पोकळी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

खर तर शिर्षकच सुचत नाहीये. कदाचित याला पोकळीच म्हणता येईल. ज्याला बॉटम् नाही अशी पोकळी. गेले तिन दिवस जगभरात जे चालु आहे ती बहुतेक फायनान्शीअल पोकळीच. ९११ च्या पेक्षा मोठी, १९९३ च्या बॉम्ब ब्लास्ट पेक्षा मोठी पोकळी तयार झालीये. खुप खुप वेळ लागनार भरुन यायला. तसे पोकळी निर्मान व्हायला काही फार मोठे कारण झाले नाही. अचानक गेल्या १० दिवसांपासुन रिसेशन हा शब्द अमेरिकेत वांरवांर उच्चारला जातोय व त्याचे पडसाद भारतात, हाँगकाँग, जपान, चिन ईकडे उमटत आहेत. इंडेक्स २१२०० ते १६००० ते ही चार दिवसात गडगडला. ८ दिवंसापुर्वी निफ्टी ( भारतातील एक महत्वाचा इंडेक्स) ६३०० वर व बिऐसई सेंसेक्स २१२०० वर होता. एक नविन उच्चांक प्रस्थापित झाला होता. इतक्यावर गेल्यावर साधारन इंडेक्स थोडा गडगडतो व लो लेवल टेस्ट करतो म्हणुन ज्या दिवशी पहिलेंदा बाजार पडला त्या दिवशी लोकांनी परत एकदा दुसरे दिवशी वर जाईल या आशेने लाँग पोझीशन्स घेतल्या. पण वर जाण्या पेक्षा बाजाराने खाली जाने पसंद केले व ईतक्या खाली बाजार गेला की आसमंतात ऐक पोकळी भरन आली आहे जी पार करने निदान बजेट २००८ पुर्वी अशक्य आहे.
आज बाजारात लोअर सर्कीट लागल्यामुळे एका तासा साठी ट्रेडींग ससपेन्ड केले आहे. काल पर्यंत साधारण ६.५ लाख करोड रुंची संपत्तीची हाणी झाली आहे.
कुठल्याही सपोर्ट लेवलला मार्केट थांबायला तयार नाही. आत्ता लिहीतान ४५७८ ला मार्केट थांबले आहे. ऐक तासाने सुरु झाल्यावर परत काय होईल हे सांगता येत नाहीये. लाखो रुंचे नुकसान झाल्यामुळे लिक्वीडीटी नाहीये. सामान्य गुंतवनुकदाराचा विश्वास यामुळे उडनार, पण याच वेळेला खरे तर खरेदी करणे आवश्यक आहे. येत्या तिन महीन्यात कदाचित आपण परत एकदा बरेच वर साधारण ५३०० च्या (निफ्टी) आसपास असु.

माझ्या मित्राचे भारतातुन ई मेल आले की आता काय करु. तो निफ्टीवर लाँग होता त्याचे शब्द असे आहेत " हे ईमेल लिहीताना पण मला हाताच्या बोटातुन पाणी येईल की काय असे वाटत आहे. काय करावे हे सुचत नाही. गेल्या वर्षभरात जे कमावल त्या पेक्षा जास्त गेल्या ३ दिवसात गमावल"
कुठल्याही फ्युचर मध्ये जे नुकसान होते ते खरे नुकसान असते, पेपर मनी लॉस्ट असा प्रकार नसतो. तिथे मार्जीन ठेवावे लागते. निफ्टीचा ऐक लॉट हा ५० शेअर चा असतो. जर ४ दिवसांपुर्वी ऐक लॉट घेतला असता तर ५० X ६२०० ही किंमत आली असती आज तिच किमंत ५० X ४५८० आहे. (लिहीताना) म्हण्जे साधारण १६५० रु प्रती शेअर नुकसान. असे एका वेळी ५ ते ७ लॉट. रोज संध्याकाळी मार्जीन मनी काढुन घेतला जातो. यात जसा प्रॉफीट अनलिमीटेड असतो तसाच लॉसही.
पण ऑन बेटर नोट आज निफ्टी ४५०० ला विकत घेता येतो मग जर परत येत्या दोन तिन महीन्यात ५३०० पर्यंत आपण जात असु जर तो फायदा होनार म्हणुन निफ्टी फ्युचर मी वाचकांना घ्यायला सांगेन.

