्या,
बर्‍याच वेळा एखाद्या गोष्टीपासून लांब गेल्यानंतर त्याच्याकडे जास्त वस्तुनिष्ठ दृष्टीने बघितल जात. You observe, and register things better when you are removed from the situation. म्हणूनच भारतातला भ्रष्टाचार त्याला बाहेर राहून जास्ती पटकन दिसला असेल. वैभवने मनातल शल्य इथे बोलून दाखवल. असो.

<<एखाद्या अमेरिकन बाईबरोबर एक रात्र घालवली, आणि दुसर्‍या दिवशी तिची छाती आनि आपल्या आईची छाती यांचा तुलनात्मक पंचनामा एखाद्याने मांडावा, असा हा लेख वाटला... कृपया गैरसमज नसावेत..>>

काय बकवास उदाहरण दिलत हो!!! प्रचंड निषेध.

<<<वैभवच्या लेखात मला तरी काही वावगे दिसत नाही. त्यांचा उद्देश (तळमळ) अगदीच स्वच्छ दिसते.

तेंव्हा नव्हता का दिसला भ्रष्टाचार भारतीय चश्म्यातून? तेंव्हा दिसला होता, तर करायचा होता विरोध...
पण नाही.
--- तेव्हा त्यांनी विरोध केला असेलही किंवा नसेलही पण त्याने खुप काही फरक पडत नाही. समजा तेव्हा त्यांनी विरोध केल नसेल तर त्यांनी आता विरोध करायचा हक्कच गमावला कां?>>>

अनिवासी भारतीय ही एक punching bag झाली आहे. कुणीही यावे मारुनी जावे. आणी भारताविषयी खबरदार टिका कराल तर. गद्दार लेकाचे.

तीन वर्षांपूर्वी आमच्या शहरात "सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत" असलेल्या दोन उद्धट कलाकारांचा कार्यक्रम झाला. त्यांनी सांगितलेला किस्सा (रेकॉर्डेड आहे)

"आम्ही दोघ ना एक खेळ खेळतो. परवा न्यू जर्सी मधे कार्यक्रमा नंतर मराठी लोक एकत्र जमले होते. आम्ही हळूच आमचा नेहमीचा प्रश्न टाकला. काय मग भारतात कायमचे कधी परतणार? आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव टिपतो. मंडळी, ५ फूट बाय ५ फूट च्या खोलीत एक उंदीर शिरलाय, अस सांगितल्यावर लोकांची जी अवस्था होईल तसे चेहरे होतात एकेकेकांचे. ओशाळे, कावरे-बावरे, काय बोलायच ते न सुचून नजर चुकवणारे. काही जण तर हळूच सटकूनच जातात. आमची एवढी करमणूक होते"

एक तर अतिशय टुकार आणी उर्जा नसलेला कार्यक्रम केला.. तो पण लोकांना सव्वा तास तिष्ठत ठेउन. वर हे असले फालतू किस्से. मग त्या न्यू जर्सी च्या बावळट लोकांचा पण राग आला..ओशाळे झाले म्हणून!

अनिवासी भारतीय ही एक punching bag झाली आहे. कुणीही यावे मारुनी जावे. आणी भारताविषयी खबरदार टिका कराल तर. गद्दार लेकाचे.>> माफ करा, मला अनिवासी अथवा निवासी कुठल्याच भारतीयाविषयी काही बोलायचे नाही.. हे लक्षात घेऊन पोस्ट वाचाल.

पण भारतात राहून अथवा भारताबाहेर जाऊन कुणीही माझ्या देशाला फक्त नावे ठेवत असेल तर तो मी माझा स्वतःचा
वैयक्तिक अपमान समजते!!

वैभव याना भारतातील भ्रष्टाचार दिसला यात काहीच चूक नाही.. पण तो भ्रष्टाचार् पहाण्यासाठी त्याना अमेरिकन चष्मा घालावा लागला हे नक्कीच खटकले. जन्मापासून भारतात असलेल्या माणसाला हे असे "धक्के" बसतात्च कसे??

