"चित्तोडगड"

Submitted by Girish Kulkarni on 31 August, 2009 - 23:20

*****************************************************
*****************************************************

काही वर्षांपुर्वी मी माझ्या मुलाला-कबीरला राजस्तानांत चितोडगड दाखवायला घेऊन गेलो होतो....त्याच्या राणाप्रतापांबद्दलच्या अन माझ्या मीराबाईंबद्दलच्या उत्सुकतेपायी ! जाऊन आल्यानंतरही "चित्तोडगड" काही पाठ सोडेना...तिथल्या आख्यायिका..पद्मिनीचा जलमहाल ..मीरेच कृष्ण मंदीर..माझ देररात्रीपर्यंत जोहारकुंडावर थांबण्..(गाईड सवयीन इथे अजुनही रात्री चित्कार ऐकू येतात म्हणुन सांगुन गेलेला..). सगळ मनांत कुठेतरी जमून बसल होत्...
आज निमित्त झाल क्रांती बरोबरच विपुतल मीरेबद्दलच चिंतन...
त्यानंतरच्या माझ्या मंथनातन बाहेर आल्या त्या या ओळी...चित्तोडगड नावाच्या महागाथेला अर्पण!!!!

*****************************************************
*****************************************************
राणासांगा ते राणाप्रतापापर्यंत सगळ्यांना वाढवलस..धैर्य दिलस तू
यवनी आक्रमणांतले वार झेललेस अन राजपूतांचे प्रहार जोपासलेस तू
अन हे सगळ्-सगळ चिरंतनासाठी तुझ्यात जतनही करुन ठेवलयस तू
या सगळ्यांच्या बरोबर
तू मीरेलाही रंगवलस निरामय प्रेमभक्तीत
तूच पाहीलस स्वार्थहीन प्रेमाच ते रुप..उज्जवलपणे
तू पदमिनीलाही दूरदेशातुन आणलस..सजवलसही
तूच तिचा जोहारही बघीतलास्...असहायपणे
तूच तर हे सगळे सारीपाट मांडतांना रचलेस अन मोडतांना जपलेस
तूच तर ह्या गाण्यांना-विराण्यांना आदी ते अनंतापर्यंत जिवंत राखलेस
तूच तर साक्षीदार या सगळ्या प्रणयांचा अन प्रलयांचाही
तूच तर सुत्रधार या सगळ्या कहाण्यांचा अन जाणीवांचाही

तू हे सगळ घेऊन जे उभा आहेस शतकांपासुन
त्याला माझ्यासारखे अर्धशिक्षीत इतिहास म्हणतात
डॉलर घेऊन फिरणारे पर्यटक झक्क्कास म्हणतात
काही अजाण...चेतक घोडाच कसा क्लास म्हणतात
अन तूझ्या वर जगणारे तुला रोजचा घास म्हणतात
या सगळ्यांना कस समजणार आहे
तू काय काय भोगलयस आयुष्यात ते
...............मग ते
आजच्या जाणीवांच्या पलीकडच राजपूतांच शौर्य अन अकाली हनन असो
की पदमिनीच शापीत लावण्य अन हजारो यामीनींच भीषण विटंबन असो
मीरेचा अघटीत अन अचंभीत करणारा प्रेमभक्तीचा न्यास असो
की तू अविचलपणे पाहीलेले राजपूतांचे उत्सव अन वनवास असो
हे सगळ एका कवितेत बसवण तस कठीणच रे....
म्हणूनच मी एक करीन....माझ्या मुलाला मात्र सांगीन....
"तू" म्हणजे काही फक्त चेतक घोड्याचीच गोष्ट नाही....
लिहीलेला तो इतिहास अन जपलेल्या त्या अख्यायिका...
जमलच त्याला तर यांतला फरक ह्रूदयाने करायला शिकवीन
मीरेच प्रेम की भक्ती ..पदमीनीचा जोहार सक्ती की मुक्ती
यात न जाता तू जपलेला त्यांचा वसा कसा मोठा ते शिकवीन
तूच सांग एक भोगवादी संस्कृतीचा पाईक आणखी काय करु श़कतो...
हां आणखी एक करु शकतो...तुला अगदी झुकुन सलाम करु शकतो !!!!

