कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका २ : फसगत - sharadpatil

Submitted by संयोजक on 24 August, 2009 - 10:22

प्रवेशिका २ : फसगत

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

सत्तेच्या धुंदीत नको ते बरळत होते..
आपण जनतेचे सेवक हे विसरत होते!

झुंडीपुढती नमते घेती का सरकारे?
इतिहासाचे धडे पुन्हा का बदलत होते?

वर्तमानपत्रात धुमाळी अपशब्दांची,
निवडणुकांची नांदी झाली... समजत होते!

थंडपणाचा आव आणती षंढ माणसे,
कधीतरी पण रक्त तयांचे उसळत होते!

तुझी करावी स्तुती असे वाटलेच नव्हते
जे होते ते माझ्या हातुन नकळत होते!

'मी नाही त्यातली, लाव ना कडी आतली',
भल्याभल्यांची सहज अशाने फसगत होते!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users