इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
२.४ लिटर्स वाली जुनी टाटा
२.४ लिटर्स वाली जुनी टाटा सफारी पांढरा हत्ती म्हणून ओळखली जायची. खूप मेंटेनन्स. रनिंग कॉस्ट जास्त. मायलेज फार बरे नाही. पण तरी ती आवडणारे अनेक लोक होते. १० लाखांच्या आसपास एसयुव्ही चे समाधान देणारी ऐसपैस गाडी.
नवीन २.२ लिटर्स वाली व्हीव्हीटी सफारी म्हणजे आधीच्याच सफारीचे रिफाईन्ड व्हर्जन. आधीचे बल्की लुक्स थोडे रिवर्क करून डायनॅमिक केलेत. इंजिन किंचित लहान करून नवीन व्हीव्हीटी तंत्रज्ञान वापरून फ्युएल इफिशिएन्सी वाढवण्यावर आणि मेंटेनन्स कमी करण्यावर भर दिला. सर्व्हिस इंटर्व्हल्स अर्थातच वाढले. शिवाय एक्स्टेंडेड गॅरंटी इंट्रोड्युस करून घेणार्याला 'प्रॉमिसिंग डील' वाटेल असे केले.
हेच इंजिन नवीन 'टाटा आरिया' ला वापरले आहे. टाटा आरिया मी अजून चालवली नसली, तरी २.२ वाली नवीन सफारी आमच्या घरातच आहे. तिचे मायलेज १४ ते १४.५ किमी प्रतिलिटर. म्हणजे छोट्या पेट्रोल कारपेक्षाही परवडेबल!
'आरिया' हे टाटाचे क्रॉसओव्हर व्हेईकल आहे. माझ्या मते, इनोव्हाशी त्याची तुलना होणार नाही.
सहा एयरबॅग्ज, जीपीएस, फोर व्हील ड्राईव्ह, अत्याधुनिक इंटिरीअर्स, चिल्ड ग्लोव्हबॉक्स यांसारखे टाटांनी पहिल्यांदाच दिलेले फीचर्स >> हे ज्ञानेशने सांगितलेले आहेच. पण इनोव्हाशी तुलना होणे साहजिकच आहे. कारण एमयुव्ही म्हणून या गाडीचा उपयोग होणारच आहे. एमयुव्ही-कम-एसयुव्ही या नवीन कन्सेप्टसाठीच त्यांनी 'क्रॉसओव्हर' ही संज्ञा वापरली आहे. टाटांनी सध्या प्रचंड एस्टॅब्लिश असलेल्या इनोव्हाशी थेट पंगा न घेता, इनोव्हाच्या होऊ घातलेल्या ग्राहकांसोबतच, नवीन प्राईस स्लॉट ठेऊन थोडा नवीन सेगमेंट डिग-आऊट करण्याचा प्रयत्न केला आहे, इतकेच. (इनोव्हा १२-१३ लाख. आरिया १५-१७ लाख). टाटांनी केलेले आजपर्यंतचे सर्वात लक्झरियस इंटेरियर, भरपूर जागा, मस्त आणि भव्यतेचा फील देणारे लुक्स, सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना आणि अत्याधुनिक फीचर्सचा विचार करता इनोव्हापेक्षा २-४ लाख रुपये जास्त द्यायला खरेच हरकत नसावी. शिवाय एसयुव्ही सेगमेंटचा विचार करता मारूती व्हिटारा (१६लाख), शेवर्ले कॅप्टिव्हा (१८-२० लाख), फोर्ड एन्डीव्हर (१९-२१ लाख), फॉर्च्युनर (२२-२३ लाख) या गाड्यांशी निर्णय घेणारा तुलना करेलच. यांचा विचार केला तर ४-५ लाख कमी किंमत असणारी, लक्झरियस एमयुव्ही म्हणून आणि एसयुव्ही म्हणूनही वापरता येणारी आरिया ही टाटांनी मार्केटमध्ये केलेली 'स्मार्ट मुव्ह' आहे, असं म्हणायला हरकत नाही.
गिरीश, हार्दिक अभिनंदन आम्हा
गिरीश, हार्दिक अभिनंदन आम्हा सगळ्यांकडून.
हॅपी मोटरिंग!