बाहेरचा टॅक्सी नंबर दिसला की त्याला थांबवून पोलिस त्याच्याकडून पैसे उकळतात असे त्याने मला सांगितले.>>> वाहतूक पोलिस की मुंबई पोलिस?? कारण सध्याच्या आतंकवादी हल्ल्यानंतर प्रत्येक वाहनाकडे संशयानेच बघावे लागते. तिथे जर त्यानी हयगय केली आणि काही हल्ला झालाच की मग पोलिस काय झोपा काढत होते का?? हे कोण म्हणतं???

मुंबईमधे "बाहेरच्या टॅक्सी" चालतात हे नविनच ऐकले. मला वाटत होतं की प्रत्येक टॅक्सी वाहतूक पोलिसकडे नोंद केलेली असते आणि तिला ठाणे, विरार, पनवेल असे बृहन्मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी परवाना काढावा लागतो.. पण वैभव याना कदाचित जास्त माहिती मिळाली असावी.. अमेरिकन चष्मा आहे ना!!!

प्रॉब्लेम्स, समस्या प्रत्येक देशापुढे असतात. त्या देशाला त्या नागरिकाना सोडवाव्या लागतात. अमेरिका आणि भारत याची तुलना करणेच चूक आहे.

तुम्ही स्वतः जर समस्या सोडवू शकत नसाल, त्या समस्या स्विकारत नसू शकाल तर मग टिका करून तरी काय मिळते? हा प्रश्न देखील विचाराना!!

एखाद्या अमेरिकन बाईबरोबर एक रात्र घालवली, आणि दुसर्‍या दिवशी तिची छाती आनि आपल्या आईची छाती यांचा तुलनात्मक पंचनामा एखाद्याने मांडावा, असा हा लेख वाटला...
>> अत्यंत घाणेरडी उपमा. निषेधापेक्षा शिसारी येण्याजोगी.
अमेरिकेत किंवा भारताबाहेर राहाणार्‍यांना भारतातील भ्रष्टाचार किंवा राजकीय्/सामाजिक स्थितीवर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही का? भारत म्हणजे आई आणि अमेरिका म्हणजे रात्र घालवण्यासारखी बाई! काय लायकीचे विचार प्रकट करत आहात तुम्ही जामोप्या? जो देश तुमच्या बांधवांच्या कौशल्याला संधी (स्वार्थासाठी का होईना), चरितार्थाचे साधन आणि तुलनेने सुखी राहणीमान देतो त्याला निदान मावशीची उपमा द्यावीशी का वाटली नाही तुम्हाला?
असो, आयान रँडच्या ' अ‍ॅटलास श्रग्ड' या पुस्तकातील एका प्रकरणात अमेरिकेबाबत जे सुंदर उदगार व्यक्त केले आहेत, ते आपण कधीतरी वाचा. वैभवसारख्यांना भारतातील जो भ्रष्टाचार भेटीदरम्यान जाणवतो, तो आम्ही इथे रोज अनुभवतो. त्याचे निरीक्षण चुकीचे नाही म्हणता येणार.

निवडणूकीच्या वेळी उमेदवारांनी मालमत्ता जाहीर केली तेव्हा अवाक व्हायची वेळ आली होती. यांच्याकडे इतका पैसा आला कुठून आणि कसा हा प्रश्न कुणीच कसं विचारत नाहीये ?

मीनू,
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एका उमेदवाराने आपली मालमत्ता केवळ ७०० रुपये असल्याचे आयोगाला सांगितले होते. तीन चार महिन्यांपूर्वी त्याचा मोबाईल चोरीला गेला होता त्याची किंमत मात्र ४५००० रूपये होती. ही गंमत सगळ्यांना माहीत होती.

अमेरिकेला मावशी म्हणा!

का म्हणून?

