रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

चिंब पावसानं रान झालं आबादानी...

महानोरांनी किती सुंदर वर्णन केलंय पावसानं भिजलेल्या धरेचं! निसर्ग आपल्या अवतीभवती अनेक नयनरम्य कलाकृती घडवत असतो.

चिंब पावसानंतर श्रावणातली हिरवाई अलवार रंगातून निथळते. उमललेला प्रत्येक रंग जणू सांगत असतो,
रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा!

rangmazawegala.jpg

विषय: 

.

प्रकाशचित्राला दाद देणार्‍या सगळ्यांचे खूप आभार. Happy
अ‍ॅडम, तुझ्या प्रश्नावरुन तू स्वत:ही खूप फोटोग्राफी करतोस अस वाटत. Happy तुझेही फोटो पहायला खूप आवडतील, आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर, हो, हाच मूळ फोटो आहे, असाच. रंगांमधला Contrast हेच ह्या फोटोमधलं मला भावलेलं सौंदर्य, आणि तेच इथे मांडायचा मी माझ्या कुवतीनुसार प्रयत्न केलेला आहे.

पोपटी पानांवर फोकस केल्याने, बाकीची पानं, जी जुनी झाल्यामुळे काळपट हिरवी झाली आहेत, ती आऊट ऑफ फोकस होत असल्याने ब्लर दिसतात हे तुला ठाऊक असेलच. Happy तीच पार्श्वभूमी थोडी अधिक ब्लर केली आहे.

तेवढं स्वातंत्र्य प्रकाशचित्र काढणार्‍याला आहेच, म्हणजे मला! Proud

.

>>मत मी मांडू शकतोच ना.>>> हो मत मांडायला हरकत नाही, फक्त मांडायची आवश्यकता खरच असेल, तर मांडलं तर त्याला काही किंम्मत असते. हे IMO. Happy जसं विरोधासाठी विरोध करणारे असतातच की. असो.

>लाल ढग, शाईच्या निळ्या रंगाचं पाणी > हे ही निसर्गात दिसतं कधी कधी:) आणि तसही फेडररला काय फरक पडेल रे? Happy

ठिके वरचे प्रतिसाद उडवले आहेत.
वर लिहायचं होतं तस की छान म्हणायचं असेल तरच यावे.. बाकी काहीही विषयाला धरून असेल तरी लिहू नये.. निगेटिव्ह प्रतिक्रिया तर अपेक्षित नाहितच म्हणून... असो.
पु.फो. आणि चां.प्र. साठी शुभेच्छा.. !

असं मुळीच नाही अ‍ॅडम. तुला फोटो आवडला नसेल, काही चुकीचं वाटलं असेल तर जरुर सांग. उगाच तुझं मत खोडून काढलं म्हणून आदळ आपट आणि वर जे आरोप मागाहून केले आहेस, (मूळ पोस्टीत नव्हते म्हणून :P) ते करु नकोस. व्यवस्थित मत, सप्रमाण मांडता येत असेल तरच मांड. जरुर मांड, पण उगाच कारण नसताना विरोधासाठी विरोध करु नकोस, एवढंच. Happy मागेही माझे फोटो, चित्रं न आवडल्याचं, त्यातल्या चुका दाखवण्याचं काम माबोकरांनी केलं आहे. योग्य असेल तिथे मी मान्यही केलय.

तुझं दुसरं पोस्ट, ज्यात गल्लीमधेही टेनिस न खेळता मी फेडररच्या खेळासंबंधी बोलू शकतो वगैरे, हे केवळ हास्यास्पद होतं! Happy ते उडवलस, हे चांगलच केलस. थँक यू. Happy बरं, आता माझाकडून हे इथेच थांबवते. ह्यात काही अर्थ नाही. त्याऐवजी फोटो काढते! Happy

Pages