ज्ञानेश, अरे बीट्चे मागचे सीट्स लहान वाटत असले, तरी तसे नाहीत. आयटेन, रिट्झ किंवा ए-स्टार यांच्या बॅकसीट्स इतकीच जागा बीटमध्येही आहे.
मागच्या खिडक्या लहान - हे प्रकरण तर अनेक सेदान आणि लक्झरी कार्समध्येही दिसते. खरे तर हा प्रॉब्लेम नाहीच, असं माझं मत.
अहो जाहो नको प्लीज. अवघडल्यागत वाटते रे.
इटिऑस ही 'प्रॅक्टिकल सलून'
इटिऑस ही 'प्रॅक्टिकल सलून' (किंवा इकॉनॉमी सेदान) म्हणून मार्केटमध्ये आली आहे. तिची तुलना स्विफ्ट डिझायर, इंडिगो मांझा यांच्याशी होईल. सिटी, फियेस्टा, लिनिया, वरना, एसेक्स४ यांच्याशी नाही.
पण १.५ लिटर्सचे इंजिन.. चांगला परफॉर्मन्स.. चांगले मायलेज.. सेदान कारचे लुक्स.. ७ लाखाचा प्राईस स्लॉट.. गुड डील!
एस्टिलो घेऊ नये, असे माझे मत. त्यापेक्षा वॅगन आर किंवा आणखी काही हजार टाकून ए-स्टार घ्यावी. (एस्टिलो, ए-स्टार, वॅगन आर, अल्टो-के१० या चारही गाड्यांना एकच इंजिन आहे. मारूती महान आहे.)
केदारला अनुमोदन. पण सिव्हिक,
केदारला अनुमोदन.
पण सिव्हिक, करोला आल्टिस यांच्या बाबतीत हा प्रकार थोडा तरी कमी आहे. कारण त्यांची किंमत १३-१४ लाखापर्यंतच आहे. पण जेट्टा, सुपर्ब, किझाशी (१६ ते १८ लाख) यांच्याबाबतीत केदार म्हणतो तसा थोडासा प्रकार आहे. आणि अॅकॉर्ड, कॅम्री, टीएना (२०-२५-२८ लाख)- यांच्याबाबतीत तर तो जरा जास्तच आहे. इतके पैसे देऊन काय मिळवतो, याचा खरेच नीट विचार केला पाहिजे. 'स्टेटस सिंबॉल' म्हणून पैशांची पर्वा करायची नसेल, तर प्रश्नच मिटला.
पण केदार व्हेंटो, सिटी, फिएस्टा, लिनिया, एसेक्स४, वरना या गाड्या भारतात मिडसाईझ सेदान कार्स म्हणून; तर सिव्हिक, करोला आल्टिस, जेट्टा, सुपर्ब, किझाशी, क्रुझ इ. गाड्या त्या तुलनेत मोठ्या आणि उच्चवर्गीय मानल्या जातात. थोडक्यात अधिक 'स्टेटस' वाल्या. यांची इंजिनेही मोठी आहेत. त्यामुळे तुलना होत नाही. करायचीच झाली तर आपण घालवत असलेल्या पैशाची, आणि मिळवत असलेल्या मोबदल्याची होईल.
त्या तुलनेत- शेवर्ले क्रुझ (१५-१६ लाख) ही गुणची गाडी हा अगदी प्रॅक्टिकल अँड पॉवरफुल ऑप्शन आहे- असे वाटते.
'टाटा प्रायमा' ही गाडी या सगळ्यांना थुफो उत्तर ठरावे, अशी इच्छा आहे.
साजिरा! कधीही इथे आले की
साजिरा! कधीही इथे आले की तुमच्या माहितीपूर्ण पोस्ट वाचत राहव्याशा वाटतात. इतकी टेलरमेड उत्तरे प्रोफेशनल्सदेखील देत नसतील. खूप धन्यवाद. तुमचे मार्गदर्शन असेच चालू राहू दे हीच इच्छा..
साजिरा धन्यवाद.........
साजिरा धन्यवाद......... !!!!!!!
मेबॅक / फेरारी या चांगल्या
मेबॅक / फेरारी या चांगल्या गाड्या आहेत.
एस्टिलो घेऊ नये, असे माझे मत.
एस्टिलो घेऊ नये, असे माझे मत. त्यापेक्षा वॅगन आर किंवा आणखी काही हजार टाकून ए-स्टार घ्यावी. (एस्टिलो, ए-स्टार, वॅगन आर, अल्टो-के१० या चारही गाड्यांना एकच इंजिन आहे. मारूती महान आहे.)
