मायबोली गणोशोत्सव २००९ : स्पर्धा निकाल

Submitted by संयोजक on 17 September, 2009 - 00:05

मंडळी, आता आपण सगळे जण ज्याची आतुरतेने वाट पहात आहात तो कार्यक्रम म्हणजे स्पर्धांच्या निकालाची घोषणा. सर्वप्रथम स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या प्रवेशिकांना दिलखुलास दाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार.

सुरुवात करूया पाककला स्पर्धेपासून. यंदाच्या पाककला स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी स्विकारून ती पार पाडल्याबद्दल ह्या स्पर्धेच्या परिक्षक मायबोलीकर शोनू, कराडकर, मनुस्विनी आणि आर्च ह्यांचे संयोजकांतर्फे मन:पूर्वक आभार. परिक्षकांच्या मते ह्या स्पर्धेतले क्रमांक असे आहेत :

प्रथम क्रमांक : सखिप्रिया (sakhipriya) : वरणातला पास्ता
द्वितीय क्रमांक : लाजो (lajo) : ओरिगामी सुशी विथ मिंट डिपींग सॉस

ह्यावर्षी इतर सर्व स्पर्धांचे निकाल हे निनावी मतदानाने काढले गेले आहेत. स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे आहेत.

कायापालट - द मेक ओव्हर अर्थात विडंबन स्पर्धा
-----------------------------------------
कविता १ : रंग नभाचे
प्रथम क्रमांक : स्लार्टी (slarti) : पाचक हझल
द्वितीय क्रमांक : शरद पाटील (sharadpatil) : फसगत

कविता २ : कविता
प्रथम क्रमांक : कविता नवरे (kavita.navare) : ओझ्याचा बैल
द्वितीय क्रमांक : मृण्मयी (mrinmayee) : कार्टा

कविता ३ : वारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग
प्रथम क्रमांक : मृगनयनी (mriganayanee) : वारी चुकलेल्या पुढार्‍याचा अभंग
द्वितीय क्रमांक : कविता नवरे (kavita.navare) : महागाईग्रस्त मध्यमवर्गीयाचा अभंग

पर्यावरण : सकारात्मक आणि नकारात्मक अर्थात फोटोग्राफी स्पर्धा
-------------------------------------------------------
प्रथम क्रमांक : प्रकाश काळेल (prakashkalel) : वार्‍याची बात आणि पराक्रमाची की पापाची प्रतीके!
द्वितीय क्रमांक : चिऊ (chiuu) : इकोफ्रेंडली फोटो अल्बम आणि वॉटरपार्क

कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा
--------------------------------------------
प्रथम क्रमांक : विभागून
सुनिधी (sunidhee) : आरसा
माधवएम (madhavm) : प्रकाशाचे दूत
द्वितीय क्रमांक : अजय जावडे (ajayjawade) : पाऊस एक आशा

चित्रातल्या गोष्टी अर्थात लघूलेखन स्पर्धा
---------------------------------
प्रथम क्रमांक : स्लार्टी (slarti) : दिसते तसे नसते
द्वितीय क्रमांक : आशू_डी (aashu_d) : हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है !

आधी घोषित केल्याप्रमाणे लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेतल्या सर्वच प्रवेशिकांना विजेते म्हणून गौरविण्यात येत आहे.

सर्व विजेत्याचे मन:पूर्वक अभिनंदन ! विजेत्यांना त्यांची प्रशस्तीपत्रके इमेल द्वारे येत्या दोन ते तीन दिवसात पाठवली जातील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा! आजच्या दिवसाची सुरुवात छान करुन दिलीत्.धन्यवाद संयोजक + वाचक सगळ्यांनाच Happy आणि अभिनंदन इतरांचे Happy

अरे हो खरच chiuu "इकोफ्रेंडली फोटो अल्बम..." ला १२ मत आहेत आणि "इकोफ्रेंडली गणेश.. "ला ३ मत आहेत. निकाल लिहिताना नजर चुकिने झालं असावं असं. संयोजक इकडे लक्ष देणार का प्लिज?

सखिप्रिया, लाजो, स्लार्टी, शरद पाटील, कविता नवरे, मृण्मयी, मृगनयनी, कविता नवरे, प्रकाश काळेल, सतिशबिव्ही, सुनिधी, माधवएम, अजय जावडे, आशू_डी...
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. Happy

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
गणेशोत्सव संयोजक समितीचे आणि सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार !

अरे वा..... !!
सगळ्या विजेत्यांचं मनापासून अभिनंदन Happy

Pages