Submitted by shashank pratapwar on 18 November, 2009 - 14:09
डेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
पार लागलेली होती वाट ती खिश्याची.
उगी भीती नव्हती,मजला तुझ्या खर्चाची,
पांगळया बजेट ची माझी झाली पार गोची,
तुला मुळी नव्हती पर्वा, होटेलच्या बिलाची.
क्षुद्र किमंतीची छोटी नाकारून भाजी,
स्टार्टर सहीत ऑर्डर केली पनीरची भुर्जी,
तुला परी जाणीव नव्हती, मेनू कार्डाची.
भूक माझी मेली होती पाहून तुझी थाली,
हिशोबावर माझ्या तेव्हा प्रश्न चिन्हे आली,
हातांनी घासली भांडी,हॉटेलच्या किचनची.
उगीच्याच फूकटया भेटा, उगीचाच व्याज,
बुक्कीवर लात बसावी, अशी जिरली खाज,
वेटरलाही भोवळ आली ,दशा पाहताची.
- शशांक प्रतापवार
गुलमोहर:
शेअर करा
शशांक्..स्वानुभव का रे? ओरपून
:D:-D शशांक्..स्वानुभव का रे?
ओरपून कढी अन भाजी, थेंब तुझ्या गाली
आठवूनी बिल ते फुगले, 'माझी' लाल झाली
नरड्याच्या बुजल्या वाटा, भिती ना जीवाची......
बकासूरी खाणे बघूनी, जीव जळे सारा
आडव्या तनातून दिसतो, आडवा नगारा
डेझर्टने जबडा तुंबला, भिती ना कुणाची......
छान आहे
छान आहे
शशांक , अरुण दातेंच्या आवाजात
शशांक , अरुण दातेंच्या आवाजात कसं वाटलं असतं
... उमेश भाउ तु तर पार आडवच
:-)... उमेश भाउ तु तर पार आडवच केलस...
शशांक आणि उमेश सहिचं :)
शशांक आणि उमेश सहिचं


क्लास! शशांक आणि उमेश
क्लास! शशांक आणि उमेश दोघेही!!
शरद
ह ह पु वा.. दोघांचेही
ह ह पु वा..
दोघांचेही काव्य सहीच हो.. हेहेहेहे:)
सही आहे
सही आहे
शशांक्..स्वानुभव का रे?>>>
शशांक्..स्वानुभव का रे?>>>

भारीच आहेत दोघांच्य रचना
भयंकर सुंदर... हसून हसून पार
भयंकर सुंदर... हसून हसून पार वाट लागली...

भिशॉण शुंदर
अरे.. मस्त्.. ह ह पु
अरे..:P मस्त्.. ह ह पु वा...दोघांचही काव्य सही
शशांक आणि उमेश दोघेही लाजवाब
शशांक आणि उमेश दोघेही लाजवाब !!!!!
दोघेही एकाच मुलीला घेऊन गेला
दोघेही एकाच मुलीला घेऊन गेला होता का?
भारी आहे..... >दोघेही एकाच
भारी आहे.....

>दोघेही एकाच मुलीला घेऊन गेला होता का?
शशांक आवडले अरे मूळ गाण्याचा
शशांक
आवडले
अरे मूळ गाण्याचा दुवा दे ना म्हणजे लोकांना त्याबरहुकुम गुणगुणता येते...
तसेच काही ठिकाणी मिटरला घसरलेय असे वाटते.. ते सुधारले तर अजून धमाल येईल
सर्वांचे मनापासुन आभार एवढी
सर्वांचे मनापासुन आभार एवढी दिलखुलास दाद दिल्याबद्दल
शशांक आणि उमेश
शशांक आणि उमेश दोघेही!!
>दोघेही एकाच मुलीला घेऊन गेला होता का?
पोरगी हुशार (कुठे) असेल!
शशांक, आपला हसवण्याचा धंदा
शशांक,

आपला हसवण्याचा धंदा
मैत्रिणीला पिझ्झा, आइस्क्रिम, भेळ, पाणीपुरी, पावभाजी असलेच पदार्थ खायला न्यायचे असते.
हॉटेलात जेवायला मात्र बायकोला न्यावे आणि मेनूकार्ड तिच्याचकडे द्यावे. फार खर्च येत नाही. खाणे उरलेच तर बायको आठवणीने पॅक करून घेते. आपल्याला ते चालते. मैत्रिणीसमोर मात्र तसे करताना शान जाते ना? हा फरक पुढच्या वेळी लक्षात ठेव.
त्यापेक्षा अशी मैत्रीण शोध जी
त्यापेक्षा अशी मैत्रीण शोध जी दोघांचे बील देईल!
योगेSSSSSSSSSSSश
योगेSSSSSSSSSSSश
ह ह पु वा...दोघांचही काव्य
ह ह पु वा...दोघांचही काव्य सही..........
खरच मस्तय
खरच मस्तय
सही
सही
!!!! शशांक, ऊ़को, मस्त
!!!!
शशांक, ऊ़को, मस्त करमणूक.
सहीच..!!
सहीच..!!
धमाल! हे डेट Date मधलं आहे की
धमाल! हे डेट Date मधलं आहे की Debt मधलं ते स्पष्ट होतय अगदी.
छानच रे शशांक....
छानच रे शशांक....
अरारारा
अरारारा
अरे भारी, सहीच एकदम चिमण
अरे भारी, सहीच एकदम
ह्या date मुळे debtor झालाय बहुतेक
चिमण
Pages