या गाड्यांपेक्षा शेवीची स्पार्क डोळे झाकून घ्या..
बास का राव आम्ही लिवल्यावरच
बास का राव
आम्ही लिवल्यावरच इंट्रेस जातो का राव..
( का तुमचा इंट्रेस संपल्यावर आम्ही लिवतो ?)
साजिरा! कधीही इथे आले की
साजिरा! कधीही इथे आले की तुमच्या माहितीपूर्ण पोस्ट वाचत राहव्याशा वाटतात. इतकी टेलरमेड उत्तरे प्रोफेशनल्सदेखील देत नसतील.
अगदी हेच म्हणतो. मला नाही वाटत मराठीत इतकी चांगली माहिती नेटवर कुठे मिळत असेल !
मनःपूर्वक आभार, साजिरा.
अल्टो के१० कशी आहे. कोण
अल्टो के१० कशी आहे. कोण वापरतय का?
साजीर्या, वॅगनार ३ सिलेंडर
साजीर्या,
वॅगनार ३ सिलेंडर इंजन व स्पार्क ४ सिलेंडर.
यातिल फरक सांगावा.
त्याचा मायलेजवर काय परिणाम होतो?
इतर काही गुण दोष असतिल ते विषद करावे.
३ सिलेंडर आणि ४ सिलेंडर एक
३ सिलेंडर आणि ४ सिलेंडर
एक वजन तीन जणांनी उचलणं आणि चार जणांनी उचलणं यात फरक असेल तोच. सिलेंडर जितके कमी तितकी डिस्प्लेसमेंट लेंग्थ वाढते परिणामी पॉवर स्ट्रोकमधलं अंतरही ! त्याचा इंजिनच्या साइझवरही परिणाम होतो.
इतकी माहीती होती ती दिली... वेटिंग फॉर एक्सपर्ट
मला वॅगन आर घ्यायची इच्छा
मला वॅगन आर घ्यायची इच्छा आहे. आम्ही दोघे, एक छोटा मुलगा, प्रसंगी आइ- आणि सासरे. मला पेट्रोल, गॅस, डिझेल, यावर चालणारी आसे पर्याय सुचवा. तसेच मुलूड जवळिल डिलर, किंमतीचा अंदाज कोणी देवु शकाल का? तसेच नवीन घ्यावी की second hand?
आम्हाला गाड़ी घ्यायची आहे. पण
आम्हाला गाड़ी घ्यायची आहे. पण दोघनाही अजुन चलवाता येत नहीं, त्यामुले शिकन्यापसून सुरुवात आहे, त्यामुले नविन गाड़ी घेतेना ज़रा भीती वाटतेय, त्यात दोघं ही गाड़ी ह्या बाबतीत अक्कल नसलेले आहोत.
त्यामुले माहितीची गरज आहे.
१. पहिली गाड़ी नविन घ्यावी की सेकंड हैण्ड घ्यावी. हा प्रश्न गाड़ी चालवण्या बाबत अजुन कॉन्फिडेंस नहीं म्हणुन पडतोय.
२. हल्ली खुप गाड्या आहेत, त्यामुले नेमका कशाला प्रेफरेंस द्यावा काळात नाहीये.
३. स्माल कार घेण्याचा विचार आहे, पण जरा आउट ऑफ़ सिटी टूर्स पण तय गाडीने कराता याव्यात.
कोणती गाड़ी advisable असेल?
Chevrolet स्पार्क हा एक option डोक्यात होता
ह्या गाड़ी बद्दल जास्त माहिती मिलु शकेल का?
अर्ली सेडानच्या भानगडीत पडू
अर्ली सेडानच्या भानगडीत पडू नका. टाटाच्या अर्ली सेडान आणि हॅचबॅकचा विचार न केलेला बरा. फियाटचं इंजिन वापरून टाटाची गाडी घेण्यापेक्षा डायरेक्ट फियाटच घावी. विनाकारण खर्च. त्यापेक्षा लक्झरी हॅचबॅक घ्या. मिड साइझ सेडान घेत असाल तर खूप ऑप्शन आहेत. फियाट लिनियाचं डिझाईन खूपच डिसेंट आहे. परफेक्ट कार. कन्सेप्ट कार च्या जवळ जाणारी म्हणून होंडा सिटी खपतेय अजून.
