ओरिगामी सुशी साठी:
- राईस पेपर किंवा स्प्रिंगरोल रॅप्स - ४ ते ६ (साईजप्रमाणे),
- शिजलेला भात - २ वाट्या (खोली तापमानाला),
- फेटलेले दही - १ वाटी,
- लांब तुकडे (ज्युलिअन्स) केलेले गाजर + बीट - १ वाटी,
- आपल्या आवडीचे कुठलेही जर्द हिरव्या रंगाचे सॅलॅड (कोवळी पालकाची पाने, कांद्याची पातं इ) - १ ते दीड वाटी,
- बारिक किसलेले आले - १ टेबल स्पून,
- बारिक चिरलेली हिरवी मिरची - १ टी स्पून (आवडी नुसार कमी जास्त),
- चिरलेली कोथिंबीर - १ वाटी,
- चिरलेली पुदिन्याची पाने (ऑप्शनल) - १०-१२ पाने'
- मीठ आणि हिंग - चवीला,
- कोमट पाणी + पसरट डिश,
- सउशी मॅट किंवा किचन टॉवेल किंवा ताट.
मिंट डिपींग सॉस साठी:
- छिरलेली पुदिन्याची पाने - १०-१५ (आवडी नुसार कमी जास्त),
- चिरलेली कोथिंबीर - १ वाटी ,
- चिरलेली हिरवी मिरची - १ ते २ टी स्पून (आवडी नुसार कमी जास्त),
- बारिक किसलेले आलें - १ टी स्पून
- मीठ, लिंबु, साखर - चवीला.
जपानी 'सुशी' हा प्रकार ऑस्ट्र्लिया त आल्यावर पहिल्यांदी ऐकला. नावावरुनच (नाक मुरडलेली बाहुली) हा पदार्थ जरा विचित्रच वाटत होता . त्यातुन मी शाकाहारी त्यामुळे आत सीफुड भरलेला आणि सी वीड मधे गुंडाळलेल्या पदार्थाची चव घ्यायला मन नकोच म्हणत होतं. पण युनी मधल्या एका जपानी मैत्रिणी ने खास माझ्यासाठी शाकाहारी सुशी बनवुन आणली. तिने एव्हढा माझा विचार करुन सुशी आणली म्हणुन मी खाऊन बघितली. पण त्या बाहेरच्या सी वीड ची चव काही आवडली नाही. त्यामुळे परत कधी त्या सुशी कडे वळले नाही.
परंतु मागच्या काही वर्षात सुशी च्या दुकानांचे मॉल्स मधे फुटलेले पेव (हल्ली भारतात जपानी रेस्टॉरंटस, पंचतारांकित हॉटेल्स मधे सुशी मिळते) आणि दुकानात दिसणार्या सुबक आकाराच्या, हेल्दी सुशी बघुन काहीतरी आयडिया करावी असे वाटले. राईस पेपर चे सॅलॅड रोल्स मी नेहेमी करते पण त्याची सुशी बनवावी ही आयडिया मा बो च्या या स्पर्धेमुळे सुचली...
बरच झालं आता सुशी पुराण...चला तर ही घ्या पाककृती...
ओरिगामी सुशी:
१. शिजलेल्या भातात दही + आलं + चिरलेली कोथिंबीर + मिरची + पुदिना (ऑप्शनल) चवीला मीठ आणि हिंग घालुन घट्ट कालवुन घ्यावा.
२. गाजर + बीट यांचे लांब पातळ तुकडे (ज्युलियन्स) करावेत. तसेच आवडत्या सॅलॅड्स ची पाने लांबट चिरुन घ्यावीत.
३. एका पसरट ताटात कोमट पाणी तयार ठेवावे.
४. आता एक राईस पेपर घेऊन तो या पाण्यात अगदी ८ -१० सेकंद बुडवावा व मॅट/टॉवेल/ताटा वर ठेववा. साधारण अर्ध्या मिनीटात पेपर नरम होईल.
५. त्यावर आता चित्रात दाखवल्याप्रमाणे कालवलेला भाताचा थर पसरावा. (थर फार जाड नको).
६. भाताच्या एका कडेवर (आपल्या बाजुला) गाजर + बीटाचे तुकडे पसरावेत.
७. आता कागदाची आपल्याकडची बाजु उचलुन ती गाजर + बीटावर ठेऊन एक गुंडाळी करावी.
८. गुंडाळलेल्या भागावरती चिरलेल सॅलॅड घालावे व आपल्या डाव्या आणि उजव्या बाजुच्या पेपरच्या कडा त्यावर दुमडाव्यात.
९. आता पेपर गुंडाळुन त्याचा रोल बनवावा.
१०. या रोलच्या दोन्ही बाजुचे दुमडलेले तुकडे कापुन घ्यावेत व मधल्या रोलचे १ इंच जाडीचे तुकडे करावेत. तुकडे करण्यासाठी सुरी कोमट पाण्यात बुडवुन घ्यावी म्हणजे दही चिकटणार नाही व काप नीट होतिल.
