डेट तुझी माझी स्मरते...

Submitted by shashank pratapwar on 18 November, 2009 - 14:09

डेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
पार लागलेली होती वाट ती खिश्याची.

उगी भीती नव्हती,मजला तुझ्या खर्चाची,
पांगळया बजेट ची माझी झाली पार गोची,
तुला मुळी नव्हती पर्वा, होटेलच्या बिलाची.

क्षुद्र किमंतीची छोटी नाकारून भाजी,
स्टार्टर सहीत ऑर्डर केली पनीरची भुर्जी,
तुला परी जाणीव नव्हती, मेनू कार्डाची.

भूक माझी मेली होती पाहून तुझी थाली,
हिशोबावर माझ्या तेव्हा प्रश्न चिन्हे आली,
हातांनी घासली भांडी,हॉटेलच्या किचनची.

उगीच्याच फूकटया भेटा, उगीचाच व्याज,
बुक्कीवर लात बसावी, अशी जिरली खाज,
वेटरलाही भोवळ आली ,दशा पाहताची.

- शशांक प्रतापवार

गुलमोहर: 

:D:-D शशांक्..स्वानुभव का रे?
ओरपून कढी अन भाजी, थेंब तुझ्या गाली
आठवूनी बिल ते फुगले, 'माझी' लाल झाली
नरड्याच्या बुजल्या वाटा, भिती ना जीवाची......

बकासूरी खाणे बघूनी, जीव जळे सारा
आडव्या तनातून दिसतो, आडवा नगारा
डेझर्टने जबडा तुंबला, भिती ना कुणाची......

शशांक Lol
आवडले

अरे मूळ गाण्याचा दुवा दे ना म्हणजे लोकांना त्याबरहुकुम गुणगुणता येते...

तसेच काही ठिकाणी मिटरला घसरलेय असे वाटते.. ते सुधारले तर अजून धमाल येईल

शशांक आणि उमेश दोघेही!!
>दोघेही एकाच मुलीला घेऊन गेला होता का?
पोरगी हुशार (कुठे) असेल! Happy

शशांक,
आपला हसवण्याचा धंदा Happy
मैत्रिणीला पिझ्झा, आइस्क्रिम, भेळ, पाणीपुरी, पावभाजी असलेच पदार्थ खायला न्यायचे असते.
हॉटेलात जेवायला मात्र बायकोला न्यावे आणि मेनूकार्ड तिच्याचकडे द्यावे. फार खर्च येत नाही. खाणे उरलेच तर बायको आठवणीने पॅक करून घेते. आपल्याला ते चालते. मैत्रिणीसमोर मात्र तसे करताना शान जाते ना? हा फरक पुढच्या वेळी लक्षात ठेव. Proud

Pages