एकदा सकाळी करदर्शन घेऊन विष्णुपत्निं नमस्तुभ्यं म्हणून 'सगळ्या' 'भूमाते'लाच वंदन केले की परत अमेरिका म्हणजे मावशी आणि बांग्ला देश म्हणजे सावत्र काकू हे तुकडे का करायचे? Happy ..

जन्मापासून भारतात असलेल्या माणसाला हे असे "धक्के" बसतात्च कसे??
---- का नको बसायला... ? उलट ज्या प्रार्श्वभुमीके मधुन त्यांनी प्रवास केलेला आहे त्यानंतर तर त्यांना अजुनच जबरदस्त धक्का बसला असेल.

समजा खाचखळग्यातुन गाडी बरेच अंतर चालुन गेली, त्यानंतर रस्ता काही अंतर अगदीच सपाट (बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांनी छान उपमा दिली आहे) लागला आहे. मग पुन्हा रस्त्याला शोधत गाडी खाचखळग्यां मधुन प्रवास करायला आली. आता या प्रवासात (जरी खड्यांची लांबी, रुंदी, खोली सारखीच असेल तरी) धक्के हे तुलनेने पुर्वी पेक्षा जास्तच जाणवतात, कारण मागचा background.

लाच घेणारे कमी असतात (संख्येनी) आणि देणारे जास्त. त्यामुळे देणार्यांनी द्यायची नाही असे ठरविले तर तो प्रकार नक्कीच बंद होऊ शकेल. एकानी लाच दिल्यामुळे घेणार्याची अपेक्षा वाढते (इतरांकडुन) आणि म्हणुन मग त्रास होतो (त्या इतरांना ज्यांना लाच द्यायची इच्छा नाही). त्यामुळे फक्त लाच देणे बंद करु नका तर शक्य तितके इतरांनाही प्रवृत्त करा. इतरवेळी घालवायला लोकांकडे बराच वेळ असला तरी कामे करुन घेतांना बरेचदा अतिशय घाई असते. अनेकदा पावसाळा आल्यावर विहिर खोदु लागल्यामुळे हे होते.

अमेरिका काय आणि भारत काय, जिथे नागरीक करु देतिल तिथे भ्रष्टाचार आणि लाचलुचपत चालणारच. प्रत्येकानी 'No, we can't' असे म्हणणे सुरु करायला हवे.

खरं तर लाच त्यालाच द्यावी लागते ज्याला undue favors हवे असतात. मी आणि माझा वाटेल तो त्रास झाला तरी लाच देत नाही. आणि मी अगदी सगर्व सांगू शकते की आमचं कुठलंही काम कधी अडलं नाहिये.

मागे एकदा मी एक सदर चालू केले होते. त्यात फक्त भारतातच येऊ शकतील असे चांगले अनुभव मी लिहीले होते. ते पुढे चालले नाही. लोकांना काय आवडते त्याची प्रचीति आली.

शिवाय लाचलुचपत फक्त भारतातच नाही तर जगभरातच आहे, पण चांगले अनुभव सुद्धा भारतात आले. तर त्याबद्दल बोलावे. असे मला वाटते.

मागे एकदा मी एक सदर चालू केले होते. त्यात फक्त भारतातच येऊ शकतील असे चांगले अनुभव मी लिहीले होते. ते पुढे चालले नाही. लोकांना काय आवडते त्याची प्रचीति आली.

शिवाय लाचलुचपत फक्त भारतातच नाही तर जगभरातच आहे, पण चांगले अनुभव सुद्धा भारतात आले. तर त्याबद्दल बोलावे. असे मला वाटते.

मला नेहमी भारतात (किंवा कुठेही) चांगले अनुभव येतात.
खूप वर्षां पूर्वी, जर्मनीला जायचा योग आला. तेंव्हा पासपोर्ट काढला पहिल्यांदा. सायबान सांगीतल. ३० दिवसात पासपोर्ट आणलास तर जा नाहीतर दुसर्‍याकुणाला तरी पाठवाव लागेल. म्हणल बघतो प्रयत्न करून. तेंव्हा त्वरीत वगैरे प्रकार नव्हता.

