वाढदिवस...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

इथे आमच्या घरापासून दिड मिनीटाच्या अंतरावर एक डंकीन डोनट आहे. मला कधी अँटी-सोशलाईझिंगचा अ‍ॅटॅक आला, डोक्याला शॉट बसला (तो बसायला कुठलंही कारण पुरत.. Happy ) , खरच कॉफी प्यायची खूपच तल्लफ आली किंवा काही वाचायचं असेल तर मी एखादं पुस्तक घेऊन तास-दोन तास तिथे जाऊन बसतो. तिथल्या माणसाला पण आता माझी स्मॉल कॉफी विथ क्रिम अँड शुगर आणि दोन चॉकलेट मचकीन ही ऑर्डर माहित झाल्याने अजिबातच काही सांगावं लागत नाही.. तिथे बाहेर पण टेबल खुर्च्या असल्याने हवा चांगली असली की मी बर्‍याचदा बाहेरच बसतो.. ओल्ड मिल्टन पार्कवे वरचा ट्रॅफिक बघत, येणार्‍या जाणार्‍या गाड्यांमधून उतरणारी माणसं बघत छान वेळ जातो... बर्‍याचदा हातातलं पुस्तक नुसतच धरलं जातं आणि एक पानही पूर्ण वाचून होतं नाही..

आज सकाळी डंकीन मधे जायला रूढार्थाने तसं काहीच कारण नव्हतं... म्हणजे मला ना अँटी-सोशलाईझिंगचा अ‍ॅटॅक आला होता, ना डोक्याला शॉट बसला होता, ना पुस्तक वाचायचं होतं पण का कोण जाणे मी देवळातून परत येताना डंकीन डोनट च्या दिशेने गाडी वळवली...नेहमी प्रमाणे कॉफी घेऊन ती खूप गरम असल्याने नुसतचं प्यायल्या सारखं करत मी ट्रॅफीक बघत बसून राहिलो.. गेल्या दोन दिवसातल्या बड्डे जश्न बद्दल विचार करत बसलो...

वाढदिवस... ! कधीकधी मला वाटतं वाढदिवस हा वर्षातला एका असा दिवस असतो की ज्या दिवशी तुमचं स्वतःचं काही कर्तुत्व नसताना उगीच तुमचं भारी कौतूक केलं जातं !!!!! हो म्हणजे आपल्याला जन्माला घालणं हे आपल्या आई-बाबांचं कर्तुत्व.. नंतर वाढवणं मोठं करणं हे पण त्यांचंच काम.. थोड्या वर्षांनी आपण आपोआपच मोठे होतं असतो.. ह्या सगळ्यात आपला स्वतःचा सहभाग किती ? ते कौतूक आपण खरचं डिसर्व्ह करतो का? असा प्रश्न कधीकधी पडतो.. ! तसंच माझं ही बरच कौतूक आणि लाड त्यादिवशी झाले.. १२.०१ वाजता आलेल्या शिल्पाच्या फोन पासून दुसर्‍या दिवशी ११.५० वाजता तिच्या भावाच्या आलेल्या फोन पर्यंत दिवसभर फोन चालूच होते. अनेक जणांनी ऑर्कूट, फेसबूक, इमेल वर शुभेच्छा दिल्या. मायबोलीवरही पार्ले बीबी मला दिलेल्या शुभेच्छांनीच भरला होता.

