उखाणे

Submitted by माणूस on 22 November, 2009 - 11:27

जुने लेखण ईथे वाचा

http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/297.html

तो सगळा TP होता, जरा चांगले लिहा आता

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या दिराने माझ्या नवर्‍याला हा उखाणा तयार करुन दिला होता. आणि त्याने तो घेतल्यावर आमच्या नातेवाईकांकडूनही उस्फूर्त दाद, टाळ्या, हशा वगैरे मिळाला.

बँगलोर असो नाहीतर मिनियापॉलिस
अजितच्या मागे आता अश्विनी पोलिस .... Sad Happy

हा एक-

****** माझं नाव घ्याया न्हाई नगं म्हणूस
तू तर माझी बाईल आणि मी तुझा 'माणूस'

Light 1 Light 1

ब्रेडबरोबर खाल्ले अमूल बटर…
***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर
Light 1
कोल्हापुर स्पेशल
अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
*** चं नाव घ्यायचा मला नाही आळस

माझी जाउ पण माहेरची जोशीच. त्यामुळे मी आमच्या लग्नात
"जोश्यांनी घातली भाव्यांवर मोहिनी
किरणची मी आज झाले अर्धांगिनी" हा माझ्या वडिलांनी सांगितलेला उखाणा घेतला. Happy

माझ्या नवर्‍याला एकच उखाणा येत होता आणि तोच त्याने दोन-तीन वेळेला घेतला ..

भाजीत भाजी मेथीची
xxx माझ्या प्रितीची

शेवटी सगळ्यांना '"मेथीची भाजी" नको आता परत' म्हणावं लागलं .. :p

माझ्या बाबांनी माझ्या दिराच्या लग्नात घेतला होता आणि बाँब टाकला होता.
विमानातुन पडला बाँब, जहाजाचा झाला चुरा
xxxx माझ्या ह्रुद्याचा हिरा Lol (लिहीता येत नाहीए)

आईने कधीतरी लग्नाच्या पंगतीत घेतलेला उखाणा
xxxच्या लग्नाची खरेदी केली पळत पळत.
xxxरावांना वाढते जिलब्यांची चळत.

[आणि बाबांच्या ताटात सगळ्या जिलब्या सरकवल्या] Lol

सशल, तू स्पष्ट केलंस तेव्हा मला कळलं की प्रीतिच्या उखाण्यातला शब्द 'हृदय' आहे. नाहीतर मी तो शब्द 'हुद्दा' असा वाचला होता. आणि मग मला वाटलं की प्रीतिला आठवूनच इतकं हसायला येतंय की त्यामुळे लिहिता येत नाहीये. मी आपलं दहा सेकंद डोकं खाजवलं, कुठला हुद्दा ? कळलं नाही तेव्हा खालची पोस्ट वाचायला घेतली आणि उलगडा झाला Lol

माझ्या मैत्रीणि मिळुन माझे डोहाळ्जेवण्-कम बेबी शॉवर करत आहेत.त्यासाठी नाव अथवा उखाणा सुचवा.प्लिज लवकर सुचवा, मी नेटवर बाकिच्या साईट शोधल्या पण सगळे मोस्ट्ली लग्नाचे उखाणे आहेत. धन्यवाद!

हा धागा अगदी मस्तच आहे.आणि मस्ट पण आहे
पण खरच टीपी नको. जरा अलन्कारिक , नात्यामधला गोडवा आणि रेशीमबंध दाखवणारे उखाणे येऊ द्यात

डोहाळे जेवणासाठी एक छान उखाणा ऐकला होता, पण आता विसरले. अंगणात चिमण्यांची चिव चिव वाढली आहे, त्यांना सुद्धा आमच्या घरात बाळ येणार याची चाहूल लागली की काय असा काहीसा अर्थ होता.

डोहाळजेवणासाठी मी घेतलेला उखाणा:

कोवळ्या मातीत उमटलं मोरपंखी पाऊल,
____ च्या पत्नीला आता मातृत्वाची चाहूल!

मी लग्नानंतर गृहप्रवेशावेळी घेतलेला उखाणा:
नीलवर्ण आकाशात लागली चंद्राची चाहुल
.... चे नाव घेऊन ठेवते संसारात पहिले पाऊल.