सर्व भारतीय गुंतवनुकदारांची या पेक्षा वेगळी काही अवस्था असेल असे वाटत नाही. त्याचा बाजारावरिल विश्वास कमी झालेला आहे. त्याला मेल लिहीताना हेच लिहीले की शेअर मार्केट चे खरे प्रिन्सीपल आहे bye low sell high. मार्केट पडल्यामूळे बाय लो हे सहज शक्य झाले आहे. गरज आहे विश्वास दाखविन्याची.

आज जर थोडे वर क्लोज झाले तर उद्या पासुन थोडी थोडी खरेदी करायला सुरु करायला हरकत नाही.
LNT, Reliance, RPL, NTPC, HDIL,DLF, ICICI, SBI, HDFC, RelCap, Relcom, BHEL हे माझ्या मते टॉप पिक्स आहेत.

जिम क्रेमर चे एका दिवशी ९८ मिलीयन डॉलर्सचे नुकसान झाले (२०००) त्याने विश्वास सोडला नाही, कदाचीत आपल्याल्या (माझ्यासहीत) त्या विश्वासाची गरज आहे.

No need to worry about West, eco growth at 8.9%: FM लेटेस्ट अपडेट.

प्रकार: 

पॉझिटिव्ह लिहिलं आहेस केदार.. या वेळी थोड्या विश्वासाचीच गरज आहे. बघू, आता उद्या बाय करू काहीतरी Happy
पण हे अमेरिकेतल्या बातम्या ऐकून आपलं मार्केट डाऊन होणं कधी थांबणार? Sad

खरय केदार. गेले काही महिने ज्या तर्‍हेने मार्केट वर जात होतं तेंव्हा हे असं काहीसं होईल याचा अंदाज आलाच होता. फक्त मार्केट कधी पडेल आणि ते देखिल असं, याची कल्पना नव्हती. आज सकाळी बातम्यांमध्ये जेंव्हा asian markets बद्दल सांगत होते तेंव्हाच थोडाफार अंदाज आला होता.

अर्थात, आज ना उद्या (फार फार तर ३- ४ महिन्यात) मार्केट परत मूळ पदाला जाणार यात शंकाच नाही. त्यामुळे फारसं घाबरून न जाता ही खरेदीची सुवर्णसंधी आहे असे मानावे, या मताचा मी आहे.

पूनम : जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेत आपण स्वतःला असे इतरांपेक्षा अलिप्त ठेवू शकत नाही. जगातील इतर महत्वाच्या शेअरबाजारांचा परिणाम हा आपल्या शेअरबाजारावर पण होणारच
--
अरूण

खरेदीचा दिवस आहे. neither FIs neither big invetsor can sit on the cash for long. Market fundamentals don't change overnight so if we believed that Indian economy is booming there is no reason to think otherwise today. इतरांप्रमाणे माझेही बर्‍यापैकि नुकसान झालेय पण वर्षभरात बुक केलेला फायदा बघता हे सहन करु शकतो. अर्थात केदार ने सांगितल्या प्रमाणे फंडामेंटली चांगलेच स्टॉक्स घ्यावेत

खरेदीचा दिवस आहे. neither FIs neither big invetsor can sit on the cash for long. Market fundamentals don't change overnight so if we believed that Indian economy is booming there is no reason to think otherwise today. इतरांप्रमाणे माझेही बर्‍यापैकि नुकसान झालेय पण वर्षभरात बुक केलेला फायदा बघता हे सहन करु शकतो. अर्थात केदार ने सांगितल्या प्रमाणे फंडामेंटली चांगलेच स्टॉक्स घ्यावेत