इथल्या प्रथेप्रमाणे माझे मित्र रात्री १२ वाजता केक घेऊन आले. पण ह्या वेळचं वेगळेपण म्हणजे माझ्या मित्राने आणि त्याच्या रूमी ने स्वतः घरी केक बनवून आणला होता. फार भारी वाटलं मला.!!!! घरच्या व्यतिरिक्त बहूदा पहिल्यांदांच इतर कोणी केक केला होता.. ! मागच्या वर्षी मला साधं विश पण न करणारे माझे ऑफिसमधले काही कलिग्ज रात्री १२ ला घरी आलेले बघून मला भरून वगैरेच यायचं बाकी राहिलं होतं. Happy खूप दंगा झाला एकूण... दुसर्‍या दिवशी देसी बुफे ला तुडूंब खाणं झालं.. नंतर छान झोप ही झाली... संध्याकाळी भारतातून आलेल्या अजून एका केक चं कटींग झालं... माझा मित्र, त्याचा रूमी, माझा रूमी, ऑफिसमधली काही जनता, त्यातले कोणाकोणाचे बाकीचे मित्र अश्या सगळ्या मंडळींचा मिळून रात्रीचा प्लॅन पण तयार झाला होता. इथे एका पब मधे देसी पार्टी होती. ११:३० पर्यंत गेलं तर फ्री एंट्री वगैरे ऑफर्स पण होत्या. खर म्हणजे मला पब/ क्लब मधे जायचा फारसा उत्साहं नसतो.. पण चांगला ग्रुप असेल आणि ग्रुप मधलं एकतरी कोणी ड्रिंक्स न घेणारं असेल (किंवा मग तो पब मायामी किंवा न्यू ऑर्लीन्स चा असेल Wink ) तर मग मी जातो. का माहित नाही पण एकूणातच मला तिथली सगळी एंजॉयमेंट ही बर्‍याचदा बुरखा पांघरल्यासारखी किंवा उसना आवेश आणल्या सारखी वाटते.. म्हणजे वर सगळ्यांचे चेहेरे हसरे, आनंदी दिसतात पण मागे काहितरी वेगळचं दडलय की काय असं वाटतं..

रस्ते चुकणे, पार्किंग शोधणे असे सगळे नेहमीचे प्रकार करत आम्ही एकदाचे त्या पब मधे जाऊन पोचलो. पार्टीच्या वेळेपेक्षा जरा जास्तच लवकर पोचल्याने तिथे त्या वेळी काहिच चालू नव्हतं. सो त्याच्याच शेजारी असलेल्या एका फिरंगी पब मधे गेलो. तिथे लाईव्ह बँड चालू होता. म्युझिक एकदम छान होतं.. आमची जनता पण एकूण खुष झाली आणि त्यांचं पेयपान ही एकीकडे चालू झालं.. मी आणि माझा मित्र स्प्राईट पित त्यांना कंपनी देत होतो.. Happy पेय आणि गाण्यांबरोबर पार्टीचा रंग हळूहळू चढत होता.. तिथे हॅलोवीन बॅश असल्याने बँड पण एकदम उत्साहात होता.. २/३ ड्रिंक्स झाल्यावर सगळ्यांना परत देसी पार्टीची आठवण झाली आणि आम्ही एकूण रागरंग बघायला त्या जागी परत आलो. त्यावेळपर्यंत इकडचा माहोल एकदम बदलला होता.. आता तिथे चांगलीच गर्दी झाली होती आणि गाणी पण जोरदार सुरु होती. लोकांच्या पोटात गेलेल्या पेयाचा परीणाम होऊन सगळ्यांची पावलं गाण्यांवर थिरकायला लागली होती... माझा रूमी अगदी टिपीकल नॉर्थी असल्याने त्याचं पार्टी-शार्टी / डान्स- वान्स एकदम जोरात चालू होतं.. Happy भुतापेक्षा ही डान्सफ्लोअरला भिणार्‍या आणि ड्रिंक्स न घेणार्‍या मला वास्तविक तिथे करण्यासारखं काहीच नव्ह्तं. पण मित्र मंडळींबरोबर टाईमपास आणि "इकडे तिकडे चोहीकडे" बघणे ह्यात वेळ छान चालला होता.. आमच्या जनतेच्या ड्रिंक्सची लेव्हल पण बियर सोडून वर गेली होती आणि त्याची पातळी डोक्यातही वर वर जात असल्याने एकूण मजा मजा चालली होती. लोकाग्रहास्तव मीही १/२ वेळा डान्सफ्लोर वर जाऊन आलो पण एकूण माझे रंग बघता त्यांनी मला आग्रह करणं सोडून दिलं.