पास्पोर्ट ऑफिसर, मुम्बै सिआयडी (तेंहा त्यांन्चा क्लिअरन्स लागायचा), पुणे पोलिस्. तिन्ही कडे वेळेची अडचण सांगितली. प्रत्येकाचा एकच प्रश्न,वडिल काय करतात, उत्तर , शिक्षक आहेत. पुढचा प्रश्नच नाही. फटाफट काम झाली. एक पैसा ही न देता. १८ दिवसात पासपोर्ट मिळाला. साहेब चाट. त्याने पण शब्द पाळला. :).

एकदा अंधेरीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. गाडी ठेवली व सिगरेट घ्यायला टपरीत गेलो. तिथे एक पोलिस सिगरेट घेत होता. (स्वतःच्या पैशाने). त्याला सहज म्हणले, अहो तुम्हाला येवढा धुराचा त्रास होतोय अजून वर सिग्रेट कशाला ओढता. तो बिचारा इतका गदगदला. मग बर्‍याच गप्पा मारल्या. सिग्रेट ओढत. नंतर गाडी घेउन पंपावरून रस्त्यावर आलो व वन वे माहित नसल्याने नेमके एका पोलिसाने पकडले व गाडी बाजूला लावायला सांगितली. त्याने माझ्याकडे पाहिल्. तोच पोलिस. हसायला लागला. म्हणला अहो इथे वन वे आहे. पुण्याचे आहात म्हणून सोडतोय. Happy पुन्हा चूक करू नका.

कितीही पैसे घेण्याबाबत नावाजलेली खाती असली तरी एखादा माणूस चांगला असतोच. तो नेमका मला भेटतो. देवाची कॄपा. दुसर काय.

<< स्वतःच्या नातलगांना बिनदिक्कत कर्जवाटप करून बँका, पतसंस्था गोत्यात आणायच्या, ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसायची, कंपन्या बुडवून शेअर होल्डरना हात चोळत बसायला लावायचे हे सर्रास चालते.>> हे तर भारतात सुद्धा चालते. कितितरि पतसंस्थानि बिनदिक्कत कर्जवाटप करुन गरिब लोकांच्या ठेवी बुडवलेल्या आहेत. सरकार ने पैसे दिल्यावर सुद्धा ते ठेवीदारांना न वाटता मधल्या लोकांनि स्वतःच्या खिशात घातले आहेत. जळगाव च्या २ पतसंस्था नि तिथल्या गरिब लोकांना बुडवले आहे. किति तरि लोक आयुष्याचि कमाई घालवुन बसले आहेत. अमेरिकेत तरि थोड्या amonut साठि FDIC insure करते. भारतात तर पतसंस्था मधे पैसे ठेवलेल्यांनि काय करावे?? तिथे तर काहिच insurance नसतो.

>>अमेरिका काय आणि भारत काय, जिथे नागरीक करु देतिल तिथे भ्रष्टाचार आणि लाचलुचपत चालणार<<

भ्रष्टाचार/लाचलुचपत निर्मुलनासाठी नागरीकांइतकाच किंबहुना जास्त सरकारी यंत्रणेचा अंकुश असणे आवश्यक आहे. अमेरिकेत कुणी पोलीस, सरकारी कार्यालय, हॉस्पिटल मध्ये लाच देण्याचा प्रयत्न केला आहे का? असल्यास, तो अनुभव वाचायला आवडेल... Happy

अहो लाच सोडा, हॉस्पिटल मध्ये टीप सुद्धा घेत नाहीत.