****************************************************
****************************************************

गुलमोहर: 

ग्रेट कविता................. "Hats ऑफ"

तूच सांग एक भोगवादी संस्कृतीचा पाईक आणखी काय करु श़कतो...
हां आणखी एक करु शकतो...तुला अगदी झुकुन सलाम करु शकतो !!!!

वाह या ओळी एकदम खल्लास.........! tRuE wOrDiNgS

गिरिश,
छान ! क्षणभर तू मलाही पद्मिनिच्या जोहारकुन्डावर स्तब्ध बसायला लावलसं.
मीरेचे अलौकीक प्रेम, अन पद्मीनीचा आत्मसन्मान , दोघींनी म्रुत्यूलाही हरविलं
एक विष प्याली अन दुसरी अग्नीला निर्भयपणे समर्पित झाली. समर्पणाचं हे विस्मयकारी रूप आपल्या भयभीत जगण्याला अजूनचं खूजं बनवून जातं. खरच तू किंवा आपण काय करू शकतो ?

खरंय.. चितोडगड पाहून आल्यावर मलाही कितीतरी दिवस त्या जोहारकुंडातल्या धगधगत्या ज्वाला, त्यात उड्या घेणार्‍या हजारो स्त्रिया, त्यांची लहान मुलं..त्यांचे आक्रोश, किंकाळ्या , राक्षसासारखे चाल करुन येणारे मुघल सुलतान..घोर विटंबना, मीरेची भक्ती, ती संपवण्यासाठी केलेल्या क्लृप्त्या, महाराणाची २६ वर्षांची हल्दीघाटी मधली अविरत प्राणपणाने लढलेली झुंज्..आणि शेवटी एका वैभवाचा अस्त हे सगळं डोळ्यापुढे दिसत होतं.. त्या मानसिक त्रासातून स्वतःला बाहेर काढायला बरेच दिवस लागले. Sad
अगदी त्याच भावना तुम्ही कवितेतून सादर केल्या.. आपण हळहळणे आणि सलाम ठोकणे याशिवाय काहीच करु शकत नाही. आणि अशा प्रसंगीच तिथं आपली नावं कोरत बसणारे लैला मजनू पाहिले की डोक्यात संतापाची सणक जाते. त्यावेळी आपण त्यांना सांगू शकतो, पण आपल्यामागून येणार्‍याचा बंदोबस्त काय? आणि मग पुन्हा.. त्या वांझोट्या संतापानंही रडू फुटतं..कीड आहे ही आपल्या पिढ्यांना लागलेली..

तूच तिचा जोहारही बघीतलास्...असहायपणे
तूच तर हे सगळे सारीपाट मांडतांना रचलेस अन मोडतांना जपलेस

तूच सांग एक भोगवादी संस्कृतीचा पाईक आणखी काय करु श़कतो...
हां आणखी एक करु शकतो...तुला अगदी झुकुन सलाम करु शकतो !!!!

गिरिषजी...मी मगे तुमच्ग्याबद्दल जे बोलले कि तुम्हि तुमच्या कवितेत खूप तल्लिन झाला अहत्...ते उगाच नाही काही....!......तुम्ही जे मांडल आहे ते अप्रतिम आहे...ज्यानीं चितोडगड नाही पाहीला त्यनाही मोह होत आसनार ...आणि ज्यानी पाहिला त्याना वाटत असेल की अरेच्या अपल्याला नही सुचल हे सगल्...त्यना (मलाही) हेवा वटतो.माफ करा पण खरं बोलत असल्यने जे वाटल ते लिहिलं.किती छान लिहिता हो तुम्ही...