११. हे तयार तुकडे एका ताटात दमट (घट्ट पिळलेल्या) कपड्यावर ठेवावेत व वरुन परत एक दमट टॉवेल ठेवावा म्हणजे बाकीचे रोल्स होईपर्यंत भात कोरडा पडणार नाही.
मिंट डिपींग सॉस:
सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सरमधे चटणी करावी. थोडी पातळसरच अस्सवी म्हनजे सुशीला लावुन खाता येते.
आता ओरिगामी सुशी रोल्स, मिंट डिपींग सॉसबरोबर सर्व करावे.
१. हा एक अतिशय हेल्दी पदार्थ आहे. राईस पेपर ग्लुटेन फ्री, फॅट फ्री असतो. भात ग्लुटेन फ्री असतो. दही लो फॅट चालेल. भरपुर सॅलॅड, गाजर असते त्यामुळे पचायला ही हलका
२. यात आपल्या आवडी प्रमाणे सी फुड, मोड आलेली कडधान्ये घालता येतिल. सुशी ही शक्य्तो कच्चा पदार्थांचीच बनवतात पण आपल्याकडे कची सी फुड खात नाहित त्यामुळे उकडलेले प्रॉन्स, फिश चालेल.
३. राईस पेपर लहान मोठ्या साईजचे मिळतात. कुठलाही उपलब्ध साईज चालेल.
४. राईस पेपर च्या पाकिटावर गुंडाळी कशी करायची याची इंस्ट्रक्शन्स असतात (बहुतेक वेळा).
५. भात कालवताना त्यात थोडा मिंट सॉस घातल्यास भाताला छान हिरवा रंग येइल.
६. भारतात राईस पेपर मिळाला नाही तर १ वाटी तांदुळाची पिठी + २ चमचे मैदा + मीठ एकत्र करुन ताज्या फेण्या वाफवुन त्याची वरिल प्रमाणे सुशी बनवावी...
(हा माझा पहिला प्रयत्न आहे मायक्रोव्हेव मधे फेणी बनवण्याचा, त्यामुळे एव्हढी पातळ नाही झाली. पण सवयीने जमेल :)).
७. सुशी हा पदार्थ करायला अतिशय सोप्पा आहे (वरती मला लिहायलाच जास्त वेळ लागला) आदल्या दिवशी रोल्स करुन दमट कापडात गुंडाळुन फ्रिज मधे ठेवले तर आयत्या वेळेला कापुन १० मिनीटात उपहार तय्यार.
सहीच. ही सुशी करुन बघायला (
सहीच. ही सुशी करुन बघायला ( आणि खायलाही ) आवडेल
मस्त आहे गं हि सुशी
मस्त आहे गं हि सुशी
)
जपान्यांना एकदा खायला घालायला हवी (कदाचित जपानी लोक जीव देतील भातात दही मिसळल्यामुळे
धन्स लोक्स कदाचित जपानी लोक
धन्स लोक्स
कदाचित जपानी लोक जीव देतील भातात दही मिसळल्यामुळे<<
त्यांना म्हणाव वसाबी मिसळा 
ला>>>>>जो...... सह्हीये..
ला>>>>>जो...... सह्हीये.. लग्गेच माझ्या डायरीत उतरून घेतली .. एक्दम तोंपासु..

माझ्याकडे राईस पेपर चं पॅकेट आहे.. त्यातील काही मी विएटनामीज रोल्स साठी वापरले पण नीट गुंडाळण्याची प्रक्रिया तुझ्या लेखातून आताच समजली.नाहीतर मी नुस्त्या पुरचुंड्या करून खाऊन टाकत असे.. सर्व्ह करण्यालायक गुंडाळताच येत नव्हत्या
टुमॉरो इज सुशीताई डे
@ वर्षू नाहीतर मी नुस्त्या
@ वर्षू
नाहीतर मी नुस्त्या पुरचुंड्या करून खाऊन टाकत असे..

तूच लिहावीस ही वाक्य!! आमच्या घरी थाई स्प्रिंग रोल हा "स्टेपल" असतो. आता लाजो चा प्रकार करून बघते. जबरा वाट्तोय. थँक यू लाजो!
लाजो, वाचल्यावर माझ्याआत अगदी
लाजो, वाचल्यावर माझ्याआत अगदी खोलखोल दडलेल्या किंचित सुगरणीला साद घातली गेली. काल जाऊन लगेच सीवीड रोल (सुशी नोरी) आणि राईसपेपर आणले. वासाबी आणली. आताच करून खाऊनही टाकले. मस्तच लागली. सीवीड रोल मुळे आणखीनच ओरीजिनल चव आली. सीफूड नव्हतं तरी चालवून घेता आलं.
सीवीड रोल वापरला तर गुंडाळी करताना शेवटी कसं काय चिकटवायचं बुवा? भातही जरा चिकट हवा ना?
सुशी मला अतिशय आवडते. (उत्साह टिकला तर) आता घरीही करता येईल त्यामुळे आनंद वाटतोय.
