मी छोटा चित्रकार...

Submitted by साक्षी on 1 September, 2009 - 13:37

ved-maayboli.jpg

नाव : वेद नाटेकर
वय : १ वर्ष ८ महिने
माध्यम : वॉटर कलर
पालकांची मदत : अर्थातच, त्याच्या हाताला रंग लावणे (फासणे), त्याचा हात कागदावर उमटवणे, चोच्,डोळा आणि तुरा काढणे. आणि महत्वाचे म्हणजे नंतर हात धुणे. (आणि चित्र ईथे अपलोड करणे)

एकाजागी आईजवळ बसणे (जे त्याच्यासाठी अत्यंत अवघड आहे) एवढाच काय तो वेदचा सहभाग.:)

~साक्षी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रन्ग लावतानाची, कागदावर ठसा उमटवितानाची, तो ठसा बघतानाची त्याचि प्रतिक्रिया काय होती ग?
त्याला गम्मत देखिल वाटली असेल, नेहेमी काजळतीट करणारी आई आज हे काय करत्ये????
पण ही आयडिया मला आवडली! Happy

सर्वांना मनापसून धन्यवाद.

पण सगळ्या प्रवेशिका दिसतात त्या पानावर माझी प्रवेशिका का दिसत नाहिये?

~साक्षी.

मस्त आहे. आणि एरव्ही हात माखुन घेऊ नको अस ओरडणारी आई स्वतःच हाताला रंग लावते तेव्हा अगदी अगदी आश्चर्य नी आनंद भरुन येतो नाही Happy

रन्ग लावतानाची, कागदावर ठसा उमटवितानाची, तो ठसा बघतानाची त्याचि प्रतिक्रिया काय होती ग?>> तो तर आधी रंगाच्या डब्या बघूनच इतका खूश झाला. त्याला ह्याला हात लावू नको, त्याला हात लावू नको असं सांगत सांगत सगळं साहित्य जमवलं आणि एक डबी उघडली आणि लक्षात आलं फडकं घ्यायचं राहिलंय. परत मी उठून फडकं आणेपर्यंत बेट्याने डबीत बोट बुडवून हातापायाला रंग लावून घेतला. हात पाय धुवून बसलो. एकदा रफ कागदावर रंगीत तालीम झाली. ते बघून तो 'अजून अजून', 'लंग लंग (रंग रंग)' म्हणून ओरडत होता. (हात धुवून परत बसलो म्हणेपर्यंत 'शू शू' झाली. झालं, परत गेलो आम्ही पाय धुवायला!) मग फायनल चित्र काढायला बसलो ते त्यानं हात हलवल्यानं फिस्कटलं. (परत हात धुतले :() मग एका बोटाला लाल रंग लावला तर त्याच बोटानं त्याने आपला पार्श्वभाग खाजवला Happy
हे सगळं करत मग त्याला ईतकी झोप आली होती, जांभया देत देत एकदा चित्र पूर्ण झालं.

~साक्षी.

हे हे मस्त. Happy चित्र सही आलंय. त्याबद्दल त्याला शाब्बासकी. त्याने हात हलवून गोंधळ घातला नाही म्हणून तर छान आलंय ना Happy

त्याने हात हलवून गोंधळ घातला नाही म्हणून तर छान आलंय ना>>
हे मात्र खरं आहे. बिचारा तास-दिड तास तरी बसला होता माझ्याबरोबर!

~साक्षी

तुझा आणि त्याचाही पेशन्स मानला खरोखर साक्षी. Happy
आमच्या लेकीचा बुड लावून एका जागेवर बसायलाच विरोध असतो. {ज्यांना हे वाक्य आक्षेपार्ह वाटतं त्यांना माझ्या आ़जीची खास शब्दसंपत्ती सांगावी का? Wink }

साक्षी, चित्राची शब्दखूण बदलून फक्त "चित्रकला स्पर्धा आणि मायबोली गणेशोत्सव २००९" कर. म्हणजे चित्र इतर प्रवेशिकांबरोबर दिसेल. इतर आयांनी पण लक्षात ठेवा Happy

तसेच शब्दखूण वरील प्रमाणे दिली नाही तरी प्रवेशिका बाद वगैरे होणार नाहीये. फक्त इतर प्रवेशिकांबरोबर दिसणार नाही इतकेच. तेव्हा काळजी नसावी Happy

cinderella,

बदल केलाय.
धन्यवाद.

~साक्षी

Pages