ताजमहाल प्रेमाच तर
चितोडगड म्हणजे सामर्थ्याच प्रतिक आहे .
चितोडगडा विषयीपण खुप वाचन झालाय आधी पण साक्षात चितोडगड समोर उभा केलात तुम्ही आयुष्यात एकवेळेस जरुर जावुन येईन तिथं. ...सुंदर आहे कविता....

सलाम गिरिशजी...सलाम

कविता वाचल्यावर खरोखर इतिहासाकडे बघण्याचा व त्याला समजविण्याचा द्रुष्टिकोन अधिक व्यापक होतो....

नितिन

वा! खरंच चितोडगड उभा केला कवितेतून.

"तू" म्हणजे काही फक्त चेतक घोड्याचीच गोष्ट नाही....
लिहीलेला तो इतिहास अन जपलेल्या त्या अख्यायिका...
जमलच त्याला तर यांतला फरक ह्रूदयाने करायला शिकवीन
मीरेच प्रेम की भक्ती ..पदमीनीचा जोहार सक्ती की मुक्ती
यात न जाता तू जपलेला त्यांचा वसा कसा मोठा ते शिकवीन
तूच सांग एक भोगवादी संस्कृतीचा पाईक आणखी काय करु श़कतो...
हां आणखी एक करु शकतो...तुला अगदी झुकुन सलाम करु शकतो !!!!

याशिवाय काहीच नाही!

अप्रतिम!!!

गिरिश.. चित्तोड्गड वर फिरताना अगदी असच वाटल होत..
पण तुम्ही अतिशय सुन्दर रीतिने शब्दात मान्डलत.. जे आम्हाला नाही जमल.. !!

गिरीष,

फार छान लिहीता!

कवितेआधीचं चिंतन सुरेख उमटलय कवितेमध्ये!

लिहीत रहा!

"तू" म्हणजे काही फक्त चेतक घोड्याचीच गोष्ट नाही....
लिहीलेला तो इतिहास अन जपलेल्या त्या अख्यायिका...
जमलच त्याला तर यांतला फरक ह्रूदयाने करायला शिकवीन
मीरेच प्रेम की भक्ती ..पदमीनीचा जोहार सक्ती की मुक्ती
यात न जाता तू जपलेला त्यांचा वसा कसा मोठा ते शिकवीन
-भावना मस्त व्यक्त झाल्या आहेत.

महेश्, राहुल्, आशु डी, रघुसुत, राधाजी, बाळू सोनवणे, नितीन, क्रांती, चेतना, उमेश, सारंग, सानिका, माणिक, करंदीकरसाहेब्, अलका काटदरे :

आतापर्यंत प्रतिसादांमुळे छान वाटायच्...उत्साह यायचा. या कवितेवरच्या तुमच्या सविस्तर अन दिलखुलास प्रतिसादांमुळे एकदम मोहरुन झाल्यासारख झालय. हे लिखाण मी खुप मनापासुन केलेल असल्यामुळे जरा अपेक्षा होत्या... त्या पुर्ण झाल्याच समाधान मोठ आहे !!!

आपले सगळ्यांचेच शतशः आभार !!!

लोभ असावाच हा आग्रह !!!!
सस्नेह
गिरीश

गिरिश जि..खरचं सुरेख लेखन..
शान्त, स्तब्ध, तल्लिन होवुन फक्त शोशत गेले...नि अन्ति एकमतहि!!

गिरीशजी, अगदी जळजळीत कविता...चित्तोडगड पाहुन आल्यावर आणि गाईड करुन त्याचा इतिहास ऐकल्यावर माझीही वाईट आवस्था झाली होती..आशुने सांगितली आहे तशीच! राणी पद्मिनी आणि मीरा बद्दल ऐकलं तर होतंच खुप पण हा इतिहास कळल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर आणि सन्मान १००० पटीने वाढला.

मिलिंदा : हार्दीक आभार !!!! चुकुन लिहायलाच विसरलो तुम्हाला....उशिराबद्दल.... क्षमस्व !!!

सस्नेह : गिरीश

Pages