तुम्ही सर्विस नेटवर्कला महत्व देणार असाल तर मग ह्युंदाई आणि मारूती इतकेच ऑप्शन उरतात. त्यात शेवर्लेची भर पडतेय. कारण तळेगावला त्यांनी प्रचंड गुंतवणूक केलीये आणि अजून करताहेत.
बजेट हा ही एक क्रायटेरिया असणारच.. स्मॉल कारच घेणार असाल तर स्पार्क डोळे झाकून घ्या.
ही गाडी म्हणजे माटिझचा मेकओव्हर आहे. एस टेक इंजिन, चार सिलिंडर्स आणि १००० सीसी. इंजिनचा आवाजही येत नाही. खूप स्मूथ आहे. एसी पॉवरफुल्ल आहे. इंटिरियर स्मॉल कारमधे सर्वात स्टायलिश आहे. बीज कलरची सुरूवात स्पार्कमुळेच झाली.
ग्राउंड क्लिअरन्स दणदणीत आहे. त्यामुळं वॅगन आर सारखं उंचावर बसल्याचा फील येतो. लांबच्या प्रवासालाही आरामशीर आहे. डिझाईन एरोडायनॅमिक आहे. सर्वात महत्वाचं ही अमेरिकन कार असल्यानं युरोप / अमेरिकेत मस्ट असलेले सेफ्टी फीचर्स आहेत. ४०% क्रॅश टेस्ट मुळे गाडी पलटी होऊनही कुणालाच काही न झाल्याची उदाहरणं आहेत. जपानी किंवा कोरियन गाड्यांमधे भारत आणि इतर बाजारपेठ असा फरक करतात. भारतात सेफ्टी स्टँडर्ड कडक नसल्याने इथं तुलनेने कमी टफ पत्रा वापरला तरी चालू शकतं. ४०% क्रॅश टेस्टमधे भारतात उतरवलेल्या गाड्या पास झाल्या नाहीत तरीही चालण्यासारखं असतं. गाडीचं वजन कमी झालं कि ती मायलेज जास्त देईल हा विचार त्यामागे असतो.
शेवीच्याच बीट पेक्षा ( क्लास वेगळा असूनही) स्पार्कच चांगली. सध्या हेवी डिस्काऊंट आहे. तीन वर्षे फ्री सर्विस आणि वॉरंटी आहे. ऑईलचाही खर्च नाही...
बी सेगमेंट मधे हवी असल्यास सरळ मारूतीची स्विफ्ट घ्या.
धन्स भिब्ररा, इतका डिटेल
धन्स भिब्ररा,
इतका डिटेल review दिल्याबद्दल ...... स्विफ्ट साधारण ५ लाख च्या पुढे आहे वाटत.....तो ही option चेक करेनच...मनापासून धन्यवाद
स्विफ्ट LXI एक जन ३ लाख ला
स्विफ्ट LXI एक जन ३ लाख ला ऑफर करत आहेत...गाड़ी २००७ ची अणि पेट्रोल मॉडल आहे.
ही किम्मत महाग आहे की ठीक आहे
गाडी ची condition चांगली आहे, असा मालकाच म्हनन आहे
आमचा नविन की सेकंड हैण्ड हा decesion न जाल्यामुले में सहजच option चेक करत होते, त्यात एकाने ही ऑफर दिली आहे ...मला कही काळात नसल्यामुळे पुन्हा confusion
wagon r vxi आणि chevi
wagon r vxi आणि chevi स्पार्क LS LPG या मध्ये कोणती गाड़ी घेणे चांगले..
आम्ही थोड्या rnd नन्तर साधारण हे दोन option शोर्ट लिस्ट केले आहेत, पण एक्सपर्ट review पाहिजे आहे.
स्पार्क ने सिटी average २० क्लेम केला आहे, तेवढा ती खरच देते का?
धन्स किरान्यके मी आधि चुकून
धन्स किरान्यके मी आधि चुकून भिब्ररा लिहिले होते अस मला आत्ताच दिसल
मीच भिब्ररा कुणीतरी स्पोर्टस
मीच भिब्ररा
कुणीतरी स्पोर्टस लक्झरी विचारलेलं.
आता मेसर्टी / मॅसर्टी आणतेय रेंज.