दरम्यान तिथे एक एबीसिडी ग्रुप आला..चाळीशीच्या आसपासच्या स्त्रिया आणि पुरुषांचा हा ग्रुप अगदी साड्या, कुरते वगैरे ट्रॅडिशनल अवतारात आणि ते सगळे जणं बोलण्याचालण्या वरून अगदी "क्युल" वाटत होते.. ! आमची मित्र मंडळी जिकडे नाचत होती त्याच्याच आसपास त्यांचाही नृत्याविष्कार चालू होता.. रात्रीचे अडीच वाजले आणि पार्टी संपायला अर्धाच तास उरला.. तो पर्यंत माझा रूमी बराच हाय झाला होता.. आणि त्यामुळे आपण आता निघावं असं माझा मित्र मला येऊन सांगून गेला.. पण नंतर अचानक अर्धाच तास राहिलाय सो ३ लाच जाऊन असं ठरलं.. दरम्यान तो देसी ग्रुप आणि आमचा ग्रुप सगळे एकत्र नाचायला लागले... त्यातल्या एक बाई फारच उत्साहात येऊन माझ्या रूमी बरोबर नाचायला लागल्या.. बघता बघता ते मर्यादेपेक्षा जास्तच जवळ येत गेले आणि अचानक त्या बाईंनी "मला उचल" असा आग्रह माझ्या रुमीला सुरु केला.. त्यानेही तो तात्काळ मान्य करुन प्रयत्न केले आणि ते दोघेही खाली पडले.. एकूण प्रकार जरा अवघड होणार हे (बहूतेक) त्याच्या लक्षात आल्याने तो तिथून दुर गेला.. त्या बाईंच्या नवर्‍याने त्यांना उचलून काही बाही प्रकार केले.. एकूणात त्या बाईंचं वागणं मला तरी फारच डेस्पो वाटतं होतं. नंतर लक्षात आल्यावर त्या परत माझ्या रूमी ला शोधायला लागल्या आणि तो सापडल्यावर परत त्यांचं नाचणं सुरू झालं ते शेवटपर्यंत .. मला त्यातल्या काही स्टेप्स आणि तो सगळा प्रकारच बर्‍यापैकी हिडीस वाटला.. नंतर गाणी बंद झाल्यावर सगळ्यांचं एकमेकांच्या गळ्यात पडून "इट वॉज सो नाईस.. सो क्यूल" वगैरे करून झालं.. आमच्या ग्रुप ने माझ्या रूमी ला त्याच्या डान्सिंग "स्कील्स" करता डोक्यावर घेतलं... नंतर गाडीतून घरी परतताना भ, फ च्या सर्व बाराखड्या वापरून त्या बाईंना, नवर्‍याला आणि फॉर दॅट मॅटर जे काय सुचेल त्या सगळ्याला शिव्या घालून झाल्या.. !! मला सगळ्या प्रकरात नक्की काय रिअ‍ॅक्ट व्हावं हेच कळेना कारण मुळात मला नक्की काय होतं ते कळत नव्हतं..
तो सगळा प्रकार बघून मला कल्चरल शॉक बसला होता ?? पण त्यासाठी काही मी अमेरीकेतल्या पब मधे पहिल्यांदा गेलो नव्हतो...
देसी बाईच्या जागी फिरंगी बाई असती तर परिस्थिती बदलली असती ? कदाचित नाही !
मग झाल्या प्रकाराची पूर्ण शुध्दीत असलेल्या माझ्या मित्रासकट सगळ्यांनी केलेली भलावण मला आवडली नव्हती? कोणी काय एंजॉय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.. माझ्या अपेक्षांचा संबंधच कुठे येतो??
माझ्या रूमी ची भाषा मला खटकली होती? ते ही नसावं कारण मी काही त्याच्या तोंडून वल्गर गोष्टी पहिल्यांदाच ऐकत नव्हतो..
की मग सगळं जग एंजॉय करत असताना न पिणारा आणि डान्स फ्लोअर वर न जाणारा मीच एकटा करंटा ! ह्याची मला खंत वाटतं होती ? पण ती ही शक्यता कमीच होती कारण ही सिचुएशन पण पहिल्यांदा आली नव्हती... अँड इट वॉज नॉट माय कप ऑफ टी.. वास्तवीक माझा रूमी, त्या बाई, आमच्या ग्रुप मधली बाकीची मंडळी, त्या डान्स फ्लोअर वरची इतर मंडळी ह्या कोणालाच त्या प्रकाराबद्दल काही वाटत नसताना माझ्या सारख्या बाहेर बसून मजा बघणार्‍याने त्याबद्दल काही विचार करायचा आणि काही खटकण्याचा संबंधच नव्हता..

