दुरितांचे तिमिर जावो...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात....

ह्या फोटोबरोबर काय लिहावं हे सुचत नव्हतं खरं तर. ते इतक्या आपसूक आणि अशा तह्रेने सुचेल असं वाटलं नव्हतं मात्र! दुरितांचे तिमिर जावो हे शीर्षक फोटोला दिलं खरं, पण त्याचा अर्थही उमगायला थोडीफार मदत झाली असं मानायला हरकत नाही. Happy

प्रामाणिक टीकेच्या पलिकडे जाणार्‍या आणि कारण नसताना, पाय ओढणार्‍या, वैयक्तिक भ्याड हल्ला वाटेल अशा बोचर्‍या मुक्ताफळांचा कंटाळा येऊन काल विपू आणि रंबे बंद करुन टाकली होती. हे काही एकदाच झालेलं नाही, पण ह्या वेळी खरच वैताग झाला होता माझा! पण आज, पुन्हा एकदा सुरु करतेय ते माझ्या मायबोलीवरच्या स्नेह्यांच्या पाठबळावर, आणि खुद्द अ‍ॅडमिन ह्यांचेही मेल आले म्हणून. सगळ्यांच्या पाठिंब्याने खूप खूप भरून पावले! Happy मनापासून बरं वाटलं.

प्रामाणिक टीकाकारांचे स्वागतच आहे, पण कंपूबाजी करुन उगाच पाय ओढणार्‍या आणि त्रास देणार्‍यांबद्दल काय म्हणू शकते? दुर्लक्ष करणे हाच उपाय आहे बहुधा.

दुरितांचे तिमिर जावो, अशी इच्छा व्यक्त करुन आणि आणि जे खळांची व्यंकटी सांडो, असे म्हणून पुन्हा एकदा सुरुवात करते. Happy

विषय: 

वाह!

आयटे फोटो छान आहे पण प्रामाणीकपणे सांगायचे तर मागे तू एकदा पणतीचा फोटो टाकला होतास तो अप्रतिम होता. यात ती मजा नाही आली. खरे तर तूझी तळटीप वाचुन लिहावे की नाही या विचारात होतो पण तरी खरा अभिप्राय तुझ्यापर्यंत पोचवावासा वाटला. Happy

काय झालं? असो ते काही नविन नाही, तिमिराचे दुरित जाईल पण दुरितांचे तिमिर जाणं अवघड आहे काराण आधीच उजेड आहे जिथे तिथे.:)

अस मनावर घेउ नको, कुणी कुणासाठी काही करत नाही, आपल्याला ज्यातुन आनंद मिळतो ती गोष्ट आपण करावी लोकांना ज्यातुन आनंद मिळतो ती त्यांना करु द्यावी.

सगळयांचे धन्यवाद.
केपी, प्रामाणिक मत सांगितलंस त्याबद्दल धन्यावद.
सत्त्या, हो, खरं आहे. Happy

झकास !
आऊट ऒफ़ फ़ोकस असलेल्या दिव्यांच्या माळेने मजा आणली.
दिव्याच्या ज्योतीजवळ जो अनफ़ोकसड दिवा आणि उभी जाड लाईन आली आहे...ती काढली तर अजून मजा येईल.
तरीही फ़्रेम आणि कन्सेप्ट आवडली. Happy

hi shailja,
your all photowork is superb.....! I like it 2 much. thanx for the all the work. Good Luck.

hi shailja,
your all photowork is superb.....! I like it 2 much. thanx for the all the work. Good Luck.