२००० सीसी च्या पुढच्या सुपर लक्झरी कार्सही रस्त्यावर दिअसतील लवकरच. विशेषतः तोंडात बोट घालायला लावणारं जर्मन इंजिनियरिंग एकदा लोकांना कळलं कि मग जपान / कोरिया या देशांच्या कार्सचं काही खरं नाही. लवकरच फोक्सवॅगची ब्ल्यू मोशन टेक्नॉलॉजी असलेली पसाट पुण्यातल्या रस्त्यांवर धावू लागेल.
'स्विफ्ट ' की 'आय २०' की
'स्विफ्ट ' की 'आय २०' की 'पोलो '?
मायलेजचा विचार करत असाल
मायलेजचा विचार करत असाल तर
बैलगाडी, हातगाडी, टांगा, बग्गी हे पर्याय पण आहेत
पुण्याच्या गल्लीबोळातून
पुण्याच्या गल्लीबोळातून चालवायची असेल तर अॅपेची तीनचाकी रिक्षा घ्यावी. मोठ्या मोठ्या गाड्या तिला अदबीने जायला वाट करून देतात ( अॅपे स्क्रॅचप्रूफ आहे
टच अप घरी केलं तरी चालतं )
जर्मन इंजिनियरिंग एकदा
जर्मन इंजिनियरिंग एकदा लोकांना कळलं कि मग जपान / कोरिया या देशांच्या कार्सचं काही खरं नाही.>>> शक्यता कमी आहे. अमेरिकेत गेली अनेक वर्षे पसाट, जेटा, बीटल या वोक्सवॅगन च्या कार्स मार्केट मधे आहेत (टोयोटा कॅमरी आणि होंडा अॅकॉर्ड च्या रेंज पेक्षा फार जास्त किमती नाहीत), तरीही तेवढ्या लोकप्रिय नाहीत. कॅमरी तर जवळजवळ गेली दहा वर्षे अमेरिकेत सर्वाधिक खपणारी कार आहे (कार्स मधे. येथे पिक अप ट्रक जास्त खपतात नाहीतर एफ-१५० सारखे).
मायलेजचा विचार करत असाल तर,
मायलेजचा विचार करत असाल तर, बैलगाडी, हातगाडी, टांगा, बग्गी हे पर्याय पण आहेत..
पुण्याच्या गल्लीबोळातून चालवायची असेल तर अॅपेची तीनचाकी रिक्षा घ्यावी. मोठ्या मोठ्या गाड्या तिला अदबीने जायला वाट करून देतात ( अॅपे स्क्रॅचप्रूफ आहे टच अप घरी केलं तरी चालतं )>>>>>>>>>>
हे मी विचारलेल्या प्र्शनाचे उत्तर होते का ???
किरण्यके, चांगली माहिती देत
किरण्यके, चांगली माहिती देत आहात. कॅरी ऑन.
गीतू, स्पार्कला प्राधान्य द्यावे, असं मला वाटतं. पण फक्त मायलेजचाच विचार करायचा तर वॅगन आर घ्या. मात्र कोणतीच गाडी शहरी वाहतुकीत २० वगैरेचे मायलेज देणार नाही, हे ध्यानात घ्यायला हवे.
याबद्दलची माहिती इथेच याआधीच्या पोस्ट्समध्ये येऊन गेली आहे.
बाळू, पेट्रोल की डिझेल? ते आधी ठरवायला हवंय.
साजिरू दोन्हीचीही तुलना सांग
साजिरू दोन्हीचीही तुलना सांग प्लीजच...
धन्स साजिरा.... मी ह्यात आय
धन्स साजिरा....
मी ह्यात आय १० चा पण विचार करतेय....
मी साधारन ५ ल च बजेत ठरव्ल आहे. ह्या बजेत मधे अजुन कोनते पर्याय आहेत????
फिगो आल्याला व अॅक्सिडेंट्ला
फिगो आल्याला व अॅक्सिडेंट्ला एक वर्ष झाले.( या बद्दल लळित लिहिणार नाही. ) इन्स्युअरन्स रिन्यू केला. एसी कँपला उद्या गाडी पाठविणार आहे. नव्या पॉलिसी बरोबर एक छान माहिती पत्रक आले आहे इथे लिहीन ते. हॅपी ड्रायविन्ग. फिगो ची पार्टस साठी एक्स्टेंडेड वारंटी पण घेतली आहे.
Pages