मंडळी, माझ्या लेखाविषयी गैरसमज करुन घेऊ नका. भारतातील चांगल्या गोष्टीविषयी मी रंगेबिरंगीत अनेक चांगले लेख लिहीले आहेत.
मी जे लिहीले आहे ते केवळ तळमळीतून लिहीले आहे. जी व्यक्ती आपल्या जास्त जवळ असते त्याच्यावरच रागावतो ना आपण? आम्हाला बाहेर गेल्यावर भारताची किंमत कळली. तसेच त्यातील दोषही जास्त खटकायला लागले. त्यात भारताविषयी फक्त प्रेमच आहे.
अमेरिकेत कितीही भ्रष्टाचार असला तरी तो भारतापेक्षा खूपच कमी आहे - निदान सामान्य माणसाला तरी बरेच कमी अनुभव येतात हे इथे राहिलेले नक्कीच मान्य करतील अशी आशा आहे. आणि भारतातील भ्रष्टाचार जर अमेरिकेएवढा झाला (म्हणजे कमी झाला) तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल.

भेसळ वाला भ्रष्टाचार हा लाचलुचपती पेक्षा वेगळा आहे. अशा जागा कटाक्षाने टाळुन, आर. टी. आय वापरुन हळुहळु त्यात देखील सुधारणा होऊ शकेल. पण आधि असे शक्य आहे याबद्दल सगळ्यानी ठाम बनायची आवश्यकता आहे. याच्याशी संबधित एक मुद्दा मी माझ्या 'लाल बटण या रंगीबेरंगी सदरात मांडला आहे.
http://www.maayboli.com/node/12205

मला ए आर सी चे म्हणणे पटले.
तसेच आजतागायत मला माझ्या कुठल्याही कागदपत्रांसाठी लाच द्यावी लागली नाहीये. आणि खेटे घालणे, वेळ अति जाणे असं काहीही करायला लागले नाहीये.
पहिला पासपोर्ट काढला तेव्हा पोलिस इन्क्वायरी झाल्यावर बरेच दिवस पासपोर्ट आला नाही. जी आर ई जवळ आली होती. पासपोर्ट शिवाय परिक्षेला बसता येणार नव्हतं. एक दिवस पुण्याहून सरळ वरळीचं पासपोर्ट हपिस गाठलं. खिडक्यांवर नीट उत्तरं मिळाली नाहीत. म्हणून सरळ विचारलं की मला तुमच्या वरच्या माणसाशी बोलायचंय. त्या माणसाची केबिन दिसली. तिथे गेले. सगळी कागदपत्रं परत एकदा दाखवली. परिक्षेला पासपोर्टशिवाय बसता येणार नाही असं ज्या पत्रकात लिहिलेलं होतं तेही दाखवलं आणि विचारलं कधी देताय? परिक्षा नाही देता आली तर पुढे ६ महिने वाया जातील. त्यांनी फोनाफोनी केली. आणि पुढच्या आठवड्यात अमुक वेळेला फोन करायला सांगितला. तो फोन मी करण्याआधीच मला पासपोर्ट हपिसातून फोन आला की तुमचा पासपोर्ट झालाय घेऊन जा. त्यांनी सांगितलेल्या दिवशी मुंबई दौरा करून पासपोर्ट घेऊन आले. तेव्हा वय वर्ष २२-२३ होतं आणि मी एकटीच गेले होते. काहीही त्रास न होता पासपोर्ट मिळाला.
हा संपायला आला तेव्हा नवीन काढायला गेले. तेव्हा वैवाहीक स्थिती आणि पत्ता बदलायचा होता, नवर्‍याचं नाव टाकायचं होतं पण आडनाव बदलायचं नव्हतं. संपल आलेल्या पासपोर्टवर पुढच्या ६-७ वर्षांपर्यंतचा व्हॅलिड व्हिसा होता अमेरिकेचा. त्याची नोंद नवीन पासपोर्टमधे यायला हवी होती. रेशन कार्डावरची ट्रान्स्फर अजून झालेली नव्हती. पण सोसायटीच्या सेक्रेटरीचं सहिशिक्क्यासकट पत्र चालेल आणि आताचं घर ज्यांच्या नावावर असेल(सासरे) त्यांच्या नावाचं लाइट बिल किंवा तत्सम काही लागेल असं सांगण्यात आलं होतं. सगळी कागदपत्रे अगदी लग्न झालंय पण आडनाव बदललेलं नाही अश्या अ‍ॅफिडेव्हिटसकट घेऊन गेले. २-३ तास रांगेत उभं रहावं लागलं पण सगळी कागदपत्री व्हेरिफाय होऊन पैसे भरून तिथून निघाले. अक्षरशः १५व्या दिवशी कुरीअरने सगळ्या योग्य नोंदींसकट पासपोर्ट आला. या वेळेला तर एकदाही कुणाला भेटायला जावे लागले नाही.

