सुमल्याची आश्रम वारी!!... (३)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सुमल्याक बातमी देवक बाबल सुमल्याक हाकारतच तेच्या घरच्या ओसरीर येऊन ठेपलो.

"सुमल्याऽऽऽऽऽ गो सुमल्याऽऽऽऽऽ!! चल, हिकडे ये बघया चटचट!! गो सुमल्या!! अगो, चल लवकर, माका कामा आसात गोऽऽऽ! काय फक्त तुझ्या पाठसून बातमे देवक धावत रवतलय काय दिसभर?? चल, चल!! "

"रे, काय झाला, मेल्या वराडतस कित्या धोतराक आग लागल्यासारखो?? काऽऽऽय, काय झाला?"

"गो, सामान बांधूक घे, समाजलय? तुका जावचा आसा, आश्रम बघूक... बरोबर काका, काकीबाय, मास्तर, मास्तरीणकाकी, गुरव सगळे आसत, तेह्वा तशी चिंता करा नको, काय तुका येकट्याकच धाडणव नाऽऽय.... पण थय सगळा डोळे उघडे ठेवन बघ, समाजलय मां?? येकदम वेवस्थिशीर रिपोर्ट मिळाक व्हयो हयसर, कितपत पाण्यात आमी आसव ता कळाक व्हया! आपले अडाणी कोकणी लोक म्हणान कोणी शेंडी लावूक जातीत, तर तसा होता कामा नयेऽऽऽ, आयला मा ध्येनात?"

सुमल्याचो वासलेलो आ अजून तसोच होतो, आता शेहराकडे जाणा तेका तसा नवीन नव्हता, पण तेची आपली ठरलेली वारी होती, आणि एक मामाचा ठिकाण सोडून अजून खयच ता फारसा जावक नाय होता. आणि आता एकदम आश्रम बघूक जावचा??

"अगोऽऽऽऽ काऽऽऽऽय?? समाजला का नाय तुका?? जातलय मां?? "

"गेऽऽऽऽ बाये माझ्याऽऽऽ!! काय सांगतय तरी काऽऽय.... खराच सांगतसय का भगल करतसय मेल्या?? माका नेतत आश्रम बघूऽऽऽक?? रे, रव रे रव, चाय हाडतय इल्ली......"

चाय बरोबर सुमल्यान बाबल्यापुढे रव्याचो लाडू पण ठेवलो. चाय आणि लाडू खात खात बाबल्यान आयुष्यात पहिल्या खेपेकच सुमतीक सूचनाच सूचना दिले अन सुमल्यान पण ते ऐकान घेतले. प्रथमच असा दृश्य दिसला की सुमल्याचा त्वांड बंद आणि बाबल बोलतासा!! सुमल्याची ओसरी हो ट्रान्स्फ़र शीन बघान धन्य झाली!! पण गावच्या इज्जतीचो आणि भलायकीचो सवाल होतो ना!!

आणि मग, प्रस्थानाचो दिवस उजाडलो! एव्हाना, महाराज पण बाकीच्या पंचक्रोशीत फिरणार होते, आजूबाजूच्या गावातल्या लोकांक त्येंच्या पवित्र दर्शनाचो लाभ देणार होते, आणि काय काय करुचो त्येंचो विचार होतो हे त्या श्रीकृष्णाकच ठावक होता!!आश्रमाक जातले लोकांच्या प्रवासाखातेर, एका भक्ताची आरामदायक क़्वालिस डायवर सकट तयारच होती, तर, शुभस्य शीघ्रम म्हणत, बर्‍याश्या मुहूर्तावर, सगळा लटांबर गाडीत बसून आश्रमाच्या वाटेक लागला येकदाचा.....

वाटेत जाताना मंडळीचे देवाधर्मावर खूप गप्पा झाले, क्वालीसमधला वातावरण अगदी भक्तीमय होवन ग्येला!! कोकणातलो माणूस तसो भाविकच, तेका आपलो देवापासून देवचारापर्यंत सगळ्यांवरच विश्वास, अन सगळयांची भीतीपण.... देवापासून देवचाराक ह्या माह्यत असता, त्यामुळे तेही आपले लाड पुरवून घेतत!! नायतरी तेंका अजून कोण विचारता आजकाल इतक्या भक्तिभावान! ता आसो आपला....

.... तर मंडळी दिस सरता सरता आश्रमात पोचली, आणि दिव्यांच्या लखलखाटातलो आश्रम बघून गार पडली!! असो आश्रम त्येंनी कधी स्वप्नात पण बघूक नाय होतो!! आता रामायण महाभारतातले आश्रम तेंका वाचून ऐकून माह्यत होते, पण ते होते साधेच, पर्णकुटीये म्हणत तेंका त्या काळात!! पण हो आश्रम म्हणजे अगदी राजवाड्याच्या मुस्काटीत ठेवणारो निघालो!!

"अहो काका, हा ड्रायव्हर आपल्याला कुठे चुकीच्या ठिकाणी तर नाही ना घेऊन आला?? काय वाटते तुम्हांस? काय हो गुरवानूं?? काय म्हणता??" मास्तर जरा टेंशन घेवक लागले....

"हं, विचारुया काय त्याला? काका, तुम्ही विचारून बघा बघया.. नायतर आम्ही आपले खय तरी जावन पडूचे!! विचारा, विचारा...." गुरवानं काकांका पुढे क्येला...

काकांनी चौकशी केल्यान, आणि ह्योच आश्रम आसा अशी डायवराकडून खात्री करुन घेतल्यान. इतक्यात, समोरुन सफेदशे कपडे घालून ए़कजण हेंच्या दिशेन येताना सुमल्यान बगला, आणि काकांका तसा सांगिपर्यंत, तो माणूस येवन पोचलोही.

"जय श्रीकृष्ण, जय गुरुदेव.... प्रणाम..." सफेद कपड्याहून सफेद बत्तीशी दाखवत त्येनी सगळ्यांचा आगत स्वागत क्येला.... निवासस्थान दाखयला...

"आपण थकला असाल ना, आज, विश्रांती घ्या, उद्या आपल्याला आश्रम दाखवायची व्यवस्था केली आहे. तुमच्या भोजनाची व्यवस्था झाली आहेच, निवास स्थानीच पाठवतो ताटं... आमच्या गुरुदेवांना, सगळ्यांची काळजी... आपली पुरेपूर बडदास्त ठेवण्याविषयी सांगितले आहे...." परत एकदा सफेदीकी चमकार दाखवून गुरुदेवांचो शिष्यही अंतर्धान पावलो अन मंडळी, जेवून वगैरे निद्रादेवीच्या आराधनेक लागली....

अपूर्ण......

विषय: 
प्रकार: