चांदोबा आता ऑनलाइन

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

'कॉमिक बुकं' हा आपल्यापैकी बहुसंख्यांनी लहानपणी केलेल्या रेल्वेप्रवासातल्या आठवणींचा अविभाज्य घटक आहे. चाचा चौधरी, फँटम वगैरे कॉमिक बुकांच्या जोडीने 'चांदोबा' हे तसं रूढार्थानं कॉमिक बुक नसलेलं नियतकालिक बालगोपाळांमध्ये तुफान लोकप्रिय होतं! त्या चांदोबाची मराठी ऑनलाइन आवृत्ती आता उपलब्ध झाली आहे.
पूर्वीच्या चंदामामा (भारत) प्रकाशनसमूहाच्या सध्याची मालक असलेल्या जिओडेसिक लिमिटेड कंपनीने मराठीसह कन्नड, तमिळ, हिंदी, इंग्लिश व तेलुगू भाषांमध्ये चांदोबाची ऑनलाइन आवृत्ती काढण्यामागे भारतातील आंतरजाल-वापरकर्त्यांचा वाढता ग्राहकवर्ग (मार्च २००९ मधील आकडेवारीनुसार डायल-अप, ब्रॉडबँड इत्यादी प्रकारांच्या जोडांची एकंदरीत संख्या १ कोटी ३४ लाख) चाचपण्याचा हेतू आहे. सध्या तरी या संस्थळावर ऑनलाइन आवृत्तीचे वर्गणीशुल्क नसले, तरीही (बहुधा) यात छापील आवृत्तीतला १००% आशय नाहीये. ताज्या कथा, कॉमिकांखेरीज काही जुन्या अंकांमधल्या (साठीच्या दशकातल्या) कथा व जाहिराती त्यांच्या जुन्या संग्रहांमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहेत. विशेषकरून त्या जुन्या जाहिराती वाचून स्मृतिकातर व्हायला होतं!
याविषयी अधिक वृत्तं इकडे उपलब्ध :
१. (इंग्लिश वृत्त) http://www.medianama.com/2009/09/223-geodesics-chandamama-adds-5-indian-...
२. (इंग्लिश वृत्त) http://www.alootechie.com/content/chandamamacom-now-also-available-kanna...

प्रकार: 

चांदोबाच्या आठवणीने खूप छान वाटलं. विक्रम्-वेताळ आवडायचीच पण त्यातल्या दीर्घकथा (विचित्र देश, तीन राजकन्या) खूप आवडायच्या. त्यात एक माझ्या खास आवडीची दीर्घकथा होती, नायक जयराम का जयशील कोणीतरी होता आणि नायिका राजकुमारी कांचनमाला, त्यात एक सिध्द्साधक म्हणून मांत्रिकही होता. कोणाला आठवतेय का ती? तसंच 'देवी भागवत' मधली चित्रंही फार सुंदर होती.

एकही लिंक दिसेल तर शप्पथ..
चांदोबा , चंपक वाचुन किती धावत आली होती मी पर तुम लोग..गाजर दिखाते हो Sad

विक्रम आणि वेताळ मधल्या चित्रात राजा विक्रम खांद्यावर प्रेत टाकून तलवार उपसून चालतांना दाखवलेला असे. त्यावेळेस बाजूच्या झाडांवर अनेक भुते बसलेली/लटकलेली असंत. ही भूतं थक्क होऊन विक्रमकडे पहात असंत. लहान वयात भुतांच्या चेहऱ्यावरील हावभाव अतिशय विनोदी वाटायचे. मी त्यांच्याकडे बघून खूप हसायचो. माझं हसणं बघून इतर मुलं पण हसायला लागायची.

-गा.पै.

<< 'बच्चा भी देखेगा और बच्चेका बाप भी देखेगा' <<< और बापका बापभी देखेगा !! नातवाकडे गेलों कीं मीं आणि नातू यांचा आणखी हा एक जॉईंट कार्यक्रम पक्का !! Wink

किशोर मासिक चालू आहे का अजूनही? असल्यास कुठे मिळेल?>>

हे बालभारती प्रकाशनाचे मासिक बर्‍याच बसस्थानकावर मिळते बहुतेक!

पुण्यात बालभारतीच्या कार्यालयात पण मिळते तसेच मासिक वर्गणी भरुन घरपोच येते. मी मागे ४-५ वर्षापुर्वी सुरु केलेले. त्यांचे काही खंड पण प्रकाशित झालेत निवडक किशोर नावाने.. मी आणलेत ४ निवडक खंड.

माझ्याकडे नाही दिसत. "सर्व्हर नॊट फ़ाऊंड" . Uhoh

नाही नाही , ते वाक्य , "तुझ्या डोक्याची शम्भर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील" असे असायचे >>>>>>.. हो असचं असायचं ते वाक्य. तोंडपाठ झाल होतं. Happy

एका मैत्रिणीने व्होटसएप वर हे पाठवलं

लहानपणी.. *चांदोबा* अंक वाचायला सर्वांनाच आवडत असे.. 
या लिंकवर क्लिक केल्यास आपल्याला *चांदोबा मासिकाचे* स्कॅन केलेले १९६० ते २००५ पर्यंतचे अंक मिळतील आणि ते डाऊनलोडही करता येतील. 

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-EksNuzurbfZj72Dbso4rIsTq...

मी उघडून पाहिलेल्ं नाही त्यामुळे लिंक चालतेय की नाही माहीत नाही

मी विचारून पाहिलं. लिंक तीच आहे. काल सबफ़ोल्डर्स दिसत होते. आज गायब झालेत. बहुधा काढून टाकल्या असतील फाईल्स. कोणीतरी मला किशोरची लिंक पाठवली होती. शोधून पहाते. एक अंक डाउनलोडही केला होता

http://kishor.ebalbharati.in/Archive/

चांदोबा ज्या कंपनी ने विकत घेतला होता डिजिटल करण्यासाठी ती दिवाळखोर झालीये. त्यांनी दुसरया कंपनी ला प्रताधिकार विकलाय.

Pages