धन्यवाद केदार

काल मी अजय ला लिहीताना लिहीले होते की फेड कदाचित रेट कट करतील. काल जर ग्लोबल मार्केट पडले नसते तर फेड ने रेट कट केले नसते पण काल सेल ऑफ झाल्यामुळे फेड ने २५ बेसीस पॉईंटच्या ऐवजी ७५ ने रेट कट केला. मार्केट आता नक्कीच वर जानार.
आपल्याकडे आरबिआय पण निदान .५० ने रेट कट करेन ( येत्या १५ दिवसात असा माझा अंदाज आहे.) त्यामुळे बाजारात लिक्वीडीटी वाढनार व हाउसिंग मार्केट परत थोडे वर जाणार. डिलऐफ व ऐच्डिआयल वर नजर ठेवा.

पूनम अग जगातले सगळे बाजार हे ईंटर रिलेटेड आहेत कारण सर्व मोठ्या कंपन्या जगभर पसरलेल्या आहेत. ईंटेल व मॉर्गन स्टनले ने लॉस डिक्लेअर व सिटी बँक सुध्दा तोटा दाखविन्याच्या तयारीत असल्यामुळे जगभरात त्याचे प्रतिसाद उमटले. अमेरिकेत सध्या हौसींग मार्केट कोसळले आहे त्यामुळे हे लोक रिसेशन च्या गप्पा करत आहे. हॉसींग मार्केट हे चांगल्या ईकॉनॉमीचे ईंडीकेटर असते. घरबाधंनीवर हजारो उद्योग आधारित असतात त्यामुळे हा उद्योग फार महत्वाचा आहे.

भारतात गुंतवनुक करताना दोन गोष्टी लक्षात घ्यावा लागतील.
१. आयात निर्यात व परकिय ईकॉनॉमीवर भारत किती अवलंबुन आहे.
२. ऑरग्यॉनीक ग्रोथ. भारताची स्वत किती टक्याने प्रगती होते आहे. आपल्या साठी दुसरी बाब फार महत्वाची आहे. कारण आपण वेस्ट वर पुर्ण पणे अवलंबुन नाही आहोत. काही बाबतीत स्वयंपुर्ण आहोत व आपली स्वतची ईकॉनॉमी ही ९.५ टक्यांने ग्रो होत आहे. सर्व म्यॉन्युफॅक्चरींग कंपन्या ह्या निव्वळ नफ्यात आहेत. (नेट प्रॉफीट) त्यामूळे भारतासाठी काहीही फंडामेंटल चेंज नाहीयेत (सध्यातरी अजुन २ वर्षे) त्यामुळे भारतात बुल मार्केट हे राहानाराच. फक्त मध्ये हे स्पिड ब्रेकर्स आहेत ते आपल्याला टाळता आले पाहीजेत. यावेळी मात्र कोणालाही ते टाळता आले नाहीत.

आज गॅप अप ओपनींग होनार. डो ४६५ ने पडुन आत्ता लिहीताना १६५ ने वर आहे. भारत आज निदान ५०० ने वर जाणार पण दुर्दैव असे की काल मार्केट जोरात पडल्यामुळे सर्व लाँग पोझीशन्स ब्रोकरेज फर्म्सनी सेल्फ क्लीअरींग मध्ये क्लीअर करुन घेतल्या त्यामुळे सामान्य गुंतवनुकदाराकडे आत्ता लाँग पोझीशन्स नाहीत व ते खुप मोठ्या तोटयात आहेत. आज लाँग पोझीशन्स घ्यायच्या आधीच गॅप अप ओपनींग असनार पण आता लाँग पोझीशन्स घ्यायला काहीही हरकत नाही. वर्स्ट ईज ओव्हर.

