वह गली थी...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आपापली आयुष्य असतात. दिनक्रम असतात. ते सुरळीत चालू असतात. आणि मग चुकून एखादा रिकामा क्षण समोर येतो.. आणि नेमकी या माणसाची अशी ही जीवघेणी कविता वाचली जाते.
शब्दांवर काट मारण्याच्या सहजतेने नाती मिटवता येत नसतात. हे उशिरा आलेलं शहाणपण अशावेळी नव्याने जाणवतं फक्त!

मैं अपने बिझनेस के सिलसिले में,
कभी-कभी उसके शहर जाता हूं तो गुजरता हूं उस गली से |

वो नीम तारीक-सी गली,
और उसी के नुक्कड पे उंघता-सा
पुराना इक रोशनी का खंबा,
उसी के नीचे तमाम शब इंतजार कर के,
मैं छोड आया था शहर उसका !

बहुत ही खस्ता-सी रोशनी की छडी को टेके,
वो खंबा अब भी वहीं खडा है !
फतूर है यह, मगर मैं खंबे के पास जा कर,
नजर बचा के मोहल्ले वालों की,
पूछ लेता हूं आज भी ये-
वो मेरे जाने के बाद भी, आई तो नहीं थी?

वह आई थी क्या?

एक काट मारुन शब्द खोडून टाकावा इतक्या सहजतेने एखादं नातं तोडून टाकता येत असतं कां? कबूल आहे काही वेळा त्या गुंतण्याचा प्रयत्न करुनही न सोडवता येणारा गुंता झालेला असतो. तो सोडवत बसण्याइतका वेळ हाताशी नसतो, किंवा तो सुटेल असा विश्वास त्यावेळी वाटेनासा झालेला असतो. थोडा वेळ जावू द्यावा मधे, आपोआप सुटेल जरा वेळ मधे गेला तर, धाग्यांची खेचाखेच दोन्ही बाजूंनी करणं बंद केल्यावर असं वाटून कदाचित म्हणूनच नात्यांचा तो गुंताडा मनाच्या एका कोपर्‍यात काही काळासाठी ठेवला गेलेला असतो.. दिवस जातात मधे आणि कशामुळे नक्की ते कळत नाही.. धागे सगळे उसवूनच गेलेले असतात आपोआप. आपण शोधतो पण दुसरं टोकं हरवून गेलेलं असतं.काही शिल्लकच राहिलेलं नसतं.. एका विफल आशेशिवाय.. ते दुसरं टोक शोधण्याचा अजून कोणी प्रयत्न करत असेल कां?

आपण शहरं सोडली तरी त्यांनी आपल्याला सोडलेलं नसतं कधीच.. गुलझारला हे इतकं अचूक कसं उमगलेलं असतं कायमच?

विषय: 
प्रकार: 

ट्युलीप, मागे एकदा तू 'वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो' बद्दल लिहीले होतेस, आत्ताची ही कल्पना त्याच्या एकदम विरुध्द आहे ना? खरच काही वेळा आपण असे म्हणतो की 'उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा' पण खरच जमत नाही, कुठेतरी खोल खालती काहीतरी शोधत असतोच. असो. छान लिहीले आहेस, गुलजार महान आहेच. Happy

साहीरच्या मूळ शायरीत 'वो अफसाना जिसे तकमील तक लाना, न हो मुमकिन ' असे शब्द आहेत. संगिताच्या सोईसाठी अंजाम शब्द वापरलाय.

ट्यु, वाचतानाच जाणवत गेलं , गुलजारच ! धन्यवाद.

वाह!

ट्युलिप,
सुरेख लिहिलयस. अगदी मनांतलं.

पण असे गुंते न ठेवणच उत्तम.. प्रयत्नाने नव्या नात्यांकरता जागा करावी.
शेवटी 'वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन उसे इक खूबसूरत मोड देकर भूलना अच्छा' हेच खरं.
गुलझार असच काही जबरदस्त लिहून दीर्घकाळ मनांत रेंगाळत राहतो.

गुलजारबद्दल काय बोलावं.... हम सबकी उमर उनको लग जाये...

ट्युलिप, नेहमीप्रमाणे छानच लिहीलंयस. अगदी नेमकं. तू जेव्हा जेव्हा गुलजारच्या कवितेबद्दल लिहीतेस, मग ते असं छोटसं असो किंवा पान-पानभर, मला वाचायला खूपच आवडतं! Happy

गुलजारचे Grace सारखे असते. वाचावे तेव्हढा अधिक उलगडतोय असे उगाचच वाटत राहते ...
टयु आवडले तुझे टिपण.

.

अशी दुखावलेली माणसं जेंव्हा स्वत:च्या भावना कागदावर उतरवतात तेंव्हा किती सुंदर दुखावतात रसिकाला. या बाबानं किती जखमा अजून गहिर्‍या केल्या असतील काय माहीत?
आणि तू पण..

गंमत म्हणजे 'शब्दांवर काट मारून शब्दही 'मिटवता' येत नाहीतच.. आणि ते लिहिताना मनात उमटून गेलेले विचार तर त्याहून नाही'... काट मारण्यामुळे आपण शब्द 'नजरेआड करतो' इतकंच. तो तिथेच असतो, आपण केवळ त्याच अस्तित्व नाकारतो, किंवा नाकारण्याचा प्रयत्न करतो.
आता विचारांचा हा धागा पकडून नात्यांचा, आणि मग गुलझारसाहेब आणि त्यांच्या लेखनाचा विचार करुन बघ...
शोध घेउन बघ... बघ काही शब्द हाती लागताहेत का की नुसताच रिकामा कागद उरतोय हातात ?

गुलजारने लिहावं आणि ट्यु ने रसग्रहण करावं.. जबरीच!
रार, मस्त! शब्दांवर काट मारली असली तरी पुन्हा मागे जाता, ते हाती लागणारचं, त्यांच्यावरच्या काटेसकट! तसंच नात्यांच..
बरं, पाडगावकरांची एक कविता 'तेव्हांची ती फुलं', माझ्या अनेक आवडत्या कवितांपैकी खूप वरची, त्यातलं एक कडवं...

फुलणं ही जशी फुलाची भाषा असते
तशीच असते कोमेजणं ही फुलांचीच भाषा
कितीही कोमेजलेली फुलं जरी असली तरी
एकदा ती फुलली होती हे नाही विसरता येत..

पुढे पांडगांवकर म्हणतात..
कोमेजलेली फुलं पुन्हा फुलत नाहीत
हे ज्यांना क्ळलं ते फुलणंसुद्धा सोसतात..

आणि इथे आपण हळूच आवंढा गिळायचा, पाणावले असतील तर डोळे पुसायचे...

बरं, तर सांगायचा मुद्दा असा की, फुलं फुलली होती हे विसरता येत नाही, तसं तो शब्द त्यावेळी तिथे होता, नातं त्यावेळी फुललं होतं.. हे विसरता आणि नाकारता येत नाही..

शब्दांवर काट मारता येते... कधी कधी शब्दं पुसटतात... काट मात्रं व्रणासारखी वरून मेलेली आत जिवंत...
अवघड केलस हे लिहून!

आपण शहरं सोडली तरी त्यांनी आपल्याला सोडलेलं नसतं कधीच..गुलझारला हे इतकं अचूक कसं उमगलेलं असतं कायमच? >>>>> सुरेख रसग्रहण! Happy

Pages