ड्रायव्हिंग लायसन्स तर ३ वेळा केलंय. एकदा १८ वर्षाखालील गिअरलेस दुचाकीचं, मग १८ पूर्ण झाल्यावर गिअरवाल्या दुचाकीचं आणि मग चारचाकी शिकल्यावर चारचाकीचं. त्यात मधेच एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लायसन्स पण काढलं होतं. सगळ्या ठिकाणी रांगेत उभं रहायला लागणारा वेळ सोडला तर काहीच प्रॉब्लेम आला नाही.

थोडक्यात असेही अनुभव असतात.

कर्नाटकातल्या भ्रष्टाचाराविषयी खुप ऐकले होते म्हणून मुलांची नोंदणी मध्यस्ताकरवी करायचे ठरवलेले. नोंदणीसाठी भारतात आल्यापासुन ६ महीन्यांची मुदत असते. मध्यस्ताने बरेच दिवस घालवले. शेवटी मुदत संपायला १ आठवडा असताना मी अगदी तणावाखाली होते. मध्यस्ताने आम्हाला ८०००रु फक्त नोंदणीसाठी आणि २८०००रु विसा बदल व नोंदणीसाठी मागितले व कहीबाही सांगून जास्त ताण द्यायचा प्रयत्न केला.
हे ऐकल्यावर मीच सर्व करायचे ठरवले. फक्त दोन फेर्‍यांमध्ये एकही पैसा न देता काम झाले. पहील्या फेरीत त्यानी मला एक लिस्ट दिली काय काय कागद्पत्रलागतील ह्याची. दुसर्‍या फेरीत काहीही कटकट न करता काम केले. खर म्हणजे १८० दिवसाची मुदत असते जेव्हा मी फॉर्म दिला तो १८१ दिवस होता पण त्यानी त्याची पेनल्टी पण भरायला सांगितली नाही कारण मध्यस्ताने दिलेला अर्धवट फॉर्म घेउन मी त्यांना आधी भेटले होते व त्यांनी फॉर्मवर काहीतरी खरडले(कन्नड) होते..
नंतर कामासाठी २-३ दा जावे लागले,प्रत्येक वेळी अतिशय चांगला अनुभव आला. एकंदरीत तिकडे काही पैशाच्या देवघेवीचे प्रकार असतील असे वाटलेच नाही. लोकांची कागदपत्र व्यवस्थित नसतील तर मात्र लोकांना ते सरळ परत पाठवत होते.

मलाही रांग लावून व्यवस्थित सगळी कागदपत्र दाखवून पोलिस इन्क्वायरी होऊन पासपोर्ट नीच मिळालेला आठवतोय. लायसन्स तर १० रुपये RTO फी भरुन मिळालेलं.

येथील विमान तळ उड्डाण पुल लाच खोरी प्रकरणी चौकशी चालु असलेले मराठी अभियंते हे अमेरिकन पासपोर्ट धारक आहेत. त्यामुळे त्याना चौकशीचा काहीच त्रास होणार नाही असे त्यांच्या पत्नीच्या भिशी गटातील मैत्रीणी कडुन कळले. आयरनी ऑफ लाइफ!

मराठी अभियंते हे अमेरिकन पासपोर्ट धारक आहेत.
---- ते अमेरिकन पारपत्र धारक नसते तर खुप काही फरक पडला असता असेही नाही. कायद्या पेक्षाही काही हात लांब असतात...

Pages