मतदान तीन ते पाच दिवस चालेल का?

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

दर निवडणुकीला हमखास चर्चा होते ती वेग्वेगळ्या मतदार संघातील कमी- अधिक मतदानाची! अन त्याहुन जास्त चर्चा होते ती एकुण कमी टक्केवरीची! हा टक्का वाढवायचा असेल तर मतदानाची वेळ एक दिवसा ऐवजी तीन ते पाच दिवस नाही का करु शकत?
१) एक तर मतदान अन मतमोजनीत ९ दिवसांचे अंतर ठेवुन, झटपट निकालाची अपेक्षा आयोगाने गुंडाळुन टाकलीय.
२) मतदानाची तारिख निस्चित करताना आयोग, त्यांना सोयीस्कर वाटेल ती तारिख घेते. जनतेच्या सोयीचा फारसा विचार होत नाही. कारण कधी कधी भर उन्हाळयात वा भर पावसाळ्यात मतदान उरकले जाते. फक्त सण, शाळा, अभ्यास ई चा थोडा ढोबळ विचार होतो. वैयक्तीक अडचणींचा विचार होत नाही.. समजा एखाद्याला परगावी, परदेशी, जाणे अटळ आहे, किंवा अचानक बाहेर जावे लागले..इ.
३) तीन ते पाच दिवस मतदान म्हणजे....
अ) सद्य स्थितीप्रमाणे एक दिवस जनरल एलेक्शन, जे सर्व गावा वाड्या वस्त्यांवर होते ते.
ब) अन पुढील दोन ते चार दिवस फक्त ठराविक ठिकाणे, जसे जिल्हा परिषद गटाचे मुख्यालय, तालुक्याचे ठिकाण वा जिल्ह्याचे ठिकाण वा इतर महत्वाची शासकिय ठिकाणे, जिथे सुरक्षेचे पुरेसे निकष लागु होत असतील.
क) मतदानासाठी ओळखपत्रांची पुर्तता पुर्वीप्रमाणेच!

अन मग ह्या पाच दिवसा नंतर सहाव्या वा सातव्या दिवशी सर्व पेट्या/ यंत्रे एकत्र करुण निकाल लावणे.

म्हंजे त्या एक दिवशी जर कोण उपलब्ध नसेल तर..... ह्या पाच दिवसात एक दिवस नक्कीच उपलब्ध असेल!

-- सध्या सरकार एक दिवस सुट्टी देते..एक महिन आगावु माहिती असते हे मान्य करुनही, अनेक लोक कामानिमित्त मतदान करु शकत नाहीत! त्यावर हा उपाय होउ शकतो का?

प्रकार: 

मतदानाची टक्केवारी कमी आहे याचे गैरसोय हे एक कारण असेल तर या उपायाने काही फरक पडू शकेल. बाकी मतदारांची उदासीनता इ. कारणांना याचा उपयोग होणार नाही.
अमेरिकेत असे मुख्य निवडणूक दिवसाच्या आधी ठराविक ठिकाणी जाऊन मतदान करता येते. तू 'पुढील दोन ते चार दिवस' लिहिले आहेस त्याऐवजी ते आधीही घेता येईल. म्हणजे मुख्य इलेक्शनचा दिवस संपला की मतदान बंद.