धन्स मामी सीवीड वापरायची
धन्स मामी
सीवीड वापरायची असेल तर जॅस्मिन राईस सारखा चिकट भात वापरावा लागेल आणि सुशीसाठी मिळणार्या बांबू मॅट वर सुशी लावुन मग मॅट घट्ट गुंडाळत गुंडाळत सुशी रोल करावी लागेल.
मला स्वतःला सीवीडची चव आवडत नाही म्हणुन मी हे राईसपेपरचे व्हर्जन करते
भारी दिसतेय रेसिपी
भारी दिसतेय रेसिपी लाजो...करून बघायचा मोह होतोय...
आजच लेकीच्या आग्रहाखातर आज
आजच लेकीच्या आग्रहाखातर आज डिनरला केली. या आधीही दोनदा करून झालीये पण त्यावेळी फोटो काढले नव्हते.
काकडी, गाजर, आव्हाकाडो सुशी:
लाजो, या रेसिपीकरता पुन्हा एकदा धन्यवाद.
सुशी सही दिसतेय मामी
सुशी सही दिसतेय मामी
भारी जमलीये मामी. उजवीकडच्या
भारी जमलीये मामी. उजवीकडच्या प्लेटमध्ये सॉय सॉस आणि वासाबी आहे का?
मामी, ती नोरी आहे का? नोरी
मामी, ती नोरी आहे का? नोरी कुठे मिळते इथे (मुंबई / ठाण्यात) ?
दुसर्या डिश मधे वासाबी आहे का? ती कुठे मिळाली?
तुम्ही नोरी वापरुन भातात दही वापरलं का?
धन्यवाद लोक्स. हो सायो.
धन्यवाद लोक्स.
हो सायो. वासाबी आणि सॉय सॉस.
सावली, नोरी म्हणजेच सीवीड ना? गोदरेजच्या नेचर्स बास्केटमध्ये नोरी, वासाबी मिळाली. तिथे राईसपेपर आणि इतरही अनेक जॅपनीज खाद्यपदार्थ मिळतात.
भाताला दही, आलं-हिरवी मिरची वाटून लावलं आहे. चव फारच छान आली होती.
हो हो. नोरी म्हणजे सीविड.
हो हो. नोरी म्हणजे सीविड. विसरलेच सिविड लिहायला.
थँक्यु.
गोदरेज नेचर्स बास्केट कुठे आहे ते शोधते आता
दही आणि नोरी हे एकत्र जरा कठीण आहे माझ्यासाठी.
वॉव सापडलं ठाण्यात आहे
वॉव सापडलं
ठाण्यात आहे त्यांचे दुकान. सिविड ऑनलाईन शॉप मधे दिसलं नाही पण जाऊन विचारते.

महत्वाचं म्हणजे मिसो पेस्ट पण दिसली
थँक्यु मामी.
दही आणि नोरी हे एकत्र जरा
दही आणि नोरी हे एकत्र जरा कठीण आहे माझ्यासाठी. >>> का? का? विरुध्द आहार की काय ते नाही ना? एकत्र चव आवडत नाही का? दह्याच्या ऐवजी लिंबू पीळ.
विरुद्धाहार नसावा पण मलाही
विरुद्धाहार नसावा पण मलाही दही-भात घालून सुशी ही कल्पना जरा विचित्र वाटतेय. इथे जी व्हेज सुशी मिळते त्यात
दही नसतं मग त्याचं प्रयोजन काय?
इथे जी व्हेज सुशी मिळते त्यात
इथे जी व्हेज सुशी मिळते त्यात दही नसतं मग त्याचं प्रयोजन काय>>>> लाजोची सुशी भारतीय चवीची आहे. त्यामुळे भाताला बाईंडींग म्हणून घातलं असेल. भातात आलं मिरचीची पेस्टपण आहे.
लाजोला विचार.
हो, तिचं भारतीय वर्जन आहे
हो, तिचं भारतीय वर्जन आहे त्यामुळे घटकही नेहमीच्या वापरातले आहेत. पण जर चिकट जॅपनीज राईस वापरला तर कदाचित दह्याची गरज भासणार नाही.
दही नावाला गं. भात एकत्र
दही नावाला गं. भात एकत्र रहायला. मी चांगली आंबेमोहराच्या भाताची सुशी केलीये. तोही तसा चिकट होतोच पण तरीही.
विरुद्धान्न वगैरे नाही. पण
विरुद्धान्न वगैरे नाही. पण दही आणि नोरी एकत्र चव आवडणार नाही.
मुळ सुशी रेसिपी मधे मिरीन ( विनेगर सदृश्य पण बहुतेक याला राईस वाईन म्हणतात. नक्की माहित नाही) घालतात त्याआधी एखादा चिकट वासरहीत तांदुळ आणावा लागेल.
त्याचं प्रयोजन काय >> लाजोची रेसिपी भारतीय आहे म्हणुन त्यापद्धतीने केल्यास दही चालेल.
मुळ सुशी रेसिपी मधे मिरीन >>>
मुळ सुशी रेसिपी मधे मिरीन >>> इकडे त्याला राईस विनीगर म्हणतात. सुशीचा वेगळा तांदूळही मिळतो.
Pages