केदार, मला तुझ्याइतके कळत नाही. तुझी माहिती छान आहे, पण आजच फेड ने ०.७५% ने ईंटरेस्ट रेट कमी केला..... इतका फक्त १९८२ च्या वेळेला केल्याचे वाचले. या पो़कळीने घरांच्या किमती पण खाली (जगात सर्वदूर) येणार नाहीत का?
आणि अमेरिके ची मंदी सगळ्या जगावर, अगदी भारतावर पण येते असे पूर्वीचे अनुभव आहेत न?

किमंती पेक्षा त्यावरील इंट्रेस्ट कमी होईल. ३० वर्षाचे कर्जावरचे व्याज पकडले तर नक्कीच ३० ते ४०००० डॉलर्स वा जास्तच फरक पडेल. त्यामुळे किमत थोडी (च) खाली येउ शकते पण व्याज दर कमी असल्यामुळे लोक घर घ्यायला तयार होतात त्याचा फायदा जास्त होतो. सध्या ईकडे घर विकली जात नाहीत कदाचित ह्या मोठ्या रेट कट मुळे लोक विकत घ्यायला तयार होतात. पण मुख्य फायदा तो नाही तर रेट कट मुळे मोठ्या वित्त कंपन्यान्या स्वस्त दरात जास्त पैसे उपलब्ध होतात व ते रोजच्या कर्जावर जास्त गुंतवनुक करु शकतात. ती गुंतवनुक बाजारात आली की बाजारात पैसा वाढतो व त्यामुळे लोक शेअर्स घ्यायला तयार होतात व मार्केट वर जाऊ शकते.

ह्यावेळेस अमेरिकेत मंदी जरी आली तरी त्याचा खुप तोटा भारताला होनार नाही कारण आधी लिहील्या प्रमाने ऑरग्यानीक ग्रोथ. पण बाजार मात्र पडनारच. कारण शेअर बाजार हा सेंटीमेंटस वर चालतो व्हॅल्यु वर नाही. RPL,RNRL Reliance power ह्यांचे तर उत्पादन्ही नाही पण लोक जास्त किमंत द्यायला तयार कारन सेंटीमेंट. त्यामुळे अमेरिकेच्या बातमी मुळे सार्या जगातील बाजार पडले.

आधी लिहील्याप्रमाने निफ्टी २२१ ने वर आहे व सेंसेक्स ७७७ ने वर आहे. बघु दिवसभर काय होते ते.

२२ तारखेच्याही खालि आहे मार्केट.. आत्ता मात्र खरच विश्वासाची गरज आहे

२२ तारखेच्याही खालि आहे मार्केट.. आत्ता मात्र खरच विश्वासाची गरज आहे

अरे मी थोडक्यात बचावलो. ४९०० नंतर मी ५४०० ला सर्व लॉट विकले व परत काही विकत घेतले. माझ्याकडे ५३०० चे ६ लॉट होते. शुक्रवारी लगेच लॉस बुक केला. नशीब म्हणुन ८०००० वरच भागल. नाहीतर आज वाट लागली असती. ४९०० मार्केट टेस्ट करनारच होत. आता मात्र मार्केटचे सर्व लेगस करेक्ट झालेत. लो लेवलला काल ४८१७ ला दोनदा सपोर्ट मिळालाय. दोन चार दिवस ट्रेड न करनेच चांगले.

सध्याची स्थिती पाहता खरेच खूप धाकधूक होते. किमान एक वर्षाचे horizon असूनही जरा भीतीच वाटते... २८०० ला आला reliance म्हणुन घेतला तर त्याने अजूनच बुडी मारली. jaiass चीही तीच गत झाली. सध्यच्या पोझिशनला अजून घ्यावे की गप्प बसावे असे तुला वाटते. अर्थातच् मी trading बद्दल नाहीच बोलत. एकूणच बाजाराबद्दल विस्ताराने लिहिलेस तर उत्तमच!