पण तरीही परतीचा वाटेवर ना मी काही ऐकू शकलो ना काही बोलू शकलो...

डंकीन मधे बसून विचार केल्यावर सहज जाणवलं.. आपण एखादं चांगलं मासिक वाचतो, चांगल सिनेमा पहातो, एखाद्या चांगल्या बुफे ला जातो.. पण कधी कधी त्यातला एखादा लेख, एखादं प्रसंग/ गाणं, एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही म्हणून संपूर्ण गोष्टीचा आनंद का घालवा... खटकलेला अर्धा तास सोडून वाढदिवसाच्या दिवशीचे खूप आनंदात गेलेले बाकी साडे- तेवीस तास परत एकदा आठवत मी डंकीन मधून बाहेर पडलो.. Happy

इतरत्र प्रकाशित... Happy

विषय: 
प्रकार: 

अडम, चांगलं जमलंय. मी लिहिणारच होते की 'कदाचित तो तुझा कप ऑफ टी नसावा, पण ते तू ऑलरेडी म्हणून गेलायस.

कल्चरल शॉक असं नाही. पण जे बुद्धीला पटत नाही ते नाहीच. मग ती बाई देसॉ/नॉन देसी असती तरी काय फरक पडला असता.
मला मुळात पबचं वातावरण आवडतच नाही फारसं. लाऊड म्युझिक, त्यात सिगरेटचा नी दारुचा मिश्र वास. कुणाशी दोन शब्द बोलायचीही सोय नसते.

आपल्या आवडी निवडी हा बर्‍याचदा सवयीचा परिणाम असतो मित्रा. आणि नंतर तो इगोचा भाग बनत जातो हळूहळू. सापेक्षतावादाचा सिद्धांत इथेही लागू पडतोच.

आपल्याला आवडणारी / पटणारी गोष्ट बर्‍याचदा दुसर्‍याला नावडणारी / आजिबात न पटणारी असते ना, तेव्हा मी त्याला रॉन्गली / डिफरन्टली प्रोग्रामड् मानतो. हा एक सोपा मार्ग आहे स्वतःला समजवायचा. Happy

आयुष्य खूप सुंदर आहे मित्रा, नको अश्या मामुली गोष्टी मनावर घेउस. Belated Happy Birthday...

चांगलं लिहिलं आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या मते आपण मनुष्य म्हणून ज्या दिवशी या जगात जन्माला आलो तो दिवस आपल्यासाठी खरचं चांगला म्हणून मग तो दिवस साजरा करायचा. ८४ लक्ष योनीप्रवासातून आपल्याला मनुष्य जन्म मिळतो यावर जर विश्वास ठेवला तर नक्कीच या दिवसाचे महत्त्व पटेल.

पण कधी कधी त्यातला एखादा लेख, एखादं प्रसंग/ गाणं, एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही म्हणून संपूर्ण गोष्टीचा आनंद का घालवा... >>> you said it! Happy ह्याला म्हणतात postive thinking!

बिलेटेड हॅपी बर्थडे Happy बी ला १००० मोदक.
अडम, नको जास्त विचार करु ! व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्यामुळे एखाद्या घटनेला प्रत्येकाचा रिस्पॉन्स, रिअ‍ॅक्शन वेगळी असते.

वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा..:)
छान लिहिलं आहेस.. मैफिल एकट्यानेपण एन्जॉय करायला शिकलं ना तर अशा गोष्टींचा त्रास होत नाही..:)

तगमग पोचली अ‍ॅडम. असे अनेक अनुभव येतात ज्यात आपण बघे असतो पण जे चाललय ते समोर दिसतं पण कुठेतरी आत काहीतरी काटा बोचल्यासारखं रुतत असतं.

वाहादिशु (उशीराने) Happy

मैत्रेयी- बदललं. Happy

मस्त Happy मला एकूण प्रसंग कल्पनेने डोळ्यासमोर आला अन तुला बसलेला शॉक पण! Proud Happy
रैना वाहिशु मधला हि म्हणजे काय?

वाहिशु मधला हि म्हणजे काय?
>> मध्यम पदलोपी समास - मियांकी ( टांग ) तोडी सारखा Happy वादिहाशु -> वाहिशु ! हाय काय नी नाय काय
विशिष्ट शहरात मराठी शिकलेलीस का मै Proud

उशीरा का होईना, वाढदिवसाच्या शुभेच्छा.

<<देसी बाईच्या जागी फिरंगी बाई असती >>
तसे काही नसते. माणसे सगळीकडे सारखीच. फिरंगी बायका सुद्धा सोज्वळ, शालीन असतात.

बिलेटेड हॅपी बर्थडे!!
त्यादिवशी फोन करायचा राहुनच गेला.

छान लिहिलंय.
>>
की मग सगळं जग एंजॉय करत असताना न पिणारा आणि डान्स फ्लोअर वर न जाणारा मीच एकटा करंटा ! ह्याची मला खंत वाटतं होती ? पण ती ही शक्यता कमीच होती कारण ही सिचुएशन पण पहिल्यांदा आली नव्हती... अँड इट वॉज नॉट माय कप ऑफ टी.. वास्तवीक माझा रूमी, त्या बाई, आमच्या ग्रुप मधली बाकीची मंडळी, त्या डान्स फ्लोअर वरची इतर मंडळी ह्या कोणालाच त्या प्रकाराबद्दल काही वाटत नसताना माझ्या सारख्या बाहेर बसून मजा बघणार्‍याने त्याबद्दल काही विचार करायचा आणि काही खटकण्याचा संबंधच नव्हता.. >>
या परिच्छेदात , शेवटच्या वाक्यात मलातरी होलियर दॅन दाउ सूर जाणवला अन खटकला देखील.

ढदिवस हा वर्षातला एका असा दिवस असतो की ज्या दिवशी तुमचं स्वतःचं काही कर्तुत्व नसताना उगीच तुमचं भारी कौतूक केलं जातं >>>>>>>>>>>> अगदी अगदी Happy

मला वाटते आपण माबो कर मिळून अ‍ॅडम चा पुढचा वाढदिवस, सकाळी त्याला उटणे लावून आंघोळ घालून, पाटावर बसवून ओवाळून नि हातात एक पेढा देऊन करू या. मग तो आधी देवाला नि मग आपल्याला सर्वांना खाली वाकून नमस्कार करेल. मग आपण त्याला नवीन टोपी, नवीन सदरा नि नवीन खाकी अर्धी चड्डी देऊ. मग तो परत आपल्याला सर्वांना खाली वाकून नमस्कार करेल. दुपारी जेवायला त्याच्या आवडीचा पदार्थ करू! मग संध्याकाळी त्याला पेशवे पार्कत नेऊन भेळ देऊ. रात्री आठ वाजता त्याची झोपायची वेळ. न चुकता नवीन टोपी, सदरा नि चड्डी काढून घडी करून ठेवायला सांगू! नि मग त्याने झोपायचे!

दुसर्‍या दिवशी सकाळी त्याला 'असा झाला माझा वाढदिव॑स' हा निबंध लिहायला लावू!

Pages